चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज ४५ मिनिटं व्यायाम केला.
ब्रेकफास्टला एक कोबी पराठा. नंतर गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून.
एक तासाने छोटा डबा भर पपई.
जेवायला २ फुलके, ताक, सॅलड आणि अख्ख्या मसुराची उसळ
दुपारी चहा अर्धा कप आणि ४ बिस्किटं.
आत्ता पेरू खाल्ला, मग पुन्हा गरम पाणी (लिंबू पिळून) घेणार.
रात्री जेवणार सॅलड आणि वाफवलेल्या भाज्या ( नो तेल)

अवांतर खाणं - कराची बेकरीचं एक बिस्किट.

१) काल सकाळी १५ मिनिटे योगासने,५ मिनिटे प्राणायाम,ब्रे.फा.ला मुगाचे २ पातळ पोळे
दुपारी २ फुलके व भाजी(नेहेमीचा तोच आहार असतो),
संध्याकाळी १ समोसा,१ टोस्ट व चहा ,२० मिनिटे घरात फिरणे,रात्री १ पोळी(मोठ्या पुरीएवढी) ,भाजी, एक वाटीच्या मुदीएवढा भात. दिवसभरात ६ वेळा अर्धा कप चहा(विदाऊट साखर ५ वेळा व १/२ चमचा साखर ६व्यावेळी).चहा अजिबात सोडू शकत नाही..
२) आजपण समोसा सोडून तसेच.मु.पोळेऐवजी १ थालिपीठ.
संध्याकाळचे फिरणे आता करणार आहेच.

नंदिनी ,
उद्यापासून जोमाने करा . Happy

सीमांतिनी ,
सकाळचा नाश्ता जास्त करत जा अन प्रोटीन इन टेक वाढवा म्हणजे रात्री भूक भूक होणार नाही .
झालीच तर एखाद फळ किंवा थोडे चुरमुरे खा .

देवकी सामोश्यात सगळ्यात जास्ती कॅलरीज असतात हे माहित आहे का तुला?>>>> हो ग! सगळ्यांबरोबर खाल्ला तेही भूक नसताना.प्रायश्चित्त घेतले ना २० मिनिटे फिरून.

नमस्कार लोकहो ,

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. अति प्रमाणात तळलेले गोड (गुलाबजामून , जिलेबी इ) अन पिझ्झा ,बर्गर वगैरे टाळणे.

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन २रा क्रमांक पाळला तर १ पैकी १ गुण

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन २रा क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/५ गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १४/१५ किंवा ५/१० असे लिहा . मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

टीप : व्यायामाला ४ गुण आहेत कारण डाएट्च्या इतर गोष्टी अजून अ‍ॅड व्हायच्या आहेत .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

उदा : मी काल अन आज व्यायाम केला , पण आज घरी जाताना झिंगर बर्गर अन चिकन पीस झाला , त्यामुळे माझे ९/१० .

इथे लिहायला मी एकदम अन्फिट व्यक्ती आहे. पण लिहायची लैच खुमखुमी आलिय म्हणुन लिहतोय.
लहान पासुन अगदी कॉलेजपर्यंत 'घरात काय खायला देत नाहीत का?' हे वाक्य किती हजार वेळा ऐकलय याला माप नाही. लग्नाच्या वेळी वजन साधारपणे ५४-५५ किलो होतं. ते तब्बल ६ वर्षे कॉन्सटंट होतं. पुढे ते ५७ किलो झाले आणि ४.५ ५ वर्षे अहे तेवढेच राहिलं. पण गंम्मत झाली ती मागच्या वर्षी. नोव्हेंबर मध्ये ५७ किलो असलेलं वजन डीसेंबर एन्ड ला ६४ किलो झाले आणि पोट सुटल्याचा फील आला (फक्त २ महिण्यात). पहिल्यांदाच मला मी आता ढोबळा होणार याची भिती वाटु लागली.

त्याला कारण असे झाले होते कि नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये मी दोन्ही वेळा हॉटेल मध्ये जेवायचो. मेन्यु जवळपास फिक्स होता. २ रोटी + एक पनीर बुर्जी / दुसरी पनीरची भाजी /चिकन + १ खिचडी संध्याकाळी आणि ४ चपात्या + एक अंडा बुर्जी / अंडा मसाला दुपारी + सकाळचा नाष्टा.

जानेवारी पासुन हॉटेल मध्ये जेवण बंद केले. भाजी / भाकरी / वरण / भात असा आहार सुरु केला. ६४ किलो ३ महिने तसेच राहिलं.

