Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
two-timing वाह नवीन फ्रेज
two-timing वाह नवीन फ्रेज कळली आज
भरत +१
जुना आहे तो वाक्प्रचार.... आदीकाळापासून टू ते सोळा हजार टायमिंग असलेले आहेत.
जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसुता संगे गंगा < ----
मस्तकी वाहे
भरत +१
ह्यात शब्दशः 'चंद्रकला शिरी धरी' म्हणजे मूनलाईटही आले.
-------
मनिम्याऊ
अच्युतम् केचपम् कृष्णदामोदरम्
अच्युतम् केचपम् कृष्णदामोदरम्
>> बरोबर तर आहे...
अस्मिता
अस्मिता
अस्मिता
अस्मिता
अस्मिता _/\_
अस्मिता _/\_
श्याम,डोन्ट टॉक टू मी.यु आर
श्याम,डोन्ट टॉक टू मी.यु आर टू टायमिंग विथ कुबजा >>> हे कुठले गाणे आहे? टेक्नीकली कृष्ण कुब्जेला एकदाच भेटला होता.
>> सोळा हजार टायमिंग
>> सोळा हजार टायमिंग
हे मस्त आहे. प्रत्येक इंजिनवर जशी क्षमता लिहिलेली असते वॅट्स मध्ये तसे माणसांच्या बाबत हे लिहिता येईल.
बहुतेक जण १ ते २ टायमिंग. काहीजण पाच/सहा टायमिंग. तर दुर्मिळ केसेस शेकडो टायमिंग.
आणि भगवान श्रीकृष्ण १६ किलो टायमिंग
ते वृंदावन सारंग मधलं
ते वृंदावन सारंग मधलं प्रॅक्टिस गाणं आहे
ना बोलो श्याम हमेसंग
जान गयी तुमरो ढंग
कुबजा नारी अति मन भाई
अब कैसो तुमरो रंग(असं काहीतरी)
कमोड, केचप, सोळा हजार टायमिंग
कमोड, केचप, सोळा हजार टायमिंग...
चुकीचं ऐकलेले नाही पण चुकीचा
चुकीचं ऐकलेले नाही पण चुकीचा अर्थ लावलेलं गाणं म्हणजे, जब जब फुल खिले चित्रपटातील , शशी कपूर आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं , ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे. लहान नातवंडे आपल्या आजीला सांगत आहे की आजोबा म्हणजेच नाना, यांना प्रेम, प्यार करायचं होतं, आणि आजीशीचं प्रेम झालं. बाकी पण इन्कार करायचा होता म्हणजे नकार द्यायचा होता पण एकरार म्हणजे होकार तुला म्हणजे आजीला देऊन बसले. "नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे"
बघा या महोदयांना काय ऐकू
बघा या महोदयांना काय ऐकू येतंय. आयुष्य कामाचे आहे कामावर असताना लुटून घ्या, म्हणताहेत
अजून किती गाणी लहानपणी आपण
अजून किती गाणी लहानपणी आपण चुकीची ऐकत होतो असे शोध लागणार आहेत?
बेशक़ मंदिर मस्जिद तोड़े...
पुढे "भुले जा....... ये कैसा?" असे काय वाट्टेल ते ऐकू यायचे. ते बुल्लेशाह ये कहता असे आहे. पंजाबी सूफ़ी संत/कवी बुल्ले शाह यांचा तो उल्लेख आहे हे आज कळले:
प्रथम तुज पाहता जीव वेडावला
प्रथम तुज पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले व्यर्थ मी तुला....
उचलुनी घेतले व्यर्थ मी तुला
उचलुनी घेतले व्यर्थ मी तुला
पश्चात्ताप झालाय
हो ना.... तिचे वजन खूप जास्त
हो ना.... तिचे वजन खूप जास्त असल्याने याच्या पाठीत उसण भरली असावी!!
मी हे ' निज शिरी मी तुला'
मी हे ' निज शीरी मी तुला' असं म्हणायचे. म्हणजे डायरेक्ट डोक्यावरच बसवलं.
मला पण ते उचलून घेतलं ऑड
मला पण ते उचलून घेतलं ऑड वाटतं
ज्या काळात हे गाणं बनलं त्या काळात असं पहिल्यांदा पाहिलेल्या बाईला उचलून घेता येत नसावं बहुतेक
अर्जुन सुभद्र्रेला उद्देशून
.
