Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जे बॉ
जे बॉ
ये काली काली आंखे गाण्यात आहे
ये काली काली आंखे गाण्यात आहे न....
गैरो की बाहोमे इठला के जाने लगी, जाने मन तू मुझे नखरे दिखाने लगी...
मला ते गैरो के च्या ऐवजी भैरू के बाहो मे असं वाटायचं...
म्हणजे शाहरुख ला जळवायला ती भैरू नावाच्या माणसाच्या बाहोमे इठला के जाने लगी....
मग नन्तर कधीतरी कॅसेट च्या कव्हर वर वाचलं तेव्हा कळलं
मेरे बदन को भी धो के मुझे छेड
मेरे बदन को भी धो के मुझे छेड रहो >> हे चुकीचं आहे हे आज कळलं.
गो चा धो (ध चा मा ) ऐकलं आपण
गो चा धो (ध चा मा ) ऐकलं आपण
आपली कै चूक नाईये. एकतर भी
आपली कै चूक नाईये. एकतर भी-गोके इथे यतिभंग होतो, शिवाय मीटर मध्ये बसवायला भिगोके मधला ऱ्हस्व भि दीर्घ होतो. त्यात आपलं हिंदी मुळात दिव्य! काय काय समजून घ्यावं मराठी माणसाने!
>>>>>मेरे बदन को भी धो के
>>>>>मेरे बदन को भी धो के

गैरो की बाहोमे इठला के जाने
गैरो की बाहोमे इठला के जाने लगी, जाने मन तू मुझे नखरे दिखाने लगी...>>> असं आहे होय! मला आजपर्यंत ते
'ठैरोगी बाहोमे इठला के जाने लगी' असं वाटायचं...म्हणजे बाहुपाशात थांबायला काय घेशील? लगेच जायची गोष्ट करून नखरे करतेस.. असा अर्थ वाटायचा
क्या खुब लगती है झालं का?
क्या खुब लगती है झालं का?
याकुब लगती हो ... असे एकायचो लहानपणी.
"या ............. दवा रही है". हे एक. हि ओळ गायक म्हणताना इतकं खेचायचा ना की, कळायचेच नाही.
काली घटा छाई, प्रेम रुतु आई आई आई आई तेरी याद आई. आई हे हिंदी मध्ये " आली" ह्या अर्थी हे कळत नसायचे तरी म्हणायचो.
जिंदगी मे थी हवा, थोडसा धुवां उठा. अगदी तुनळी आल्यावर कळले की, ते "थी" हवा नाहिये. "दि" हवा आहे. आणि, दिल्लगी आहे.
कारण कॉलेजमध्ये असताना, हवेमुळे आग पसरते हेच डोक्यात. कित्येक पिकनिकला व असेच कोणी क्रश आजूबाजूला असताना आम्ही मुलं-मुली असेच म्हणायचो.
>> याकुब लगती हो
>> याकुब लगती हो

>> या ............. दवा रही है
>>जिंदगी मे थी हवा
लहानपणी केवळ मराठी अवगत होते. हिंदी कळायचा प्रश्नच नव्हता. तेंव्हा "या दारही है" (दरवाजाशी संबंधित काहीतरी असेल) असे ऐकायला येत असे.
चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोहित्याचा घास तुला भरविते ही एक लहानपणीची अजून एक आठवण. कारण एक मोहिते म्हणून डॉक्टर होते आणि मोठ्या माणसांनी आम्हा मुलांच्यात त्यांना इंजेक्शन देण्यासाठी कुप्रसिद्ध करून ठेवले होते. "मुकाट्याने वाढलेले खायचे, नाहीतर मोहिते डॉक्टरना बोलवीन इंजेक्शन द्यायला" इत्यादी धमक्या. त्यामुळे जळीस्थळी हे मोहिते डॉक्टर दिसायचे.
चुकीची ऐकू आलेली गाणी : -
चुकीची ऐकू आलेली गाणी : -
हा जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
****************************************
बरोबर :-
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
याकुब लगती हो मोहित्याचा घास
याकुब लगती हो

मोहित्याचा घास
ठैरोगी बाहोमे इठला के जाने
ठैरोगी बाहोमे इठला के जाने लगी' >>>

याकुब लगती हो >>>
याकुब लगती हो.... !अगागागा ..
याकुब लगती हो.... !अगागागा ...
मोहित्याचा घास तुला ......
Smooth like butter, like a
Smooth like butter, like a criminal undercover
Gon' pop like trouble breaking into your heart like that (ooh) यातील breaking into your heart like that मला ब्रेकिंग इंडिया INTO TWO PARTS ऐकायला येते एकतर मी म्हणते हे BTS वाले इंडियाचे दोन तुकडे का बरे करायला निघालेत आणि मी तसे गायले कि माझ्या मुली माझ्यावर चिडतात।
सून भेडीया>> आई गं
सून भेडीया>> आई गं
याकुब लगती हो >>> अर्रे देवा
याकुब लगती हो >>> अर्रे देवा
सुन भेडिया >>
सुन भेडिया >>

