Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36
'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...
सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...
काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>> हे तुम्हाला कसे कळले?
>>>>> हे तुम्हाला कसे कळले? किमान तुम्हाला ही सर्व माहिती कुठून मिळाली याचा तरी संदर्भ द्या. ही गंभीर विधानं आहेत. जर विश्वास ठेवा या पलीकडे या विधानांना काही बॅकींग नसेल तुमच्याकडे तर कोण विश्वास ठेवेल आणि का ठेवावा? तुम्ही intelligence मध्ये कोणत्या मोठ्या अधिकारी पदावर आहात का जिथून तुम्हाला या अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खबरा मिळतात? तसं असेल तर तसं सांगा मग तुमच्या शब्दाला जरा तरी वजन असेल.
ही नुसती विधानं नाहीत. मी सिक्युरिटी मधे काम करते का गुप्तहेर आहे ह्यावर काही अवलंबून नाही .
मी अधीच लिहिलय विश्वास ठेवा आणि नका ठेउ परिस्थिती बदलत नाही. माझ्या शब्दाला /मला मान द्या अशी आजिबात अपेक्षा नाही.
कारण जेंव्हा ओपन मांइंड नसत / फक्त झापडं लावूनच इकडे-तिकडे पहाता येतं त्याला कोणीही काहीच करू शकत नाही.
तुम्हाला पटणार्या पत्रकाराचाच सही शिक्का असलेला रिपोर्ट पाहिजे तुम्हाला - म्हण्जे रबिश कुमार - जो पोलिसांवर पिस्तुल रोखणार्या शहारूख ला अनुभव मिष्रा म्हण्नंत/ आख्खा कार्यक्रम करतो टिव्हीवर , किंवा बरखा दत्त - जी २६/११ चं सगळं रिपोर्टिंग लाइव्ह दाखवते ...असे हुश्शार लोकं का?
त्या हुतात्मा ओंबंळ्यांचे अतोनात उपकार आहेत तो कसाब जीवंत पकडला गेला नाहीतर हातातल्या लाल धाग्यांचे रिपोर्ट आले असते.
इस्टर्न युरोप ( पोलंड रूमेनिया इ. देश ) सोडून बाकीचा युरोप लेफ्ट लिबर्ल्स च्या प्रभावाखाली आहे, ते रोच्डेल सँडल जर वाचलं तर कळेल की पोलिस सुद्धा 'रेसिझम' चा आरोप येइल म्हणून बलात्कार/ अॅब्युज अशा तक्रारी नोंदवत सुद्धा नव्हते.
हे असं बरीच वर्ष चालू होतं; किती रिपोर्ट पाहिजेत ?
आणि एक खासदार त्यावर हे म्हणते --
https://metro.co.uk/2017/08/23/mp-shares-tweet-saying-abuse-victims-shou...
त्या निकिता तोमरच्या खून्याची आई सुद्धा असच काहीसं म्हटली होती - 'का नाही निकितानं धर्म बदलला, आम्ही करोडप्ती आहोत. तिच्या धर्म न बदल्याच्या निर्णयामुळे माझ्या मुलानं तिचा खून केला आणि तिच्यामुळं माझा मुलगा तुरूंगात आहे'.
स्वतः आरोपी आणि त्याचे नातेवाईक हे म्हणताहेत आणि रिपोर्ट पाहिजे ...
हे म्हण्जे त्या तैमुर , औरंगजेब इ. क्रूर / धर्मांध लोकांनी स्वतः लिहून ठेवलेल्या कागदपत्रावर विश्वास न ठेवता कोणत्यातरी 'हुश्शार' पत्रकारानं त्या नोंदीचं केलेलं इंटर्प्रिटेशन / रिपोर्ट म्हणून ग्राह्य धरायचं
ओळंबे चा पुतळा आहे गिरगाव
ओळंबे चा पुतळा आहे गिरगाव चौपाटी ला.
त्यांच्या पुतळ्या च्या नशिबात रोज आंघोळ आणि हार पण नाही.
फक्त उपकार आहेत असे म्हणायचे आणि सोडून द्यायचे.
हो, चालतय की. मनानं आठवण /
हो, चालतय की. मनानं आठवण / नतमस्तक रोजच.
जेंव्हा मुंबईत जातो तेंव्हा भेट देतोच तिथे .
