Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फर्गसन कॉलेज रस्त्यावरच्या
फर्गसन कॉलेज रस्त्यावरच्या वैद्यांच्या दुकानातून खरेदी करणे मला बरे वाटते. दोन्ही वैद्यांच्या दुकानात सगळी तयार पीठं मिळतात. दर्जा चांगला असतो. याच गोष्टी डीमार्ट मधून घेतल्या म्हणून दर्जात फरक पडणार नाही. डीमार्टला संध्याकाळी आणि शनिवार रविवार बिलिंग काऊंटरला तासभर रांगेत उभे रहावे लागते.
उद्या जर किराणावाले बंद झाले तर डीमार्ट आणि इतर लोक जिओच्या मार्गाने लोकांची जिरवणार नाहीत का ? कोपर्यावरचा वाणी बंद पडणे हे काही चांगले लक्षण नाही. (त्याच्याकडेच जा ही सक्ती नाही या पोस्टमधे).
सुपर डेलीवरच्या पालेभाज्या
सुपर डेलीवरच्या पालेभाज्या मुळं कापलेल्या असतात. तेवढा वेळ वाचतो. सकाळीच मिळत असल्याने आदल्या दिवशी ऑर्डर केली तरी चालतं. शिवाय ऑर्डर करताना आहे, नंतर आउट ऑफ स्टॉक हा बिग बास्केट सारखा प्रकार तिथे एकदाच झाला.
फक्त ते प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या प्लास्टिक पिशवीत पॅक करून देतात, हा प्रॉब्लेम आहे. प्रचंड कचरा. पर्यावरणावर भार.
मी सामान दुकानात, सुपरमार्केट
मी सामान दुकानात, सुपरमार्केट, भाज्या मासे चिकन मटण स्थानिक विक्रेत्यांकडे जाऊन घेते.
सगळंच आँनलाईन मागवणं पटत नाही.
भाजीवाला कांदे बटाटे वाला फळंवाली मावशी किराणावाला वाणी दुध अंडी ब्रेडवाला ह्यांच काय होणार असं वाटतं.
घरपोच भाजी पुरवणारे लोक आहेत.
घरपोच भाजी पुरवणारे लोक आहेत. ज्या बायका कामाला जातात त्या महिन्याचे पैसे अशा छोट्या व्यावसायिकांना देतात. आदल्या दिवशी व्हॉट्स अॅप वर उद्याचा मेन्यु, न मिळाल्यास पर्यायी भाजी असा तपशील मिळतो. भाज्या ताज्या असतात, चिरलेल्या असतात. रोजगाराचे जेव्हढे विकेंद्तीकरण होईल तेव्हढे चांगले मूठभरांच्या हातात सगळाच बाजार जाणे कोणत्याही कारणास्तव लाँग टर्म मधे परवडणारे नाही. नाहीतर रोज पेट्रोलचे भावही मनमानी पद्धतीने बदलतील.
अभ्यंकर नावाच्या एका महिलेचे
अभ्यंकर नावाच्या एका महिलेचे उदाहरण आहे. नवरा मेल्यावर नातेवाईकांनी हात वर केले. त्या बाईने जिद्दीने दोन मुलांना हाताशी धरून भाज्या घरोघर पोहोचवण्याचा व्यवसाय चालू केला. खूप लोकांनी त्यांना उस्फूर्तपणे ऑर्डर्स दिल्या. त्या जोरावर केटरींग चालू केले. आज खूप मोठा व्यवसाय आहे त्यांचा. या सर्वांनी डी मार्टातून भाज्या आणल्या असत्या तर हे शक्य नसते झाले.
मला सध्या उठसूट बाहेर जाणं
मला सध्या उठसूट बाहेर जाणं शक्य नाही. एक भाजीवाली घरी येत असे. पण ती हवी तेव्हा येईलच आणि आपल्याला हवी ती भाजी असेलच याची खात्री नाही. घासाघीस , भाज्या निवडणे हा प्रकार येत नाही. भाजी दुकानदार स्त्रीपुरुष दोघेही बनवतात असा अनुभव आला. रस्त्यावरून ओरडत जाणार्या फळवाल्याला घरी बोलवलं तर तो गळ्यात पडून खूप जास्त फळं घायला लावतो. मग ती सगळी एकदम तयार होऊन टाकायची वेळ येते.
प्रत्येक खरेदी मार्गात अडचणी
प्रत्येक खरेदी मार्गात अडचणी आणि त्रास आहेच.
आता दुय्यम शहरांतही १९ -२५ मजल्यांच्या इमारती उठत आहेत. ( आठ दहा किमिटर परिसरातही.) साधारणपणे दोनशे तिनशे घरं. होम डिलिवारीवाले येणार म्हणजे काय ट्राफिक होईल लिफ्टमध्ये आणि वाचमन कसे लक्ष ठेवणार?
