मुलीचा विवाह लवकर होण्यासाठी गुरुचरीत्रातला कोणता अध्याय वाचावा

Submitted by मोहिनि३३३ on 21 July, 2014 - 02:47

घरातील मुलीचा विवाह लवकर होण्यासाठी गुरुचरीत्रातला कोणता अध्याय वाचावा ? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे . मी नेटवर सगळीकडे शोधलं पण सापडलं नाही. ५३ व्या अध्यायात संपूर्ण गुरुचरित्राचे सार असल्यामुळे हा अध्याय वाचला तर चालेल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न होण्याचा आणि गुरुचरीत्रातला अध्याय वाचण्याचा सम्बन्ध असतो हे प्रथमच कळाले :अरेरे:.

रुक्मिणी स्वयंवर लग्नाळू मुलीने स्वतःच वाचायचे असते म्हणे. वाचताना तुपाचा दिवाही तेवत ठेवायचा असतो.
दुसर्‍या कोणी काही वाचायचे असे ऐकलेले नाही.

इथे पहा काही मिळाल्यास.

Rofl

मुलीचा विवाह लवकर होण्यासाठी गुरुचरीत्रातला कोणता अध्याय वाचावा

>>> हे मुलगी किती सुंदर/सिडक्टीव्ह आहे ह्यावर अवलंबुन आहे !

मला वाटत नवनाथान्च्या पोथीत पण आहे हे... कशासाठी कुठला अध्याय वाचायचा ते अनुक्रमणिकेतच दिलेल असत.

मोहिनि३३३,

इथे नवनाथ भक्तिसार आहे : http://titkare.blogspot.co.uk/

40 व्या अध्यायात शेवटी फलश्रुती दिलेली आहे. तिच्यानुसार २८ वा अध्याय वाचल्याने भाविकांचे लग्न होते.

अट्ठाविसाव्या अध्यायांत ॥ पिंगलेकरितां स्मशानांत ॥ विरक्त होऊनि भर्तरीनाथ ॥ पूर्ण तप आचरला ॥५७॥
तो अध्याय करितां श्रवण पठण ॥ त्या भाविकाचें होईल लग्न ॥ कांता लाभेल गुणवान ॥ सदा रत सेवेसी ॥५८॥

मात्र इथे कांता लाभेल असं लिहिलं आहे. त्यावरून केवळ पुरूष भाविकांसाठी असावा असे वाटते. कोणी नाथभक्तास विचारून घ्यावे.

आ.न.,
-गा.पै.

मला एक शन्का आहे.
गापै,
अर्गलास्तोत्रात:
'पत्नि मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम् ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि||'
असा श्लोक आहे. म्हणजे हे स्तोत्र/ श्लोक स्त्रियान्नी वाचु नये काय?

वर लिहील्याप्रमाणे मुलीचे लग्न होण्यासाठी वेळ लागत नसेल तर रुक्मिणी स्वयंवर वाचावे. त्यासठी संकल्प सोडुन वाचन करावे. संकल्प सोडुन मंगळवारचे उपासही करतात.
पण ही general माहिती झाली. कोणाला पत्रिका दाखवुन त्या व्यक्तीसाठी कुठली साधना गरजेची आहे ते माहित करुन घ्यावे.
गुरुचरित्र लग्नासाठी नक्की वाचत नाहीत. त्याने वैराग्य येते. लग्न होण्याचे चान्सेस अजुन कमी होतील.

प्रसाद - विषय नाजुक आहे... तुमचा उद्देश निव्वळ थट्टा करण्याचा असेल पण येथे धागाकर्तीच्या भावनान्ची काळजी घ्यायला हवी. धन्यवाद.

चार वधुवरसूचक सायटींवर नांवं नोंदवा.
आपल्या अवास्तव अपेक्षा कंट्रोल मधे ठेवा.
अन आईबापांना जरा शोधाशोध करायला सांगा.