ओंबाळे
ओंबाळे
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/mumbai-news/crime-in-mumbai-local-between-boriv...
दीक्षित चोरी करायला आणि
दीक्षित चोरी करायला आणि त्याने थेट चोरीचाच प्रयत्न केला. शेख ला चोरी करायची होती पण त्याने आव मात्र सज्जनाचा आणला त्यामुळे तरुणीने शेखवर विश्वास ठेवला. विश्वासघात करुन त्याने तरुणीला लुटले.
मुली विश्वास कसा ठेवतात हे विचारणार्यांकरिता ही वरची लिंक दिलीय.
लडके लिया पाकिस्तान, हंसके लेंगे हिंदूस्थान हा त्यांचा नारा आहे तेव्हा सावध राहा.
स्वतःचा दीक्षित चोर निघाला ,
स्वतःचा दीक्षित चोर निघाला , ते बघा.
कदाचित मुलगी आरक्षित समाजाची असल्याने रहीमच्या मदतीने त्याने काटा काढायचा ठरवला असेल
पहले भी मनुस्मृती थी , आज भी वही है , हा दिक्षितचा नारा आहे , सावध रहा
मी इथली चर्चा हळू हळू वाचतेय.
मी इथली चर्चा हळू हळू वाचतेय.
माझा प्रश्न - लव जिहाद कायदा आल्याने मुलींना/ स्त्रीयांना सेक्शुअली एक्सप्लॉइट करणे खरेच थांबेल का? म्हणजे धर्म न बदलता, लग्नही न करता एकत्र रहाणे असेही होवू शकते ना? मुलंही होवू शकतात ना? स्त्रीयांची सुरक्षितता , वापरले जाणे थांबवणे करायचे तर व्यापक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न हवेत. तेही १०-११ व्या वर्षांपासून. जेणेकरुन स्त्री सबल असेल योग्य निर्णय घेण्यासाठी.
{{{ कदाचित मुलगी आरक्षित
{{{ कदाचित मुलगी आरक्षित समाजाची असल्याने }}}
हे कुठे छापले आहे त्या बातमीत?
अपर्णा, चर्चा पुढे गेली
अपर्णा, चर्चा पुढे गेली सुद्धा! सनव यांनी चांगल्या लिंक्स दिल्या. तुम्ही मात्र संदर्भहीन आणि अर्थहीन लिहीता आहात. प्रश्न विचारणारी व्यक्ती ओपन माईंडेड नसते वगैरे वगैरे. असो!
स्वाती ताई, हिच तर शोकांतिका आहे! राजकारणी लोकांना लव्ह जिहाद प्रकरणात का कळवळा आहे तर त्यातून निर्माण होणाऱ्या पोलरायझेशन मधून राजकीय पोळी भाजून घेता येते सर्वांनाच. स्त्री वर स्वधर्मात असो वा स्वजातीत अत्याचार होतोच आहे पण त्याला political traction नाही. स्त्रीचे सबलीकरण हा उपाय नको आहे कोणालाच.
हे कुठे छापले आहे त्या बातमीत
{{{ कदाचित मुलगी आरक्षित समाजाची असल्याने }}}
हे कुठे छापले आहे त्या बातमीत >>>>>>>
असे विचारणे बर नव्हे !
त्यांना अचानक दृष्टांत होत असतात .
स्वयंघोषित सुधारक असले की असेच होते !!!
कदाचित लिवले की झाले
कदाचित लिवले की झाले
राजकारणी लोकांना लव्ह जिहाद
राजकारणी लोकांना लव्ह जिहाद प्रकरणात का कळवळा आहे तर त्यातून निर्माण होणाऱ्या पोलरायझेशन मधून राजकीय पोळी भाजून घेता येते सर्वांनाच.
सर्वांनाच नाही हो, फक्त भाजपाला. वृंदा करात यांनी यावर सुंदर लेख लिहिला आहे. जरूर वाचा.
कदाचित लिवले की झाले
कदाचित लिवले की झाले
Submitted by BLACKCAT on 26 November, 2020 - 17:52
तसं असेल तर कदाचित मग तो दीक्षित आडनाव लावणारा इथल्या कागलकरप्रमाणे कन्व्हर्टेड असेल.
