'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपर्णा, यातून मुलींचे प्रबोधन करावे हाच उत्तम उपाय वाटतो आहे. मुलाचा धर्म अलाहिदा.. मुळात आपली फसवणूक होते आहे हे न समजण्याइतक्या मुली वाहवत जात असतील तर यात मुली आणि त्यांचे पालक यांचीच चूक वाटते आहे. मुलींना आपण कोणाला डेट करतो आहोत हे घरी सांगता येण्याइतका मोकळेपणा नसेल तर मग त्या अशा बाहेरून फसवल्या जाणार. मुलीला स्वातंत्र्य आणि जबाबदारी दोन्ही कळलं पाहिजे आणि आपले आईवडील आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास देखील वाटला पाहिजे. हे असं झालं तर मग मुलीची फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.

खोटे नाव कसे घेतात म्हणे

मुलगा वर्गात असेल , क्लास मध्ये असेल , नोकरीत क्लिग असेल तर खरे नाव माहीत होतेच ना ?

जिज्ञासा - हो, बरोबर आहे. मुलींचं प्रबोधन व्हायलाच पाहिजे. पण हा मुद्दा फक्त मुलींपुरता नाहीये, मुलं सुद्धा व्हिक्टीम आहेत.
आणि बर्‍याचदा जीव जाण्याचा सवाल आहे ह्या भानगडीत आणि जीवंत राहीलं तर अत्यंत वाईट स्थिती - धर्म बदलला तरी .

आई-वडील्/समाज बरोबर असणं जितकं जरूरीच आहे तितकीच कायद्याची भीती जरूरी आहे. बर्‍याचदा आई-वडील्/कुटुंब अतिशय मवाळ असतं मुलीचं आणि काहीही करू शकत नाही.

इथे आणि इतर मराठी सोशल मिडियावर अपर्णा रामतीर्थंकरांबद्दल खूप वाईट बोललं जातं, अगदी त्यांच्या मृत्यूनंतरही . पण या बाईंचं या क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे. अशा खूप मुलींना त्यांनी अधार दिलाय/ त्याना पायवर उभं केलय.

>>>मुलगा वर्गात असेल , क्लास मध्ये असेल , नोकरीत क्लिग असेल तर खरे नाव माहीत होतेच ना ?

फक्त याच जागी नाही भेटत लोकं.
कसाब आणि त्याचे क्लिग सुद्धा हातात दोरे बांधून आले होतम, माहित आहे ना? हुतात्मा तुकाराम ओंबंळेंचे हिंदूंवर फार मोठे उपकार आहेत , हिंदू समाज त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाही

आज पुण्यात प्रेम प्रकरणातून लग्न झालेल्या एका मुलीच्या चेहऱ्यावर एसिड फेकानाऱ्या आय्याज तांबोळी
ला पोलिसांनी अटक केली आहे .
न्यूज मध्ये पीडितांची नावे न देण्याच्या प्रोटोकॉल मुळे त्या मुलीचे नाव अजुन समजलेले नाही .

मुलं व्हिक्टिम कशी होतात याची पण माहिती द्यावी. पण कायदे तर हिंदू मुलींनी हिंदू मुलांशी लग्न केल्यावर जर अत्याचार होत असतील तरी आहेत. तरी या घटना थांबलेल्या नाहीत. त्यातल्यात्यात सर्व आंतरधर्मीय विवाह हे फक्त स्पेशल मॅरेज ॲक्ट खालीच होऊ शकतील अशी सुधारणा करता येईल. पण मुलींची फसवणूक हा संपूर्णपणे धर्मनिरपेक्ष विषय आहे. मुस्लिम मुलाशी लग्न झाले तर ती होतेच आणि स्वतःच्या धर्माच्या मुलाशी लग्न केले तर ती होत नाही असं आजिबातच दिसत नाही.

हे जिहादी स्वत:चे खोटे नाव सांगून फक्त 'हिंदू' मुलींनाच फसवत नाहीत तर खोटे नाव लावून हे आता कोर्टाला देखील फसवत आहेत.

संदर्भ : आज की बात रजत शर्मा के साथ. २४-११-२०२०

तुमची ती रजत शर्मा लिंक दिसत नाही.