अस्लं खाटल्यावर बसून चरित्र फिरित्र वाचून काही व्हायला लागलं तर झालंच म्हणायचं कल्याण!

हाही एक प्रकारचा अंधविश्वास नाही कां?
उद्या संतान होण्यासाठी कुठले पुस्तक वाचावे असा बाफ निघेल. असो, जैसी जिसकी सोच!

ह्म्म्म या असल्या उपायांपेक्षा शोधमोहिम जास्त जोरदार करा. फारतर ज्या कोणा देवाला मानत असाल त्याची रोज हात जोडून मनोमन प्रार्थना करा.

>> इब्लिस | 21 July, 2014 - 13:17 नवीन
>>>चार वधुवरसूचक सायटींवर नांवं नोंदवा.
>>>आपल्या अवास्तव अपेक्षा कंट्रोल मधे ठेवा.
>>>अन आईबापांना जरा शोधाशोध करायला सांगा.

हे सगळ करत असाल हे ग्रुहित धरले आहे. पण हेच करुनही लग्न जमत नसेल तर वर सांगीतलेले उपाय करा.

हे सगळ करत असाल हे ग्रुहित धरले आहे. पण हेच करुनही लग्न जमत नसेल तर वर सांगीतलेले उपाय करा.>> हे सगळं करत बसण्यापेक्षा उपवर मुलींना हे असले ग्रंथ का आणुन देऊ नये??

धागाकर्तीच्या भावना दुखवण्याचा कुठलाही हेतू नाहीये, पण हे असले उपाय असु शकतात कां ???

मनकवडे की काय तुम्ही?
तुम्हाला कसं कळलं की हे सगळं करूनही त्यांचं जमत नाहिये ते? Proud

मोहीनी३३३

वरील चरित्रातील एखाद्या विशिष्ट अध्यायाचे ह्या कारणासाठी वाचन करण्यापेक्षा सर्व अध्यायांचे वाचन करा कुठल्याही कारणाशिवाय, झाला तर फायदाच होईल नुकसान तर काही होणार नाही ना. मनाला समाधान मिळेल. आणी शक्यतो पारायणे स्वतःसाठी न करता दुसर्‍यांसाठी करावीत त्याने आपलाही फायदा होतो व दुसर्‍याचाही असं माझं वैयक्तीक मत आहे.

अस्लं खाटल्यावर बसून चरित्र फिरित्र वाचून काही व्हायला लागलं तर झालंच म्हणायचं कल्याण!>>> तमिळमध्ये लग्नालाच कल्याण म्हणतात.

मला एका हितचिंतक नातेवाईकांनी रूक्मिणस्वयंवराच एक पुस्तक दिलं होतं> ते इतकं विनोदी आणी भयाण होतं की मी घरात जोरजोरात वाचून दाखवाय्चे. रूक्मीणीने हवा तो नवरा निवडून त्याला लव्ह लेटर पाठवून्त्याच्यासोबत पळून गेली की नाही? मग मीही तसंच करेन. काही मुलं वगैरे बघू नका, या युक्तीवादासरशी ते पुस्तक माळ्यावर फेकलं गेलं.

अहो मोहिनी श्री गुरु चरित्र वाचत नाहीत. वर रुक्मिणी स्वयम्वराचा उल्लेख आला आहे तो बरोबर आहे. तसेच नवनाथ भक्तिसार मधला २८ वा अध्याय वाचावा.

इब्लिस यान्चे उपाय बरोबर आहेत.

डॉक्टर मी काही पत्रिका पाहिल्या होत्या. ( प्लीज माझ्या या विधानावरुन कुणी माझ्याकडे मी ज्योतिष्यी आहे असे मानुन डिटेल्स देऊ नयेत, मी अजून काठावरच आहे) त्यावरुन लिहीते.