जिज्ञासा,
जिज्ञासा,
आमच्या इथे लव जिहाद वगैरे नाही. दोन्ही पार्टीज ख्रिश्चन पण मुलींना, स्त्रीयांना प्रेमाचे स्वप्न दाखवून फसवणे, अॅब्युझ, सेक्स ट्रॅफिकिंग, कल्टमधे भरती हे सगळे आहेच. गैरफायदा घेणारी मंडळी मानसिकतेचा अभ्यासा करुन व्यवस्थित जाळं टाकतात. मुलींची फसवणूक टाळायची असेल तर सातत्याने प्रयत्न हवेत. केवळ मुलीच नाही तर पालकांचेही प्रबोधन गरजेचे. दुसर्या पार्टीचा धर्मप्रसार हा उद्देश असेल तर काम अजूनच वाढते. पहिल्यांदाच घर सोडून कॉलेज कँपसवर रहायला जाणार्या मुलामुलींना कल्ट मधे ओढण्याचे प्रकार होतात. त्याबाबत जसे प्रबोधन केले जाते तसे करणे गरजेचे आहे असे मलातरी वाटते.
Submitted by BLACKCAT on 26
Submitted by BLACKCAT on 26 November, 2020 - 17:52
तसं असेल तर कदाचित मग तो दीक्षित आडनाव लावणारा इथल्या कागलकरप्रमाणे कन्व्हर्टेड असेल >>>>>
अच्छा त्यामुळे सतत हिंदू धर्मा विरुद्ध गरळ ओकने चालू असते !
जिज्ञासा,
जिज्ञासा,
...कोणाचे रिपोर्ट ग्राह्य धरणार तुम्ही ?
खालील दोन्ही विधानं तुमची आहेत . तुम्ही मला आंतर्राष्ट्रीय खबरांबद्दल विचारताय / माझ्या पदाबद्दल विचारताय/ शब्दाचं वजन मोजताय .. आणि संदर्भहीन आणि अर्थहीन सुद्धा म्हणताय. ...सगळं वैयक्तिक बरं .
मज्जाच आहे. तुम्ही परिक्षक वगैरे आहात की मी विद्यार्थी आहे सबमिशन करायला संदर्भांचं? जसा प्रश्नाचा टोन तसंच उत्तर मिळणार .
काहीही मत दिलं की रिपोर्ट रिपोर्ट
तुम्हाला अर्थ कळत नसेल तर माझी चूक नाही. कळवून घ्यायचा नसेल तरीही ओक्के.
>>>>जर विश्वास ठेवा या पलीकडे या विधानांना काही बॅकींग नसेल तुमच्याकडे तर कोण विश्वास ठेवेल आणि का ठेवावा? तुम्ही intelligence मध्ये कोणत्या मोठ्या अधिकारी पदावर आहात का जिथून तुम्हाला या अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खबरा मिळतात? तसं असेल तर तसं सांगा मग तुमच्या शब्दाला जरा तरी वजन असेल.
>>>तुम्ही मात्र संदर्भहीन आणि अर्थहीन लिहीता आहात. प्रश्न विचारणारी व्यक्ती ओपन माईंडेड नसते वगैरे वगैरे. असो!
अपर्णा, जरा सगळ्या पोस्ट्स
अपर्णा, जरा सगळ्या पोस्ट्स नीट वाचत चला. I am not going to argue with you because I find your posts illogical and useless.
मस्त,. . Thank you जिज्ञासा.
मस्त,. .
Thank you जिज्ञासा.
स्वाती ताई, +१ लव्ह जिहाद या
स्वाती ताई, +१ लव्ह जिहाद या शब्दाचा वापर केला जातो आहे. समाज प्रबोधन हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे पण त्याला सपोर्ट नाही कारण मग प्रश्न सुटेल!
विकु, मी वृंदा करातांचा लेख शोधते पण केवळ भाजपा जबाबदार आहे असं मला वाटत नाही.
> केवळ भाजपा जबाबदार आहे असं
> केवळ भाजपा जबाबदार आहे असं मला वाटत नाही.
केवळ भाजपाच जबाबदार आहे. कारण असे पोलरायझेशन करून मधून राजकीय पोळी भाजून घेणे ही भाजपाची एस ओ पी आहे.
