निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
बी, दिनेश आणी तत्सम
बी, दिनेश आणी तत्सम मंडळींपैकी कुणीही सांगेल तुला अर्थ
तोपर्यन्त लहान पणी वाचलेले बालसाहित्य आठव, रेफरंस मिळेल
बीला कुठल्याही गोष्टीचा अर्थ
बीला कुठल्याही गोष्टीचा अर्थ फोडुन सांगावा लागतो.... असे का?? असे का?? असे का???
शांकली, मला ते चिंचोके पाहुन बिब्ब्याच्या बियांची आठवण झाली.
ओके म्हणजे कुठलेही कोनीफेरस
ओके म्हणजे कुठलेही कोनीफेरस ट्री ख्रिसमस ट्री म्हणुन सजवता येते.
एन्टाडा र्हीडे - Entada
एन्टाडा र्हीडे - Entada rheedei असं नाव आहे गारंबीचं. आणि ही फळं (बिया) खातात की उगाळून लावतात, हे नक्की एखाद्या तज्ञ वैद्यालाच विचारून घे. विकिपिडियावर कन्फर्म कर.
धन्यवाद शांकली. तसाच दिसतो हा
धन्यवाद शांकली. तसाच दिसतो हा चिंचोका.
ओक्के शांकली. तुझ्यामुळे
ओक्के शांकली. तुझ्यामुळे अरुकेरिया - Araucaria. हे नाव कळलं.
जागू , वर्षू डिस्कव्हरीवर काल रात्री ९ ते १० "रिव्हील्डः रन ऑफ कच्छ" दाखवलं.. आता तो एकच एपिसोड होता किंवा काय ते माहिती नाही. पण तू नळीवर पहा.
चाफ्याचे झाड आणि पानांच्या
चाफ्याचे झाड आणि पानांच्या मधोमध चंद्रः
भेंडीजास्वंदाचे झाड आणि पानांच्या जवळ चंद्रः

थँक्स.. खूप शोधली लिंक,
थँक्स.. खूप शोधली लिंक, मानुषी.. पण ३६ सेकंदा ची अॅड आहे फक्त.. मे बी उद्यापर्यन्त अपलोड केली जाईल
मागच्या आठवड्यात नगरला गेले
मागच्या आठवड्यात नगरला गेले होते भावाकडे.
जवळच असलेल्या चान्दबिबीचा महाल पहायला गेलो होतो. .. एका छोट्याशा टेकडीवर हवेशीर अशी छान वास्तु आहे. तिकडुन परततान्ना हे 'महाराज' असे आरामात रोड क्रॉस करतान्ना दिसले. भावाने अचानक गाडीला ब्रेक मारला. आणी गाडी अगदी ह्याच्याजवळच थाम्बवली. हे महाराज हलायला तयार नाहीत. निवान्तपणे फोटोसेशन करु दिले.
बाकी कारवाले लोक आमच्याकडे बघत निघुन जात होते. पण समोरुन मोटरसायकलवरुन आलेल्या एका खेडुताने तत्परतेने गाडी थाम्बवली आणि एक झाडाची फान्दी तोडुन त्यावर या सरड्याला घेउन अलगद पलिकडच्या बाजुला सोडले. खुप बर वाटल. या साध्या सरळ लोकान्न्ची निसर्गाबद्दलची ही जाणीव बघुन.
<<<एन्टाडा र्हीडे - Entada
<<<एन्टाडा र्हीडे - Entada rheedei असं नाव आहे गारंबीचं. >>>
माझ्याकडे या गारंबीच्या वेलाचे लोणावळ्याच्या रायवूड पार्कात घेतलेले फोटो आहेत. गारंबीची वेल 'लायना' प्रकारात येते. म्हणजे अजस्त्र वेली. गारंबीचा वेल अर्धा किमीपर्यंतही पसरलेला असू शकतो. त्याच्या शेंगेची लांबीही दीड मीटरपर्यंत असू शकते.

ही शेंगः
ही त्याची फुले:

आणि ही वेल!

-अश्विनी
बापरे वेल बरीच मजबूत आहे. काय
बापरे वेल बरीच मजबूत आहे. काय छान झोपाळा तयार झाला आहे. ग्रेट. धन्स अदीजो.