कसाब आणि त्याचे क्लिग सुद्धा हातात दोरे बांधून आले होत

पण ते तर माणसे मारायलाच आले होते , लव्ह जिहाद करायला नाही

मुलाचे खरे नाव , व्यवसाय , पत्ता माहीत नसताना मुली प्रेमात पडतात कशा ?

प्रश्न लग्नाचा नाहीये, प्रश्न लग्नाची / प्रेमाची फूस लावून दुसर्‍या व्यक्तीचं 'धार्मिक कर्तव्य ' म्हणून धर्मांतरण करण्याचा आहे.

हे 'प्रेम' ही खरं नसतं बर्‍याचदा, एकदा का लग्न होउन धर्मांतरण झालं की मुलगा दुसरं लग्न त्याच्या आई-वडिल्/समाज धार्जिण व्यक्ती/व्यक्तींशी करतो. जाणून बुजून / एकदम प्लॅन्ड अ‍ॅक्टेव्हिटी असते.

आणि मुसलमानबरोबर लगीन करून एखादी स्त्री हिंदू राहिलीच , मग तुम्ही तिला सवाष्ण म्हणून किंवा चैत्रा गौरीला पन्हे प्यायला बोलावणार का ?

इथे लव जिहादचा नक्की निकष सांगण्यास कोणी तयार नाही, कोणत्याही लग्नाकडे बोट दाखवून लव जिहाद म्हणतायत.

अहो आम्ही जन्मानं मुसलमान/ ख्रिश्चन / ज्यू / नास्तिक / अ-धार्मिक अशा सर्व स्त्री/पुरूषांना ह.कू ला बोलावतो व जी काही खिरापत्/जेवण्/ओटी भरणे प्रकार असतो तो करतो. अर्थात त्यांना हे करून घेणं मान्य नसेल तर त्याचाही आम्हांला प्रॉब्लेम येत नाही...

बौद्ध्/जैन्/शिख इ. अशा भारतात उगम असलेल्या धर्म्/पंथ ना आम्ही हिंदूच समजतो

प्रश्न लग्नाचा नाहीये, प्रश्न लग्नाची / प्रेमाची फूस लावून दुसर्‍या व्यक्तीचं 'धार्मिक कर्तव्य ' म्हणून धर्मांतरण करण्याचा आहे. >> अपर्णा, हे सगळं conspiracy theories च्या प्रकारात मोडायला लागलंय. Planned activities वगैरे. याचा व्यवस्थित शोध पत्रकारितेच्या मार्गाने मागोवा घेऊन जर कोणा विश्वसनीय संस्थेने रिपोर्ट केला तरच यात तथ्य आहे असं मला वाटतं. बाकी अनेकदा लग्नात फसवणूक होते हे मला मान्यच आहे पण केवळ धर्मांतरण करण्यासाठी लग्न करणे ही एक मोठी activity आहे आणि यात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम समाजातील मुले/पुरुष सामील आहेत वगैरे फार पटणारं नाही. आकडेवारी, पुरावे दाखवू शकाल का?
कायद्यात आंतरधर्मीय लग्ने केवळ स्पेशल मॅरेज ॲक्ट खालीच व्हावीत ही सुधारणा झाली पाहिजे हे ही मान्य आहे.

पटो वा न पटो , कोणी काँस्पिरसी थेअरे म्हणो अथवा काहीही, ग्राउंड रिअ‍ॅलिटी हीच आहे.
आणि कोणीच पत्रकार या बद्दल बोलत नाही असं नाही, पण सम पत्रकार आर होलिअर दॅन अदर्स. आता फक्त अशाच पत्रकारांकडून व्हॅलिडिटी हवी असेल तर नाही विश्वास ठेवला तरी चालेल. त्यामुळे परिस्थिती बदलत नाही.

योगी सरकारचा चांगला निर्णय.
मात्र जे जिहादी, जिहाद व धर्मासाठी स्वत:च्या जीवाची व इतरांच्या जिवाची, अजिबात पर्वा करत नाहीत ते या कायद्यातील शिक्षेच्या तरतुदीला किती भिक घालतील हा प्रश्नच आहे/ कारण या जिहाद्यांना जन्नतमधे मिळणार्‍या ७२ हुरची आस असते.

