मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक मला हिजरा वाला धागा वाचायचा आहे पण तो ओपनच होत नाहीये. त्याच्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन मला जिहाले मस्ती मुकुंबरंजिश मधला मुकुंबरंजिश शब्द ऐकल्यानंतर मला आजही काकडीची कोशिंबीर आठवते.

भोंग्याच्या प्रश्नावरून म वी आ ने राजचे ला महत्व वाढवायचं फायनल केलेलं दिसतंय !
औरंगाबाद मध्ये सभा चालू असताना अजान चालू झाला म्हणून राज ने " एकदाची काय ते कारवाई करा , नाहीतर आम्ही बघून घेतो असे पोलिसांना सांगितले " होते .
आता त्या वक्तव्यावरून राज वर काय कारवाई करता येईल याची चाचपणी चालू आहे !
कदाचित काकाच्या स्क्रिप्ट प्रमाणे खटला दाखल केला जाईल , एक दिवस चौकी ची हवा , पुन्हा एकदा शेनेच्या कट्टर मराठी लोकांचा राज कडे फोकस , मग आपोआप कट्टर हिंदू मतांचे ध्रुवीकरण आणि बावचळलेला शैनीक जरी राज च्या मागे उभा राहिला नाही तरी शेणेची कुंपणावरील हिंदू मते शेणेला खिंडार पाडू शकतात .
हे सगळे काका विधिलिखित होऊ शकते Happy

हो. हा दोघा भावांचा प्लान आहे. राज भाजपची मतं खाणार. फडणवीसमध्ये काही दम नाही हे दिवसेंदिवस सिद्ध होत़य. बाबरी मशीद पाडली तेव्हा मी तिथे होतो हे सांगायला बाळ्याला तीस वर्षं लागली.
ब्राह्मण संघ देवळांवरचे लाउडस्पीकर काढायला विरोध करणार म्हणे?

हो नां.
दुर शहरसे "खबर" आई है !
आग लगानेवाले दो भाई है !

गल्ली चुकलं की वो... Happy

काढुन टाका हा कचरा इथून.. स्वतःची सफाई स्वत:च करावी....

भरत Proud
मात्र अ‍ॅडमिन पावरफूल आहेत. ते शिळेलापण फुलासारखे उचलुन बाजुला करतात.

चार तासांनंतर जे काही असेल त्याचा शिलालेख होतो. >>> Lol

इथे १०-१२ नव्या पोस्टी पाहून आले तर भलताच विषय चाललेला... आपण चुकीची लिंक क्लिकली का काय हे स्वत:च दोन-तीनदा तपासून पाहिलं Biggrin

चार तासांनंतर जे काही असेल त्याचा शिलालेख >>> छिन्नी-हातोडा सुरू करण्याआधी कलाकाराने बघावे ना कुठल्या लेण्यात आलोय ते. Happy
मी पण काल विचारणार होते, राज / भाजप / ब्राह्मण संघ / फडणवीस / सेना / काका / सैनिक / पोलीस / अजानवाले / म वी आ --- यापैकी कोणी गायलेले कुठले गाणे चुकीचे ऐकू आले??
हनुमान चालिसा चुकीचे गायले का? तर मराठी माणसाचे हिंदी म्हणून सोडून द्या ....
मग म्हटले जाऊ दे राजकारण-प्रेमींशी वाद नको.

लहानपणी शिल्पा टिकली ची जाहिरात टीव्ही वर लागायची.
त्यात एक छानशी मॉडेल सुरेख झुळझुळीत साडी नेसून आरश्या समोर टिकली लावायची.
आणि मागे जिंगल वाजायची.
शिल्पा चा s s चा लगाये
मला तेव्हा वाटायचे की ही बाई शिल्पा आहे. आणि तिचे चाचा तिला ह्या टिकल्या देऊन गेलेत आणि ती झोकात टिकली लावून बाहेर निघाली आहे.
खरे तर ते
शिल्पा चा ss र चांद लगाये
असे होते.
पण अजूनही मला चाचा च ऐकू येते.

चुकीची ऐकु आलेली : -

रात कली एक ख्वाब मे आयी
और गले का हार हुई
सुबह को जब हम नींद से जागे
आंख खुली नयन चार हूई

*****************************
बरोबर : -

रात कली एक ख्वाब मे आयी
और गले का हार हुई
सुबह को जब हम नींद से जागे
आंख उन्ही से चार हूई

Lol
मला हे गाणं फार आवडतं. पण मला लहानपणी ऐकताना असं वाटायचं की आपले दोन डोळे आणि तिचे दोन डोळे असे मिळून 'आँख चार हुई'!

सुबह को जब हम नींद से जागे
आंख उन्ही से चार हूई

>> अरेच्चा. असं आहे होय. मी एवढे दिवस "आंख सुबह दो चार हुई" असं ऐकत होते.

- चश्मेवाली पियु Lol

वावे - आपले दोन डोळे आणि तिचे दोन डोळे असे मिळून 'आँख चार हुई'! - असच आहे ते ( हो ना ??) . "आँख चार होना " असा हिन्दीत वाक्यप्रचार आहे बहुतेक.

आँख उन्हीं से चार हुई असंच मी तरी ऐकलेलं आहे.

बब्बन , हो, वाक्प्रचारच आहे तो, पण मी शब्दशः दोन अधिक दोन म्हणजे चार असं समजायचे. मला लहानपणी तो वाक्प्रचार माहिती नव्हता. त्याचा अर्थ तोच आहे. पण समजा तिथे तिसरं कुणी असेल तर सहा डोळे झाले असं म्हणणार नाही आपण.

प्रेमात पडलेले झॉम्बी ह्या कृती (शब्दशः) करत प्रेमात पडल्यावर डोळे आणि लग्न करताना हात देऊन 'दोनाचे चार' करू शकतात .
------
पियू Lol

Pages