Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाबा कामदेव , हर्पेन
बाबा कामदेव , हर्पेन सिनिऑरिटी साईट मस्तच आहे. भारतात्ल्या नातेवाईकांनी पाठवून दिली. खुप धन्यवाद.
कोणी everstylish.com वरचे
कोणी everstylish.com वरचे इअररिंग्ज घेतले आहेत का? - मी घेतले आणि मला त्यांची quality अजिबातच नाही आवडली . पॅकिंग पण खराब . इअरिंग्स चे दांडे सगळे वाकले होते पॅकिंग मध्ये. अँकलेट पॅकिंग मधून काढतानाच तुटलं. गोल्डन कलर तर असा वाटत होता कि एका दिवसात काळा पडेल.
बोहो आणि एथनिक डिझाइन्स खूप सुंदर आहेत - +१ तेच एक फक्त ठेवून घेतलं बाकी सगळे रिटर्न ना टाकलंय
कोणी everstylish.com वरचे
कोणी everstylish.com वरचे इअररिंग्ज घेतले आहेत का? - मी घेतले आणि मला त्यांची quality अजिबातच नाही आवडली . पॅकिंग पण खराब . इअरिंग्स चे दांडे सगळे वाकले होते पॅकिंग मध्ये. अँकलेट पॅकिंग मधून काढतानाच तुटलं. गोल्डन कलर तर असा वाटत होता कि एका दिवसात काळा पडेल.
बोहो आणि एथनिक डिझाइन्स खूप सुंदर आहेत - +१ तेच एक फक्त ठेवून घेतलं बाकी सगळे रिटर्न ना टाकलंय>>>>>> आईगं हो का?
मी पण मागवलय. ३ इअरिंग्स , बोहो टाइप्स मधे. बघुया आता. २७ ते ३१ मधे डिलीव्हरी मिळेल असं दिसतय, पण नक्की कुठपर्यंत आलिये ते दिसत नाही.
अमा, व्हील चेअरचा
अमा, व्हील चेअरचा घेण्यापूर्वी बराच अभ्यास केला . व्हीचे लहान मुलापासून ज्ये ना पर्यन्त कोणालाही लागू शकतात. त्याप्रमाणे गरजानुरूप उपलब्ध आहेत. ४-५ हजारापासून तर ४-५ लाखापर्यन्त आहेत. सतत बेड्वर पडून असलेले ज्ये ना गल्लीच्या टोकापर्यन्त फिरून आले तरी फ्रेश होतात, मानसिक स्थिती बदलते, चिडचिड कमी होउन उल्हसित वाटते. दुसर्याने ढकलायच्या, स्वतः चाक फिरवून चालवायच्या मॅन्युअल मोडच्या असतात. नव्याने बॅटरीवर चालणार्या आल्या आहेत. सध्या सगळ्यात पॉप्युलर असलेली आणि बसाययला कर्वेचर असलेली आहे. किंमत ९००००/- अगदी धक्का न बसणार्या उत्कृष्ट सस्पेन्शनच्या ४ -५ लाखापर्यन्त आहेत पण त्या लांबच्या प्रवासा साठी म्हनजे शेतावर जायला इ. उपयोगी . काही स्कूटर सारखी मॉडेल्स आहेत . आम्ही आइच्या गरजेनुसार कर्मा या तैवानी कम्पनीची घेतली आहे. https://www.seniority.in/ergonomically-designed-power-wheelchair-kp-10-3... एका चार्ज मध्ये १२ कि मी जाते . अगदी लहान मुलालाही तीन भागात डिस्मॅन्टल व असेम्बल करता येते व मोटारच्या डिकीत घालून नेता येते. त्याला जॉय स्टिक आहे त्यानुसार ३६० अंशात वळवता येते मागे पुडे जाते. स्पीड ३ आहेत. जॉय स्टिक सेन्सिटिव असल्याने त्याची कळ किती प्रेशरने दाबायची याच्या जजमेन्टला थोडी प्रॅक्टिस लागते. याची लिथियम बॅटरी असून तिचेच वजन २६ किलो आहे. एकून वजन ४० कि च्या आसपास आहे. पण तीन भागात सुटी होत असल्याने वजन विभागऊन जाते . मॅन्ञुअली देखील चालते पण वेगळ्या व्यक्तीने ढकलावी लागते. नवीन वजनाने हलक्या बॅतर्यांचे मॉडेल्स ही आहेत पण किंमत जास्त आहे. एकून वॅल्यु फॉर मनी आहे
आमच्या कडे एक प्रौढ माणूस
आमच्या कडे एक प्रौढ माणूस अपंग झाला आहे. तो व्हिचे वर गर्दिच्या रस्त्यावर आरामात पळवत असतो. स्पीड ब्रेकर वगैरे लीलया पार करतो व एकदम फ्रेश दिसतो. दु:खाचा लवलेशही नसतो चेहऱ्यावर.