आर्या, मला आधी वाटले मुलांचे खेळणे आहे. अगदी स्तितप्रज्ञ योगीस्थ दिसतात साहेब.
अरे बापरे.. ह्या असल्या वेली
अरे बापरे.. ह्या असल्या वेली नॅशनल पार्कात पाहिल्यात.
ह्या लायाना मधे
ह्या लायाना मधे गारंबीप्रमाणेच कांचनवेल सुद्धा मोडते. तीही अशीच अजस्र असते. पुण्यात एम्प्रेस गार्डन मधे या दोन्ही वेली आहेत.
आर्या, मस्त फोटो. शॅमेलिऑन हा
आर्या, मस्त फोटो. शॅमेलिऑन हा नेहमीच - पुढे सरकू की नको?? अशा मन:स्थितीत असल्यासारखा वाटतो. (बहुधा खूप विचारशील असावा तो!) कारण पुढे-मागे झुलत झुलतच तो अगदी धीम्या गतीने चालतो.
शॅमेलिऑन मस्तच टिपलाय.
शॅमेलिऑन मस्तच टिपलाय. त्याच्या भडक रंगामुळे झाडाच्या बाहेर पडला अत्र अगदी उठून दिसतो.
साधना, हि गारंबीची वेल अंबोलीला पण आहे. या वेली सहसा नदीकिनारी असतात. या शेंगांचे तूकडे होऊन पाण्यात पडतात. प्रत्येक तुकड्यात एक बी असते पण ती शेंगेच्या संरक्षक कवचात असते. ती होडी तरंगत तरंगत दूरवर जाते. त्या काळात ते आवरण कुजते आणि मग त्या ठिकाणी ती बी रुजते. एरवी कुठल्या प्राण्या पक्ष्याकडून तिचा प्रसार होणे शक्य नाही.
आपल्याकडे फक्त शोभेसाठी पण वापरतात ( अंबोलीला लाडांच्या घरी आहे ) नायजेरियात त्याच्या माळा करतात !
हो जंगलात असल्या वेली
हो जंगलात असल्या वेली पाहिल्याचे आठवतेय. लाडांकडे जाऊन पाहिन नक्कीच. तुम्ही भीमवेल म्हणत होतात ती हीच का?
हो जंगलात असल्या वेली
हो जंगलात असल्या वेली पाहिल्याचे आठवतेय. लाडांकडे जाऊन पाहिन नक्कीच. तुम्ही भीमवेल म्हणत होतात ती हीच का?
शॅमेलिऑन >> मला कळलेच नाही
शॅमेलिऑन >> मला कळलेच नाही तुम्ही कशाबद्दल बोलता. मी शॅमेलिऑन न म्हणता चॅमेलिऑन म्हणतो.
शॅमेलिऑन हा नेहमीच - पुढे सरकू की नको?? अशा मन:स्थितीत असल्यासारखा वाटतो. (बहुधा खूप विचारशील असावा तो!) कारण पुढे-मागे झुलत झुलतच तो अगदी धीम्या गतीने चालतो.>>
बरोबर शांकली, सरडा हा खरच खूप अडखळत आणि त्याची मान उंचावून पुढे पुढे जातो. त्याच्या मानेजवळचा भाग कसा गदगद हलतो ना.. काल मी हिरवट शेवळी रंगाचा सरडा पाहिला. मला बघून तो आणि त्याला बघून मी पळून गेलो
दिनेशदा, गारंबीची वेलबद्दल मस्त माहिती मिळाली तुमच्याकडून . धन्यवाद.
साधना, भीमवेल वेगळी. तिला
साधना, भीमवेल वेगळी. तिला फार मोठी फुले येतात. पण ती साधारण ऑक्टॉबर मधे ( दिवाळीच्या सुमारास ) माझ्या माहितीप्रमाणे सर्वात मोठे फुल येणारी वेल आहे ती.
<<कारण पुढे-मागे झुलत झुलतच
<<कारण पुढे-मागे झुलत झुलतच तो अगदी धीम्या गतीने चालतो.<<
अगदी अगदी...शान्कली! आम्ही व्हिडीयो शुट पण केल त्याच.
अग, एक तर त्याचे डोळे तारवटलेले..:डोमा: त्यात एक पाय पुढे टाकला की जागच्या जागी झुलायचे महाराज...मग हळुच दुसरा पाय टाकतील. ते पाहुनच आम्हाला हसु आवरल नाही.
