ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अनु किल्ली,

वर किंमत डिटेल मुद्दाम दिलेत, जर कोणी घेणार असेल तर तो 900 वालाच घ्या, उगा 140 जास्त खर्चून फायदा नाही.
मोती चांगले आहेत पण फुले अन फिनिशिंग नाही आवडले इतके

चिन्मयी, हो, काही तासांचा प्रश्न आहे.
खऱ्या फुलांचा या पेक्षा महाग अन आदल्या दिवशी देणार सांगत होते शेवंती किंवा तगर, त्यापेक्षा हा बराच आहे अन रंगसंगती चांगली आहे, साडीवर बटबटीत दिसणार नाही

Amazon वरून कुणी झाडं-रोपं मागवलेत का? इथली कुमक्वाट्सची रेसिपी बघून सर्च मारला तर amazon वर त्याची रोपं विकायला आहेतसं दिसतंय,. कुणाला यातला अनुभव आहे का? की सुकलेलं साध्या लिंबाचं रोप मिळेल पार्सलमधे? Uhoh

धागा वर आलेला दिसला म्हणून लिहितेय. हा सेट नुसता बरा नाही तर अप्रतिम दिसत होता घातल्यावर, साडीलाही खुलून दिसत होता. जास्त नाही पण आलेल्या दहा बारा बायका अन स्टेटस चे फोटो बघितलेल्या सगळ्या जणींना आवडला अन बऱ्याच जणींनी सांगितले सुद्धा की खऱ्या फुलांपेक्षा हा भारी आहे.
अन मुख्य म्हणजे मलाही आधी आवडला नव्हता पण घातल्यावर छान अन पैसा वसूल फिलिंग आले

व्हीबी मस्तच गं
इतक्या अभ्यासाचं चीज(किंवा साजूक तूप) झालं.
चिन्मयी नर्सरीलाईव्ह वरून मी आता 6 वं रोप मागवलंय. चांगली येतात रोपं.रोपाबरोबर मिळणाऱ्या कुंड्या तश्या सो सो असतात.
ट्रस्टबास्केट ची फेसबुकवर जाहिरात बरीच येते पण नर्सरी लाईव्ह बरी वाटल्याने अजून तिथे खरेदीचा योग नाही आला.
अमेझॉन वर बिया मागवल्या आहेत मागे.पण ग्रीन फिंगर नाही, किंवा पाणी ऊन नीट दिलं नसेल, उगवल्या नाहीत.झाडं ते नीट डिलिव्हरी करतात.पण अगदी फोटो सारखं नसेल.
आता कोकोपीट, गांडूळ खत, थोडी माती आणि नीम पावडर असे मिश्रण करून घरातलेच धने मेथ्या लाऊन ज्या कुंड्या लावल्यात त्या टिकल्या.अर्थात नंतर वेळ मिळाला नाही की टिकत नाहीत.आता धने, मेथी उगवली आहे.अगदी छोट्या प्रमाणात, एक वेळ पोह्यावर टाकता येईल इतकीच.
बिया सगळीकडेच ऑनलाईन, दुकानात थोड्या जुन्या असतात.पेरल्यावर उगवतीलच असं नाही.स्वतः घरी वाळवून तयार करता आल्या तर बेस्ट.

ugaoo.com वरून रोपं, बिया आणि माती, खत इ. मागवलंय. मी लावलेली झाडं पहिल्यांदाच जगली आणि वाढली.
फक्त त्यांनी तुळशीचं म्हणून पाठवलेलं बी काहीतरी वेगळंच निघालं. चिमुकली असताना ती पानं तुळशीसारखीच दिसतात. पण पुढे पानवेलीच्या पाना एवढी पसरली आणि वेलासारखी वाढ. हरभर्‍यासारखं एका कवचात एकच लालचुटूक फळ की बी काहीतरी धरलं.