Thanks i know a lady with
Thanks i know a lady with spinal issues. She can really use this type of chair.
everstylish.com भंगार अनुभव
everstylish.com भंगार अनुभव . परत ऑर्डर देणार नाही. पैसे तर गेलेच पण माल पण मिळाला नाही. COD केलं असतं तर बरं झालं असतं. कानाला खडा. त्यांच्या custome care ला कॉल केला तर म्हणे पैसे जमाच नाही झाले. माझ्या बँकेतून तर वजा झालेत कधीच ५/६ दिवस झाले असतील.
everstylish.com. >>>>.माझे
everstylish.com. >>>>.माझे इअररिंग्ज आज सकाळी डिलिव्हर झाले, पण बिझी असल्याने आता लंच टाइममध्ये पॅकेट उघडलं. अगदी फोटो मधल्या सारखे आहेत. ,जड नाहीत पण प्लास्टिक किंवा तत्सम चिप मटेरियल नाही. स्तर्दी वाटतात. फक्त एकच आवडलं नाही की oxidized टोन कमी आणि सिल्वर जास्त आहे. पण वाईट नाही. मला पर्सनली खूप काळपट आवडतात म्हणून तसं वाटलेलं असू शकतं.
मला सेलफोनवरून फोटो अपलोड करता येत नाहीत
चैत्रगंधा, : Sad : माझ्याकडे पॅकिंग चांगलं होतं, बबल रॅप केलं होतं
everstylish.com भंगार अनुभव >
everstylish.com भंगार अनुभव >>>>>>>> अईगं
चैत्रगंधा , आता मला धाकधुक वाटतेय , माझे कानातले अजुन आले नाहीत, पण कसे येतील असं वाटतय. तसही कॅश ऑन डिलीव्हरी आहे .
. तसही कॅश ऑन डिलीव्हरी आहे .
. तसही कॅश ऑन डिलीव्हरी आहे .>>>> सीओडी असेल तर पैसे देण्यापूर्वी,वस्तू चेक करून मग द्यायचे का? एखादी गोष्ट फॉल्टी असल्यासपैसे न देता परत करता येते का?
मी विचारलं आणणाऱ्यास तेव्हा
मी विचारलं आणणाऱ्यास तेव्हा तो म्हणाला मी घेऊ शकत नाही. पण तुम्हास उघडून देतो. हा बारकोड कापायचा नाही. खालून कुठूनही पिशवी कापायची. परत करण्याचा मेसेज टाकल्यावर दुसरा कुणी येऊन हा बारकोड स्क्यान करून नेतो. पैसे दिल्यावर उघडून पाहिले मागवलेलीच वस्तू होती.
पण बिल नव्हतं. त्याने लगेच फोन केला बिल नाही ये. मला विचारलं बिल हवय का? मी नको म्हणालो.
ओ.के.
ओ.के.
खरंच पार्सल उघडून बघायची खबरदारी घेतलीच पाहिजे.इतक्या वेळा ऑनलाईन मागवले,पण चेक केले नव्हते.यापुढे करायला पाहिजे.
नोजरींग अगदी स्वस्तं आहेत
नोजरींग अगदी स्वस्तं आहेत स्टायलिश वर पण चापवल्या आहेत आणि आऊट ऑफ स्टॉक. तसंही इथले अनुभव वाचून न घेतलेलं बरं असं वाटतंय. ट्रेन झिंदाबाद. पण ट्रेनमध्ये नोजरिंग मिळत नाहीत. आद्याची एक नोजरिग मी सातशेला घेतली आणि छोटेसे कानातले तींशेला. ते कानातले हरवले आणि फार हळहळ झाली जीवाची. तेव्हापासून आद्या, मोहा अशा कुठल्याच ब्रँडच्या प्रदर्शनाला जात नाही. काहीतरी आवडतं आणि घेतलं जातं. चांदीचे दागिने रोज घालायला मलातरी नाही परवडणार. अमेझॉन वर बघते नोझरिंग.