<<मला बघून तो आणि त्याला बघून मी पळून गेलो<<< बी
पण खर त्या 'माणसामुळे' मला एकदम आठवल... आम्ही लहानपणी भिन्तीवर बसलेले सरडे कसे नेमधरुन उडवले ते. वाईट वाटल.
शॅमेलिऑन - या सरड्याचे
शॅमेलिऑन -
या सरड्याचे डोळेही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशेला हा फिरवू शकतो जेणेकरून ३६० अंशातील सर्व गोष्टी एका जागेवरुनच पाहू शकतो. या गंमतीशीर गोष्टीमुळे डावा डोळा समोरचे बघतोय तर उजवा पूर्ण मागचे... (एल एल टी टी - लुकिंग टू लंडन टॉकिंग टू टोकिओ
) असं काहीसं विचित्र याच्याबाबत सहज घडते.
सगळ्यात मजा येते ती हा भक्ष्य पकडायच्यावेळी. याच्या समोर भक्ष्य असले की हे महाशय दोन्ही डोळे समोर आणतात - पुढची गंमत म्हणजे हे दोन्ही डोळे एकच भक्ष्य बघतात हे कन्फर्म झाल्याशिवाय हा लांबलचक जीभ बाहेर फेकणार कसा - तर दोन्ही डोळे समोर आणून हा आपले डोके थोडे थोडे हलवतो - चक्क पॅरलॅक्स घालवण्यासाठी - एकदा हे नक्की झाले की दोन्ही डोळे एकच भक्ष्य पहात आहेत की मग क्षणार्धात याची जीभ बाहेर फेकली जाते - भक्ष्याला पकडण्याकरता.
याची जीभही मजेशीर - तोंडाच्या टोकाशी पण आतल्याबाजूला गुंडाळून ठेवलेली. ही गुंडाळी केव्हा उलगडते व केव्हा भक्ष्याच्या दिशेने फेकली जाते ते कळतही नाही भक्ष्याला... (आपल्या डोळ्यांना तर भक्ष्य एक्दम याच्या तोंडात गेले एवढेच कळते...अतिशय फास्ट अॅक्शन....सेकंदाचाही दशांश का शतांश ).......
(तू नळीवर याचा एखादा व्हिडिओ उपलब्ध असेलच - जरुर पहाणे.. )
शॅमेलिऑन - (रंग बदलणारा सरडा)
शॅमेलिऑन - (रंग बदलणारा सरडा) - डॉ. वाटवे सरांमुळे (आ. गरवारे महा., पुणे - १९८०च्या आसपास) जे अनेक किटक, पक्षी, प्राणी हाताळायला मिळाले, पहायला मिळाले त्यात हे चिरंजीवही होते.
हा अतिशय संथ प्राणी असून चालताना सारखा मागे पुढे झुलत असतो (गमतीने आम्ही त्यावेळेस त्याला - "लाजते पुढे सरते फिरते" अशी "नववधू" म्हणायचो)
याची सगळ्यात गंमतीशीर बाब - जी आपणा सर्वांना माहित आहे ती आसपासच्या रंगात/ परिस्थितीत मिसळून जाण्याकरता (कॅमाफ्लॉज) याच्या शरीरावर होणारे रंगबदल. वेगवेगळ्या रंगसंगतीत याच्या अंगावरील रंग कसे व किती भरभर बदलतात याचे निरीक्षण करण्यासाठी तास न तास घालवलेले आठवतात. वस्तुतः याच्या अंगावर खवले असतात (दोन प्रकारच्या पिगमेंट्ससहित) व आसपासच्या तापमान, त्याचा मूड, नर-मादी संयोगाकरता अशा वेगवेगळ्या कारणाने हे रंगबदल होतात ( - आपल्याला गैरसमजाने ते कॅमाफ्लॉजिंग वाटतात). हा रंगबदल प्रत्यक्ष बघण्याची मजा काही औरच......
