ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मागवले आहे एक दोन वेळा.पहिल्यांदा(करोना पूर्व काळ) त्यांनी ऑनलाईन नुकतेच चालू केले होते तेव्हा डिलिव्हरी ला सेल्स पर्सन पाठवले होते 2.त्यांनी पत्त्यासाठी खूप फोन केले.
आता एक गार्गी कलेक्शन चे चांदी चे मागवले ते व्यवस्थित आले डिलिव्हरी कडून.
अमेझॉन वरूनही पी एन जी मागवले आहे, किंचित जास्त पडते किंमत पण डिलिव्हरी मध्ये व्यवस्थित.
पॅकिंग सर्वच केस मध्ये अगदी व्यवस्थित.
एका चांदी कानातल्या साठी एक सोनेरी पत्रा डबा, त्याला अगदी लहान छिद्र पाडून तारेने ओवून बांधलेली आतली मुख्य डबी, डिलिव्हरी ला ओटीपी अशी चोख व्यवस्था होती.

मी अनु, धन्यवाद

@देवकी, आज करणावळ फ्री आहे मंगळसूत्रावर (डायमंड) . मागवा.
दुकानात स्वस्तातले संपले म्हणून सांगितले. ऑनलाईन उपलब्ध दिसतेय.

डोझा.
चंदू सराफ कडे पण सेम स्कीम आहे पण दुकानात जाणे झाले नाही. रविवार पेठेत पार्किंग पासून प्रॉब्लेम्स येतात. त्यांचे ऑनलाईन दुकान नसावे.

मला माझ्याकडची काही पुस्तकं काढायची होती. फेस बुकवर अशा वस्तू (फुकटात) देण्यासाठी ग्रुप्स आहेत. त्यात मी पुस्तकांची यादी दिली. ज्यांना हवी होती त्यांनी पसंती कळवली. मी पत्ता, फोन नंबर कळवला. दोघांनी Wefast कुरियर सेवा बुक करून त्यामार्फत पुस्तकं कलेक्ट केली. पैसे त्यांनीच भरले.

मी_अनु, धन्यवाद.
पीएनजीचे कलेक्शन आवडते पण ऑनलाईन मागवायला जरा कचरत होते. आता बघते परत.

ऑन्लाईन लेडीज टी शर्ट, फॉर्मल्स, टॉप्स, स्कर्ट्स, कुर्ती ई. साठी वेबसाईट्स सुचवा. फ्लिपकार्ट चा कंटाळा आला.
भारत वारीत पिक करता येतील भारतात.

Myntraवरून कर ऑर्डर. त्यांची सर्व्हिस सगळ्यांत एफिशियंट आहे. प्रॉडक्ट्स क्वालिटी चांगली असते, रिटर्न / एक्सचेंज करायची वेळ आली तर सोप्या आहेत गोष्टी.

Mantra, tatacliq चांगल्या आहेत. मुख्य म्हणजे रिटर्न प्रोसेस सोप्पी आहे.

फसवणूक अलर्ट

इंस्टाग्रामवर evogue.in या ब्रँडच्या मोजडी सेलमध्ये दिसल्या म्हणून खरेदी केल्या. साईटवर रिव्ह्यू ठीक ठाक होते.म्हणून ५०० रुपये देऊन खरेदी केली आणि तिथेच ते पैसे अक्कलखाती जमा करून टाकले.
सोमवारी ऑर्डर दिली आणि शनिवारी प्रॉडक्ट मिळालं. पण ते खराब गुणवतेच . खाली फोटू दिलाय. प्रॉडक्ट हातात पडल्या पडल्या तिथल्या कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्हशी संपर्क साधला आणि एक्सचेंज ची मागणी केली. तेव्हा त्या एक्झक्युटिव्हने आधी ते प्रॉडक्ट खराब आहे हे मान्य करायचं नाकारलं. पण नंतर "काही काळजी करू नका, सोंमवारी प्रॉडक्ट एक्सचेंज करायला डिलिव्हरी माणूस येऊन खराब प्रॉडक्ट घेऊन जाईल आणि दुसऱ्या आठवड्याभरात नवीन प्रॉडक्ट मिळेल अस सांगितलं. माझा ऑर्डर नंबर वगैरे पण टिपून घेतला.

सोमवार उजाडला , मंगळवार निघून गेला तरीही तो माणूस आलाच नाही. शेवटी बुधवारी मीच स्वतःहून संपर्क केला तर तिथली बाई आधी म्हणे की तुमचं नवीन प्रॉडक्ट कुरीयर केलेय . मी म्हतएल ठीक आहे, शिपमेंट डिटेल्स द्या ट्रॅक करायला. तर टाळाटाळ करायला लागली. जास्त आग्रह केला तर म्हणे आमचं शूट होत त्यामुळे टीम कुरियर करू शकली नाही. मग मी धारेवर धरलं तर म्हणे तुमच्या ठिकाणाहून आमच्या ठिकाणी प्रॉडक्ट यायला आम्हाला कुरियर चार्जेस पडतात , त्यामूळे तुम्हीच ते प्रॉडक्ट कुरियरने आम्हाला पाठवा. Uhoh तुम्ही कुरियर केलेत की आम्ही नवीन प्रॉडक्ट पाठवू..
कपाळबडवती योग Angry या एकेक उत्तरासाठी २ ते ३ तास लावलेले आहेत त्या कस्टमर एक्झक्युटिव्हने.