कापडी पिशवी घेऊन दुकानात जाणे
कापडी पिशवी घेऊन दुकानात जाणे अगदीच अशक्य नसते. इतकेही कुणी बिझी नसते. कामवाल्या बायका कशा मॅनेज करत असतील ?
घरात वृद्ध व्यक्ती आहे. तिला
घरात अतिवृद्ध व्यक्ती आहे. तिला एकटं ठेवून वरचेवर किंवा जास्त वेळ बाहेर जाणं शक्य नाही.
एखाद्याची अडचण असते. ते काही
एखाद्याची अडचण असते. ते काही इतरांसाठी आदर्श उदाहरण होत नाही. लाँग टर्म मधे विचार केला तर मोनोपॉली होऊ नये यासाठी विचार करावाच लागेल. आमच्या भागातले सगळे किराणा दुकानदार घरी डिलीव्हरी देतात. चिरलेली भाजी देण्याचा व्यवसाय अनेक लोकांचा आहे. नेटवर पण आहेत. सोसायटीने पुढाकार घेतला तर थेट शेतातून टेंपो येतो कॉलनीत. सोल्युशन्स पण चिकार आहेत. अॅमेझॉनचा डिलिव्हरी वाला पण आपल्या वेळेत येत नाही. त्याच्याच वेळेत येत असतो. दूधाच्या पिशव्या घरपोच हे तर जुने झाले आता. अशी कोणतीही गोष्ट नाही जी शहरे आणि उपनगरात घरपोच होण्यासाठी मोठे मॉल्सच असावे लागतात. ते येण्याआधीपासूनचे हे व्यवसाय आहेत.
आणि खराब भाज्या तर बिग बझार, हायपर मार्केट, स्टार बझार मधे पाहिलेल्या आहेत. डी मार्टच्या सातारा रोडमधे भाज्या शिल्लक नसतात अनेकदा. तिथले मांस मासे घेऊ नका असे लेख होते मध्यंतरी. खूप दिवसाचे असते ते.
कोपर्यावरचा वाणी बंद होणे ही काही भूषणास्पद गोष्ट नाही इतकाच मुद्दा होता. बाकी ज्याला त्याला आपली अडचण, आपल्या प्रायारिटीज ठाऊक असतात. त्यामुळे त्याबद्दल नो फर्दर डिस्कशन.
मी बहुतेक जाता येता रस्त्यात
मी बहुतेक जाता येता रस्त्यात चांगले सुपर मार्केट आणि त्याला लागूनच भाजीचे दुकान आहे तिथुन घेतो.
अधून मधुन बिगबास्केट.
ऑनलाईन / आठवडी बाजार / मंडईत भाज्या ठराविक मापानेच घ्याव्या लागतात (किमान अर्धा किलो) आणि मग वाया जातात. त्यामुळे वरील दुकानात घेतो, हवी तेवढीच घेता येते.
सुपर डेली सकाळी पाच वाजेतो
सुपर डेली सकाळी पाच वाजेतो डिलिव्हरी करतात.
दुकानदारांकडून मागवायचे म्हणजे cash, नेमके सुटे पैसे इ.
केमिस्ट whatsapp वर यादी घेतो आणि घरी कार्ड रीडर पाठवतो.
लहान व्यावसायिकांचा धंदा टिकवायला हवा, हे मान्य आहे. पण सध्या अगदीच नाईलाज आहे.
मी एकटाच राहत असल्याने
मी एकटाच राहत असल्याने पालेभाज्या निवडायचा, मोडायचा व साफ करायचा खूप कंटाळा येतो. त्यामुळे पालेभाज्या आवडत असूनही आणल्या जात नाहीत. मी चेंबूरला राहत असतांना एक-दोन भाजीवाल्यांना ज्यादा पैसे देऊन पालेभाजी मोडून देण्याची विनंती केली होती, पण त्यांनी वेळेअभावी साफ नाकारली. आता खारघरलाला चौकशी केली पण कुणीही पालेभाजी मोडून विकणारे भेटले नाही. तर एखाद्या ऍपहून स्वच्छ, निवडलेल्या व मोडलेल्या पालेभाज्या विकत घेण्याचा कुणाला अनुभव आहे का?