धार्मिक उपायानी लग्न किन्वा नोकरी हे प्रश्न लवकर निकालात नाहीत, पण त्याचे जे टेन्शन येत रहाते, ते कमी होते. जुन्या रितीनुसार ( अजूनही ) मुलीच्या लग्नाला उशीर झाला की घरच्यान्पेक्षा बाहेरचे जास्त काळजी करतात, आणी अगबाई कधी आम्हाला लाडु खायला मिळणार हो! असे बोलुन जाम पिडतात. मग आई बाप बीपी वाढवुन ठेवतात.

त्यातुन मुलीचे/ मुलाचे मन इतरत्र भटकु नये यासाठीच धार्मिक श्लोक/ वार/ पूजा योजली जात होती आणी जातेय.

तुमचे बरोबर आहे, की बसल्या जागी हरी करुन खाटल्यावर काही मिळणार नाही, पण वरील उपायाबरोबरच हे उपाय पण बरे.

मोहिनी खालील उपाय आहेत.

१) श्री गुरुदत्ताना दर गुरुवारी पिवळ्या फुलान्चा हार घालतात. ( का माहीत नाही, पण पिवळाच कलरच हवा)

२) पत्रिकेत मन्गळ असेल तर गणपती व दुर्गा उपासना ( उपास तापास नव्हे) करावी.

३) पत्रिकेत शनी ३ र्‍या, ६ व्या, ७ व्या वा नवव्या स्थानी असेल तर मुलीच्या भावाने व वडिलानी मारुतीला रुई चा हार घालावा. शनी अभिषेक करावा. ( पैशाचे/ यज्ञाचे/होम-हवनाचे स्तोम माजवु नये. अभिषेकाला १०१ रुपयेच खर्च येतो)

४) पती मनोरमाम देही असा जप करावा. पत्नी या शब्दा ऐवजी पती शब्द वापरावा. वर आर्या ने लिहीले आहे.

अपेक्षा समतोल ठेवा.

आर्या बरोबर आहे ते. मी वर लिहीले आहे तसे वाचायला सान्गतात. श्री दुर्गा सप्तशती मधला श्लोक आहे तो.

@उदय ,

भावनांना दुखावेल असं मी काही लिहलय असे वाटत नाही .... मुलींचे लग्न होणे हे ७०% त्यांच्या दिसण्यावर आणि ३०% त्यांच्या स्वभावावर अवलंबुन असते . त्यातही "दिसणे" हआच मेन फॅक्टर असतो ...

कोणताही ग्रंथ वाचुन लग्न होण्याचे चान्सेस वाढतील असे वाटत नाही !

हां , आता जर स्पष्ट बोलल्याने भावना दुखावत असतील तर भावनाने उपचार करुन घेण्याची गरज आहे !

@ धागाकर्ती :- आपले विचार जुळणार नाहीत. तुमचे समाधान होईल असं काही सांगणे अशक्य आहे.

पण नोंद घेऊन ठेवा. हल्ली जमाना प्रचंड वेगाने बदलतोय. मुलगी शिकलेली असेल आणि तिचा तिने जोडीदार पसंत केला असेल तर त्याला गोड मानून घेणे हे सर्वोत्तम. ती ज्याच्याबरोबर खूष राहील त्याला नाकारून मुलं पाहत बसणे, मग उपाय करणे याने लग्नाच्या मूळ उद्देशाला हरताळ तर फासला जात नाही ना हे देखील पहावे.

हल्ली तर आं.जा. पण जोरात आहेत आयटी वगैरे सेक्टर मधे. आंजा च नाही आंरा (आंतर राज्य) पण होताहेत. ऑप्शन्स वाढले की लग्न लवकर जमतं असं माझं मत आहे. ते लिमिटेड करून ठेवले की मग पोथ्या कमी पडतील..

