अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<बाकी तुम्हालाही माझ्यासारखे अण्णांना वापरले असे वाटत असेल तर गुड, वि बोथ आर ऑन राइट ट्रॅक.>>

नो, वि आर नॉट Happy
अण्णांनी मध्येच कच खायला नको होती. मग त्यांच्याबद्दल आदर वाटला असता. राजकारण वाईट म्हणून बाहेरच उपोषणं करत बसायचं होय? किती वर्षे?

एक व्यक्ती एक पोस्ट असं असताना त्यांनी राजीनामा दिला हे योग्यच केलं. >>

तुम्ही काय वाचताय हे माहित नाही. खूप काही गाळून तुम्ही काहीच झालं नाही असे म्हणता. पण त्यांना राजिनामा द्यायचा नव्हता. .. जाऊदे परत तेच तेच लिहित नाही.

सिलेक्टिव्ह रिडिंग हे पण भक्त असण्याचे लक्षण आहे. तिकडे नमोभक्त आणि काँग्रेसभक्त तसेच करतात. Happy

जकारण वाईट म्हणून बाहेरच उपोषणं करत बसायचं होय? किती वर्षे? <<< यु नो गांधी? ते स्वातंत्रदिनाच्या दिवशीही उपोषण करत बसले होते. असो ( अण्णा आणि गांधी सेम असे नाही पण उपोषण लिहिल्यामुळे )

@ केदार - आप मधले लोक एकमेकांशी भांडु देत नाही तर मिठ्या मारु देत. तुम्हाला काय फरक पडतो? आप सरकार आणि आमदार काम करत आहेत का नाही हे जास्त महत्वाचे आहे. पैसे खाल्ले नाहीत ना हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे.

आप फक्त केजरीवाल वर उभी आहे. बाकीची लोक मदतनीस असतील पण केजरीवाल नसेल तर त्यांना काही किंमत रहाणार नाही. यादव आणि भुषण ह्यांनी एकुणच स्वताचा आवाका ओळखावा आणि केजरीवाल ना त्रास देवू नये.

टोचा - इतर पार्टीत असे झाले असते (भाजपा सहित) तर इतक्या पोस्टी टाकायचे कारणच नव्हते. पण आप म्हणे पार्टी विथ डिफरंस आहे. आम आदमीची आहे म्हणून कळवळा ! अन्यथा इतर पार्टीत नेहमीच होते की ते. अगदी आज काँग्रेस मध्ये अशोक चव्हाण आणि नारायण राण्यांमध्ये वाद चालू आहेत

यादव आणि भुषण ह्यांनी एकुणच स्वताचा आवाका ओळखावा आणि केजरीवाल ना त्रास देवू नये. >> हं मे बी यु आर राईट, मे बी नॉट, केजरीवाल ह्यांना पुरून ऊरणार आहे हे नक्की आहे.

<<तुम्ही काय वाचताय हे माहित नाही. खूप काही गाळून तुम्ही काहीच झालं नाही असे म्हणता. पण त्यांना राजिनामा द्यायचा नव्हता. .. जाऊदे परत तेच तेच लिहित नाही.
सिलेक्टिव्ह रिडिंग हे पण भक्त असण्याचे लक्षण आहे. तिकडे नमोभक्त आणि काँग्रेसभक्त तसेच करतात.>>

मी वाचते कमी. ऐकते आणि पाहते जास्त. वर लिंक दिलेल्या व्हिडिओमध्ये योगेंद्र यादव स्वतः म्हणत आहेत की अरविंदने राजीनामा पाठवला होता. आम्ही तो नामंजूर केला.
ती 'मी येणार नाही' असा बालिश समस पाठवल्याची स्टोरी तुम्ही कुणाच्या तोंडून ऐकली?

<<आप मधले लोक एकमेकांशी भांडु देत नाही तर मिठ्या मारु देत. तुम्हाला काय फरक पडतो? आप सरकार आणि आमदार काम करत आहेत का नाही हे जास्त महत्वाचे आहे. पैसे खाल्ले नाहीत ना हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे.>>
+१०००

<<आप फक्त केजरीवाल वर उभी आहे. बाकीची लोक मदतनीस असतील पण केजरीवाल नसेल तर त्यांना काही किंमत रहाणार नाही. यादव आणि भुषण ह्यांनी एकुणच स्वताचा आवाका ओळखावा आणि केजरीवाल ना त्रास देवू नये.>>

त्यांनी प्रत्येकी एकेक राज्य घ्यावं. तिथेसुद्धा एस्टॅब्लिश व्हायचा प्रयत्न करावा. तरच विस्तार होईल.

