मेरा कुछ सामान.....

Submitted by प्रसन्न हरणखेडकर on 9 December, 2013 - 03:01

1) आठवतयं का रे तुला ....?
एकदा आपल्या सायकली ने जेव्हा आपल्याला दिला होता धोका...आपण कसे गरीब-बिचारे असण्याची ऍक्टिंग केली होती……
हवालदार ने उलट आपल्या अंगावर भिरकावले होते तेव्हा त्याच्याकडचेच आठाणे...
चाराणे त्यातले तुझे होते…आणि चाराणे माझे....
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे.......||१||.

माझे काही से सामान, तुझ्याकडे उरले आहे...….
श्रावणात चिंब झालेले ते दिवस, तुझ्याकडे उरले आहेत.…
आणि उरल्या आहेत तुझ्या आठवणींत घालवलेल्या त्या बैचेन रात्री.
बघ विसरण्याचा कर प्रयत्न ; अथवा दे धाडून त्यांना माझ्याकडे..........
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे........||२||

बघ रे जरा बाहेर….सुरु झाला आहे पुन्हा पानगळीचा तो मौसम !
पानगळीतील ती शुष्क पाने…आणि त्यांचा तो व्याकुळ करणारा आवाज….
सांगतोय कारे काही तुझ्या कानात ??
उडून जाउ दे भिरभिरत आठवणींची ती पाने…अथवा दे धाडून त्यांना माझ्याकडे..........
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे........||३|||

घन-निळा बरसताना...एकाच छत्री चा आडोसा घेउन, भिजत होतो आपण दोघे ही….अर्धे त्रुप्त, अर्धे अत्रुप्त
ओले सुके मन.....अन ओली सुकी आपली शरीरे ही…….
आठवणींत नाहलेले मन मात्र अजून ही तुझ्या घरी राहते आहे.
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे........||४||

एक शे सोळा त्या चांदरात्री...एक तुझा तो खांद्यावरील तीळ....
एक शे सोळा त्या चांदरात्री...एक तुझा तो खांद्यावरील तीळ....
ओल्या मेंदी चा तो गंध..अन लटक्या रुसव्या-फुगव्यांनी पडणारा ह्नदयाला पीळ.
खोट्या होत्या का रे त्या शपथा...अन खोट्याच का रे त्या आणाभाका….?
हं !! दे…दे सगळेच धाडून माझ्याकडे.......…
अजून हि बरेचसे सामान तुझ्याकडे उरले आहे माझे, बघ जमत असेल तर ते पाठवून दे........||५||

एकच विनंती करते रे आता........
जेव्हा हे सगळे करेन दूर तुझ्यापासून …..

मी पण होउन जाईन लुप्त तुझ्या जीवनातुन.........................
मी पण होउन जाईन लुप्त तुझ्या जीवनातुन.........................

गुलज़ार साहेबांच्या गीता चा स्वैर अनुवाद

अश्या प्रकारच्या स्वैर अनुवादाचा पहिलाच प्रयत्न आहे.
तुमच्या प्रतिसादांची अपेक्षा करतो. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वैर अनुवाद लिहील्यामुळे वाचणं सुसह्य झालं. अन्यथा ते गाणंही कधी स्वस्थपणे ऐकता येत नाही. पहिलाच प्रयत्न खरंच असेल तर खुपच चांगला जमलाय. पु.ले.शु. Happy

ब्रो भाऊ,

श्राप द्यायला ते काही तुझ्या माझ्या सारखे मा.बो. वर पडीक नसतात... Lol
So just chill man !!!
आणि लोकांच्या कथा ढापण्या पेक्षा स्वैर अनुवाद करणे बरे नाही का ?

मूळ गाण्याच्या संदर्भात एक प्रश्न :

११६ चांदकी राते याचा चित्रपटात काही सन्दर्भ आहे का? जाणकारा.नी प्रकाश टाकावा

सिनेमात काही संदर्भ नाहीये पण त्या ओळीचा अर्थ "गेली ९ वर्षे मी तुझ्या खांद्यावर डोके टेकवून घालवली आहेत." असा काहीसा आहे.

गुलजारना ११६ रात्रीच का असे विचारल्यावर त्यांनी "मी दुसरा एखादा आकडा टाकला असता तर तो का, असे विचाराल" असे उत्तर दिले. त्यावरून ११६ ला काहीही अर्थ नाही. (सं. याहू : गुलजार फॅन ग्रुप).मायबोलीवर या उत्तराची लिंक मागे कधीतरी दिली होती.

आशाचा आवाज,आरडीचे संगीत आणि सुंदर चित्रिकरण यामुळे शब्दांकडे तेव्हढेसे लक्ष गेले नव्हते. आज तुमचा अनुवाद वाचला.मस्तच आहे.तुमचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला असूनही मूळ कवितेतील ती तरलता जास्त प्रभावी आहे असं माझं मत.