या लव्ह जिहाद कायद्याचा उद्देश स्त्रीयांचे संरक्षण करणे आहे असे लोकांना का वाटते हे अनाकलनीय आहे, भाबडे पण म्हणावा, की ब्रेनवॉशिंग ?
जिज्ञासा, स्वाती,
जिज्ञासा, स्वाती,
तुमचे मुद्दे योग्य आहेत.
समाजप्रबोधन (spreading awareness) हे महत्वाचं आहे. आपल्यापेक्षा युरोप, युकेमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कितीतरी जास्त चांगली आहे पण तिथेही हे प्रकार होतात. सीख आणि वर्किंग क्लास व्हाईट मुलींसोबत.
आताही निकिता तोमर आणि अंजना तिवारी प्रकरणांमुळे आदित्य नाथ सरकारवर जनतेचा दबाव आला की सरकारने आता काहीतरी हालचाल केलीच पाहिजे. त्या प्रेशरला वाट करुन देण्यातून हा कायदा पुढे आला असावा.
मुळात इथले काही लोक आणि डावे intellectuals अशीच मांडणी करत आहेत की लव्ह जिहाद वगैरे काही नाहीच. जणू हे मोदीभक्तांचं figment of imagination आहे. पण मग केरळमधील कॅथलिक चर्च, शीख संघटना, युके आणि स्वीडन, जर्मनी इथल्या बातम्या- यालाही आपण मोदीभक्त कॅटेगरी म्हणणार का?
तर मुळात काही गोष्टी घडत आहेत हे वास्तव स्वीकारणं ही पहिली पायरी आहे.
त्यानंतर सावध राहणं, मुलींना समजावणं , सक्षम करणं, कायद्याचाही धाक असणं हे सर्व येईल.
>>>केवळ भाजपाच जबाबदार आहे.
>>>केवळ भाजपाच जबाबदार आहे. कारण असे पोलरायझेशन करून मधून राजकीय पोळी भाजून घेणे ही भाजपाची एस ओ पी आहे.
+11
मग केरळमधील कॅथलिक चर्च, शीख
मग केरळमधील कॅथलिक चर्च, शीख संघटना, युके आणि स्वीडन, जर्मनी इथल्या बातम्या- यालाही आपण मोदीभक्त कॅटेगरी म्हणणार का?
>>>>> +१११
आंधळ्या चे सोंग घेतलेले लव जिहाद बद्दल शीख संघटना , कॅथालिक चर्च च्या नावाने गळे काढणार नाहीत .
विकु, म्हणजे तुम्हाला खरंच
विकु, म्हणजे तुम्हाला खरंच असं वाटतं का की ओवेसी, काँग्रेसचे नेते इत्यादी लोकांना मुस्लिम समाजाच्या विकासात रस आहे? त्यांना केवळ मुस्लिम मतांमध्ये रस आहे जसा भाजपाला हिंदू मतांमध्ये. जर काँग्रेसला मुस्लिम समाजाच्या प्रगतीमध्ये खरोखर रस असता तर एव्हाना चित्र वेगळे दिसायला हवे होते.
केवळ भाजपाच जबाबदार आहे. कारण
केवळ भाजपाच जबाबदार आहे. कारण असे पोलरायझेशन करून मधून राजकीय पोळी भाजून घेणे ही भाजपाची एस ओ पी आहे.
बरं, ते असेलही. पण तुमच्या माता ( सोनिया गांधी हो, त्यांना तुम्ही सोनियामाता म्हणून नावाजता ना ) आणी त्यांचे सुपुत्र राजधानी सोडुन गोव्याला गेलेत. कारण काय तर दिल्लीचे प्रदुषण. लाखो लोकांचे तारणहार, भावी पंप्र, एकमेवाद्वितीय असे युवराज चक्क लोकांना आणी तुमच्या काँग्रेस पक्षाला असहाय्य अवस्थेत सोडुन जातात याला काय म्हणावे?
