ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे लेडीज आणि घे भरारी वर काही चांगल्या नाजूक, एकदम परदेशी दिसणार्या डोहाळेजेवण ज्वेलरी पाहिल्या. (हे प्रमोशन नाही. बाकी ग्रुप वर पण चांगल्या असतील पण मला इथेच माहिती आहेत.)
पाटणकर खाऊवाले ऑनलाईन साईट वर पण चेक कर.
थोडी दुकाने पाहिल्यास आपल्या पसंतीची स्वतः पण घेता येईल. डोजे ची ज्वेलरी बटबटीत नसणं फार महत्वाचं पडतं. नाहीतर ते कार्टून फोटो आयुष्यभर फेसबुकावर राहतात Happy
पारंपारीक घरांतील डोजे: भलामोठा हार, टंगाडा मुकुट, अत्यंत लाऊड चकमक वाला कंबरपट्टा आणि बायकांनी भसाभस त्यांच्याकडचं डाय युक्त कुंकू लावून लाल केलेलं कपाळ. माण्डीवर ती कस्टमाइझ्ड ओटी पिशवी आणि काय काय. फुल्ल गंगू.

पारंपारीक घरांतील डोजे: भलामोठा हार, टंगाडा मुकुट, अत्यंत लाऊड चकमक वाला कंबरपट्टा आणि बायकांनी भसाभस त्यांच्याकडचं डाय युक्त कुंकू लावून लाल केलेलं कपाळ. माण्डीवर ती कस्टमाइझ्ड ओटी पिशवी आणि काय काय. फुल्ल गंगू.>>>>>>>>>>>>
आयुष्यभर फेसबुकावर राहतात Happy:) फेबु चं काय डिलीट करा फोटो Wink पण मनावरचा तो आघात Proud

वहीच तो
वर लोक ते मेमरीज मधून वर काढून आणि मीठ चाट मसाला चोळतात.
मला चांगला डिसेंट मेकअप करून पांढरी फटक गजरेवाली लाल भडक लिपस्टिक वाली गंगू न दिसता मस्त फोटो यायला लग्न पण परत करावं वाटतं कधीकधी.

https://youtu.be/2GZ_s65_1yM
चॅनल वर राहुल कुलकर्णी मुलाखत
(मी अजून पूर्ण ऐकली नाहीय, वेळ मिळाला की ऐकायची आहे)
(ही जाहिरात नाही.मी या गृहस्थाना ओळखत नाही)

<<< पुणे लेडीज आणि घे भरारी >>> हे काय आहे

<<< पाटणकर खाऊवाले >>> लिंक मिळु शकेल का प्लिज

<<< पारंपारीक घरांतील डोजे: भलामोठा हार, टंगाडा मुकुट, अत्यंत लाऊड चकमक वाला कंबरपट्टा आणि बायकांनी भसाभस त्यांच्याकडचं डाय युक्त कुंकू लावून लाल केलेलं कपाळ. माण्डीवर ती कस्टमाइझ्ड ओटी पिशवी आणि काय काय. फुल्ल गंगू >>> हो, पण तरी गोडही वाटतच की, मला तर डोजे ची खुप आवड आहे. खर्या फुलांची ज्वेलरी आणायची ईच्छा आहे मम्माची पण कोरोनामुळे तीला फुलबाजारात जाऊ द्यायची ईच्छा होत नाहीये.

<<< मला चांगला डिसेंट मेकअप करून पांढरी फटक गजरेवाली लाल भडक लिपस्टिक वाली गंगू न दिसता मस्त फोटो यायला लग्न पण परत करावं वाटतं कधीकधी. >>> याबाबतीत मी लकी आहे. माझे लग्न गावी झाले. मुळात माझा रंग गोरा असल्याने मी कधीच खुप मेकप करत नाही (म्हणजे सावळ्या किंवा कमी गोर्या मुली/बायका जास्त मेकप करतात असे माझे मुळीच म्हणने नाही) फक्त लिप्स्टीक मात्र लावते. अन तेच केले लग्नात सुद्धा. साडी नेसवायला अन केसरचनेसाठी मुलगी आली होती. चेहर्यावर फक्त पावडर अन लिप्स्टीक. नंणदेने जबरदस्ती हलकासा डोळ्यांचा मेकप केला.
रिसेप्शन ईकडे केले तेव्हा सुद्धा, पार्लरवालीला सांगुन लाईट मेकपच केला. भविष्यात फोटो बघताना किमान स्वतःची ओळख पटली पाहिजे हे मैत्रिणींचे लग्नाचे फोटो बघुन कळले होते. accessories आणि कपड्यांवर मात्र भरपुर खर्च केला.

