Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कापड हवंय.
कापड हवंय.
Tarpaulin असं सर्च करा.
Tarpaulin असं सर्च करा.
Thank you आ.रारा. पण हे खूपच
Thank you आ.रारा. पण हे खूपच जाड कापड आहे. मला रेनकोट चे कापड हवंय. IndiaMART वर होलसेल मिळतंय.पण एवढी जास्त quantity नकोय..
mala krupaya maybolivar
mala krupaya maybolivar Marathi lekhan kase karayache tyachi mahiti havi aahe vishyantar kelyabaddal maaf kara mi attach maybolicha sabhasad zalo aahe , punha ekda vishyantar kelyabaddal mi tumha sarvachi maafi magato
जयू दरवर्षी परेल धनमिल
जयू दरवर्षी परेल धनमिल नाक्यावर पावसाल्यापूर्वी असे waterproof sheets रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेली मी बरेचदा पाहिलेत. तुमच्या local market मध्ये बघा स्वस्त मिलतील online पेक्षा
कोणी किराणा सामान ऑनलाईन
कोणी किराणा सामान ऑनलाईन खरेदी केलं आहे का? ऑरगॅनिक मिळालं तर उत्तमच.
कोलकात्याच्या जवळ लहान शहरात हवे आहे.
बिग basket तिथं येत नाही.
Amazon now aahe ka? Grofers?
Amazon now aahe ka? Grofers? Dunzo
अरे वा! डंझो वापरतय का कोणी!
अरे वा! डंझो वापरतय का कोणी! भाडिपा मध्ये अन्या तहान लागल्यावर डंझो वरुन पाण्याची बाटली मागवतो तो एपिसोड आठवला डंझो नाव ऐकुन.
धन्यवाद राजसी.
धन्यवाद राजसी.
यापैकी काहीच माहीत नव्हतं.
Grofers आणि dunzo तिथे येत नाहीत.
Amazon now आत्ता install नाही होत. भारतात जाऊन करेन. किंवा नवऱ्याला सांगेन. पण आधी Amazon आलंय तेव्हा हेपण येईल असं वाटतंय.
Amazon pantry pan check kara,
Amazon pantry pan check kara, usual Amazon bar. 24 mantra, pro nature che product milatat.
सध्या तरी हे इथेच विचारतो.
सध्या तरी हे इथेच विचारतो.
टाटा पॉवरवाले त्यांच्या मुंबईतल्या ग्राहकांसाठी नव्या टेक्नॉलॉजीचे पॉवर सेव्हर सीलिंग फॅन्स अर्ध्या किंमतीत देताहेत. पण त्या उत्पादकांची नावं कधी ऐकलेली नाहीत. कोणी हे पंखे घेतलेत का?
उत्पादक Atomberg , Versa Drives
तंत्रज्ञान BLDC
कोणी everstylish.com वरचे
कोणी everstylish.com वरचे इअररिंग्ज घेतले आहेत का? बोहो आणि एथनिक डिझाइन्स खूप सुंदर आहेत आणि किंमती सुद्धा ठीकच वाटल्या. मी आज 6 पेअर्स ऑर्डर करणार आहे. फेबु आणि इंस्ता वर रिव्ह्यूज चांगले आहेत, अपवाद एका मुंबई गर्लचा - ' आमच्याकडे लोकल ट्रेन मध्ये असले इअररिंग्ज अर्ध्या किंमतीत मिळतात'
आम्ही मुंबईला रहात नाही म्हणून ऑनलाईन ऑर्डर करणार आहे. कोणाला या साईटचा अनुभव असेल तर प्लिज लिहा आणि ज्यांना इअररिंगज जमवायला आवडतात त्यांनी साईट बघून घ्या
टाटा पॉवरवाले त्यांच्या
टाटा पॉवरवाले त्यांच्या मुंबईतल्या ग्राहकांसाठी नव्या टेक्नॉलॉजीचे पॉवर सेव्हर सीलिंग फॅन्स अर्ध्या किंमतीत देताहेत. पण त्या उत्पादकांची नावं कधी ऐकलेली नाहीत. कोणी हे पंखे घेतलेत का? >> किती किंमत आहे टाटा पॉवर देत असलेल्या फॅनची? अमेझॉन वर ३००० च्यावर दिसत आहेत. विजेचे बिल नक्कीच कमी येईल पण किंमत थोडी जास्त वाटत आहे.
आमच्याकडे लोकल ट्रेन मध्ये
आमच्याकडे लोकल ट्रेन मध्ये असले इअररिंग्ज अर्ध्या किंमतीत मिळतात' >>>>> मीरा, खरं आहे हे.
