मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सध्या ही महान(??) सिरियल पहायलाच मिळत नाही. टकल्या येतो ना त्या वेळेत. त्यामुळे.>>>> टकल्या कोण? एक टकल्या तर ८.३० येतो.

तो साईप्रसाद आल्यापासुन सिरीयलमध्ये जान आली आहे, खरा रन्ग आत्ता भरायला लागलाय. तो रजनीला जाम खोचक उत्तर देत असतो. कालचा एपिसोड धमाल होता. काश मेरा स्वभाव भी साई जैसा होता.:फिदी:

जय नेहेमीप्रमाणे म्हसोबा, आउ आणी गट्टु समोर प्रेझेन्टेशन देतो. म्म्हसोबा त्यात चूक काढतोच. त्या आधी रजनी अदितीला टोमणा मारते, ती काय बोलते ते मात्र मी नाही ऐकले. त्यावर नन्दिनी रजनीला बोलते. मग रजनी म्हणते की आजकाल सगळे अदितीची/ कोणा न कोणाची वकिली करत असतात. त्यावर साई म्हणतो की हो पण ते सत्याच्या बाजूने बोलतायत.

अरे ही टूर कंपनी आहे ना...मग त्यात सारखी प्रेझेंटेशन्स कशी येतात IT किंवा तत्सम multinational कंपनीज सारखी ?

टूर कंपनी असून कधी यांच्याकडे ट्रेनच्या, विमानाच्या तिकीटांसाठी, व्हिसासाठी पळापळ नाही, कधी कुठला अपघात नाही की काही नाही अगदी एखाद्या गृपचं अचानक कँसलेशनही नाही! यापेक्षा जास्त घडामोडी चिपळूण बसडेपोत होत असतील.

..आपले १००/२०० लोक टूरला पाठवण्यासाठी दाभोळकर नामक मनुष्य महिनोंमहिने टूर कंपनीच्या कार्यालयात बसतो.
.. त्याला आपल्या कर्मचार्‍याना टूरवर पाठवण्याची इतकी आवड की तो १०० वेळा Presentations बघतो.
.. कित्येक तरूण पोरं परदेशातल्या हॉटेलचे डील स्वस्तात देत असतात.
.. Presentation बघून लोक टूर ठरवतात...
.. Honeymoon साठी Booking वगैरे करणार्‍या Travel Agency मधे Reception, Open Counter वगैरे नसतात.
... Tour/Travel Poster नसतात.
... फक्त Background ला मुरली वाजणार्‍या एक आऊ, आणि सतत सगळे Presentation करत असतात.
... नवरे नामक व्यक्ती 'कामं करा...,कामं करा...' असं सांगण्यासाठीच कार्यालयात असतो...

ती आऊ सारखं ''we are family..we are family'' काय बरळत असते.? एक्दा ऐकायला ठीक होतं.. आता सारखं तेच..

कालचे हवा येऊ द्या कोणी पाहीले का?:फिदी: काल कारेदुची ७० टक्के टिम आली होती. तुफान झाला कार्यक्रम. हसून वाट लागली आणी या सिरीयलची पण वाट लावली. आज पण आहे ही टिम.

यस्स रश्मी... जाम धम्माल.... टोटल वाट लागली हसून.

आदिती मिश्या लावून येते तिथे तर मी खुर्चीवरुन पडले. Rofl

टूर कंपनी असून कधी यांच्याकडे ट्रेनच्या, विमानाच्या तिकीटांसाठी, व्हिसासाठी पळापळ नाही, कधी कुठला अपघात नाही की काही नाही अगदी एखाद्या गृपचं अचानक कँसलेशनही नाही! यापेक्षा जास्त घडामोडी चिपळूण बसडेपोत होत असतील.>>>>>>>>>>>>>मस्त .... Happy

ते सगळ जाउदे, कालपर्यंत एकही प्रेझेंटेशन यशस्वी करु न शकलेला जय दाभोळकरांनी प्रेझेंटेशन अप्रुव्ह केल्यानंतर एकामागोमाग एक सगळीच प्रेझेंटेशन्स यशस्वी कशी काय करु लागतो? आणि इतकाच जर हुशार "दाभोळकर दी सेकंड" आहे तर बिझनेसमध्ये कुठे माती खाल्लीय आणि याआधी हीच हुशारी कुठे गहाण टाकली होती?

