सॅटीनच्या रिबीनीची फुलं ( बदलून)

Submitted by मनीमोहोर on 21 June, 2015 - 12:59

काही दिवसांपूर्वी मुलीकडे गेले होते. तिच्या कडे देवपूजेसाठी फुलं मिळत नाहीत आपल्याकडे मिळतात तशी. बुके मधली फुल देवाना वहायला योग्य वाटत नाहीत आणि रोज तसे करणे परवडणारे ही नाही. फुलांशिवाय देव बघणे बरे वाटत नाही. काय करता येईल म्हणून मी विचार करत होते तर नेट वर बघुन ही सॅटीनच्या रिबीनीची फुलं केली आहेत. अगदी सोपी आहेत. देठाला सेल्फ अ‍ॅडहेसिव हिरवी टेप गुंडाळली आहे आणि पानं ही त्याच टेप पासून बनवली आहेत. आकाराने छोटी असल्याने देव्हार्‍यात ठीक्क बसतात आणि आकर्षक रंगांमुळे देव्हारा ही छान दिसतो. दर आठ पंधरा दिवसानी बदलुन बदलुन घालता येतात.
याशिवाय कुठे ही ऐन वेळेला सजावटी साठी उपयोगी पडतात जसे ताटाभोवती महिरप म्हणून केक च्या बाजुला सजावट म्हणून. फुलाला टुथ पिक चे देठ करुन छान बुके ही करता येतो. एखाद छोटसं फुल गिफ्ट द्यायच्या पाकिटाला लावून पाकीट सुंदर बनवता येतं.

हा त्याचा फोटो

From mayboli

ही फुलं कशी केली त्याची ही लिंक.

https://www.youtube.com/watch?v=7ZkXi0WtYc8

आता कृती ही लिहीते.

पाऊण इंच रुंद रिबीनीचा १५ इंच लांब तुकडा घ्यावा.
दोन इंचावर ती रिबीन ९० अंशावर दुमडावी आणि थोडी गोल गोल गुंडाळावी जेणे करुन गुलाबाच्या आतला भाग तयार होईल. तो झाला की रिबीन पाकळ्यांसाठी अर्धी फोल्ड करुन गुंडाळत जावे रिबीन संपेपर्यंत. फुल न सुटण्यासाठी खाली दोरा बांधावा. (लिहीलीय मी कृती पण नाही जमलय मला नीट लिहायला तेव्हा विडिओच पहा आणि करा. )

मध्यंतरी मी अशी खूप फुल केली कुणा कुणाला देण्यासाठी. शेवटी त्या दुकानदाराने विचारली की फुल बनवण्याचा तुमचा व्यवसाय आहे का ? ( स्मित)

हा आणखी एक फोटो

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!! किती सुर्रेख आयडिया.. आणी फुलं ही खूप सुबक झालीयेत..
जमल्यास स्टेप बाय स्टेप शिकव बरं ऑन लाईन Happy
किंवा लिंक टाक प्लीज!!!

छान!

माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हा सगळ्यांना आवडला खूप खूप धन्यवाद.

कशी केली ते लिहीते. आणि लिंक ही मिळतेय का ते बघते कारण खूप नेट सर्फिंग केलं होतं हे असं काही शोधण्यासाठी. .

मस्त Happy

धन्यवाद सर्वांना परत एकदा पतिसादांसाठी.

फुलं कशी करायची ते लिहीलय हेडर मध्ये पण इतक छान नाही जमलय लिहायला याची जाणीव आहे. तेव्हा व्हिडीओच बघा.

.

Pages