साखरपुडा आणि ओटीची पिशवी.

Submitted by सुलेखा on 25 February, 2013 - 04:32

साखरपुडा--
otichi pishavi v sakharapuda. 002.JPG
साहित्य --पातळ पुठ्ठा,गिफ्ट्पेपर,सेलोटेप,फेविक्विक,टिकल्या,मोती,सिक्वेन्स,लेस,सोनेरी दोरी किंवा सॅटीन लेस.
मी यासाठी चादरीच्या पॅकिंग साठी वापरतात तो पुठ्ठा वापरला आहे.साडी/शर्ट पॅकिंगचा चौकोनी बॉक्सही घेता येईल.
११" लांबी रुंदीचा एक काटकोन कापला.त्याची तिसरी बाजु ११ " त्रिज्या येईल अशी गोलाकार कापली.थोडक्यात सांगायचे तर ११ इंच त्रिज्येच्या वर्तुळाचा १/४ भाग दिसेल असा आकार कापला.
आता या त्रिकोनाच्या तीनही कडांना फेविक्विक लावुन घेतले.गिफ्ट पेपर ची १ इंच बाजु बाहेर राहील अशा रीतीने त्यावर हा काटकोन चिकटवला.गिफ्ट पेपरचा जास्तीचा भाग तसाच ठेवला.
gift paper.JPG
आईसक्रीम चा कोन किंवा भेळवाले करतात तसा कोन तयार केला.काटकोनाच्या दोन बाजु जिथे एकावर एक येतात तिथे सेलोटेप लावली.कोन ला सजावटीचे सामान चिकटवुन घेतले--लेस,मोती,सिक्वेन्स वगेरे.आता या कोनमधे बदाम,जर्दाळु,काजु,किशमीश व खडीसाखर भरले .कोनच्या वरच्या बाजुला असलेल्या जास्तीच्या गिफ्टपेपरला सोनेरी दोरीने घट्ट बांधले.जास्तीचा पेपर कात्रीने कापला.
otichi pishavi v sakharapuda. 004.JPG
कार्यक्रमाच्या वेळेस या सोनेरी दोरीवर दोन गुलाबाच्या कळ्या सेलोटेप ने चिकटवल्या.हा गिफ्टपेपर तसाच ठेवुन सोनेरी दोरीऐवजी सॅटीन रिबन गुंडाळुन त्याचे फुल बांधता येते.
ओटीची पिशवी--
otichi pishavi v sakharapuda. 001.JPG--
साहित्य---
एक ब्लाउजपीस,सोनेरी /सॅटीन लेस.
१५ "लाबी-रुंदीचे रेशमी कापडाचे [ब्लाऊजपीस] दोन चौकोन कापले.त्यापैकी एका चौकोनाच्या मध्यभागी ५ 'चा चौरस कापुन घेतला.त्याला उलट बाजुने १/२ " रुंदीच्या कापडाच्या पट्टीचा नेफा शिवुन घेतला.या नेफ्याला कोणत्याही दोन समोरासमोरच्या बाजुला मधे दोन काज केले.त्यातुन सॅटीन रिबिन बटव्याच्या सरकफासासारखी ओवुन घेतली.आता हा चौकोन नेफा आतील बाजुला राहील असा /उलट बाजुने दुसर्‍या चौकोनावर ठेवला. हे दोनही चौकोन व सोनेरी लेस एकत्र धरुन शिवली .जेणेकरुन वरुन चारी बाजुला सोनेरी लेस दर्शनी भागावर दिसली.त्यानंतर दोनही चौकोनाच्या चार काटकोनांवर साधारण ३ ते ४ इंचावर एक तिरकी रेघ मशीनने मारली. ओटी भरण्यापुर्वी ही पिशवी पदरावर ठेवायची .ओटीचे साहित्य ओटी भरताना या पिशवीत भरायचे,मधला सरकफास ओढला कि पिशवीचे तोंड बंद होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओटीचा चौकोन बंद कसा करायचा? बंद केल्यावरचा फोटो टाकाल का? घरी फॅब्रिक आहे बनवून ठेवते. दोन्ही मस्त आयडिया आहेत.

अश्विनी,लहान चौकोनला आतुन नेफा शिवुन त्यात सॅटिन लेस्/रिबिन बटव्याच्या सरकफासासारखी ओवली आहे ना .ती दोन्हीकडुन ओढली कि पिशवी [बटव्यासारखी]बंद होते .तसे जर जमले नाही तर साधी नाडी ओवतो तसे कर..आता मी केलेली ओटीची पिशवी दिली गेली.त्यामुळे तो फोटो देता येणार नाही.

सुरेख !!

सुंदर. साखरपुडा मस्त जमलाय.
एक सुचवायचे आहे... ओटीची पिशवी शिवताना दोन्ही एकावर एक ठेवताना कोनावर कोन न ठेवता तिरके ठेऊन शिवावे म्हणजे पिशवी बंद केल्यानंतर आठ पाकळ्यांचा बटवा होतो.

मधु.होय,असा आठ पाकळ्यांचा बटवाही छानच दिसतो.मी तशी पिशवीही शिवली आहे.सूचना छानच आहे.त्याबद्दल धन्यवाद.मॉल मधल्या पॉप़कॉर्नच्या स्टॉलवर जो चौकोनी पुडा मिळतो त्याचा असाच गिफ्ट्पेपर लावुन साखरपुडा केला. होता.तो बराच मोठ्ठा असल्याने त्यात भरपूर मखाणे व ड्राय फ्रुट्स भरले होते.त्याला वरुन चौकोनी झाकण बनवुन त्यावर एक कळी चिकटवली होती.

हा मी दोन वर्षांपूर्वी केलेला साखरपुडा
sakharpuda-4.JPG

हॅन्डमेड कागदाचा रोल केला, त्यावर डेकोरेशन केले. तळ म्हणून जुन्या झाकणावर हा रोल चिकटवला, पुठ्ठयाचे झाकण केले, गिफ्ट्पॅकमधे मिळालेल्या रिबिनीचे फूल झाकणाला लावले. रोल जास्त उंच केला तर जास्त पेढे / साखर / खाऊ ठेवावा लागतो.

सुलेखा, तुझी मॉल मधल्या पॉप़कॉर्नच्या स्टॉलवर च्या चौकोनी पुड्याची कल्पना सुद्धा छान आहे. नक्की करून पाहीन.

मधु मकरंद,तू बनविलेला साखरपुडा छान आहे.
मी पॉपकॉर्न च्या चौकोनी पुड्याचा केला होता तेव्हा आत काय भरायचे हा प्र्ष्न होताच कारण एकतर तो आकाराने बराच मोठा होता तसेच भरल्यावर तो जड व्हायलाही नको होता.आणि सुकामेवा तसेच खडीसाखर वजनाला जड असते.त्यामुळे मी या पुड्यात खालच्या अर्ध्या भागापर्यंत मखाणे भरले त्यावर सुकामेवा,खडीसाखर्.त्यामुळे साखरपुडा फार जड झाला नाही.पण एकुण त्यावर चिकटवलेल्या डेकोरेशनमुळे फारच छान दिसत होता.आमच्याकडे असा साखरपुडादेवुन पेढा वेगळा देतात.