खाली दोन लिंक देतेय, अ‍ॅमेझॉनवर आवडलेल्या दोन सेटच्या. यातला कोणता प्रकार जास्त चांगला वाटेल सांगाल का प्लिज. मला जरा तुमची मते कळु द्या.

https://www.amazon.in/Sarpi-Crafts-Jewellery-Designer-Mehandi/dp/B07YP7Q...

आणि

https://www.amazon.in/JUI-PEARLS-Multi-Colour-Jewellery-Bracelets/dp/B07...

https://www.amazon.in/Sarpi-Crafts-Jewellery-Designer-Mehandi/dp/B07YP7Q...
हा आवडला.
तसेच हा घेतला तर साडी फिक्या रंगाची (आकाशी/लिंबू/बेज्/अंजिरी/अगदी फिकट ऑलिव्ह) आणि शक्यतो कमीत कमी डिझाईन असलेली, ब्लाऊज पण प्लेन घेतल्यास दागिने उठून दिसतील.(अर्थात हे वै.म. लोक ऐनवेळी 'ही काय इतकी साधी साडी' म्हणून एकदम धपाधप जरी पूर्ण अंग बुट्टे वगैरे साडी घ्यायला लावतीलच.)
एका वेळी खूप जास्त डिझाईन वाल्या गोष्टी अंगावर घातल्यास पाहणार्‍याचे मन कुठे बघू म्हणून कन्फ्युज होते आणि त्या प्रिंटस चे मूळ सौंदर्य उठून दिसत नाही. हल्ली बायका लग्नी भरपूर डिझाईन साडी वर भरपूर डिझाईन जरदोसी काम केलेले ब्लाऊज घालतायत तेही पटकन झेपत नाहीये.

मलाही हा जरा डिसेंट वाटला.

मला घराबाहेर जायची परवानगी नाहीये, सो साडी जी मिळेल ती घ्यावी लागेल. रंग गडदच असणारे हे पक्के माहितीये, कारण सगळ्यांची आवड तशीच आहे समारंभासाठी. मी चिंतामणी सुचवला आहे,

मी वाराणसी वरुन जो बनारसी शालु आणलाय तो पुर्ण भरलेला आहेच पण ब्लाऊज अन सेम त्यातली बनारसी दुपट्टा पण आहे. जेव्हा कधी तो शालु नेसेन तेव्हा फक्त लांब वाले एकच मंगळसुत्र घालेन हे ठरवलेय नाहीतर खुपच गिचड गिचड वाटायचे.

मस्त दिसेल त्यातल्या त्यात प्लेन किंवा मिनीमल बुट्टे वाला प्लेन गडद पण
मला फेसबुक ग्रुप ची लिंक नाही देता येत, सर्च करून बघ

हा त्या दुकानात काढलेला फोटो

हा दुपट्टा आहे, साडी न ब्लॉउज पण सेम असेच पूर्ण डिझाइन वाले आहेत.

लग्नानंतर नवऱ्याने कडून पहिली साडी ☺️

IMG_20201022_151746.jpg

VB, खऱ्या फुलांचे दागिने जमत असतील तर घे. फार सुंदर दिसतात. पण पाच हजारांपर्यंत असतील. दोन तासांसाठी एवढा खर्च नको वाटू शकतो.

https://www.google.com/search?q=dohale+jevan+real+flower+jewellery&oq=do...