प्रसाद दिसण्या वर अवलम्बुन असेलही कदाचीत, पण नसलेले जास्त बरे असे वाटते. स्वभाव पण महत्वाचा नाही का? आपल्या पायावर उभी असेल, कणखर असेल, समजून घेणारी असेल ( जीवनात येणार्‍या प्रसन्गासाठी) तर जास्त चान्गले असे माझे वैम.

ब्र आ तुमचे बरुबर हाय, पण मुलीला लव्ह मॅरेज करायचे नसेल आणी असले उशिरा विवाह प्रश्न सामोरे असतील तर घरचे विचारत असतील.

अन्धश्रद्धा, गैरसमज यात वाहवुन जायचे नसतेच, पण कुठल्या बुवा/ बाबाजी पेक्षा हे धार्मिक उपाय वाईट नव्हे.

हल्ली सगळे जण जग कसे पुढे गेलेय आणि म्हणुन आप्पपले लग्न आपणच जमवले पाहिजे, नाही ते तसेच जमणारच हा सल्ला देत असतात. पण असे जमायला हवे ना... माझी एक मैत्रिण गेल्या दहा वर्षात चारदा अगदी जोरात प्रेमात पडलीय. चारही वेळा समोरचा मुलगा तिच्या थेंबबरही प्रेमात नव्हता. प्रत्येक वेळेस त्याच्या लग्नात अक्षता टाकण्याची वेळ हिच्यावर आलीय. आणि गंमत म्हणजे तिचे आईबाबासुद्धा ती स्वतःच जमवणार स्वतःचे असे धरुन चाललेत.. तीच्या बाजुने ती जोरदार प्रयत्न करते पण तीच्या मते मुलांच्या दृष्टीकोनातुन ती फक्त फ्रेंड मटेरिअल आहे, गर्लफ्रेंड मटेरिअल नाही त्याला काय करणार???

तिचे सगळे प्रयन्त करुन झालेत तेव्हा कृपया आता तिने काय करावे याचे मला सल्ले देऊ नका. वरचे वाचुन मला तिचे उदाहरण आठवले ते दिले बस्स...

ज्यांना टिंगल टवाळी करायची आहे त्यांनी कृपया प्रतिसाद देण्याची तसदी घेवू नये .
लोक इतके खालच्या थराला जातात हे बघून वाईट वाटत . जावूदे . ज्यांना उत्तर माहित असेल त्यांनी कृपया द्यावं. बाकीचे उपाय मला माहित आहेत . मला फक्त गुरुचारीत्रातला तो अध्याय जाणून घायचंय

@इब्लिस . तुमच्या बुद्धीची लायकी कळली . प्रश्न काय आहे हे नित वाचलेला दिसत नहिये. आणि तुमच्यासारख्या लोकांच्या सल्ल्याची गरज हि नाहीये .
@ ब्रह्मांड आठवले | . गुरुचरित्र वाचणारे जुन्या विचारांचे असतात अस कुणी सांगितला तुम्हाला ? तुम्ही सांगितलेली situation नाहीचे तर मी काय बळजबरीने त्या मुलीला सांगू का बाई ग तूच तुझा कोणी शोध म्हणून .
मुलींचे लग्न होणे हे ७०% त्यांच्या दिसण्यावर आणि ३०% त्यांच्या स्वभावावर अवलंबुन असते . त्यातही "दिसणे" हआच मेन फॅक्टर असतो ..
हे आम्हाला समजत नाही असं वाटला का तुम्हाला ?