टोचा,
केजरीवाल नसेल तरी त्यांची किंमत कमी होणार नाही. पण कदाचित मास अपील फार राहणार नाही. भूषणने कोर्टात आघाडी सांभाळावी, यादवांनी (अमेझिंग) स्पोक्सपर्सनचं काम करावं, ब्रेनस्टॉर्मिंगसाठी पुढाकार घ्यावा. जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना मोटिव्हेट करण्यात ते कमी पडतील असं वैयक्तिक मत.

ती 'मी येणार नाही' असा बालिश समस पाठवल्याची स्टोरी तुम्ही कुणाच्या तोंडून ऐकली? >> मी आधी लिहिले आहे की मी वाचले मिडीया मध्ये.

तसेही तुम्ही वाचत नाही म्हणजे अकेंच्या ट्विट अकाउंटवर पण तुमचा भरवसा नसणार म्हणा. ते म्हणाले की "I refuse to be drawn in this ugly battle" आणि " I am deeply hurt and pained by what is going on in the party. This is betrayal of trust that Delhi posed in us" हे तुम्ही वाचलं नसलं म्हणा. कारण ते ऐकु येत नाही.

मे बी तुम्ही लिहिल्यासारखे "अरे यार, मग प्रॉब्लेम आहे कुठे" ते उगाच बालिश ट्विट करत असावेत.

जाऊद्या मिर्ची. थांबतो आता मिटिंग आहे. Happy हॅव अ गुड डे अहेड.

<<मी आधी लिहिले आहे की मी वाचले मिडीया मध्ये.>>

तरीच. Happy

अकेंच्या ट्वीटमध्ये विश्वास न ठेवण्यासारखं काय आहे? प्रामाणिक मत - कप्तान ह्या नात्याने त्यांनी जहाज योग्य दिशेला वळवायचा प्रयत्न करावा. पण जिथे त्यांच्या कप्तानपणावरच वादळ आहे तिथे काय बोलणार?
गुडडे.

अप्पाकाका, खूप दिवसांनी पायधूळ झाडलीत. Lol

याचा अर्थ पायधूळ झाडण्याइतकाही धागा महत्वाचा वाटला नाही Proud

तरीच. स्मित >>> Lol Lol

मग काय यादव अन अके प्रत्येक गोष्ट मला हवी म्हणून ऐकवून दाखवणार आहेत की काय? मिडीयावर विश्वास नाही तुमचा, तरी तुम्ही हजारो लिंका देता. Happy

Couldn't resist myslef त्या तरीच मुळे Lol

जा, आता मिटींगला. आणि तिथे आप, केजरीवाल, यादव असलं काही बडबडू नका >>.
आणि हो. अजून ६ ला तीन मिनिटं आहेत. इथे जेवढं तुमच्या पोस्ट मुळे हसू येतंय तेवढं तिथे येणार नाहीच. म्हणून अजून एकदा रिफ्रेश करीन म्हणतो.

छान. आपच्या भांडणांमुळे भक्तज़ण बाहेर आले Happy
नाहीतर ३७०, मुफ्ती वगैरे मुद्द्यांमुळे आतच लपुन बसले होते Rofl

"तुझं-माझं जमेना, आणि तुझ्यावाचून करमेना" असं झालंय का तुमचं आपच्या धाग्याबद्दल ? Wink

तुमच्याकडून कधीकाळी पुन्हा एकदा आपच्या यशानिमित्त जेवणाची पार्टी घेता आली तर मी एक चांगली प्रचारक आहे असं म्हणून मी स्वतःचीच पाठ थोपटून घेईन.
आता मी पण कल्टी. बाय.

Just as the best position to bat is the non-strikers end, the best position in politics is to be in opposition. Nobody to defend modi or fadnavis's govt, many saying, what's happening is on expected lines and yet so vocal here. Btw, didn't anybody praise Mr.modi for such a hectic schedule in the u s of a while fasting, and hasn't hechimself said n number of times, that he hasn't taken a holiday in ages and sleeps so less.