>> त्यावरून ११६ ला काहीही अर्थ नाही. (सं. याहू : गुलजार फॅन ग्रुप).
हो, त्या पर्टिक्युलर आकड्याला नाही, पण कोणीतरी ते दिवस नेमके मोजले आहेत हे ध्वनित करायचं आहे त्यातून - असं म्हणाला होता. Happy

नमस्कार,
वरिल सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद !

हो, ११६ हया आकड्याला अर्थ नाहीये...
मुळात गुलजार साहेबांनी स्वतः असे म्ह्ण्ट्ले आहे, की मुळात तो आकडा हे दाखवितो की ती व्यक्ती दुसर्या व्यक्ती च्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली आहे की त्याच्या बरोबर घालवलेल्या प्रत्येक रात्रींचा हिशोब ही तिच्या कडे आहे.

स्वाती ताई, तुम्ही बरोबर हेच म्ह्ण्ट्ले आहे Happy

rmd तुम्ही म्हणता त्या प्रमाणे अनुवादात 'सावनके कुछ भीगे भीगे दिन' आणि 'खत में लिपटी रात' नाहीये.
खरे आहे, मी त्याचा भावार्थ टिपुन त्याचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. Happy

मित्रांनो, मला अजुन ही काही उत्तम कवितांचा, गझलेचा अनुवाद करण्याची ईच्छा आहे, कृपया असे अनुवाद कसे चांगले करता येतील ह्या संबंधी suggestion येऊ द्या !!

देवकी ताई,

>>आज तुमचा अनुवाद वाचला.मस्तच आहे.तुमचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला असूनही मूळ कवितेतील ती तरलता जास्त प्रभावी आहे असं माझं मत.<< Happy

अहो स्वाभाविक आहे ते....कुठे गुलजार साहेबांसारखे शब्द-प्रभु आणि कुठे आमच्या सारखे अनुवादक Lol

>>पण कोणीतरी ते दिवस नेमके मोजले आहेत हे ध्वनित करायचं आहे

लंपनच्या कथांमधे असलेल्या अंकांप्रमाणे, किंवा
दिल चाहता है मधला सुबोध - तुम्हे टाईम याद नही होगा ना ?

गुलजार यांच्या मुळ गीतामधे सायकल, पोलिस, चार आणे हे सारे आहे ? Uhoh

>>गुलजार यांच्या मुळ गीतामधे सायकल, पोलिस, चार आणे हे सारे आहे ?<<

नाही, मुळ गीता च्या आधी, महेंद्र ला त्या माया चे पत्र येते, तो ते पत्र सुधा ला म्हणजे त्याच्या बायकोला वाचुन दाखवतो, मुळ गीता प्रमाणेच हा प्रसंग ही माया ने मुक्तछंदात लिहिला आहे......

>> त्यावरून ११६ ला काहीही अर्थ नाही. (सं. याहू : गुलजार फॅन ग्रुप).
हो, त्या पर्टिक्युलर आकड्याला नाही, पण कोणीतरी ते दिवस नेमके मोजले आहेत हे ध्वनित करायचं आहे त्यातून - असं म्हणाला होता. >>

हम्म धन्स मंडळी.

मला आणि माझ्या बहिणिला गाणे कोळून प्यायला फार आवडते .
अगदी छान , सु.न्दर गाण्याच्या बाबतिअच नाही , कुठल्याही 'क्लिक' झालेल्या गाण्याच्या बाबतित ( कितीही सामान्य असेल तरीही ) हे खर आहे

एकदा दोघीजणी हे गाण घेउन बसलो होतो आणि ११६ चा आम्ही काढ्लेला अर्थ :

११६ चांदराती , पण ही अशी ऑड फिगर का???

तिला फक्त चंद्र असलेल्याच रात्रि म्हणायच्या आहेत का?

( मग आमचे गणिती डोके )
एका महिन्यात चांदराती किती - सरासरी ३० वजा एक अमावस्या = २९
२९ आणि ११६ ???? हां ...... २९* ४ = ११६ ( बिंगो !!!)

म्हणजे ते दोघजण एक्मेकाना चार महिन्यापासून ओळखत असतात ???

आम्ही चित्रपट बघितला नसल्यामुळे ...

'हेन्स प्रूव्हड ' नाही करता आलं

म्हणून म्हटल जाणकाराना विचारुया .

धन्यवाद Happy

सिनेमात काही संदर्भ नाहीये पण त्या ओळीचा अर्थ "गेली ९ वर्षे मी तुझ्या खांद्यावर डोके टेकवून घालवली आहेत." असा काहीसा आहे >>> म्हणजे आमचे गणिती डोक योग्य तर्हेने चालले असते ११६ चांदराती म्हणजे ११६ पौर्णिमा म्हणजे साधारणपणे ९.५ वर्शे असा हिशोब करता आला असता Happy

म्हणजे ते दोघजण एक्मेकाना चार महिन्यापासून ओळखत असतात ????>>> ५+ वर्षे नसीर रेखाशी लग्न टाळत असतो आणि अनुराधाला ओळखत असतो/प्रेमात असतो. त्यामुळे ९ वर्षे जास्त प्लौसिबल वाटत. ४ महिने एखाद्या मुलीशी प्रेम आहे तर कोण रेखाला सोडेल? Wink
बाकी एका वर्षात १३ पौर्णिमा येतात. ११६/१३ = ??