नोजरिंग माझ्या पुतणी ने
नोजरिंग माझ्या पुतणी ने अॅमेझॉन वर २०० ला ६ मागवले होते, एव्हरस्टाइलीश मधे होते तसेच चापाचे. छान आहेत सगळे.
मी पण मागवले 4 चे बोहो आणि
मी पण मागवले 4 चे बोहो आणि एथनिक types चे everstylish मधून . Cod ने. कसे असतील उत्सुकता आहे. पण designs सुरेख आहेत असे शॉप मध्ये बघायला मिळत नाहीत
>>टाटा पॉवरवाले त्यांच्या
>>टाटा पॉवरवाले त्यांच्या मुंबईतल्या ग्राहकांसाठी नव्या टेक्नॉलॉजीचे पॉवर सेव्हर सीलिंग फॅन्स अर्ध्या किंमतीत देताहेत. पण त्या उत्पादकांची नावं कधी ऐकलेली नाहीत. कोणी हे पंखे घेतलेत का?>>>
ह्याची लिंक आहे का? तपशिल कुठे मिळतील?
आयटोकरी डॉट कॉम नावाची,
आयटोकरी डॉट कॉम नावाची, भारतीय पारंपारिक / हातमाग कापड चोपड, साड्या, हातानी बनवलेल्या वस्तू, दागदागिने, आदिवासी / लोककलेतील चित्रे ई. करता एक भरपूर विविधता आणि पर्याय असलेली वेबसाईट आहे.
खास भारतात बनवलेल्या म्हणून ज्या छोट्या मोठ्या भेटवस्तू ज्यांचे परदेशी लोकांना अप्रूप असू शकते अशा वस्तू इथे मिळतील.
याआधी ह्या धाग्यावर उल्लेख झाला असेल तर दुर्लक्ष करा कृ. ध.
त.टी. - ऑक्सीडाईज्ड / जर्मन सिल्व्हर ई. प्रकारचे दागिनेही इथे आहेत.
माझा आयटोकरीचा अनुभव चांगला
माझा आयटोकरीचा अनुभव चांगला आहे. मी दिल्लीच्या प्रसिद्ध गुलाबसिंग जोहरीमलची काही अत्तर मागवली होती. त्यांच्या दुकानात ती थोडी स्वस्त मिळतात पण माझ्या आधीच्या काही बाटल्या संपल्याने मला पर्याय नव्हता. पॅकिंग व्यवस्थित करून दिलेलं होतं.
मी अमि, मला टाटा पॉवरकडून
मी अमि, मला टाटा पॉवरकडून इमेल आली.
https://www.tatapower.com/media/PressReleaseDetails/30/Tata-Power-launch...
everstylish.com भंगार अनुभव >
everstylish.com भंगार अनुभव >>>>>>>> अईगं Sad चैत्रगंधा , आता मला धाकधुक वाटतेय , माझे कानातले अजुन आले नाहीत, पण कसे येतील असं वाटतय. तसही कॅश ऑन डिलीव्हरी आहे .>>>>> मी अजूनही वाट बघतेय, आलेच नाहीत, ट्रॅकींग केलं तर शिप्ड असं दिसतंय. इतके दिवस प्रोसेसिंग असं दिसत होतं.
सिनियॉरिटी डॉट कॉम चं फेसबुक
सिनियॉरिटी डॉट कॉम चं फेसबुक पेज मला कालपासून स्नेक कॅचर दाखवतंय
त्या सिनीऑरिटी वर इतक्या
त्या सिनीऑरिटी वर इतक्या अतर्क्य वस्तु उपलब्ध अस्तात लै विनोदी. परत साइट बघोन नुसते परत गेले की यू व्हिजिटेड बट वेंट बॅक. व्हाय. म्हणून विचारत राहतात. क्रोम उघडले उघडले कि नोटिफिकेशन्स. ही कशी बॅन् करावीत?
फेसबुक वर पण मध्ये मध्ये येत राहतात. अनेक वस्तू वार्धक्याशी संंबंधित नाहीत उगीच वेस्ट ऑफ मनी कॅटेगरी आहेत. कारण वय्स्कर लोकांकडे डिस्पोजेबल इनकम जास्त म्हणून टार्गेट करत राहतात. सध्या सिल्व्हर जनरेशन म्हणतात. ( संदर्भ बिझनेस स्टँडर्ड. ) त्यामुळे
अॅड टु कार्ट कराय आधी प्लीज एक मिनिट विचार करा खरेच गरज आहे का. व मग पु ढे जावा.
