मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुना आहे तो वाक्प्रचार.... आदीकाळापासून टू ते सोळा हजार टायमिंग असलेले आहेत.

जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसुता संगे गंगा < ---- Happy
मस्तकी वाहे

भरत +१
ह्यात शब्दशः 'चंद्रकला शिरी धरी' म्हणजे मूनलाईटही आले. Lol

-------
मनिम्याऊ Lol

श्याम,डोन्ट टॉक टू मी.यु आर टू टायमिंग विथ कुबजा >>> हे कुठले गाणे आहे? टेक्नीकली कृष्ण कुब्जेला एकदाच भेटला होता.

>> सोळा हजार टायमिंग

Lol हे मस्त आहे. प्रत्येक इंजिनवर जशी क्षमता लिहिलेली असते वॅट्स मध्ये तसे माणसांच्या बाबत हे लिहिता येईल.
बहुतेक जण १ ते २ टायमिंग. काहीजण पाच/सहा टायमिंग. तर दुर्मिळ केसेस शेकडो टायमिंग.
आणि भगवान श्रीकृष्ण १६ किलो टायमिंग Lol

ते वृंदावन सारंग मधलं प्रॅक्टिस गाणं आहे

ना बोलो श्याम हमेसंग
जान गयी तुमरो ढंग
कुबजा नारी अति मन भाई
अब कैसो तुमरो रंग(असं काहीतरी)

चुकीचं ऐकलेले नाही पण चुकीचा अर्थ लावलेलं गाणं म्हणजे, जब जब फुल खिले चित्रपटातील , शशी कपूर आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं , ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे. लहान नातवंडे आपल्या आजीला सांगत आहे की आजोबा म्हणजेच नाना, यांना प्रेम, प्यार करायचं होतं, आणि आजीशीचं प्रेम झालं. बाकी पण इन्कार करायचा होता म्हणजे नकार द्यायचा होता पण एकरार म्हणजे होकार तुला म्हणजे आजीला देऊन बसले. "नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे"

अजून किती गाणी लहानपणी आपण चुकीची ऐकत होतो असे शोध लागणार आहेत? Lol

बेशक़ मंदिर मस्जिद तोड़े...

पुढे "भुले जा....... ये कैसा?" असे काय वाट्टेल ते ऐकू यायचे. ते बुल्लेशाह ये कहता असे आहे. पंजाबी सूफ़ी संत/कवी बुल्ले शाह यांचा तो उल्लेख आहे हे आज कळले:

मला पण ते उचलून घेतलं ऑड वाटतं
ज्या काळात हे गाणं बनलं त्या काळात असं पहिल्यांदा पाहिलेल्या बाईला उचलून घेता येत नसावं बहुतेक Happy

ओह ओके
हे अर्जुन सुभद्रा वाला कंटेक्स्ट माहीत नव्हता मला.

Dosto ना कोई साथी है
ना कोई मंजिल
फिर भी निकल पडा हु घरसे
शायद उसकी तलाश है
ब्ला ब्ला
हे........ ( हे hit it आहे हे आज च कळलं)
ओ ओ जाने जाना ढुंढे तुझे दिवाना

अर्जून-सुभद्रा? मला वाटतं इथे कृष्ण- रुक्मिणीचा रेफरन्स आहे.
असंही ऐकलेय की गदिमांनी त्यांच्या नवजात नातीला पहिल्यांदा उचलून घेतले आणि त्यांना पहिल्या ओळी सुचल्या.

असं पहिल्यांदा पाहिलेल्या बाईला उचलून घेता येत नसावं बहुतेक >> उचलुन म्हणजे कडेवर उचलुन नाही हो! Rofl रथातुन चाललेलो आणि तुला लिफ्ट दिली. इतकंच उचलुन.
उचलुनी घेतले निजरथी मी तुला.
ट्रिपला जाताना आपण विचारतो ना तुला कुठुन उचलू? त्याचा उगम हा आहे! Wink
बाकी हे कलावती मधलं आहे गाणं. मस्त राग आहे हा. तन मन धन तोपे वारू वाला.

ओह ओके
माझ्या डोळ्यासमोर एकदम के ड्रामा मधलं 'उचलून' आलं.
माझी मराठी भावगीत समज एकंदर कमीच आहे(ही अजिबात अभिमानाने सांगायची गोष्ट नाही.)

अरे! ते गाणं सुंदर आहेच. पण प्रभा अत्र्यांनी गायलेले तन मन धन असंख्य वेळा ऐकलं तरी ऐकत रहावं वाटतं. स्वच्छ आवाज, अजिबात कुठे लयीशी, शब्दाशी, तालाशी कुस्ती न खेळता तरीही त्यांना झुलवत झुलवत प्रेमाने पुढे पुढे जात रहातं. गाणं चालू होताना पहिलाच 'तन' हरकतीतुनचं येतो तरीही तो तसाच हवा वाटतो. आणि मन फक्त तन मन धन यावर त्या अक्षरशः असंख्य बारीक बारीक हरकती करत राहतात. कुठलेही दोन 'तन मन ' एकसारखे नसतील तरी ते एकसारखे नाहीत हे फक्त कानाला आणि तोंडावर हसू फुटलं की मेंदूला जाणवते. अनेक गायक गाताना तयारी दाखवायला मुद्दाम हरकती करतात त्याच्या कित्येक कोस दूर शांत स्थिर प्रेमळ हरकती... अंगावर काटा नाही येत. तर हृदयात एक काहीतरी वेगळंच वाटतं. थोडाफार माझ्या नॉस्टॅल्जिया चा भाग ही असेल. असो. इथे आणखी वहावत जायला नको Happy

अमीत, वाहवणं मस्त आहे. त्यांच्या आवाजातली आण्खी एक खूप आवडणारी चीज - सावरे अयजय्यो. त्याच्या येण्याकरता विनवणी इतक्या प्रकारे केली आहे की शेवटी तो एक जप बनून जातो.

Pages