एक सांगा , सगळे उघड उघड त्या जय ला "दाभोळकर दी सेकंड" म्हणतात , तर त्याला राग कसा येत नाहि ?
म्हणजे माझी अशी कोणाशी तुलना केली असती तर नक्कीच चिड्चिड झाली असती .
"दाभोळकर दी सेकंड" ही काय फार अभिमानाची गोष्त आहे अस मला वाटत नाही .
विशेशतः जेव्हा सगळ्याना माहित आहे के ते कसे आहेत तेन्व्हा .

"दाभोळकर दी सेकंड" >> हे काय आहे.
हल्ली सौभाग्यवतीने याच्या रिपीट टायमिंगवर कब्जा केल्याने ही शिरेल पाहता येत नाही.

दाभोळकर दी सेकंड म्हणजे जय हा दुसरा दाभोळकर असं म्हणायचं असेल त्यांना बहुतेक Uhoh
वाक्यरचना ठार गंडली आहे तसं असेल तर.

दाभोळकर दी सेकंड म्हणजे जय हा दुसरा दाभोळकर असं म्हणायचं असेल त्यांना बहुतेक >>> हो .
म्हणजे जय ही दाभो. सारखा कर्त्रुत्ववान आणि यशस्वी बनणार . तो त्यान्च्यासरखाच धोरणी वागतो आहे , असे सगळाना वाटते . म्हणून सगळे त्याचे कौतुक करत असतात . अगदी आउसुदधा याच शब्दात .

आशू-डी - चिपळूण बसस्टँड Biggrin अगदी !!

आपण एक कुटुंब आहोत...
जय कित्ती काम करत असतो आजकाल...
आदितीमॅडमनी काम करून सरांचा विश्वास संपादन केला आहे...
नंदिनीमॅडम टूरवर गेल्या आहेत...

हे सगळं विविध प्रसंगांतून प्रेक्षकांना आपोआप समजायला हवं Uhoh
पण मी मागे म्हटलं तसं - त्यासाठी लेखकाला बराच रिसर्च करावा लागेल, ते कोण करणार! Angry

तद्दन फालतू, पाट्या-टाकू मालिका
घरचे सगळे भक्तीभावाने बघतात (आणि आपल्याला दररोज ऐकावी लागते) म्हणून आणखीनच चिडचिड होते Angry

घरचे सगळे भक्तीभावाने बघतात (आणि आपल्याला दररोज ऐकावी लागते) म्हणून आणखीनच चिडचिड होते.. अगदी अगदी.!
आमच्या कडे ही सा. बु., सा. बा. बघतात. त्यामुळे माझी पण चिडचिड होते. काही च्या काही मालिका आहे. वन लाईन स्टोरी अजून किती वर्षे ताणणार आहेत ते निर्माते च जाणे.!
मालिका तर महान त्यातले कलाकार अजून महान!

रच्याकने, आदिती वर वडिल रागावले आहेत पण ते तर नेहमीच तिच्या समोर असतात. पण तिला कधीही आईची आठवण येत नाही. आईशी फोनवर बोलताना ही दाखवत नाही कधी. भेटणं तर दूरच.! की फक्त आॅफिस ची स्टोरी दाखवायची म्हणून दुसरे काही नातेसंबंध दाखवायचे नाही? नवरा बायको, आईी मुलगी... इ. इ.

जयला अचानकपणे केबिन मधे का बसवलयं ? प्रेझेंटेशन्स बनवताना आजूबाजूच्या ललनांचा त्रास नको म्हणून Wink

Pages