कुठल्याही पत्रकाराने केलेला रिपोर्ट दाखवा. किमान रिपोर्ट उत्तम दर्जाचा हवा ही अपेक्षा आहे. केवळ ही ground reality आहे एवढेच सांगून विश्वास कसा बसेल? इथे बाडं भरभरून डाटा उपलब्ध आहे तरी climate change is haux म्हणणारे लोक सापडतील. तुमच्यावर का विश्वास ठेवावा?

अश्या तरुणींची ( मग त्या हिंदु देखील का असेनात ) अवस्था ही तोंड दाबुन बुक्क्यांचा मार अशी असते. एक उदाहरण आमच्या शेजारच्या कॉलनीत २५ वर्षापूर्वी झाले. एका धनाढ्य व्यापार्‍याची मुलगी एका मुस्लिम दुकानदाराच्या नोकराच्या प्रेमात पडली. हा नोकर त्या वेळी खरच देखणा दिसायचा, नीट बोलायचा. पण १० वी सुद्धा पास नव्हता. एके दिवशी दोघेही पळुन गेले. त्यामुळे वडिल आजारी पडले, आई तिला चोरुन भेटायची ( जेव्हा ती लग्न करुन परत आली ) ह्याची नोकरी गेली कारण दुकानदाराला चौकशीला सामोरे जावे लागले. मग एका साध्या मातीच्या घरात दोघे राहु लागले. अगदी एकच खोली. माहेरी स्वतःची खोली असलेल्या या मुलीची अशी दुर्दशा. काही वर्षांनी मी आणी तिची धाकटी बहीण तिला भेटायला गेलो होतो तेव्हा तिची तब्येत खूप खराब झाली होती. पदरात ४ मुले ( हो ४ च मुले ) आणी नो पैसा अडका.

वाईट वाटले पाहुन. त्याला पण नीट नोकरी नव्हती. पण एक होते की त्याने तिला कधी त्रास दिला नाही. आता ती कुठे आहे माहीत नाही. कारण ते घर त्यांनी सोडले. ही अवस्था प्रत्येक हिंदु वा मुस्लिम वा ख्रिश्चन तरुण तरुणीची होऊ शकते, जर योग्य जोडीदार मिळाला नाही तर.

दुसरे उदाहरण माझ्या वर्गातल्या मुलीने पळुन जाऊन लग्न केले जेव्हा ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. पण सासर ठीक होते. पण मुर्खपणाचा कळस म्हणजे तिच्या धाकट्या बहिणीने पण पळुन जाउन लग्न केले, का तर म्हणे ताईने केले तर मी का नको , आणी माहेरी परत आली कायमची. अर्धवट वय, कमी शिक्षण आणी डोक्यावर बॉलीवुड.

Submitted by रश्मी.. on 25 November, 2020 - 19:37
--
@रश्मी,
हा तर तुमचा स्वत:चा अनुभव आहे, खरा असेल कश्यावरुन ? हां, हाच अनुभव एकाद्या पुरोगामी जर्नेलिस्टने, एकाद्या पुरोगामी पेपरात लिहाला असता तर एकवेळ आम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवला असता.

बॉलिवूड च्या आधी लोक पळून जात नव्हते का ?>>> जात होते की पण ते परतुन येत नव्हते. बायकोला पोसायची ताकद होती मग तो कृष्ण असो वा पृथ्वीराज.

मुलाचे खरे नाव , व्यवसाय , पत्ता माहीत नसताना मुली प्रेमात पडतात कशा ?........... हा धागा वाचत असतानाच डिलिव्हरी बॉय आलेला.मस्त उंची,goodlooking वगैरे.नवऱ्याला म्हटले काय मस्त होता रे तो दिसायला,उगाच आपल्या मुली भाळत नाहीत.त्यावर त्याची कॉमेंट: अग कालचा पोरगा बघायला हवा होतास,याच्यापेक्षा उंच आणि गोरागोरा.

सो आकर्षण हे महत्त्वाचे असते हो.