आता तिला म्हणल की बाई हात जोडते, चूक झाली की तुझ्या ब्रँडकडून प्रॉडक्ट मागवलं ते. पैसे तर अक्कळखाती गेलेच आहेत , आता ते प्रॉडक्ट कुरियर करून अजून पैसे वाया घालवायचे नाहीत.

evogue.in या ब्रँड कडून काहीही खरेदी करू नकात

हे ते खराब झालेले प्रॉडक्ट

IMG-20220507-WA0010.jpeg

पुण्यातले पण.ते तोट्यात चालले होते,आता मेसेज येतो की स्विगी जिनी आणि स्विगी इंस्टामार्ट वापरा.
सुपर्डेली चा माणसांचे संपर्क येऊ न देता भल्या सकाळी भाज्या, शाम्पू, कॉर्नफ्लेक्स, बँड एड, फिनेल दारात येऊन पडण्याचा जो कम्फर्ट होता तो आता वेगळी सेटिंग करून इतर सेवा दात्यांकडून मिळवावा लागेल.

मी पूर्वी बिग बास्केट व सुपर डेली वापरत होते. सुपर डेली काढून टाकले काल बिचार्‍यांचा मेसेज आला काहीतरी क्रेडिट केले वगैरे. आता बिग बास्केटच फक्त.

स्विगी इन्स्टामार्ट व डन्झो छान चालले आहे.

टाटा न्यु अ‍ॅप काल डाउन लोड केले आहे. सर्व टाटा माल व सर्विसेस एका छत्री खाली उपलब्ध. मी जास्त करून बिग बास्केटच. पण त्यातही काही न्यु कॉइन्स मिळाले आहेत. आवडीचे परफ्युम बघुन ठेवलेत. पण फार महाग आहेत. कपडे हाय व्हॅल्यु पर्सेस शूज आहेत. हॉटेल बुकिन्ग बिल पेमेंट पण आहे. चंद्रशेखर आवडतो म्हणून टीसीएस चे शेअर व टाटा न्यु अ‍ॅप घेतले. त्यांच्यासाठी कायपण.

इथे वाचून place of origin वरून काही स्नॅक्स मागवले होते. आजच आले. छान आहेत..पॅकिंग पण छान. Tirunelveli हलवा मस्त आहे.

इथे वाचून place of origin वरून काही स्नॅक्स मागवले होते. आजच आले. छान आहेत..पॅकिंग पण छान. Tirunelveli हलवा मस्त आहे.>>>
ती साईट आणि त्यावरचे फोटोज कसले मस्त आहेत. मला तर तेव्हा बघूनच ऑर्डर कराव वाटत होत. इकडे शिपिंग करतात बहुदा. बघेन नंतर ऑर्डर करून. सध्या घरचे येतील त्यामुळ दम धरेन थोडे दिवस.
ती गुड अर्थ ईंडीया साईट पण जबरी आहे एकदम. महाग आहे पण वस्तु खुप छान आहेत.

ती गुड अर्थ ईंडीया साईट पण जबरी आहे एकदम. महाग आहे पण वस्तु खुप छान आहेत.>> गुड अर्थ सामान खरेच सुरेख आहे पण फार महाग.
$ मध्ये परव्डू शकेल पण भारताfunction at() { [native code] } त ते रेट्स आर्टिफिशिअली महाग वाटतात.

गुड अर्थ ईंडीया >> बघते.. फूड आयटम्स च आहेत का? की सगळं काही?

myntra चा अनुभव छान वाटला, १ डबल बोलावलेले लगेच रीटर्न पण झाले, क्वालिटी पण छान.
कपडे च घेतलेत सो फार.
गिफ्ट आयटम्स बघत होते पण फार महाग आहेत. नविन वास्तू साठी देण्या साठी हवेत, गुड अर्थ वर बघते. Happy

ब्लिस क्लब चे खिसे वाले लेगिंग घेतले
किंमत जास्त असल्याने एक काळे घेऊन गप्प बसणार आहे.एकंदर कापड, शिवण चांगली आहे.पण उन्हाळ्यात गरम होईल असे वाटते.जाड आहे कापड ईलास्टेन किंवा जे काही मिक्स असेल ते.
मागे चेन वाला मोबाईल खिसा आणि पुढे एक नॉर्मल खिसा गुडघ्यावर आहे.
शॉपर स्टॉप चे कलेक्शन कधी लाभते कधी लाभत नाही.त्यांचा स्वतःचा ब्रँड स्टॉप, त्याचे कपडे टिकले घेतलेले.कशीश ब्रँड चे कपडे थोडे खांद्यात टाईट वाटतात इतर ब्रँड च्या सेम साईझ पाहिल्यास.

फूड आयटम्स च आहेत का? की सगळं काही?>> फुड आयट्म्स नाहीत. मोस्टली होम डेकोरेशन आयटम. आणि अमा म्हणतात ते खर आहे. डॉलर मध्ये पे केल तर किंमती बर्‍या वाटतात.

Pages