खऱ्या फुलांचे छान वाटतात पण आणायला जाणे जमणार नाही. कोरोनामुळे जास्त लोक बोलावणार नाहीये. एरव्ही हॉल बुक केला असता पण आता घरगुती समारंभ करणारे.
चंद्र अन धनुष्य बाण सुद्धा स्टुडिओ वाल्याचे वापरणार आहोत.
खऱ्या फुलांचे दागिने हजार दोन हजारांपर्यंत मिळतात इकडे, हौसेपुढे पैश्यांचे इतके वाटत नाही . पण कोरोनाने लोचा केलाय.

बघू कसे जमतंय

पुणे लेडीजबद्दल ऐकले आहे. पण अजून जॉईन करावंसं नाही वाटलं.>> छान आहे हा ग्रुप, मी गेली चार वर्षे आहे, आणि बरंच काही खरेदी पण केलं आहे.. आत्ता ही पोस्ट करायच्या काही तास आधीच कानातले ऑर्डर केलेत मी तिकडून. आत्ता त्यांचा पूला ग्रेट इंडियन शॉपिंग फेस्टिवल पण चालूये, काही स्लॉट्स मधे ते ऑनलाईन येणार वगेरे.

खूप छान आहे हा ग्रुप, फक्त खरेदी साठीच नाही तर इतर बऱ्याच गोष्टीं साठी पण.(माझ्या एका मैत्रिणीच्या नातेवाईकांना बेड मिळत न्हवतं कोविड झाल्यावर, पण इथल्या काही पोस्ट मधून कॉन्टॅक्टस मिळाले त्याचे पण )
त्यांचे दिवस ठरलेले असतात, की कधी bazar डे आहे, आणि कधी काय शेअर करायचं ते, आणि हॅशटॅग पण वापरतात तर शोधायला पण फार सोपं पडतं.

आणायला जाणे जमणार नाही
>> अच्छा. एखाद्या पार्लरवालीकडे चौकशी करून बघा. ओळखीने कुठे घरपोच मिळून गेले तर फार भारी होईल.

Vb, एकदा पुणे लेडीज किंवा घे भरारी वर चेक कर
कदाचित कमी किमतीत चांगली ज्वेलरी मिळेल
(पुणे लेडीज चे बरेच सेलर्स मुंबई मध्येच आहेत.)
कोणी मैत्रीण या दोन पैकी एखाद्या ग्रुपवर असल्यास चेक कर.

पीनी, पार्लरमध्ये माहीत नाही पण स्टुडिओ वाला बोलला भाड्याने देतो, पण आम्हाला वापरलेले नकोय. फुलांसाठी कोणी घरपोच करू शकतो का ही चौकशी चालू आहे पण नसेल तर ऑनलाईन विकत घ्यायचा ऑप्शन बघतेय.
इमिटेशन काय किंवा खऱ्या फुलांचे काय, हे परत वापरात येणार नाहीयेत

खर्‍या फुलांचे पण चांगले. पण त्यात फुले जास्त हवीत. ते सोनेरी गुलाबी कागद, कलाबतू जास्त नको.
विकतचे चांगले १००० च्या खाली मिळावेत. थोड्या चांगल्या गिफ्ट्/व्हरायटी/लेडीज आर्टिकल मध्ये जाऊन समान केशभूषण आणि तसाच टियारा वगैरे घेऊन घरीही मिक्स मॅच सेट करता येईल.
इथे एका आयडीने क्रोशा का सॅटिन फुलांचे अतिशय सुंदर संक्रांत दागिने बनवले होते. आठवत नाही. आपल्या मनीमोहर च असाव्यात. शिवाय एकीने स्वतःच्या १ वर्षाच्या मुलीसाठी घरी सॅटिन चे दागिने बनवले होते.
जर क्रोशा/मॅक्रम चे बनवून घेऊन नंतर काही वेगळा रियुज करता आला तरी छान. (घरात चालत असेल तर मोत्याचे डोजे हार दागिने गणपती ला पण चालू शकतील.)
या लिंक अश्याच बघायला छान म्हणून.
https://www.maayboli.com/node/54371
https://www.maayboli.com/node/52072
https://www.maayboli.com/node/41436
https://www.maayboli.com/node/55070
https://www.maayboli.com/node/68684

अनु खूप थँक्स

काही शॉर्टलिस्टड लिंक

1

https://www.flipkart.com/usha-bentex-jewellery-plastic-paper-jewel-set/p...