हा तर तुमचा स्वत:चा अनुभव आहे, खरा असेल कश्यावरुन ? हां, हाच अनुभव एकाद्या पुरोगामी जर्नेलिस्टने, एकाद्या पुरोगामी पेपरात लिहाला असता तर एकवेळ आम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवला असता. >> इतका रिकामा प्रतिसाद लिहून काय मिळते?
राजकारणाच्या सर्व धाग्यांवर इतक्या रिकामटेकड्या पोस्ट्स पाहून फार वाईट वाटते. यात सर्व राजकीय पक्षांचे आयडीज आहेत. अगदी थोडे सदस्य आहेत ज्यांच्या पोस्ट्स नीट मुद्देसूद आणि वाचनीय असतात बाकी सगळी नळावरची भांडणे दर्जा Sad

माझ्यावर/ याच्यावर /त्याच्यावर विश्वास आजिबात ठेउ नका. डोळे उघडे असतील आणि ओपन मांइंड असेल तर हे दिसेल.
नाही दिसत असेल तर ओक्के. पण ज्या लोकांना दिसतय तेच कसे धर्मांध आहेत / वाइट आहेत असा फोबिया जमलं तर नका धरू.

डेटा/ रिपोर्ट्स इ. चांग्ल्या पत्रकाराचे....चांगला पत्रकार म्हण्जे कोण? इंग्रजी पत्रकार का?
बर,, ही फक्त भारताततलाच भयानक प्रकार आहे का? तर नाही . युरोपात हे लोण प्रचंड पसरलेलं आहे. ब्रिटन मधे शीख मुलींना 'पटवून' धर्मांतरण करण्याचा 'रेट' ( लिहायला अतिशय घाण वाटतय, पण सत्य आहे) सर्वात जास्त आहे.
शीख संघटना निदान आवाज तरी उठवतात , मुलगी जर व्हाइट-ब्रिटीश असली तर सगळी सिस्टीम तिच्याच विरोधात जाते...
धर्माधारित लैंगिक छळ याबद्दल ब्रिटन मधली हवी असेल तर रॉचडेल सँडल वाचा

मुलं सुद्धा व्हिक्टीम आहेत. आणि बर्‍याचदा जीव जाण्याचा सवाल आहे >>>> अहो अस लिहू नका कोणाला तरी राग येईल.

सावरकरणी मुसलमांनाही हिंदूच म्हटले आहे.>>>>> सावरकर म्हणाले आहेत की : आसिन्धु-सिन्धुपर्यन्ता यस्य भारत.भूमिका I पित्रुभू: पुण्यभू: चैव सः वै हिन्दु इति स्म्रुतः I ज्यान्ची ज्यान्ची हि भूमिका आहे तेच हिन्दु आहेत. मला वाटते की मुस्लिम या पित्रुभू: पुण्यभू: शब्दावर आक्षेप असेल. हे शब्द महत्वाचे आहेत हिन्दु याच्या व्याख्येत. त्यान्चा अर्थ fatherland व holy land आहे. मुस्लिम व ख्रिश्चन लोकान्चा या दोन शब्दापैकी holy-land या शब्दावर जास्त आक्षेप असेल कारण तेभरताला पुण्यभूमी मानतील का याबद्दल शन्का वाटते. ओवैसीन्चा, त्यान्च्या भावाचा व त्यान्च्या पक्षच्या कर्यकर्त्यान्चा आक्षेप तर नक्की असेल. कालच बिहारमधल्या एका मुस्लिम आमदाराने हिन्दुस्थान या शब्दावर आक्षेप घेउन शपथ घ्यायला नकार दिला होता. आता यावर काही जण तारे तोडतीलच.

ब्रिटन मधे शीख मुलींना 'पटवून' धर्मांतरण करण्याचा 'रेट' ( लिहायला अतिशय घाण वाटतय, पण सत्य आहे) सर्वात जास्त आहे >> हे तुम्हाला कसे कळले? किमान तुम्हाला ही सर्व माहिती कुठून मिळाली याचा तरी संदर्भ द्या. ही गंभीर विधानं आहेत. जर विश्वास ठेवा या पलीकडे या विधानांना काही बॅकींग नसेल तुमच्याकडे तर कोण विश्वास ठेवेल आणि का ठेवावा? तुम्ही intelligence मध्ये कोणत्या मोठ्या अधिकारी पदावर आहात का जिथून तुम्हाला या अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खबरा मिळतात? तसं असेल तर तसं सांगा मग तुमच्या शब्दाला जरा तरी वजन असेल.

Pages