त्यांनी साईट बघून घ्या>>>>
त्यांनी साईट बघून घ्या>>>> मस्त साईट आहे.पण डिलिव्हरी चार्जेस धरून किंमत जास्त वाटतेय.अर्थात मला आर्टिफिशल ज्वेलरीचा अनुभव फारसा नाही.बघायला खूप आवडतात.
लोकल ट्रेन मध्ये असले इअररिंग्ज अर्ध्या किंमतीत मिळतात'>>>>> असतीलही.मी २-२.५ वर्षांपूर्वी ऑफीसमधील एकीकडून पांढर्या खड्याचे टॉप्स घेतले होते.एकच खडा,पण २००रु.किंमत होती.ट्रेनमधे तसेच १०-२०रू.ना मिळायचे.पण ते टॉप्स अजूनही छान आहेत.
देवकी, क्वालिटी मधे अर्थातच
देवकी, क्वालिटी मधे अर्थातच फरक असेल म्हणूनच २०० रुपये आणि अजुनही चांगले राहिलेत.
पण हे ऑनलाईन मागवणं म्हणजे काय क्वालिटीचे असतील माहित नाही. मला आर्टीफिशियल ज्वेलरीचा अलिएक्सप्रेसचा फार वाईट अनुभव आहे.
डिलिव्हरी चार्जेस प्रत्येक
डिलिव्हरी चार्जेस प्रत्येक नगाला धरून नाही.आताच मी २ पेयर्स निवडल्या.दोघींचे मिळून डि.चा.कमी आहेत.हे चांगले आहे.
पण हे ऑनलाईन मागवणं म्हणजे काय क्वालिटीचे असतील माहित नाही>>>>खरंय.
मीरा अत्ताच बघीतली साईट. आणि
मीरा अत्ताच बघीतली साईट. आणि ३ इअरिंग्ज ऑर्डर केल्या. छान कलेक्शन आहे. बघु आता
आणि लोकल मध्ये मिळतात पण त्याचि कॉलिटी वेगळी असते.
देवकी, अग क्वालिटीमध्ये फरक
देवकी, अग क्वालिटीमध्ये फरक असणार म्हणून किमतीत एवढा फरक.
सस्मित, तुम्ही मुंबई गर्ल्स लकी असता. अर्धी शॉपिंग ट्रेनमध्ये बसल्या बसल्या होते. लक्षात ठेवा, बाहेर जाऊन आणा हे झंझट नाही. आम्हाला मुंबईला यायच्या किमतीत अजून 10 पेअर्स घेता येतील
माझा अली एक्सप्रेसचा अनुभव बेष्ट. पण मी पूर्वी लिहिलं ते लक्षात ठेवायचं. कधीही काहीही गोल्ड टोन्ड घ्यायचं नाही, फार चिप पिवळं मेटल असतं. त्या उलट सिल्वर/व्हाईट मेटल फार मस्त आणि कधीही काळ न पडणार असतं. मला ते फार स्वस्त आणि मस्त वाटतं.
ज्या ज्या कोणी घेताहेत, त्यानी आपले अनुभव लिहा. मी 3 इअररिंग्ज आणि एक नेकपिस ऑर्डर केला आहे
तुम्ही मुंबई गर्ल्स लकी असता.
तुम्ही मुंबई गर्ल्स लकी असता. अर्धी शॉपिंग ट्रेनमध्ये बसल्या बसल्या होते. लक्षात ठेवा, बाहेर जाऊन आणा हे झंझट नाही. >>>> मी नाही घेत ग काही ट्रेनमधे. अर्टीफिशियल फार कमी वापरते. आणि घेतले तर बरेचदा दुकान किंवा मार्केट मधे जाउन.
सिनिऑरिटी डॉट इन नावाची
सिनिऑरिटी डॉट इन नावाची नावाप्रमाणेच प्रामुख्याने ज्येनांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेली एक साईट आहे.
ज्येनांना उपयोगी पडू शकतील असे बरेच आणि काही काही घरातल्या सर्वांना वापरता येतील असे प्रॉड्क्ट्स आहेत तिथे.
नरेन, टाटा पॉवर मार्फत एम आर
नरेन, टाटा पॉवर मार्फत एम आर पीच्या जवळजवळ निम्म्या किमतीला मिळताहेत.
प्रत्येक कंपनीचे दोन दोन मॉडेलच आहेत.
Atomberg GV-2 (Gorilla Version -2) रु १७९० GV-2 (Gorilla Version -2) Premium रु २१४०
Versa Drives Super X1- रु २०७० Super E1 रु, १८९०.
