मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा महाशिवरात्रीला "शिवजी बिहाने चले पालखी सजाईके" हे गाणं पुन्हा ऐकलं. त्याची पुढची ओळ मला ऐकू यायची "बाबूजी लजाईके".
लग्नाला चाललेत तर महादेव लाजत असतील असं वाटलं. Happy
पण आत्ता कळलं की ते "बाभूती लगाईके" (विभूती/भस्म फासून) असं आहे

https://youtu.be/gFPfRL9ySmo

मानव मामा Happy

टीपी जरी असलं, तरी आधी वावे यांनी सांगितलेला अर्थ पटला होता थोडा. पण पुढे पुढे शब्द ते नसून वेगळेच असल्याचे प्रतिसाद यायला लागले. मग अर्थ काय असावा ह्यात गोंधळ झाला.

बाकी आपण अजूनही ' चुकीची ऐकू आलेली गाणी ' तशीच म्हणतो , म्हणजे मोठेपणीही अर्थाकडे लक्ष देत नाहीच हे उघड आहे. Happy

त्र्याऐंशी नावाचा चित्रपट पाहिला. त्यात ते लहरा दो गाणं असं ऐकू आलं -

लेहरा दो लेहरा दो (इथे सोलो तबल्याच्या साथीला लेहरा वाजवतात तो आठवला)
सर्कशी का पर्चम् लेहरा दो

अल्ला पे रोना
ईश्वर पे रोना

असेच कित्येक वर्षे ऐकलेले आहे. यांच्यावर का बरे रडायचे? तर मनात दयाभाव ऊत्पन्न झाला की आपोआप डोळ्यात आसु येतात अशी स्वत:ची समजुत पण घातलेली आहे. Happy

ह.पा सरकशी का पर्चम आहे. सरकशी म्हणजे बंडखोरी किंवा रेबेलियन. (सर्कशी नको Lol सरकशी बरोबर पण तो अरिजित का कोण आहे तो सर्कशी म्हणतो.)

मला वाटलं "सर्कशी का.. पर्चम लहरा दो" म्हणजे रस्त्यावर नियम न पाळता नसती सर्कस करणार्‍या चालकांवर ट्राफिक व्हायोलेशनचे चालान ठोकून द्या असं काही असेल.

<<अल्ला पे रोना
ईश्वर पे रोना

असेच कित्येक वर्षे ऐकलेले आहे. यांच्यावर का बरे रडायचे? तर मनात दयाभाव ऊत्पन्न झाला की<<<
+123456
एक्झेकटली साधना! मी आजवर असच ऐकत आलेय. इथं लिहायचंही खूपदा ठरवलं होतं! Proud

हे आधी लिहिलंय कि नाही आठवत नाही. पण "तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है" हे गाणं "तू भी जरासी मेरी जिंदगी में शामिल है" असं आहे असं वाटायचं

लहानपणी, दूरदर्शनवर 'मिले सूर मेरा तुम्हारा' लागायचं त्यातील दीपा साही अन तमस मधील कलाकारांच्या तोंडी असलेलं,
"सुर का दरिया बह के सागर में मिले
बदलाँ दा रूप लैके बरसन हौले हौले"
हे, "बदलाँ दाsssरू प लैके"
अस ऐकू यायचं! Proud

मला तरी बरीच वर्षे(तुनळी शोध लागेपर्यंत). "दारु" असेच एकायला येत होते.

आणि अगदी लहानपणी , आप जैसा कोइ मेरी जिंदगी मे आये तो, "बाप" बन जाये...
मग कॉलेजला गेल्यावर पिकनिकमध्ये असेच गायले का काय, मग कळले. "बाप" नाही "बात" आहे.

आणि अगदी लहानपणी , आप जैसा कोइ मेरी जिंदगी मे आये तो, "बाप" बन जाये. >>>>>>>> हे गाण चुकीची ऐकू आलेली गाणी च्या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमान्कावर आहे.

आप जैसा कोइ >> इथे शिरिष कणेकर म्हणतात की 'तूच असं काही नाही. आप जैसा कोई, म्हणजे कोणीपण चालेल.'

खरं आहे Happy
पण असला पांचटपणा आपल्याला आवडतो.

सुनयना सुनयना आज इन नज़ारों को तुम देखो
हे 'आज' आहे हे मला आज कळले. मी ऐकत होतो "आSS इन नज़ारों को तुम देखो"

(बाय द वे याचं चित्रीकरण सुद्धा आजच पहिल्यांदा बघितलं. हि गाणी कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये लागायची. सिनेमातले असेल असे वाटले नव्हते तेंव्हा)

नायिका अंध असते. गरीब नायक पैसे जमवून तिच्या डोळ्यांचे ऑपरेशन करवतो आणि तिला दृष्टी मिळवून देतो आणि मग आपलं सामान्यपण तिला रुचणार नाही म्हणून तिच्यापासून दूर राहतो. हे कथानक.
चार्ली चॅप्लिनच्या सिटि लाइट्सवरून घेतलाय. गाण्यात नसीरने चॅप्लिन दाखवायचा प्रयत्न केलाय.
शिरवाडकरांनी सिटि लाइट्सवरून विदुषक हे नाटक लिहिलं.
स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

चुकीची ऐकु आलेली : -

भीगी भीगी रातो मे
ऐसी बरसातो मे कैसा लगता है

ऐस लगता है तुम बनके बादल
मेरे बदन को भी धो के मुझे छेड रहो
छेड रहो छेड रहो
*****************************
बरोबर : -

भीगी भीगी रातो मे
ऐसी बरसातो मे कैसा लगता है

ऐस लगता है तुम बनके बादल
मेरे बदन को भिगो के मुझे छेड रहो
छेड रहो छेड रहो

ऐस लगता है तुम बनके बादल
मेरे बदन को भी धो के मुझे छेड रहो
छेड रहो छेड रहो

म्हणजे हीने महिनाभर काही अंघोळ केलेली नाही (पारोशी कुठली.. उं) तर तो पावसाचा ढग बनुन हिला घासुन घासुन धुतोय. (पावसाळ्यात चिखलाने भरलेली गाडी जशी धुतो तशी) हे डोळ्यासमोर तरळले.

Pages