मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच लागलेला एक शोध...

इतके दिवस मी असं म्हणत होते....
ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई
जिस्म जैसे हो जनता की मूरत कोई

जनतेच्या मनातली सुंदर स्त्री ची मूर्ती कशी असेल तसं तुझं हुस्न आहे.. अशा अर्थाने Wink

ते खरतर असं आहे...
ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई
जिस्म जैसे अजंता की मूरत कोई
जिस्म जैसे निगाहों पे जादू कोई
जिस्म नगमा कोई जिस्म खुशबू कोई

'उसने' जाना की तारीफ मुम्किन नहीं - इतकी सुंदर आहे, की तिची तारीफ (रफीच्या आवाजात, ताssssरीफ करूं क्या उसकी) करणंच शक्य नाही, हे तिलाही माहीत आहे - असं मला वाटायचं.

उसने' जाना की तारीफ मुम्किन नहीं - इतकी सुंदर आहे, की तिची तारीफ (रफीच्या आवाजात, ताssssरीफ करूं क्या उसकी) करणंच शक्य नाही, हे तिलाही माहीत आहे - असं मला वाटायचं.>>>
अगदी अगदी! मलाही ते असंच वाटायचं आणि तो अर्थ अगदी चपखल बसत होता Happy
ते हुस्नेजाना आहे हे खूप नंतर कळलं!

तसंच मै अगर कहू या गाण्याचाही अगदी उलटा अर्थ
तारीफ ये भी तो, सच है कुछ भी नही
म्हणजे मी एवढं तुझ्या रूपाचं वर्णन करतोय ती केवळ स्तुती आहे, यातलं खरं काहीच नाहीये Happy

काय योगायोग! आजच सकाळी एक विडीओ पाहिला. बॉलिवूड लिरिक्स बद्दल Lol त्यात ऐकलं

उई उई उई उई
लड्की दिवानी है ये करती है उई
लाया हूं मै चुहा अपना
चुहा अपना चुहा अपना
कहां है तेरी चुही
ऊई उई....

मला वाटलं मी काहीतरी भन्नाट चुकीचं ऐकलंय पण खरंच आहे असं गाणं. यार गद्दार मधलं Uhoh

https://www.youtube.com/watch?v=gSp377c55hc&t=44s

पद्मावत मधले 'खलिबली 'गाण्यामध्ये सुरुवातीला कोरस काय गात असतो? मला नेहमी'जेहेरीला गॅस बना'असे काहीतरी ऐकू येते.

ते तसं नाहीये
पल्पी या गॅस वाला -२
असं आहे म्हणजे ते juice कोणता असं विचारत आहेत?

<< जलदी आ गॅस वाला <<< Biggrin

कलबीया कैस वल्लाह....
कलबीया कैस वल्लाह....
कलबीया कैस वल्लाह....
वल्लाह...वल्लाह...
हबीबी...हबीबी...हबीबी...
......
कलबीया= मेरा दिल
खली बली= बेपरवाह, बिंदास
कैस= दीवाना, आशिक, लवर
वल्लाह= कसम से
हबीबी= डार्लिंग, महबूबा, प्यारा

किल्ली Proud

खरं तर ते
कर भिम या कॅश भला? असे आहे.
म्हणजे तुला पेमेंट bhim app ने चालेल की कॅश हवी?

वो हसीना वो नीलम परी ( दर्दे डिस्को - ओम शांती ओम )
मला तेव्ह नेहमी ऐकायला यायचं - वो हसीना वोही लव परी कर गई कैसी जादूगरी

दुसरं
पापा केहते है बडा नाम करेगा
मेरा पप्पू कौवेसा काम करेगा
पप्पू कान्ट डान्स साला

कच्ची कली कचनार की, क्या समझेगी बातें प्यार की... असे एक गाणे होते.
ते कित्येक वर्षे मी , 'कच्ची गोली पचनॉल की.. ' असेच ऐकत होतो.
त्याकाळी हम्दर्द नामक कंपनीचे 'पचनॉल ' नामक गोळीची जाहिरात यायची रेडियोवर......

मैं निकला ओ गड्डी ले के
ओ रस्ते पर ओ सड़क में
एक 'क'मोड़ आया
मैं उत्थे दिल छोड आया ..

Pages