प्लस साइझ (जा ड) लोकांच्या
प्लस साइझ (जा ड) लोकांच्या कपडे खरेदी साठी स्पेशल साईट अहे का
पुरुषांसाठी माहीत नाही, पण
पुरुषांसाठी माहीत नाही, पण बायकांसाठी Amydus म्हणून ब्रँड आहे. माझी कलीग नेहमी घेते, मस्त कलेक्शन आहे.
पर्सनली जाणं शक्य असेल तर स्त्री आणि पुरुषांसाठी कॅम्प - ईस्ट स्ट्रीट वर एक 'So what?' नावाचं दुकान आहे. माझ्या त्याच कलीगने सांगितलं की तिथे प्लस ते अति प्रचंड प्लस या रेंजमधलं ह्युज कलेक्शन आहे. एकमेकाला लागून दोन दुकानं दिसतात म्हणजे भरपूर व्हरायटी असायला हरकत नाही.
सिनिऑरिटी डॉट इन नावाची
सिनिऑरिटी डॉट इन नावाची नावाप्रमाणेच प्रामुख्याने ज्येनांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेली एक साईट आहे.
ज्येनांना उपयोगी पडू शकतील असे बरेच आणि काही काही घरातल्या सर्वांना वापरता येतील असे प्रॉड्क्ट्स आहेत तिथे. >>>
सिनिओरिटी हा पुण्यातला स्टार्ट अप आहे. मात्र टी टी के कि कुठल्या मोठ्या कंपनीचा बॅक अप असणारा आहे. कल्याणीनगर भागात त्यांचे मोठे शो रूम कम सेल आहे. तिथे चक्कर मारली तर ज्यांचेकडे ज्ये ना आहेत त्यांचे साठी विलक्शण वस्तू सापडतात. ज्येष्ठाना सोइस्कर असे छोटे मोठे अकल्पित प्रॉडक्ट तिथे सापडतात. ज्येष्ठाना आवश्यक काठ्याच किती प्रकारच्या आहेत. त्यात कार मधून उतरताना उपयोगी पडणारी अन दोन्ही हातांचा आधार एकाच काठीवर देता येणारी काठी उत्ताम आहे. मी आइसाठी ९००००/- ची एलेक्ट्रिक व्हील चेअर घेतली. तैवानी आहे . तिथला स्टाफ अतिशय नम्र आणि मनमिळाउ आहे. गुगल मॅप वर सापडते
भरत, atomberg चे पंखे घरात
भरत, atomberg चे पंखे घरात लावायचा माझा मोठा मनसुबा होता/आहे! मला स्वानुभव नाही पण चांगले रिव्ह्यू आहेत अॅमेझॉनवर. मुंबई आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेली कंपनी आहे. मी अजून घेतले नाहीत कारण जितकी किंमत आहे त्या प्रमाणात वापर नाही घरी त्यामुळे breakeven व्हायला फारच वेळ लागेल. निम्मी किंमत असेल तर कदाचित गणित जमावं! साधा पंखा 60 ते 80 वॅटचा असतो आणि यांचा 28 वॅटचा आहे. कदाचित ज्या पंख्याचा सर्वाधिक वापर आहे तिथे बदलता येईल.
बाबा कामदेव, ज्ये नांसाठीच्या दुकानाच्या माहिती साठी धन्यवाद!
जिज्ञासा , थँक्स.
जिज्ञासा , थँक्स.
सिनीऑरिटी चे रिमाइंडर मला पण
सिनीऑरिटी चे रिमाइंडर मला पण सारखे येत असतात. अजीबो गरीब वस्तू तिथे उपलब्ध आहेत. त्यांची सध्या आपल्याला गरज नाही हे लगेच कळते. पण नी रिप्लेसमेम्ट सर्जरी करून घेतली तर काही चीजे लागतील. व्हीलचेअर चा रिव्यू कसा आहे?!
सिनिऑरिटी डॉट इन नावाची
सिनिऑरिटी डॉट इन नावाची नावाप्रमाणेच प्रामुख्याने ज्येनांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेली एक साईट आहे.
ज्येनांना उपयोगी पडू शकतील असे बरेच आणि काही काही घरातल्या सर्वांना वापरता येतील असे प्रॉड्क्ट्स आहेत तिथे. >> अगदी अगदी . छोटे छोटे खूप प्रोडक्स दिसत आहेत . थँक्स
सिनिओरिटी - इंटरेस्टिंग!
सिनिओरिटी - इंटरेस्टिंग! याबद्दल माहिती नव्हतं.
Pages