निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी मस्तच. शशांक माहितीत मोलाची भर घालत आहात. धन्यवाद.

दिनेशदा जमल्यास तारखा सांगा, म्हणजे तुम्हाला भेटायचा प्लॅन मला करता येईल. तुमच्गे पुस्तक ही द्यायचे आहे.

शशांक माहिती मस्त. पण वाचुन कसेसेच झाले. यु नो फॉर व्हॉट. Sad
बी मस्त फोटो. तो गुलाबी रंग कसला अफलातुन आहे दोन्ही फुलांचा. Happy

हो वर्षा, ह्याला गार्डन लिझार्ड म्हणू शकतो. (ह्याच्यातही खूप स्पिसीज आणि सब स्पिसीज असतीलच) Happy
बाकी फोटो नेहेमीप्रमाणेच सुरेख आलाय. खवले किती स्पष्ट दिसताहेत! आणि डोळ्यातले भाव - 'माझं लक्ष आहे हं तुझ्याकडे'.... असं एखाद्या किड्याला म्हणाल्यासारखे आहेत. Happy

बी, वर्षा फोटो मस्त.

मी राई पेरली आहे. उगवून एवढी झाली आहे. ह्याचा सरसोका साग करायला अजून किती वाढायला पाहीजे? पाने पुर्ण यायला हवीत का?

जागू, ही रोपे एक दोन फुट उंच होऊन त्याला छान पिवळी फुले येतात. तू सरसो के खेत पाहिले नाहीस का सिनेमात? तेवढी मोठी झाली की तुला सागासाठी पाने मिळतील. सॅलड म्हणून तू ही पाने खाऊ शकतेस.

वर्षा.. याला म्हणतात चित्रकाराची नजर !

जागू, दोन चार पाने आल्यावर खुडून घे. पानेच खुडलीस तरी चालतील, परत फुटतील.
घरी करणार असशील तर त्यात भरीला पालक, बटवा वापर. नुसती भाजी "गरम" पडते.

वर्षा, फोटू एकदम भारी.

मला सरपटणार्‍या प्राण्यांच्या स्वच्छ आणि तुकतुकीत त्वचेबद्दल नेहमीच उत्सुकता वाटत आलीय. Proud
एवढे सरपटत असतात तरी अजिबात मळलेले नसतात.

गारंबीच्या शेंगाप्रमणेच आईस्क्रीमच्याही शेंगा असतात Inga Beans म्हणतात त्यांना. न्यू झीलंडला होतात पण मी खाल्लेल्या नाहीत. लेक म्हणाली होती एकदा पण मला खरं वाटलं नव्हतं. ( ती आपल्या विलायती चिंचांना बघून तसे म्हणाली होती. ) याचा स्वाद व्हॅनिला आईसक्रीमसारखाच असतो. आणि बाकिचे गुणधर्म गारंबीच्या शेंगेचेच.

इथे वाचा..

http://en.wikipedia.org/wiki/Inga

मी राई पेरली आहे. उगवून एवढी झाली आहे. ह्याचा सरसोका साग करायला अजून किती वाढायला पाहीजे? पाने पुर्ण यायला हवीत का? >> जागुताई मस्तच हा एकदम पंजाबात आल्या सारख वाटल Happy

वर्षा, फोटू एकदम भारी. >>+१

वर्षा, फोटो मस्त .

बी तुमचे ही सर्व फोटो सुरेख.

जागू सरसो का साग केलस की रेसिपी टाक.

आणि हे पहा पंजाब मधील सरसोंका खेत.

From mayboli

सर्पदंशावरची लस आणि माहिती छान सविस्तर लिहिली आहे . खेचर भारतात बरयाच हिल स्टेशन वरती असतात.सामान आणि माणसांची ने आण करण्यासाठी.

आईस्क्रीमच्याही शेंगा???? वाचली लिंक ,फ्लेवर आहे ना तो. आईस्क्रीम म्हंटलं की माझं लगेच लक्ष जातं . आईस्क्रीमच्याही शेंगा वाचल्यावर एकदम शेतात आईस्क्रीम पिकत असल्याचं दिसलं पॅकिंग सकट. Happy
सरसोंका खेत मस्तच फोटो .एकदम डीडीएलजे आठवतो. Happy

मनीमोहोर सरसो चे शेत एकदम मस्तच.
रेसिपी टाकेन नक्की.

गारंबी आणि आईस्क्रिमच्या शेंगा कधी पाहिल्या नाहीत नविन आहेत दोन्ही माझ्यासाठी.

थँक्यू अश्विनी आणि सर्वांना.
खरं तर सरडा बघून ईईई अशीच प्रतिक्रिया तोंडून बाहेर पडली होती. पण कॅमेर्‍याच्या झूमिंग पॉवरने त्याचे डीटेल्स इतके सुंदर दिसू लागले. डोळ्याभोवतालचा फुगीर भाग, खवले, लांबलचक शेपटी, पाठीवरील त्रिकोणी झालरीसारखे दिसणारे खवले,, पुढच्या आणि मागच्या पायांची बोटं बघून अक्षरशः थक्क झाले. काय पॅटर्न्स बनवलेत निसर्गाने ___/\___

सरड्यांचं एक बरं असतं. पक्ष्यांसारखी घाई नसते. हा एकेच ठिकाणी इतका निवांत होता की भरपूर वेळ फोटोसेशन करु शकले त्याचं. Happy

सिनी... आईस्क्रीमसारखेच लागते असे लेक म्हणत होती. ( आमच्या दोघांचा आईस्क्रीम म्हणजे विक पॉईट.. पण मला आईस्क्रीम हवेय असे म्हणायचे नाही, तूला हवेय का ? असे विचारायचे.. असा नियम आहे. )

वर्षा, किटकांकडे पण लक्ष देणार का ? ( झूम लेन्समधून ) त्यांच्यात पण अनोखे रंग असतात.

वर्षा, सरड्याचा फोटो एकदम मस्त . काय अ‍ॅटीट्युड दाखवतोय तो.... चेहर्यावरचे भाव मस्तच. आय मीन डोळ्यातले. त्याच्याकडे पहात असताना पटकन वरती सरकेल असे वाटत आहे. पहिल्यांदा सरड्याला एवढया प्रेमाने आणि काळजीपुर्वक बघितले.

ही फुले कसली आहेत? पुण्यातला आहे हा फोटो. एक टवटवीत प्रसन्नता आहे फुलावर ... आणि पाकळ्या मिटून कोमेजलेले फुल फारच बिचारे वाटत आहे.. . आता गळून पडेल.

ही फुले महादेवाला प्रिय असतात.. अजून पांढरा कण्हेर आणि पिवळी कोरंटी - ही तीन फुले महादेवाला अतिप्रिय मानतातः

वा! क्या कहे?

ही फुले कसली आहेत?

ह्या पानांचे सौंदर्य पानाआड दडले आहे.. मरुम रंग निरखा!

बी, पहिली निळी फुलं विष्णुक्रांता नावाची आहेत. दुसरी गोकर्णी आणि शेवटून दुसरी - गुलाबी बहुधा पेंटास असावीत. तिसर्‍या फोटोतल्या फुलांचं नाव माहिती नाही. पण फ्लॉवर्स ऑफ इंडियाच्या साईटवर समजेल.

सरसोंका साग.... जागूचं कुंडीतलं शेत आणि मनीमोहर चा फोटो .. दोन्ही मस्त!!
[दिनेशदा आणि जागू - (हिच्या शाकाहारी पाककृतींसाठी) यांच्याकडे काहीदिवस फडकं मारावं असा विचार येतो मनात]

Pages