ओ मिर्चिताई, ते आपचे अंतर्गत लोकपाल रामडॉस यांच्या पत्रातील मुद्द्यांचं काय झालं? त्यातुनच हे वादळ निर्माण झालेलं आहे ना? आणि हा सगळा गदारोळ निस्तरण्याऐवजी केजरीवाल कुठे पळ काढतायत, आजारपणाच्या नावाखाली.

माझी तर खात्री पटत चाललेली आहे कि केजरीवाल हे राज्य्/शासनकर्त्यापेक्षा विसलब्लोवर या भुमिकेसाठी फिट आहेत. काय आवश्यकता होती ट्विटरवर जाउन सांगण्याची की आप मधे चाललेला बेबनाव दुर्दैवी आहे वगैरे वगैरे. एक पक्षप्रमुख म्हणुन त्यांना हि अंतर्गत भांड्णं मिटवता येत नाहित? चव्हाट्यावर मांडुन सहनुभुतीची अपेक्षा करत आहेत का?

त.टि.: आपचे नुतन भक्त/समर्थक्/पुरस्कर्ते (पुर्वाश्रमिचे काँगेसभक्त) यांनी उत्तर दिले तरी चालेल... Happy

I hv never praised Modi for such reasons. If he has taken a responsibility, he has to deliver in his own manner. No need to show off yr dedication. people know that being a part of system is a hectic n demanding job. Nobody can run a govt by resting all the time or making issues of every small or big personal things. They cannot take 1 month leave for their children's exam or childrens marriage preparations as a common man. I never said anything abt Kejriwal's fever, cough or sugar news even if it came alonwith a bit show of his dedication. As a human being he can hv all possible difficulties. But, when I saw that if somebody is saying something in return of so many things which is not being tolerated at all, I mentioned it. That's all. I got the answer as expected.

मी अजूनतरी आपभक्त नाही. आपच्या नथीतून तीर मारतोय. जिथे शिवसेना सरकारवर टीका करू शकते तिथे एवढे खपेलच.

अ‍ॅप्रिश्येट योर ऑनेस्टी, मयेकर; नाहितर इतर अड्डेवाले - नये फकिर को भिक कि जल्दी या उक्तीची प्रचिती देत असतात... Happy

तुझं-माझं जमेना, आणि तुझ्यावाचून करमेना" असं झालंय का तुमचं आपच्या धाग्याबद्दल >>

छे छे हा तुमचा भ्रम असावा. कारण इतर आपचे विरोधक असा विरोध करत नाहीत, आक्रस्ताळेपणा करतात, त्यामुळे तुम्हाला चांगल्या शब्दात विरोध ऐकायची सवय राहिली नसावी. मी येथील पहिल्या व दुसरा धागा मिळून १५-२० एक पण नसतील टाकल्या. पण असे दिसते की मी आपच्या धाग्यावर आलो की तुम्हाला नसता त्रास (उद्वेग) होतो. Happy

तुमच्याकडून कधीकाळी पुन्हा एकदा आपच्या यशानिमित्त जेवणाची पार्टी घेता आली तर मी एक चांगली प्रचारक आहे असं म्हणून मी स्वतःचीच पाठ थोपटून घेईन >>> जरूर. एक काय दोन घ्या. तुम्ही आहात खर्‍या प्रचारक. हॅव टू गिव्ह दॅट टू यु. Happy आल्यावर नक्की पिंग करा. भेटू आपण.

पण मग प्रश्न पडतो की नमो प्रचारक पण असेच (सिलेक्टिव्ह रिडिंगचे) काम करतात, मग त्यांच्यावर का रागात येता? Lol

बाकी आमचे तारणहार श्री राहूल गांधी पण रजेवर जातात तर अकेंनी घेतली तर त्याचे काय नवल. फक्त ती अचानक राजकीय हालचाली गरम असताना घेत आहेत त्यामुळे लोकं जरा बिचकली इतकेच. मला तर वाटते की PAC जर सोडावी लागली (तसे होणार नाही, पण ..) तर केजरीवाल लगेच धरणे धरतील त्यांच्याच पार्टी विरोधी.

माझ्यासारख्या अनेक आपसमर्थकांना आजचा दिवस १० फेब्रुवारीपेक्षा महत्वाचा वाटत असेल. Lol
दिल्ली निवडणूक ही वार्षिक परिक्षा आहे असं वाटलं होतं, पण ती तर प्रिलिम निघाली. खरी परिक्षा आज.