या लव्ह जिहाद कायद्याचा उद्देश स्त्रीयांचे संरक्षण करणे आहे असे लोकांना का वाटते हे अनाकलनीय आहे, भाबडे पण म्हणावा, की ब्रेनवॉशिंग ?>>>>
मला सध्या तरी लव्ह जिहाद हा
मला सध्या तरी लव्ह जिहाद हा क्लिकबेट शब्द वाटतो भारताच्या संदर्भात. धर्मांतराचा मुद्दा मुस्लिम नवरा आणि इतर धर्मीय मुलगी या लग्नात महत्वाचा आहे कारण या बाबतीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कायदे अगदीच बेकार आहेत. त्यात स्त्रियांना कोणतेही संरक्षण नाही. हे साधना यांनी त्यांच्या एका पोस्टमधे सविस्तर मांडले आहे मागच्या पानांवर. योगी सरकारचा नवा कायदा लग्न अवैध ठरवतो म्हणजे नक्की काय करतो आणि त्याने फायदा होईल की तोटा असा मला प्रश्न पडला आहे. त्यापेक्षा असलेला स्पेशल मॅरेज ॲक्ट वापरून सर्व आंतरधर्मीय लग्न त्या कायद्याखाली नोंदवण्याची सक्ती करणे सोपे नाही का? जर हे कायदे सर्व धर्मांसाठी समान असते तर धर्मांतराचा मुद्दा माझ्यासाठी फार महत्वाचा उरला नसता - त्यात बळजबरी होणे हा एक मुद्दा वगळता.
जर हे कायदे सर्व धर्मांसाठी
जर हे कायदे सर्व धर्मांसाठी समान असते तर धर्मांतराचा मुद्दा माझ्यासाठी फार महत्वाचा उरला नसता - त्यात बळजबरी होणे हा एक मुद्दा वगळता.
करेक्ट. समान नागरी कायदा मोदींच्या अजेंडावर आहेच. पण त्याला काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांकडून कट्टर विरोध होणारच आहे त्यामुळे ती लढाई दीर्घकालीन असणार आहे. म्हणून बहुधा ट्रिपल तलाक, लव्ह जिहाद असे कायदे करावे लागत आहेत- तात्पुरती मलमपट्टी.
धर्मांतर बळजबरीबरोबरच radicalization हाही एक काळजीचा मुद्दा आहे जो कॅथलिक चर्चने मांडला होता.
ओके, पण मला एक कळले नाही.
ओके, पण मला एक कळले नाही. लव्ह जिहाद म्हणजे अक्च्युअली काय? त्याची व्याख्या काय? माझ्या अल्पमती नुसार लव्ह जिहाद म्हणजे एखाद्या मुस्लिम तरुणाने ( मुस्लिम अशासाठी की जिहाद हा शब्द त्यांच्या धर्मासंबंधीत आहे ) एखाद्या हिंदु वा शीख वा बौद्ध वा ख्रिश्चन तरुणीला प्रेमात पाडण्याचे नाटक करणे आणी मग तिला फुस लावुन पळवुन नेणे वा पळुन जाऊन लग्न करण्यासाठी भाग पाडणे. म्हणजे येनकेन प्रकारे त्या तरुणी ला कोणते ना कोणते आमिष दाखवुन फसवणे. पुढची पायरी म्हणजे लग्न करुन तिला तिचा धर्म बदलायला भाग पाडणे. हा लव्ह जिहाद असावा.
पण हरयाणात त्या मुस्लिम तरुणाने निकीता तोमर ही त्याला दाद देत नाही म्हणल्यावर तिचा खून केला. मग तो लव्ह जिहाद होऊ शकतो का?
सनव, तात्पुरते म्हणून जे
सनव, तात्पुरते म्हणून जे कायदे आणत आहेत ते रोगापेक्षा इलाज भयंकर असे तरी नकोत. मी लव जिहाद कायद्यात मला जाणवणारा धोका मांडला आहे वरच्या पोस्टमधे. त्यावर तुमचे काय मत आहे?
रश्मी, सहमत आहे. म्हणूनच नीट विदा असल्याशिवाय असे शब्द सर्रास वापरू नयेत. सर्व राजकीय पक्ष हे केवळ त्यांच्या फायद्यासाठी असे क्लिकबेट शब्द पसरवत असतात ज्याच्यामुळे समाजात कायम दुही रहावी. भाजपा तर उघड हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे. त्यांच्याकडून मला वेगळी अपेक्षा नाही. समान नागरी कायदा हा देखील हिंदूंच्या तुष्टीकरणासाठी आणला जाईल. त्यामुळे मुस्लिम समाजाचे काही भले झालेच तर ठीक आहे पण तो दुर्लक्षित मुद्दा आहे.
Pages