ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेजाज्ञा आणि सिंडरेलाने सुचवल्याप्रमाणे क्रफ्ट्सवीला बघते आहे.
दोन्ही आवडताहेत.
मनिमाऊ किती बारकाईने बघितलं आहे. साड्यांची जोडणी बघणे सुचंलच नव्हतं.
मागच्या पानावर '...' ने गुजराती साईटचा उल्लेख केला आहे. त्याबद्दल जास्त माहिती आहे का?

सॉरी पण मला तेजाज्ञा पेज अजिबात आवडले नाही. निव्वळ नाव आहे म्हणून काहीही. ५४९९? वाट्टेल ती प्राईस आहे यार
मला तर एक पण आवडली नाही Sad

मलाही आवडल्या नाहीत त्या तेजाज्ञाच्या साड्या. किंमत पाहिली नाही पण पहिल्या १०,१५ बघून त्यात काही सौंदर्य दिसेना. मग बंद केलं पेज.
रेणुका शहाणेने नेसलेली तर अगागा आहे अगदीच.

माझ्या एका मैत्रिणीने मला एका साइट बद्दल सांगितले. elanic.com ह्या साइटवर आपण आपले नको असलेले पण सुस्थितीत असलेले कपडे, अक्सेसरीज आणि इतरही वस्तु विकु शकतो. तिने मला तिचं अकाउंट दाखवलं. तिने आतापर्यंत तिचे वापरलेले पण सुस्थितीत असणारे कपडे विकुन तीनेक हजार कमावलेत Uhoh तिच्या मते ह्या साईट्मुळे आपलं घरातलं क्लटर कमी तर होतंयच शिवाय पैसे ही मिळतात. Happy
मलाही अकाउंट उघडुन देत होती पण मी म्हणलं नंतर बघु.
इथे कुणाला काही अनुभव आहे का अशा साइट्सचा?

elanic.com server not found.

elanic.in साईट ओपन होतेय. विकण्यासाठी ऍप डाउनलोड करायला सांगताहेत.
OLX, QUICKR सारखेच असावे.

मी नेहमी बोलावते, सुतार, electrician, a/c installation-uninstalltion, house deep cleaning. नेहमी चांगला अनुभव आला आहे. एकदा सुताराने शेल्फ उलट जोडला, तो गेल्यावर लक्षात आलं तर त्यांनी परत त्याला नीट काम करायला पाठवलं. मी नेहमी त्यांच्या app through online payment करते. त्यामुळे कितपत मदत होते माहीत नाही पण check राहतो असे वाटले.
Housejoy पण चांगले होते पण त्यांचे आपल्याला discount कोड नीट add करावे लागतात नाहीतर फायदा मिळत नाही, urbanclap मध्ये सगळं direct होतं.

अर्बन क्लॅप चांगली सर्वीस आहे. मी इलेक्ट्रिशिअन, प्लंबर वगैरे बोलावले आहेत. पे मात्र नेहेमी कॅशनी च केलं आहे. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हव्या त्या वेळी हे लोक्स हजर होतात. फोन करा रे मग तो म्हणेल आता नाही नंतर इ. खिटखिट काही राहात नाही.

अर्बन क्लॅप चे रेट्स बघितले, सध्या ६०% डिस्कॉउंट दाखवताहेत बाथरूम डीप क्लिनिंगला, ₹३९९ एका बाथरूमला. नेहमीच एवढे डिस्काउंट असते का?

फूड साठी:
ऊबर इट्स पण चांगलय म्हणे..
डीलीवरी चार्जेस कमी आहेत त्यान्चे.. पेटिएम कॅशबॅक इ. अस्तच

काही ना काही डिस्काउंट असतो. >>
चांगले आहे मग. दिवाळीत मला एका बाथरूमला ७५० द्यावे लागले.
पुढल्या वेळेस अर्बन क्लॅप वापरून बघेन.

सध्या ऑनलाईन इलेक्टरीकल अप्पर लिप्स हेअर रेमोवल मिळते ते कुणी वापरले आहे काय

वापरले असेल तर अनुभव सांगा, मी विकत घ्यायचा विचार करतीये

इथे विचारल्यानंतर मी अर्बन क्लॅपवरून सुतार बोलवलेला. सर्व्हिस अगदी छान होती.
फक्त मला असं वाटलं की तो माझ्याकडे असतानाच त्याला पुढचं कामही अलॉट झालं होतं.
त्यात माझ्या कामासाठी दुकानात जाऊन सामग्री विकत आणणे, एक ग्लास (काच) कट करून मिळायला लागलेला वेळ हे धरलं नव्हतं.

चार्जेस hourly basis वर आहेत. वेळ वाढेल तसा रेट वाढतो. पण म्हणून वेळकाढूपणा दिसला नाही.
उलट, तो मनुष्य मलाच घाई करत होता की मिटर डाउन झालाय.
त्यांच्या साइटवर आहेत चार्जेस.

सध्या ऑनलाईन इलेक्टरीकल अप्पर लिप्स हेअर रेमोवल मिळते ते कुणी वापरले आहे काय>>>>>>>>... मी वापरतेय.
मला तरी आवडलेय, कधी घाईत असाल पार्लर साठी वेळ नसेल तर फास्ट रिमुवल साठी चांगलेय. पण नेक्स्ट टाईम जेव्हा थ्रेडिंग्/वॅक्सिंग करायला जाल तेव्हा इन ग्रोथ बरीच असते. अर्थात पूर्ण ग्रोथ करून जाणार असलात तर गोष्ट वेगळी. पण रेकमेंड करीन नक्कीच

डीएसएलआर चांगला कॅमेरा हवा आहे. कुठला घ्यावा ? ऑनलाईन असेल तर सुचवा. शॉर्ट फिल्म्स बनवता आल्या पाहीजेत. २४ फ्रेम्स पर सेकंडस चं फीचर हवंय. सेकंडहॅण्ड चालेल.

निकॉन डी ३४००. सोनीचेही चांगले आहेत. शक्यतो दुकानातच घ्या. कॅनन पण छान आहे. एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफर कडून अधिक माहिती घेऊन खरेदी करा. शुभेच्छा.

Pages