ओलेक्स व पोर्टर . कॉम चा पण
ओलेक्स व पोर्टर . कॉम चा पण अनुभव मस्त आहेत
एक वापरलेला फ्रिज स्वस्तात हवा होता. तर ओलेक्स वर मिळाला अंधे रीत जाउन घ्यायचा होता. व कॅश पेमेंट करायचे होते. मी लेकी बरोबर गेले तर विक णारी पण बाईच होती. बहुतेक सिंगल पेरेंटच असावी सोबतीला बारका छोकरा घेउन आली होती. मग मी वडीलकीच्या नात्याने चौक्शी केली फ्रिज घेतला व क्याश दिली. आम्ही बायकांनीच फ्रिज खाली उतरवला लिफ्ट मधून. मग पोर्टर . कॉम ला फोन केला मध्ये अध्ये मी ग ड ब ड धमाल करून बारक्याला हसवले. त्याचे खुदु खुदू हसणे इतके गो ड वाटले.
मग आम्ही त्यांना बाय केले. पंधरा मिनिटात पोर्टर ची गाडी आली. छोटा टेंपो. दोन बाप्ये त्यांनी फ्रिज चढवला दोरीने बांधला. तिकडे तिथल्या मुलीने उतरवुन चढवून घेतला.
पोर्टर वाल्याना आम्ही ३०० रु
पोर्टर वाल्याना आम्ही ३०० रु दिले व बाकीचे चार्जेस काय ते. घरचा बाप्या नाही ना.
मग मायक्रोवेव्ह मुलुंड ते अंधेरी हवे होते. ते पण पोर्टर वाल्याने उचलून नेले. चस्मिश मुलगाच होता.
मुलींनी फर्निचर थोडे ओशिवारा मार्केट मधून स्वस्तातले घेतले. थो डे आयकिआ ऑनलाइन पर्चेसेस. व रेंट अ फर्निचर का काय आहे तिथून बेड व
गाद्या घेतल्या.
हे लोक्स एकदम पोलाइट व व्य्वस्थित प्रोफेशनल बोलले. वाजवी दाम
@ राहुल बिग बास्केट वर leafy
@ राहुल बिग बास्केट वर leafy vegetables section मध्ये पालक मेथी chopped बघितलं आहे, मागवलं नाही. अख्खा पालेभाज्या बर्या असतात ( पावसाळ्यात नाही मागवत). BB टाटा कडे गेल्या पासून काही मागवलं नाही.
अवांतर: मुंबई मध्ये एखादा ग्रूप आहे का जिथै आपल्याला नको असलेल्या परंतु सुस्थितीत असलेले वस्तू देता येतील (उदा. माझ्याकडे बेबी बाॅटल sterilizer , बेबी क्रीब आहे मला विना मोबदला द्यायचंय तर काय करायचे) म्हणजे वस्तू भंगारात पण नाही, कुणीतरी वापरल्याचे समाधान, इ् . आपल्या घरात क्रोकरी इ. अशीच कपाटात ठेवून दिलेली असते , तवे, ताटं वाट्या आलेली असतात, आपण गोळा केलेली असतात त्यांचा कुणाच्या घरी उपयोग झाला तर बरं
<<मी एकटाच राहत असल्याने
<<मी एकटाच राहत असल्याने पालेभाज्या निवडायचा, मोडायचा व साफ करायचा खूप कंटाळा येतो.>> दुकटे रहात असले तरीही येतो.
स्वीगी इंस्टामार्ट मध्ये मूळ कापलेल्या, धुतलेल्या पालेभाज्या आहेत, त्यातल्या त्यात काम कमी.
सुपरदेली,Zepto वरही
सुपरदेली,Zepto वरही पालेभाज्या अगदी निवडून नसल्या तरी बऱ्यापैकी स्वच्छ असतात.मुख्य म्हणजे फ्रेश असल्याने कोवळ्या देठासकट चिरता येतात.
धन्यवाद. मीही बिगबास्केटवर
धन्यवाद. मीही बिगबास्केटवर अकाऊंट काढतोय.
Meghask,
Meghask,

ग्रोफर्स आता ब्लिंकिट झालंय.
ग्रोफर्स आता ब्लिंकिट झालंय.
त्यांनी मोठ्या प्रमाणात डार्क स्टोअर्स उघडायला सुरुवात केली आहे.
तुमच्या भागात असेल तर अक्षरशः: १५ मिनिटांत डिलिव्हरी.
_---++++
लहान वस्तू इकडून तिकडे पाठवायला डन्झो.
सुटले ली पालेभाज्या, कोथिंबीर
सुटले ली पालेभाज्या, कोथिंबीर इ. मुळं छाटून, जुडी न बांधता देतात. बऱ्यापैकी स्वच्छ असतात.
निवडायला कमी वेळ लागतो.
फु प्रो असेल तर चटकन चिरून होतात.
Country delight
Country delight
घरपोच दूध डिलिव्हरी app
चांगले आहे
Danzo सुरु आहे का अजून?
डॅन्झो नवीन कळ्ले.
डॅन्झो नवीन कळ्ले.