उद्या संतान होण्यासाठी कुठले पुस्तक वाचावे असा बाफ निघेल. असो, जैसी जिसकी सोच!
गुरुचरित्रात ह्यासाठी २ अध्याय आहेत . ६० वर्षांच्या बाईला जिची मासिक पाळी थांबली आहे आणि जिचा पती ८० वर्षांचा आहे तिला १ मुलगी आणि १ मुलगा श्री गुरूंच्या कृपेने कसा प्राप्त झाला ह्याबद्दलचे ते २ भक्तीरसाने भरलेले अध्याय आहेत
सोता दत्तगुरु ब्रह्मचारी होते.
गुरुचरित्र मुलीनी वाचु नये अस म्हण्तात. फक्त पुरुषानी वाचावे.
पण हे असले उपाय असु शकतात कां ???
फक्त गुरुचरित्राच्या जाणकारांसाठी मी हा प्रश्न केला आहे . कोणीही सोम्या गोमयाने स्वताची चुकीची मते प्रदर्शित करू नये . ज्याने आयुष्यात १ दा तरी गुरुचरित्र वाचलेलं आहे तो चुकून सुधा असं काही लिहिणार नाही कि बोलणार नाही

मोहिनी परत एकदा सान्गते/ लिहीते की स्त्रीयानी श्री गुरुचरित्र वाचु नये. कदाचीत बाकी जाणकार तज्ञ तुम्हाला सान्गतीलच. पण दत्तगुरु हे ब्रम्हचारी होते/ आहेत. आणी स्त्रीयान्च्या अनेक अडचणीन्मुळे ते वाचु नये असे सन्केत आहेत. तरीही तुम्ही त्याचाच आग्रह का करीत आहात हे समजले नाही, कृपया गैरसमज नसावा.

पुराणात गार्गी मैत्रेयी सुद्धा पौरोहित्य करीत होत्या, आजही करतात. पण गुरु चरित्रा बाबत मला आजवर हेच ऐकायला मिळाले की स्त्रीयानी ते वाचु नये. मला नाही वाटत की कुठली पुरुष प्रधान वादी मन्डळी मुद्दाम स्त्रीयाना आडकाठी करीत आहेत.

तरीही तुम्हाला शन्का असल्यास पुण्यात अथवा मुम्बईत एखाद्या ज्योतिश्य्याला पत्रिका दाखवुन उपासना विचारा. मुम्बईत धोन्डोपन्त आपटे ( जाम सडेतोड आहेत हो ते) आणी पुण्यात विजय केळकर हे चान्गले ज्योतिष्यी आहेत. निर्णय तुमचा.

थोडं अवांतर -
काहीही होत नाही बायकांनी गुरुचरित्र वाचल्याने. मी गेले वर्षभर माझ्या कामानिमित्त अखंड, अधूनमधून असं वाचलंय. काय ढिम्म झालं नाही मला. मी, माझं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य, तब्बेत वगैरे सगळं समाधानकारकच चाललंय. या वाचनाने ना चांगला ना वाईट - काही फरक पडला नाही अथवा मनात भक्तीही उत्पन्न झाली नाहीये.
मी नेटवर, घरच्या पूजेतील पोथी आणि नुसतंच घरी इतर गोष्टीच्या पुस्तकांमधे ठेवलेलं पुस्तक अशा तीन्ही स्वरूपात वाचलं आहे.

बाकी चालूद्यात. विवाहेच्छू मुलीला शुभेच्छा Happy

काहीही वाईट होत नाही स्त्रीयांनी गुरूचरित्र वाचल्यामुळे .
कोणत्याही देवाचं नाव स्त्रीयांना / पुरूषांना घ्यायला देवानं मज्जाव केलेला नाही; इच्छा असेल तर निर्धास्तपणे वाचा.

वर दिलेल्या ग्रंथांच्या यादींत अजून एक भर घालते - सुंदरकांड.

>>काहीही होत नाही बायकांनी गुरुचरित्र वाचल्याने.<<
मला कुणीतरी सांगितल की त्यात चावट चावट लिहिलय म्हणुन बायकांनी ते वाचू नये असा दंडक घातलाय. मी अजून वाचल नाही.

@इब्लिस : मोहीनी आज्जींनी जोरदार तलवार चालवली आहे तुमच्या वर. नॉर्मली असे धागेकर्ते असले धागे काढुन मजा बघत बसतात पण मोहीनी आज्जी तडफेने मैदानात उतरल्या आहेत

बेफींची अनुपस्थिती जाणवतिय ह्या धाग्यावर.