उचलुनी घेतले व्यर्थ मी तुला >
उचलुनी घेतले व्यर्थ मी तुला >>
भरत..डिलीट का केले? बरोबर आहे
भरत..डिलीट का केले? बरोबर आहे तुमचा कयास . हे अर्जुनाने सुभद्रे ला म्हटलेलेच गाणे आहे...
ओह ओके
ओह ओके
हे अर्जुन सुभद्रा वाला कंटेक्स्ट माहीत नव्हता मला.
मला खात्री नव्हती. आणखी
मला खात्री नव्हती. आणखी कोणाकोणालाही लागू पडलं असतं.
शंतनू सत्यवती, इ.
Dosto ना कोई साथी है
Dosto ना कोई साथी है
ना कोई मंजिल
फिर भी निकल पडा हु घरसे
शायद उसकी तलाश है
ब्ला ब्ला
हे........ ( हे hit it आहे हे आज च कळलं)
ओ ओ जाने जाना ढुंढे तुझे दिवाना
अर्जून-सुभद्रा? मला वाटतं इथे
अर्जून-सुभद्रा? मला वाटतं इथे कृष्ण- रुक्मिणीचा रेफरन्स आहे.
असंही ऐकलेय की गदिमांनी त्यांच्या नवजात नातीला पहिल्यांदा उचलून घेतले आणि त्यांना पहिल्या ओळी सुचल्या.
असं पहिल्यांदा पाहिलेल्या
असं पहिल्यांदा पाहिलेल्या बाईला उचलून घेता येत नसावं बहुतेक >> उचलुन म्हणजे कडेवर उचलुन नाही हो! रथातुन चाललेलो आणि तुला लिफ्ट दिली. इतकंच उचलुन.
उचलुनी घेतले निजरथी मी तुला.
ट्रिपला जाताना आपण विचारतो ना तुला कुठुन उचलू? त्याचा उगम हा आहे!
बाकी हे कलावती मधलं आहे गाणं. मस्त राग आहे हा. तन मन धन तोपे वारू वाला.
ओह ओके
ओह ओके
माझ्या डोळ्यासमोर एकदम के ड्रामा मधलं 'उचलून' आलं.
माझी मराठी भावगीत समज एकंदर कमीच आहे(ही अजिबात अभिमानाने सांगायची गोष्ट नाही.)
अरे वा अमित! क्या आप भी तन मन
अरे वा अमित! क्या आप भी तन मन धन तोपे वारू के शौकीन हैं?
अरे! ते गाणं सुंदर आहेच. पण
अरे! ते गाणं सुंदर आहेच. पण प्रभा अत्र्यांनी गायलेले तन मन धन असंख्य वेळा ऐकलं तरी ऐकत रहावं वाटतं. स्वच्छ आवाज, अजिबात कुठे लयीशी, शब्दाशी, तालाशी कुस्ती न खेळता तरीही त्यांना झुलवत झुलवत प्रेमाने पुढे पुढे जात रहातं. गाणं चालू होताना पहिलाच 'तन' हरकतीतुनचं येतो तरीही तो तसाच हवा वाटतो. आणि मन फक्त तन मन धन यावर त्या अक्षरशः असंख्य बारीक बारीक हरकती करत राहतात. कुठलेही दोन 'तन मन ' एकसारखे नसतील तरी ते एकसारखे नाहीत हे फक्त कानाला आणि तोंडावर हसू फुटलं की मेंदूला जाणवते. अनेक गायक गाताना तयारी दाखवायला मुद्दाम हरकती करतात त्याच्या कित्येक कोस दूर शांत स्थिर प्रेमळ हरकती... अंगावर काटा नाही येत. तर हृदयात एक काहीतरी वेगळंच वाटतं. थोडाफार माझ्या नॉस्टॅल्जिया चा भाग ही असेल. असो. इथे आणखी वहावत जायला नको
अमीत, वाहवणं मस्त आहे.
अमीत, वाहवणं मस्त आहे. त्यांच्या आवाजातली आण्खी एक खूप आवडणारी चीज - सावरे अयजय्यो. त्याच्या येण्याकरता विनवणी इतक्या प्रकारे केली आहे की शेवटी तो एक जप बनून जातो.
Pages