सुरवातीला याला हातात कसे घ्यायचे म्हणून सगळे घाबरतच होतो अन सर मात्र न घाबरता सहज हाताळत होते. याच्या पायाच्या टोकाला दोन बोटांसारखे अवयव असतात. आपला हाताचा अंगठा एका बाजूला व बाकी सर्व बोटे एकत्र एका बाजूला असे केले तर जसे होईल तशी त्याची रचना असते. या पंज्याच्या पकडीमुळे हा कुठल्याही फांदी, झाड वगैरेचा यांचा आधार घेऊन चालतो. तसेच याची शेपटीही हा आधार म्हणून वापरतो. वरच्या फांदीला शेपटीने गुंडाळून अलगद खालच्या फांदीवर उतरताना याला बघताना फारच मजा यायची.
जेव्हा सर याला हाताळत होते ते पाहून पाहून अखेर भिती गेली व आम्ही मंडळीही याला हाताळू लागलो. ज्याच्या हातात. अंगा-खांद्यावर हा असायचा त्यापुढे आपला हात केला की हे महाशय त्या हातावर चालत यायचे व त्या हातावरुन हळुहळू खांद्यावरुन दुसर्या हातावर जायचे. मधेच कोणी त्याला पाठीला धरुन खेचले तर हा सरडा आपली पहिली पकड अजिबात सोडत नसे व तो दुसरा घेणारा जोवर आपला हात पुढे करत नसे तोवर हा पहिल्या आधारावर ठाम असे.
मला सरडा हा प्राणी जरी
मला सरडा हा प्राणी जरी सरपटणारा असला तरी त्याची फार भिती नाही वाटत. जितकी मला इतर सरपटणार्या प्राण्यांची वाटते. मी कित्येकदा सडकेवर चाकाखाली येऊन चिरडले जाणारे सरडे पाहिले आहे. बहुतेक ह्याला कारण हा मधेमधे थांबतो म्हणून असेल. कित्येकदा त्याची सडकेला चिकटलेकी त्वचा आकार पाहिला आहे. कधी काट्याकुट्यात सुकलेला सरडा पाहिला आहे.
मस्त
मस्त
शशांक, कित्ती विचार करतो ना
शशांक, कित्ती विचार करतो ना हा !
नायजेरियात, दर ५० पावलावर सरडा दिसतो. ऑफिसच्या खिडकीत पण येत असत ते. नेमका तेवढा एकच प्राणी ते लोक खात नाहीत
इथे अंगोलात, निळे सरडे दिसतात, पण तितक्या संख्येने नाहीत.
न्यू झीलंडमधे सरड्यासारखास एक प्राणी त्यांच्या खास पोहोतुकावा या सुंदर झाडाचे परागीवहन करतो. तिकडे लोकांना त्यांच्या बागेत सरडे, पाली यावेत असे वाटते.
शशान्कजी थॅन्क्स! गमतीदार
शशान्कजी थॅन्क्स! गमतीदार माहिती आहे शॅमेलियानबद्दल!
<< दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशेला हा फिरवू शकतो जेणेकरून ३६० अंशातील सर्व गोष्टी एका जागेवरुनच पाहू शकतो.<< हे भारीच!
<<भक्ष्याला पकडण्याकरता.याची जीभही मजेशीर - तोंडाच्या टोकाशी पण आतल्याबाजूला गुंडाळून ठेवलेली. ही गुंडाळी केव्हा उलगडते व केव्हा भक्ष्याच्या दिशेने फेकली जाते ते कळतही नाही भक्ष्याला.ं<<< अगदी बरोब्बर! याचा फोटो होता शाळेतल्या विज्ञानाच्या पुस्तकात.
भन्नाट निरिक्षण आणि माहिती.
भन्नाट निरिक्षण आणि माहिती. आणि सगळ्या किटकभक्षी प्राण्यांची जीभ चिकट द्राव निर्माण करते भक्ष पकडायला त्यानी मदत होते.
जिप्स्याचे डब्बल अभिनंदन दा,
जिप्स्याचे डब्बल अभिनंदन

दा, शशांकजी - उपयुक्त माहिती . आर्या,बी ,अदीजो - सुंदर प्रचि
अदिजो... गारन्बीची वेल' अशा
अदिजो... गारन्बीची वेल' अशा नावाची वेल आहे हेच माहित नव्ह्त.
केवढी ती वेल.
मस्त प्रचि!
व्वा , मस्त माहिती. मजा आली
व्वा , मस्त माहिती. मजा आली वाचायला.
Pages