पुणे स्थित असीम फाऊंडेशन
पुर्वाश्रमीच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या साम्बा जिल्ह्यातल्या नागरिकांना (विशेषतः मरण पावलेल्या जवानांच्या बायका आणि कुटुंबीयांना) स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून बेकरी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन एक बेकरी चालू करून देण्यात आलेली आहे.
त्यात बनवल्या जाणार्या कोशर क्रंच आणि ऑलीव्ह ग्रीन कुकीज ऑनलाईन खरेदी करण्याची सोयही नुकतीच उपलब्ध झाली आहे. ही अगदी अलीकडची घटना आहे. परंतु ह्या योजनेला मिळालेल्या अमाप प्रतिसा दा मुळे आणि काश्मीर मधल्या सद्य परिस्थितीमुळे डिलीव्हरी उशीरा होत आहेत.
मी ऑर्डर दिली होती तेव्हा ३७० कलम हटवण्याची घोषणा झालेली नव्हती तरीही साधारण महिना लागला. असीम फाऊंडेशन कडून डिलिव्हरीला उशीर होत आहे असे सुचित करणारी आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारी ईमेल आली होती. मी त्यांना हवा तितका वेळ लागू दे आणि इतरांना घाई असेल तर त्यांना माझ्या आधी कुकीज दिल्या तरी चालतील असेही कळवले होते.
तर सांगायचा मुद्दा त्यांनी दोन लॉट मधे मिळून माझी ऑर्डर पुर्ण केली. कुकीज चवीष्ट आहेत, वाजवी दरात मिळताहेत, पॅकींगही व्यवस्थित होते.
कुकीज खुसखुशीत असूनही तुटल्या फुटल्या नाहीत.
https://www.aseemfoundation.org/orders.html
छान.
छान.
Everstylish वरून इथेच बघून 4
Everstylish वरून इथेच बघून 4 कानाटल्यांची ऑर्डर दिली होती 2 ठीक पण 2 प्रचंड मोठ्या size चे आले . घेताना size चा अंदाज येण्यासाठी काही फोटो नसतात त्यामुळे फसगत झाली आता रिटर्न केले आहेत.
आयटोकरी चांगली वाटतेय. अजून
आयटोकरी चांगली वाटतेय. अजून काही मागवलं नाही पण नोजपिन्स चांगल्या वाटल्या.
हरपेन, चांगली माहिती.मी पण
हरपेन, चांगली माहिती.मी पण मागवेन.
मेमरी कार्ड मोबाईलसाठीचे -
मेमरी कार्ड मोबाईलसाठीचे - sandisc 32 GB class 10 - दुकानात ६५०/- रु. अमेझोनवर ३१०/३९०/४५० रु काही फरक किंवा गडबड असावी का?
फूल (पी एच डबल ओ एल) डॉट कॉम
फूल (पी एच डबल ओ एल) डॉट कॉम
नावाच्या वेबसाईट वर देवाला वाहिलेल्या फुलांपासून (निर्माल्यापासून) बनवण्यात आलेल्या उदबत्त्या, धूप कांड्या आणि खत मिळते.
देवाला वाहिलेली फुले दुसर्या दिवशी निर्माल्य झाल्यावर नदीत विसर्जित केली जातात. हे नदी प्रदूषण टाळण्याकरता कानपूर स्थित अंकित आणि करण ह्या दोन मित्रांनी त्यापासून उदबत्ती, धूपकांडी आणि खत बनवण्याचे ठरवले आणि त्याच मालाची विक्री ह्या वेबसाईट द्वारे करत आहेत. तसेच ह्या उपक्रमामुळे अनेक महिलांना रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे.
वस्तू भारतात कुठेही पाठवायच्या झाल्यास त्याकरता वेगळी पाठणावळ आकारली जात नाही.
कॉटनचे ड्रेअ मतेरीअल कुठल्या
कॉटनचे ड्रेअ मतेरीअल कुठल्या साइटवर चांगले मिळतात. खुप महाग नको. डेली युजसाठी पाहिजे.
Pages