@ मोहीनीआज्जी, मुलगी तुमची आहे का? ( घरातली आहे असे लिहीले आहे म्हणुन हा प्रश्न ).
मुलीचे लग्नाचे वय होउन गेले आहे का? उगाच कशाला टेंशन घेताय, जेंव्हा होयचे तेंव्हा होइलच.
आणि लग्न नाही झाले तरी काही अडत नाही. झाले तर जास्त अडते.

असे ऐकिवात आहे कि विवाहकामनास्त्रोत्र आहे गरुडपुराणात... परंतु त्याची पथ्यं फार आहेत. जाणकार उजेड टाकतीलच.

@इब्लिस . तुमच्या बुद्धीची लायकी कळली . प्रश्न काय आहे हे नित वाचलेला दिसत नहिये. आणि तुमच्यासारख्या लोकांच्या सल्ल्याची गरज हि नाहीये .
<<
सल्ले विचारायला चव्हाट्यावर उभं राहिलं, की बेगर्स आर नॉट चूजर्स. सगळेच लोक सल्ले देणार. अन देणारच. बाकी कुणाच्या बुद्धीची लायकी किती, वगैरे तुमच्या 'धार्मिक' उपायांवरून समजतेच आहे.
तेव्हा पुन्हा एकदा, तुम्ही चूजर नस्ल्याने,
आम्ही सल्ले तर देणारच ब्वा! भले कुपात्री असोत. Wink

बाकी हे भयंकर आवडले -->
>>
गुरुचरित्रात ह्यासाठी २ अध्याय आहेत . ६० वर्षांच्या बाईला जिची मासिक पाळी थांबली आहे आणि जिचा पती ८० वर्षांचा आहे तिला १ मुलगी आणि १ मुलगा श्री गुरूंच्या कृपेने कसा प्राप्त झाला ह्याबद्दलचे ते २ भक्तीरसाने भरलेले अध्याय आहेत
<<
केवळ सुंदर!

नरसोबावाडीला गुरुचरित्र मिळते.. महिलानी ते वाचावे की नाही याबाबत त्यत सविस्तर दिलेले आहे. सल्ले विचारण्यापेक्षा.खुद्द ग्रंथातच जे दिले आहे त्याचे पालन करावे.

बहुदा स्त्रीयाणा मज्जाव नसावा. एक कुठला तरी अध्याय वाचु नये asaa बहुदा संकेत. आहे. हे गु च बाबत आहे की शिव लीलाबाबत आहे , हे.कन्फर्म करावे

बहुदा स्त्रीयाणा मज्जाव नसावा. एक कुठला तरी अध्याय वाचु नये asaa बहुदा संकेत. आहे. हे गु च बाबत आहे की शिव लीलाबाबत आहे , हे.कन्फर्म करावे>> गुरुचरित्र च!
दि.न्डोरीप्रणीत स्वामी समर्थ केन्द्रात स्त्रीया सुद्धा गुरुचरित्र वाचनास बसलेल्या दिसायच्या...
शिवलीलाम्रुत चालते बायका.न्नी वाचलेले!
माझ्यामतेविवा।ह लवकर होण्यापेक्षा सुयोग्य जोडिदार मिळावा यासाठी प्रयत्न करा..बाकी उगाच दहा पुजा करायला लावुन मुलिला पिडु नका!

बाप्रे! प्राजक्ता!!
अहो काय बोलताहात हे?
तुमच्या बुद्धीची लायकी कळेल बरं त्यांना अशाने!! Lol

बरं, १५व्या शतकाआधी (गु.च चा लेखनकाळ) जर लग्न होत नसेल तर कुठले उपाय केले जात? असा एक किडा डोक्याला चावून गेला Proud

फेक

Pages