सद्ध्यातरी सुपरडेली,बिग बास्केट,झेप्टो(पट्कन भाजी,आईसक्रीमसाठी छान आहे) वापरतेय.अधूनमधून जिओ,फ्लिपकार्ट(आताशा वापर कमी झालाय).लॉकडाऊनमधे फ्लिपकार्टवरून ग्रोसरी मागवायचे त्यात एकंदर ३ वस्तू रुपयाच्या आणि २ वस्तू कमी किंमतीच्या होत्या.त्यावेळी एका रुपयात मिळालेल्या किलोभर साखरेच्या पिशव्या मी अजूनही वापरतेय.नंतर बाईलाही दिल्या.घरातील एकच मेंबर आणि बाई याशिवाय चहात साखर वापरली जात नाही.अधीमधी शिरा,खीर व्हायची.आता साखर विकत आणावी लागेल.
कुणाला बिग बास्केट महाग वाटत
कुणाला बिग बास्केट महाग वाटत नाही का?
सफरचंद 100 रु. किलो मिळत असतं तेव्हा बि.बा वर 230 रु. ला तीन वगैरे पाहिलं.
भाजीचं ठीक आहे की आपल्याला बाहेर जाऊन आणावी लागते पण वाणी लोक घरपोच देतात की. मला प्रत्येक जिनसात किलोला पंधरा वीस रु. चा फरक दिसतो.
कुणाला बिग बास्केट महाग वाटत
कुणाला बिग बास्केट महाग वाटत नाही का?.......... मलाही वाटते. म्हणून मी इतरही ॲप्स वापरते.
पण डाळिंब इ फळे बिबावरून मागवते.जास्त चांगली असतात हा माझा अनुभव आहे.तो दर्जा लोकल मार्केटमध्ये कधी कधी मिळत नाही. biscuits इ.नीट न तुटता यावी म्हणूनही बिबा आणि फ्लिपकार्ट जास्त सोयीचे पडते.
ही सारी ॲप्स वापरणे म्हणजे ॲडिक्शन झाले आताशा.भाजी आणायला जाणेही नको वाटायला लागतं.' अरे भाजी नाही घरात ,जाऊ दे अमुकवरून मागवू ' असं होतेय ते वाईट आहे.
हे मागवणे प्रकरण फक्त शहरी
हे मागवणे प्रकरण फक्त शहरी असावे.
A2 दुधासाठी Provilac , सुप
A2 दुधासाठी Provilac , सुपरडेलीवरही मिळतं. प्रोव्हीलॅक हा ब्रँड आहे.
फ्रोझन , चपात्या, पराठ्यांसाठी https://www.thefreshneeds.com/
आमच्या इकडे तरी बिबा आणि
आमच्या इकडे तरी ( मी म. प्र. मध्ये राहते) बिबा आणि दुकानातले रेटस् जवळपास सारखेच आहेत. मी अधूनमधून दुकानातून पण मागवते पण दरवेळी कमीत कमी एक वस्तू चुकीची मिळाली आहे. मग परत दुकानात जाऊन बरोबर वस्तू घेऊन या वगैरे वैताग होतो. कधी कधी हव्या त्या ब्रॅण्ड ची वस्तू मिळत नाही, विशेषतः पोहे आणि रवा.
तांदूळ एकदम दहा किलो घेतला तर बिबावर स्वस्त पडतो.
भाजीसाठी इकडे एक लोकल ऍप आहे ग्राम हाट म्हणून ते वापरते. भाज्या स्वच्छ आणि चांगल्या असतात. किंमत कोपऱ्यावर असणाऱ्या भाजीवाल्या एवढीच असते. नो मिनिमम ऑर्डर, इझी रिटर्न वगैरे आहे. भाजी आवडली नाही तर परत घेऊन जातात. रात्री ऑर्डर दिली की सकाळी दहापर्यंत भाजी घरपोच मिळते.
त्यांचे अधूनमधून प्रमोशनल डिस्काउंट सुरू असतात. मजेदार कोडी वगैरे असतात आणि उत्तर बरोबर आले की डिस्काउंट मिळतो. कधी कधी तीन दिवसांत दुसरी ऑर्डर दिली की डिस्काउंट मिळतो.
त्यांचे प्रमोशनल विडिओ पण फारच मजेशीर असतात.
आताच बिबावरून भाज्या आणि इतर
आताच बिबावरून भाज्या आणि इतर गोष्टी मागवल्या.भाज्या लोकल मार्केटपेक्षा स्वस्त आहेत. बाकी काही गोष्टी मला दुसरीकडे मिळत नव्हत्या.
झेप्टोवर चांगले discount milate.2 महिन्यापासून जिओ वरही काही प्रमाणात पैसे कमी द्यावे लागतात.कदाचित जास्त काळापासून असेलही.
Pages