मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलमानला आलोकनाथजी जसे सांगतात (मैने प्यार किया) खुदकी कमाई लावं का काय ते. तो पण बाणेदारपणे उत्तर देऊन पैसे मिळवतो. ३ तासात किती छान बनविला मुव्ही. इथे वर्षाहुन अधिक काळ मिळाला तरी कथा रंगली नाही.

धन्यवाद मुली-मुलानो हसल्याबद्दल.:फिदी:

कालचा एपिसोड पण भारी होता. रजनी जाम वैतागली होती. पण गम्मत ही आहे की जय आणी अदिती कधीच एकमेकान्शी मोकळेपणाने बोलताना दिसत नाहीत. काल पण जयचे तळ्या-मळ्यात चालले होते. मालिका आता सम्पायला आल्यावर रन्गत आलीय. रजनी आणी शोभडीला बेस्ट व्हिलनचा पुर्स्कार विभागुन दिला पाहीजे.

काहे दिया परदेस ची हिरॉईन कुणालाही निवेदिता जोशी सारखी वाटली नाही?
मला चेहरेपट्टी आणि आवाज दोन्ही तिच्यासारखी वाटली. नक्की माहित नाही त्यांचीच मुलगी आहे का ते.
खरं नाव काय आहे तिचं? Uhoh

निवेदीता जोशीला मुलगी ना.....य !
पण गम्मत ही आहे की जय आणी अदिती कधीच एकमेकान्शी मोकळेपणाने बोलताना दिसत नाहीत. >>> ते दोघ मला कधीच नवरा-बायको वाटत नाही . प्रेमात पडलेले शेजारी वाटतात . कधी रोमान्स नाही , क्धी रुसवे-फुगवे नाहीत , कधी भाण्डण नाही , कधी मनमोकळ्या गप्पा नाहीत ... एकंदरीतच बोअर लोक वाटतात .

सुयश आणि सुरुचीचं नाटक येतंय 'स्ट्रॉबेरी', आत्ताच जय महाराष्ट्र चॅनेलवर मुलाखत होती सुयशची छोटीशी, तो म्हणाला वाटलं नव्हतं ही मालिका इतक्यात संपेल असं.

का रे दुरावा हे टायटल आदू-जयच्या दुराव्याबद्दल नाहीच आहे. 'का रे दुरावा?' असं त्या जयला रजनी आणि जुई म्हणत असणार त्याप्रीत्यर्थ हे टायटल Proud झालंच तर नंदिनी अरविन ला म्हणत असेल Lol

रजनी आणि जुईबद्दल सहानुभूती वाटायला लागली आहे. काल चुकून पाहिला एपिसोड. त्या जयला राग येण्याचं कारण नव्हतं. लग्न झालेलं नाही अशी समजूत करून दिल्याने रजनीला तसं काही वाटलं तर त्याला राग नको यायला. त्याला तसा अधिकार आहे का ? उद्या जेव्हां तिला समजेल की ती एका विवाहीत पुरूषावर प्रेम करत होती त्तेव्हां तिला काय वाटेल ? लेखक तो एपिसोड गुंडाळणार यात शंका नाही.

कापोचे, पण याआधी पण जयने रजनीला एकदा सांगितलेल आहे की त्याच्या मनात तिच्या बद्दल मैत्री शिवाय इतर कुठल्याही फिलींग्ज नाहीयेत.

मला वाटत जयच्या रागाच कारण अनेकदा ती त्याच्यावर हक्क सांगायला जाते हे असाव.

काल , रजनी जय ला सांगते ' माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर आनि त्याला मी काहीच करू शकत नाही . '
आणि दारात साईप्रसाद उभा असतो . एक्दम कानकोंडा होउन .

जयच्या रागाच कारण अनेकदा ती त्याच्यावर हक्क सांगायला जाते हे असाव>> हो, म्हणूनच तो चिडतो. एकदाच नाही कितीतरी वेळा त्याने स्पष्टपणे सांगितलंय की तिला. पण रजनी इतकी लोचट आहे की परत परत त्याला चिकटायला जाते. Angry

साईप्रसादला वेड लागलय का रजनीच्या प्रेमात पडायला? ऑफीसमध्ये होतो तेवढा अपमान पुरेसा आहे प्रेमात पडला तर दिवसरात्र अपमान सहन करत बसाव लागेल. अर्थात तो ही काही कमी नाही म्हणा.

अवांतरः
एकमेकांचा सतत अपमान करणारे, टोमणे मारणारे, एकमेकांशी कधीही हसुन मस्करी करुन न बोलणारे, तुसड्यासारखं वागणारे, आय डोन्ट केअर अबाउट यु असं दाखवणारे सुद्धा त्या व्यक्तीच्या प्रेमात असु शकतात बरं Happy (असं एक फ्रेंड कपल आहे)

हे रिअल लाइफ उदाहरण झाल सस्मित, रील लाईफमध्ये प्रेमात पडण्यासाठी त्या कपल वर उल्लेखलेल्या गोष्टी करण बंधनकारक असत तरच शिरेलीतल्या आणि आपल्यासारख्यांना कळणार ना की ब्वा हे दोघे प्रेमात आहेत.

मालिका संपणार म्हणून कालपासुन परत बघायला सुरवात केली Wink सर्व गोष्टी पुर्वी सारख्याच चालू आहेत हे बघुन बरे वाटले Proud सगळ्यांचा भोचकपणा, कदमांनी उगाचच झापणे त्यावर जयने स्पष्ट न बोलणे इत्यादी.

Pages