मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"श्री एन्टरप्राईज " हा देव टुर्स चा प्रॉस्पेक्ट आहे. ह्रिशिकेश मोहिले त्यान्चा एच आर हेड आहे .
गट्टु आणि आदू , तिथे मीटिन्ग साठी जातात तेन्व्हा त्याच्याशीच बोलतात . आणि मुख्य म्हणजे तो आदू आणि जय चा कॉलेजमधला मित्र आहे . आदूला बघून तो , आणि त्याला बघून ती खूश होते तेन्व्हा गट्टू वैतागतो .
त्यात तो तिला विचारतो " तुझा नवरोबा कुठे आहे. मध्यंतरी फोन केले तर उचलला पण नाही . फार बिझी झाला आहे का ?? " ते ऐकुन गट्टू आणखी वैतागतो . कारण तो आदूच्या खाजगी आयुश्याबद्दल विचारपूस करतो . .. हुश्श्श

थान्कु सगळे!

"श्री एन्टरप्राईज " हा देव टुर्स चा प्रॉस्पेक्ट आहे. ह्रिशिकेश मोहिले त्यान्चा एच आर हेड आहे .
गट्टु आणि आदू , तिथे मीटिन्ग साठी जातात तेन्व्हा त्याच्याशीच बोलतात . आणि मुख्य म्हणजे तो आदू आणि जय चा कॉलेजमधला मित्र आहे . आदूला बघून तो , आणि त्याला बघून ती खूश होते तेन्व्हा गट्टू वैतागतो .
त्यात तो तिला विचारतो " तुझा नवरोबा कुठे आहे. मध्यंतरी फोन केले तर उचलला पण नाही . फार बिझी झाला आहे का ?? " ते ऐकुन गट्टू आणखी वैतागतो . कारण तो आदूच्या खाजगी आयुश्याबद्दल विचारपूस करतो . .. हुश्श्श>>>> अच्छा असे आहे तर!

क्लिओपात्रा म्हणजे का? ती अशा स्मायली टाकायची स्मित>>> म्ह्न्जे काय?? नाय कळ्ले अओ

जय आणि आदू म्हणजे माठ , रांजण , सिमेन्टची टाकी आहेत.

ती शोभाडी , चिनुच्या क्लासची फी भरली नाही म्हणून त्याला क्लासमधून काढून टाकलं म्हनून सांगते .
तर जय लगेच ७ हजार रू. द्यायला तयार होतो Sad .
मग ती पुस्तके , बस फी , उनिफोर्म सगळ्यासाठी पैसे मागते , तर हा हो म्हणतो .

काल मला शोभडीला रट्टावुन काढावेसे वाटले.:राग:Whipping

अदिती डोक्यावर पडलीय. आणी तिची अवस्था अशी झालीय.Cat chasing tail

हाहा अदू ची निळी मांजर :हहगलो:....खरं तर अक्खी serial तशीच आहे... अजून फिरून फिरून तिकडेच आहे... जर centemeter भर पुढे सरकेल तर शपथ... माबो वरच्या गप्पा हाच काय ता खरा timepass हा SSSSSSSSSSSS

काय चाल्लय या मालिकेत. जरा थोडक्यात कथन करा बरं.>>>>>>> आउ जयला पिडतायत अदितीवरुन, म्हसोबा जयला रागवतोय अदितीवरुन, गट्टुला बाकी कोणीच पार्टनर भेटत नाही अदितीवाचुन, शोभडी वॉक वॉक करुन येते आणी काकु तिला सरबत पाजतात लिम्बाचे करुन, शोभडी, जयकडे निर्लज्जासारखे पैसे मागते एन जी ओ चे नाव करुन, काका वैतागलेत शोभडीवरुन. गट्टु वैतागलाय त्याच्या नवीन क्लायन्टला भेटुन जो पूर्वीचा कॉलेज मेट आहे अदितीचा.

वरचा म्हसोबा आवडला .

त्या आदूला माहितेय की आउंच्या मनात काय आहे . तरी गट्टू समोर पुढे पुढे करते .
जय अगोदरच आउंमुळे कावला आहे . ही त्याला सर कसे चांगले आहेत ते सांगून आणखी गॅसवर ठेवते .
आणि मग वर " जय , मला काळजी वाटते . जे आउंच्या मनात आहे तसं सरांच्या मनात असेल तर " , पोचलाच तो जय वेन्टीलेटर वर .
आणि तो म्हणतो ही , " तसं काही असतं तर तुला कळल असतं ना , म्हणजे अशा गोष्ती बायकाना लगेच कळतात म्हणून म्हटलं " तर शुम्भासारखी मान डोलावते .

Pages