त्यामुळे ९ वर्षे जास्त प्लौसिबल वाटत.>> होना सिमंतिनी ताई , मलाही ४ महिने फार कमी वाटत होते , त्यान्चे प्रेम बघून . शेवटी टोटल लागली ११६ ची Happy ११६/१३ ~ ९

स्वस्ति व सिमन्तिनी >>

तुम्हा दोघींच्या ही म्हणण्या मध्ये तथ्य आहे.
ही एक लिंक सापडली बघा -
http://www.hindustantimes.com/entertainment/music/ijaazat-song-was-proph...

शीSSश!! ११६ फेजेस ऑफ मून म्हणजे ४ महिने झाले कि. भलती इंटेन्स बया असणार. ४ महिन्याच्या प्रेमावर एवढ इमोशनल ब्लाक्मेल!!!

अनुवाद बरा जमला. पण हा अनुवाद जर मराठी वाचकांसाठी असेल तर मराठी लोकांना हिन्दी कळतेच की मग हा अनुवाद करुन असा काय उपयोग होईल. माझ्यामते अनुवाद करताना आपण असे साहित्य निवडतो जे साहित्य आपल्या भाषेतील लोकांना कळत नाही. जसे की जर्मन, फ्रेन्च, ईंग्रजी, चायनीज, जॅपनीज इ. इ.

बी.....

>> पण हा अनुवाद जर मराठी वाचकांसाठी असेल तर मराठी लोकांना हिन्दी कळतेच की मग हा अनुवाद करुन असा काय उपयोग होईल<< बरोबर बोलतो आहेस मित्रा....पण अरे माझे मुळ काम हे जर्मन<->इंग्रजी भाषांतराचे च आहे रे, दिवस भर तेच करुन करुन कंटाळा येतो...म्हणुन हा उपद्व्याप Lol
बाकी तुझे वरचे वाक्य मात्र अगदी सरकारी बँकातील लोकांसारखे होते....अगदी बँक ऑफ महाराष्ट्र मधील public इथे पुण्यात किंवा आपल्या विदर्भात असेच म्हणतात....तुम मराठी हो, पर हिंदी सम्झता है ना....फिर क्या प्रॉब्लेम है अगर सब information हिंदी में लिखी है !! Lol Lol

प्रसन्न, नाही मला माहिती आपल्या भाषेत मराठीत वाचायला केंव्हाही आवडेल. निदान महाराष्ट्रात तरी माझी तशी अपेक्षा आहे.

तुम्ही काक्फाचा जर्मन मधून मराठीमधे अनुवाद करुन पहा ना मग.. इथे अनेक जन काक्फाप्रेमी आहेत. मला तुमचे इतर भाषेतील साहित्याचे मराठीमधे अनुवाद वाचायला आवडतील.

पुलेशु!

धन्यवाद बी !!

Please अरे अहो-जाहो नको म्हणु...काफ्का चा अनुवाद करण्याची माझी पण तिव्र इच्छा आहे..पण तेवढी प्रतिभा अजुन तरी नाही. Happy

बादवे....येत्या काही दिवसांत माझे एक पुस्तक येते आहे, सहज, सोप्या भाषेत ते ही मराठी मधुन जर्मन कसे शिकता येइल ह्या वर त्या मध्ये भर दिला आहे. बघु कशी जमते आहे त्या पुस्तकाची भट्टी ते...

गुलजार ह्यांच्या कवितेचा अनुवाद करणार्‍याला काफ्का सुद्धा अनुवाद करायला जमेल. आम्ही सांभाळून घेऊ तुम्हाला. प्रयत्न करा. मराठी भाषेत असे किती जर्मन अनुवादक आहेत!

पुस्तक काढल्याबद्दल मनापासून अभिनंदन!

येत्या काही दिवसांत माझे एक पुस्तक येते आहे, सहज, सोप्या भाषेत ते ही मराठी मधुन जर्मन कसे शिकता येइल ह्या वर त्या मध्ये भर दिला आहे.
>>>>>
अरे वाह, अभिनंदन आणि शुभेच्छा Happy

@ मेरा कुछ सामान हे गाणे आजवर मी मोजून दोन वेळा ऐकले असेल फारतर, ते ही लहानपणी कधीतरी, पण वाचले मात्र त्या गाण्यावर पन्नास ठिकाणी आहे त्या बद्दल, पण म्हणून लेखावर नक्की प्रामाणिक प्रतिसाद नाही देऊ शकत. Happy

Pages