उगाओवाले रोपं पेल्या एवढ्या क्युट प्लास्टिक कुंडीतून नीट हवाबंद करून पाठवतात.

https://www.1mg.com/ वरून औषधं मागवली. १२ तासांत हातात. तेच नेटमेडवर ४८ तास गाडं प्रोसे सिंगच्या पुढे सरकेना. मध्येच माझी ऑर्डर आणि प्रिस्क्रिप्शन दोन्ही गायब झाले होते. लवकर पाठवा म्हणून ईमेल केल्यावर परत आले. यांना दिलेली ऑर्डर कॅन्सल केली.

Netmed वर मी एकदा औषधं ऑर्डर केली तर ती तीन ऑर्डर्स मध्ये विभाजीत झाली. एक दिल्ली वरून, एक चेन्नई वरून आणि एक बंगलोर वरून असे तीन वेगवेगळे पार्सल्स आले, चार पाच दिवस लागले.

हैद्राबादला Medplus चे warehouse आहे. Medplus वर ऑर्डर की बहुतेक पाच सहा तासात औषध येते, stock मध्ये नसतील तर दुसऱ्या दिवशी. Medplus मध्ये cash on delivery option आहे.

1mg कधी वापरून नाही पाहिलं, एकदा वापरून बघेन.

Pharmeasy
15℅ discount वर औषधें मिळतात
सांबांच्या diabetic च्या गोळ्या मागवायला हेच वापरतो
चांगलं आहे

औषधे आणि कॉस्मेटिक्ससाठी वनएमजी बरोबरच फार्मइजी चांगले आहे. फार्मइजीवर औषधे थोडी लवकर पाठवतात पण वनएमजीवर आयुष औषधांची व्हरायटी अफाट आहे जी फार्मइजीवर नाही मिळत. आयुष औषधांसाठी helthmug चांगली साईट आहे जिथे यूनानीची सर्व औषधे मिळतात. मेडप्लस medlife चा खराब अनुभव आहे.

Medplus ला 200 च्या वर १०% discount आणि 2000 च्या वर 20% discount आहे.

गावांंप्रमाणे वेगवेगळा अनुभव असू शकतो.

मी हैद्राबाद आणि नागपूरला Medplus वापरले, नागपूरला ही हैद्राबाद warehouse मधुन त्यांची औषधं येतात 48 तासात.

मानव, त्यांनी आठवडा होऊन गेला तरी ऑर्डर डिस्प्याच नाही केली आणि कॅन्सल केल्यावर रिफँड नाही दिला. आता तर ते हुशार झालेत एकदा ऑर्डर प्लेस केल्यावर काहीही केलं तरी कॅन्सल होत नाही कारण क्यान्सलचा ऑप्शनच देत नाही ऍपवर Lol

जिद्दु कॅन्सल ऑप्शन आहे की.
कस्टमर केअरला फोन करा: 040 67006700. रिफन्ड सोडू नका फोन करून धारेवर धरा.

बाकी तुम्ही आहात तिथे असला अनुभव असेल तर कोणी ऑर्डर करणार नाही त्या ऍपवर.

अर्रर्र ... मला medlife या साईटबद्दल बोलायचे होते आणि मी मेडप्लस लिहलं
ही मागच्या वर्षीची गोष्ट आहे. कॉल करून पैसे आले असते पण ४०० वगैरे रक्कम असल्याने मी कंटाळा केला. आता दिवाळीपूर्वी मी एक प्रोडक्ट कमी किमतीत मिळतंय म्ह्नणून डिस्कॉउंट धरून कार्टमधे फायनल प्राईस पहायच्या नादात ऑर्डर प्लेस झाली आणि कॅन्सलचा पर्याय नाही येत हे तेव्हाच कळले. थोडा गुगलून पाहिल्यावर कस्टमर केअरला कॉल हा एकच पर्याय आहे तिथे. कॅशऑन असल्याने मी जादा डोकं नाही लावलं. दिवाळीला मी नगरला आलो होतो तर ते पार्सल आपोआप मागे गेलं. कॅन्सल ऑप्शन नाही दिसत ऑर्डर प्लेस करून पहा

ओके.

आता दुरुस्त केलंय. medlife वर औषधे घेतलीच कोणी तर कॅशऑन पर्याय निवडा कारण ऑर्डर कॅन्सल होत नाही.

इथे पूर्वी कोणीतरी resale च्या कपड्यांची साईट दिली होती. मला आता सापडत नाहीये. आहे का कोणाकडे?