"लडाई का मुद्दा क्या है?"
"राष्ट्रीय संयोजक कौन रहेगा ये मुद्दा एक दिन के लिए भी ना था, ना आज है और ना अभी निकट भविष्य में होनेवाला है। अरविंद केजरीवाल इस देश में नयी राजनीति के 'प्रतीक' है, और अगर वो प्रतीक हमारा राष्ट्रीय संयोजक नहीं रहता तो उस पार्टी को ही नुकसान हो सकता है, उस आंदोलन को नुकसान हो सकता है।"
----इति योगेंद्र यादव. ६:२७ च्या पुढे हे वाक्य आहे.

सगळी सर्कस मराठीतून लिहायचा कालपासून विचार होता. पण जमलं नाही. मला जे लिहायचं होतं, (बर्‍याच प्रमाणात) तसं इंग्रजीतून लिहिलेलं मिळालं. इथे डकवतेय.

All you need to know about #AAPCircus.
First thing first. No need to panic.
So what's going on?
Two groups are fighting in AAP.
1. PB, YY & followers.
2. AK followers.

Why Fighting?
Because AK followers think the other group wants to topple AK to get control over AAP.

Why AK followers think so?
Because other group wrote letters which somehow got leaked.

But why leaks should bother AAP? Isn't AAP all for transparency?
Yes. But AK supporters don't understand that leaks don't matter.

So should there be leaks?

Nope. A Better way would be to write Open Letters. Why write a letter privately, which can be leaked?
And if something is really "secret", just talk. Don't write.

Why would anyone try to topple AK?
Because AK is convener. To do something against the will of AK, it seems desirable to some that AK should not be convener.

But didn't AAP fought LS 2014 nationwide against AK's will?

Yup. They did, but not everyone understands that.

Are YY & PB trying to topple AK?
Seems highly unlikely. SB might want that, but not YY & PB.
But they sure want to expand AAP by contesting all coming elections, which is against what AK group thinks.

Is something cooking here?
Yes. Definitely?

What's cooking?
As noted above, there are two groups. Or rather two approaches with followers.
1. YY, PB approach is that AAP should fight all elections. That's how traditionally parties have expanded in India.
2. AK approach is to first concentrate & deliver results in Delhi and show the nation that they are indeed better then other existing parties.

But why should they fight?
Because no one is in AAP for Money. Everyone has a Vision, Agenda.
Some have spent better part of their life trying to do what they feel they can do now (YY, PB group).
This group feels this is the right time. This opportunity must not be wasted.
The other group thinks It's too risky to capitalize on the Delhi results and contest all elections, without proper organization.

Is this a fight to take control of AAP?

Somewhat. Because everyone wants AAP to proceed ahead on their desired path.

So who's right?
Only time will tell.

So the whole Circus is because two groups want to expand AAP through different Approaches?

Yes. Remember Gandhiji & Bhagat Singh wanted the same thing, independence, but went different ways?

But this is silly, isn't it?
Yes. It will look silly to the outsider or an ordinary AAP supporter, but for those who have invested their lives to work for the nation, it is really Do or Die.

But why AAP is doing this Circus?

Because they can afford to. Or so they think.
There is no high-command, who can silence everyone, so they fight.
This is democracy.
In better democracy, such fights would be called debates. And these would be more civil. More organized. Proper.
That's how democracy survives. Through debates.
But we Indians haven't seen what real democracy is.

So there indeed is some sort of internal democracy in AAP?
Sure, but the problem is, there are no rules of engagement.
That's why they quarrel in the open.

Will AAP expel YY & PB?

Highly unlikely.

सगळ्या प्रकारात नेत्यांच्या वागणूकीची माझी असेसमेंट. नॉट दॅट इट मॅटर्स Proud

१. शांती भूषण - एकदम चूक.
निवडणूक ४ दिवसांवर आलेली असताना ते जर "मुख्यमंत्रीपदाची माझी पहिली निवड किरण बेदी, दुसरी अजय माकन आणि तिसरी अरविंद" असं विधान देत असतील तर त्यांच्या हेतूबद्दल शंका येते. 'दिल्लीनिवडणूकीत आप हरावी ह्यासाठी आतूनच प्रयत्न केले गेले' ह्या दुसर्‍या गटाच्या आरोपाला पुष्टी मिळते.