सुन भेडिया >> अरारा
सुन भेडिया >> अरारा
वार्याने हलते रान नावाचं कवी
वार्याने हलते रान नावाचं कवी ग्रेस यांचं एक गाणं आहे. हृदयनाथ मंगेशकरांनी गायलं आहे. मी ते काइच्या काइ म्हणायचो.
'वार्याने हल्ला केलान, तुझे सुनसान हृदय गहिवरले' - गाण्याची पहिलीच ओळ अशी ऐकू येते.
किंवा एका कडव्यात 'चरण्यात हरवला गंध तुझ्या की ओठी' - ही ओळ! इथे 'चरणात' पाहिजे. मला वाटायचं की धिस 'चरण्यात' गोज बेटर विथ द लाइन इन द ध्रुवपद 'गाईचे डोळे करुण उभे की'.
अजून एका ओळीत 'डोळ्यात शीण हातात वीण देहात फुलांच्या वेणी' असं म्हणालो तर मला कुणीतरी सांगितलं की ते 'वेगी' आहे. च्या मारी! म्हणजे काय, कुणास ठाऊक?
हिंदी गाण्यात ऊर्दू किंवा पंजाबी कळण्याची बोंब असल्यामुळे ती मी चुकीची म्हणतो. ते नको व्हायला म्हणून मराठी गाणी म्हणायला घेतली तर इथे ग्रेसांचं मराठी कळायची बोंब!
तनहाई गाण्यात एक ओळ आहे,
तनहाई गाण्यात एक ओळ आहे,
क्यूँ ऐसी उम्मिद की मैने जो है सेना काम हुई
नंतर लक्षात आलं, ते 'ऐसे नाकाम हुई' असं पाहिजे.
सेना काम
सेना काम
रमैया बटाबैया
रमैया बटाबैया
एक आदी-चुऐ-गाणे
अगदी अलीकडच्या काळात कळले राज कपूर आणि टीमने ते शब्द तेलुगू भाषेतून घेतले होते
वस्तावैया म्हणजे तेलगुत ये रे
वस्तावैया म्हणजे तेलगुत ये रे भावा असा अर्थ होतो
रमैया वस्तावैया - रमैया
रमैया वस्तावैया - रमैया वस्तावैया - मैंने दिल तुझको दिया" का असली अर्थ... क्या आप जानते हैं इस गीत में "रमैया वस्तावैया एक लोकप्रिय तेलगू उद्धरण है और क्या आप इस उद्धरण का अर्थ जानते हैं? "राम" तो तेलगू भाषा ही क्या क्या समस्त देश -दुनियाँ मे एक लोकप्रिय और सुप्रसिद्ध नाम है और विशेषण भी है। "अइय्या" का इस्तेमाल तेलगू में पुल्लिंग(पुरूष) के प्रति प्रेम और सम्मान हेतु प्रयोग किया जाता है ,जबकि ''वस्तावैया" का अर्थ हुआ क्या तुम आओगे? अथवा तुम कब आओगे?
राम +अइय्या +वस्तावैया = रमैया वस्तावैया -- राम तुम कब आओगे? अथवा राम तुम आओगे?
भक्तिकाल से ही महाराष्ट्र में तेलगूभाषी द्रविड़ जनसंख्या भी बड़े पैमाने पर मौजूद है , जिनमे मछुआरे भी शामिल हैं। सम्भवतः इसी द्रविड़ प्रभाव के चलते गीतकार शैलेंद्र ने इस उद्धरण का प्रयोग किया, रोचक तथ्य यह है कि शैलेन्द्र खुद मूलतः रावलपिंडी से थे,जो कि अब पाकिस्तान अधिकृत पंजाब में है। > >>>>>माहिती आंतरजालावरून साभार .
लहानपणी व अगदी तुनळी
लहानपणी व अगदी तुनळी येइपर्यंत उर्दूची बोंब असल्याने, बर्याच गाण्यांची वाट लावलीय.
१) जुते जू जिसकी थी उसको न पाया हमने. जुते जू = जुस्तं जू असे आहे (बहुधा). अर्थ कळतो पण उच्चार नक्की काय माहित.
२) नीली नदी के परे नीला सा चहा छिल गया . आधी काहीच कळायचं नाही. मग कळले, गिला सा चांद आहे ते. आता माझं हे फेव गाणं आहे.
नीला सा चहा इथे>
नीला सा चहा

इथे
जुस्तजूचा अजून एक अर्थ सापडेल
सुन भेडीया .... आईग्गं
सुन भेडीया .... आईग्गं
भेडीयाने असं काय केलंय की त्याला शुक्रिया मेहरबानी म्हणायचं आहे
आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बाप (?) बन जाए
,,, हे असं आणि असंच ऐकू येतं मला.
तूही ए मुझको बतादे,, चाहू मै याना (?) /आना,, ,,,, अपने तो दिल का पता दे, चाहू मै याना /आना?
भीगी भीगी साडी में यु थुंकी
भीगी भीगी साडी में यु थुंकी लगाती तु.... इति माझी कन्या...
झूबि डू गाणे... ३ मूर्ख पिक्चर:G
भेडीया , याकुब, मोहिते
भेडीया , याकुब, मोहिते
तेच तर कळत नव्हतं ना
तेच तर कळत नव्हतं ना भाग्यश्री ताई.. मला पण हाच प्रश्न पडला होता कितीतरी दिवस गाणं म्हणताना.
Pages