सर्व वाचलं नाहीये अजून पण VB अभिनंदन आणि शुभेच्छा .

तो सिलेक्ट केलेला सेट छान दिसतोय.

मला साडीचा फोटो दिसत नाहीये.

हा सेट नुसता बरा नाही तर अप्रतिम दिसत होता घातल्यावर, साडीलाही खुलून दिसत होता. >>> अरे वा, मस्तच.

हे आत्ता वाचलं.

अंजुताई थँक्स Happy

<<< मला साडीचा फोटो दिसत नाहीये. >>> हो, आता मलाही दिसत नाहीये, माहित नाही का

सेल्फी स्टीक घ्यायची आहे. ट्रायपॉड म्हणून पण वापरता येईल अशी. मी एमेझॉन्वरुन एक घेतली होती पण त्यातली बॅटरी डेड होतीच आणि रिचार्जेबलही नव्हती. (रिव्ह्यू वाचून घेतली होती Uhoh )आता मी ती परत करणार आहे. तुमच्या ट्राइड अ‍ॅन्ड टेस्टेड सेल्फी स्टीकबद्दल सांगा. ब्रँडनेम वगैरे.

सध्या भारतात किराणा सामान आम्ही इथून (भारताबाहेरून) ऑनलाईन खरेदी करणे गरजेचे झाले आहे.
यासाठी कोणत्या साईट्स चांगल्या आहेत? भारताबाहेरील card आणि phone number चालतो का?
किंमत (आपण 'असू दे' म्हणून घेतलं आणि ते ज्ये. ना. ना पटले नाही तर स्वत: घ्यायला जातात, तेव्हा थोडीफार त्यांना पटेल अशी असेल तर बरी) आणि quality कशी आहे?

डीमार्ट ऑनलाईन, मुंबईत असाल तर धान्य सोडल्यास इतर गोष्टी (डेअरी, साबण इ.) ऍमेझॉन फ्रेश, मुंबईबाहेर ऍमेझॉन पॅंट्री (आजकाल चॉइस कमी असतो).

भाज्यांसाठी किसानकनेक्ट, सह्याद्री फार्मस्. दोन्हीवर आज ऑर्डर केली तर परवा भाजी मिळते. आठवड्याभरासाठी भाजी घेतली तरच रिझनेबल ठरते. सह्याद्री फार्मस् वर रवा, मैदा, काही कडधान्य, वेगवेगळी पीठंपण मिळतात. किसानकनेक्टवर भाजीचे दर रिझनेबल असतात.

मीट, पोल्ट्रीसाठी नेचर्स बास्केट (प्रत्यक्ष बाजारातून आणल्यास जास्त स्वस्त असते.)

बाहेरच्या देशातील कार्ड, फोन नंबरविषयी कल्पना नाही.

भारताबाहेरील card आणि phone number चालतो का?.......अमाच्याकडची एक बाई, यू.के की कॅनडा वरून गेली 3 वर्षे कामवालीचे पेमेंट पाठवत आहे.इकडच्या लॅब,किंवा डॉक्टरच्या फीज देतेय.माहीत नाही कसे ते
जास्त परिचय नसल्याने तसाच हा विषय नाजूक असल्याने विचारले नाही.

धन्यवाद.
किराणा शक्यतो dry पाठवायचा आहे.
अजूनतरी भाजी ई. जवळ मिळते आणि थोडी थोडी आणू शकतात.
मुंबईबाहेर आणि राज्याबाहेर असे दोन्ही ठिकाणी पाठवायचे आहे.
सुचवलेल्या सगळ्या sites बघेन Happy

bigbasket , suprdaily, grofers तिन्हीची अ‍ॅप्सही आहेत. भारताबाहेरचा फोन नंबर आणि कार्ड चालतं का ते पहावं लागेल.

बिगबास्केट अनेक शहरांत आहे. इतर दोनबद्दल कल्पना नाही.

लॉकडाउनपासून अमेझॉन, फ्लिपकार्ट हेही ग्रोसरीज डिलिव्हर करू लागलेत.

Pages