2
https://www.flipkart.com/jui-pearls-paper-jewel-set/p/itmf59gft8s3rpwc?p...
3
https://www.flipkart.com/usha-bentex-jewellery-plastic-jewel-set/p/itm4d...

4
https://www.flipkart.com/usha-bentex-jewellery-plastic-jewel-set/p/itm04...

फक्त फ्लिपकार्टचा प्रॉब्लेम असा आहे की सध्या डिलिव्हरी खूप लेट दाखवतायेत. काल नवर्यासाठी घड्याळ ऑर्डर केले तर 4 नोव्हेंबर तारीख दिलीय

क्र. १ आणि ४ आवडले.
तारीख आता लगेच ऑर्डर केले तर लवकर येईल पण. एकदा दसरा दिवाळी खरेदी रश चालू झाला की वेळ लागेल.
खाऊवाले पाटणकर बघत होते पण जरा खाणे सेंट्रिक आणि हलवा सेंट्रिक आहेत दागिने. मल्हार आणि म्हळसा सेट प्रत्येकी ८००० ला आहेत अगदी प्रिमियम रेशमी नऊवारी कद वगैरे असेल तरी रेटस जास्त आहेत.आणि त्यांनी सेट मध्ये काय काय आहे ते लिहीलंच नाहीये. कदाचित नुसतेच दागिने असतील.)
https://patankarkhauwale.com/product-category/halwyache-dagine/page/5

इथे कोणाला first cry वरुन खरेदी करून Return केल्याचा अनुभव आहे का? मी माझ्या मुलीसाठी nighty ऑर्डर केली होती पण size issue मुळे return करायची आहे... Return request टाकून झाली... Customer care सोबत 4-5 वेळा बोलून झालं तरी pick up अजून झालं नाही.. 1 महिना झालाय... काय करावं? कोणाला काही अनुभव?

अनु, खूप आभारी आहे

अजून तसा महिना आहे, पण ऑनलाईन किंवा खऱ्या फुलांचा सेट घेतला तरी इकडे फोटो टाकेन☺️

मोक्षू >> मी Firstcry खूप वेळा बऱ्याच गोष्टी रिटर्न केल्या आहेत आणि वेळेत पिक अप झाल्या आहेत.
10 दिवसांत किंवा 7 दिवसांत रिटर्न असतं. मी रिटर्न रिक्वेस्ट करून फोटो अपलोड केले की दुसऱ्या दिवशी लगेच ते घेऊन जातात.

अनु, आज सेट आला
तुमची खूप मदत झाली होती म्हणून हा फोटो देतीये इकडे.
सेम सेट 900 अन 1040 ला होता, 900 वाल्याचा रिव्ह्यू चांगला नव्हता म्हणून 1040 चा घेतला, पण तरीही क्वालिटी यथा तथाच आहे.
तेव्हढा एक दिवस पुरला तरी बास

IMG_20201111_132524.jpg

मस्त गं
(मोती जर चांगले असतील तर नंतर डिसेंबल करुन बारश्याच्या पंगतीला ताटाभोवतीची रांगोळी वगैरे प्रयोग करता येतील Happy )
प्रॉडक्ट फोटो आणि अक्च्युअल बरेच सारखे आहे हे बरे
दिवसापुरतं काम नीट झालं की झालं. कार्यक्रम मस्त होऊदे.

VB हा सेट खरंच फार बरा आहे. फक्त एक दिवस त्यात पण काही तासांपुरता वापरायचा आहे.
याने छान लुक येईल. मुळातच प्रेग्नन्सीमुळे चेहर्यावर छान ग्लो आलाच असेल तुझ्या. बाकी सब कॉम्प्लिमेंटरी है. Happy
माझ्यासाठी माझ्या नणंदेने बनवला होता. १०-१२ दिवस खपून. छान होता. पण जेमतेम २ तास घातला.
शुभेच्छा.

Pages