२. प्रशांत भूषण - बरोबर.
पक्षात काय व्हायला हवं आहे किंवा नको आहे हे त्यांनी पत्रात लिहिलं. शांभूंच्या वरील विधानाशी मी सहमत नाही हे त्यांनी त्वरित सांगितलं. सगळी चर्चा करण्यासाठी निवडणूक संपेपर्यंत धीर धरला. नंतरही कुठे अब्युझिव भाषा वापरलेली नाही. (पत्रं त्यांनी लीक केली असतील असं वाटत नाही.)

३. योगेंद्र यादव - बरोबर.
वरच्या सारखंच.
फक्त 'द हिंदू' मधल्या लेखासाठी मुद्दाम चुकीची माहिती पुरवल्याचं धुकं स्पष्ट व्हायला पाहिजे. इंडियन एक्स्प्रेसची पत्रकार तसं म्हणत आहे.

४. अरविंद केजरीवाल - अंशतः बरोबर.
त्यांच्या प्रामाणिक हेतूबद्दल मलातरी शंका नाही. अद्याप त्यांनी अण्णा, किरण बेदी, शाझिया, प्रशांत भूषण, यो या कोणाबद्दलच कधीही वाईट वक्तव्य केलेलं नाही. दिल्ली निवडणूकीसाठी जीवतोड मेहनत केली आहे. आणि नंतरही शपथविधीच्याही आधीपासून व्यवस्थित कामाला लागले आहेत.
अंशतः एवढ्यासाठी की संजय सिंग, दिलीप पांडे, आशुतोष, आशिष खेतान ह्या नेत्यांना स्पष्ट शब्दांत सांगायला हवं होतं की तुमची चर्चा मिटींगमध्ये करा, मिडियात नको.

५. संजय सिंग, दिलीप पांडे, आशुतोष, आशिष खेतान - एकदम चूक.
यो या आणि प्र भू ह्यांचं आपनिर्मिती आणि आप स्वच्छ ठेवण्यासाठीचं योगदान फार मोठं आहे. ह्या गोष्टीचा तरी मान ठेवून त्यांनी थोडं सेन्सिबल वागायला हवं होतं. शिवाय पक्षात सेन्सिबल विरोधी आवाज असायलाच हवेत. अके बाबत इतकं पझेसिव आणि प्रोटेक्टिव व्हायची अजिबात गरज नाही. कल्ट तयार झालाच असेल तर त्यासाठी असलेच प्रकार जबाबदार आहेत.

उत्तम उपाय म्हणजे अरविंद, भूषण पिता-पुत्र आणि योगेंद्र यादव ह्या सगळ्यांना एका खोलीत पाठवून खोलीला बाहेरून कुलूप लावायला पाहिजे. जोपर्यंत आतून #UnitedAAP असा आवाज येत नाही तोपर्यंत कुलूपच उघडायचं नाही !
ते तिघं-चौघं जास्त सेन्सिबली सगळे प्रश्न सोडवतील. बाकीच्यांच्या विनाकारण हस्तक्षेपाने प्रश्न वाढत आहेत.

आपमधील ह्या गोंधळामुळे कोण सगळ्यात जास्त खुष होत असेल हे ओळखणं फार कठीण नाही. हे सगळे अतिरथी एकत्र पाहून अनेक 'क्रोनी', भ्रष्ट लोकांच्या पोटात गोळा येत असेल. तो गोळा जिवंत ठेवण्यासाठी आपच्या नेत्यांना योग्य निर्णय घेण्याची सदबुद्धी मिळो.

AKYYPB.jpg

आपमधील ह्या गोंधळामुळे कोण सगळ्यात जास्त खुष होत असेल हे ओळखणं फार कठीण नाही
-------
मी आप समर्थक नाही आणि भक्त तर मुळीच नाही. पण आआप अयशस्वी व्हावी असे मनापासुन वाटत नाही.

आपमधील ह्या गोंधळामुळे कोण सगळ्यात जास्त खुष होत असेल हे ओळखणं फार कठीण नाही >> Lol मग गोंधळ नका करू की, सिंपल. तुम्ही काहीही लिहिता बुवा. Happy

मिटिंग होईपर्यंत थांबा. मग लिहा. तुम्हालाही आनंद होईल कदाचित. (म्हणजे तशी अपेक्षा आपकडून)

Pages