आता कामाची गोष्टः
मग महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक लेख वाचला. दोन वेळा जेवाय्चा. आणि ते ३-४ महिने फॉलो केलं. आणि चहा कॉफीत साखर बंद केली. सकाळी ९ वाजता पुर्ण पोटभर जेवतो. आता वजन परत ६० किलो झालय.
दुर्दैवाने व्यायाम करने हा आयटम माझ्याकडुन कधीच झाला नाही. त्याबद्दल अतिशय खेद आहे. तो कधी ना कधी सुरु करावाच लागणार आहे.

पण मी केलेले एक महत्वाचे निरीक्षण म्हणजे, प्रत्येकाच शरीर हे एक वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन आहे. त्याचे अव्हरेज वेगवेगले आहे (कुणी ४-५ चपात्या + भात खाउन वजन आहे तेवढेच रहाते आणि कुणी १ चपाती खाउन वजन वाढतच जाते) . एकच नियम सगळ्यांना लागु होइल असे नाही. प्रत्येकाचा मेटॅबोलिझम रेट वेग्वेगला आहे. त्याला दुसरे वैद्यकिय कारण जबाबदार नाहीना हे पाहुनच पुढची पावले उचलावीत.

आता परत दोन वेळ जेवायचा कन्सेप्ट बदलुन ३ वेळा जेवायचा कन्सेप्ट सुरु करणार आहे. आणि लवकरच व्यायाम पण सुरु करेन. हर्पेन यांच्याबरोबर चर्चा करुन पळायचे शुज आणलेत जाने. मध्ये. पण अजुन एकदाही घातले नाहीत. (अजुन आणलेल्या पिशवित आहेत Sad )

मला पण आपले म्हणा. वजन ६३ किलो ऊंची ५-२, ६ किलो वजन कमी करायचे आहे. माझे सद्ध्याचे रुटीन, रोज व्यायाम १ तास, ह्यात ३० मिनीटे पळण / एलेप्टीकल़, ५० सिट अप्स, थोडे मशिन्स आणी स्त्रेचेस. ब्रेफा १ अंड, १ बाउल ओट्स / व्हिटाबिक्स - दुध. नेहमीचे जेवण २ वेळा, तेलकट/ बिस्कीट नाही. पण मला तुप खुप आवडते. काय करु? आत्ता करत आहे ते पुरेसे आहे का?

मी पण येणारे ग्रुपमध्ये. व्यायाम अजिबात होत नाहीये व इच्छाही होत नाहीये. ५ किलो मॅक्सिमम कमी करायचेत, पण..

baske, tu adhi 20 kg vajan vadhav ani mag ye ithe..ithe sagale rathi maharathi ahet Happy

व्यायाम तर तुमचा चांगला होतोय. तरीही वजन कमी होत नाहीये म्हणजे फूड इन्टेक वॉच करायला हवं. दिवसभराच काय खाल्ल ते डिटेल मधे लिहीले तर एक्स्पर्ट्स त्यावर कॉमेंट करु शकतील.

सकाळी शेंगदाणे भाजले ....पण एकही दाणा तोंडात टाकला नाही.......संयम संयम म्हणतात तो हाच...
या धाग्याचा धाक नसता तर मूठ्भर तरी बकाणा भरला असता.....:डोमा:

मी पण.
सध्याचं वेट ६४. बी एम आय. २८.८
टारगेट वजन ५६. बी एम आय २५
आज शनिवार असूनही ३किमी चालले.
सकाळी २ ग्लास पाणी प्यायले.
आता मोड आलेले का वा खाणार आहे.
मागचा एक आठवडा हेच शेड्यूल होते - आलटून पालटून कडधान्ये.
मात्रं वॉक हिली एरियातून होता.
आज फक्तं सपाट रस्त्यावर.

आता दुपारी एक चपाती , पाववाटी भात , उकडलेली डाळ आणि दोड्क्याची भाजी.
रात्री दलिया उपमा.

फळं खाऊन मला अतिशय अ‍ॅसिडिटि होते.
त्यामुळे फ्रूट आणि फ्रूट ज्यूस बाद.
कोणत्याही भाज्या (शेपू सोडून) खाऊ शकते.
तळलेलं , गोड अज्जिबात खात नाही.

सगळ्यात महत्त्वाचं सोडिअम कंट्रोल असतं ते माझ्याच्याने अज्जिबात होत नाही.
लोणचं पापड चटणी यांपैकी एक काही असल्याशिवाय घास उतरत नाहि.
आता सैंधव आणणार आहे.
ते घालून चटणी करून खाणार.

माझे कालचे ५/५
आजचे उद्याच लिहिता येतील.

मी आता आठवड्यातून तीन दिवस १ तास पळतो, दोन दिवस सायकल किंवा चालणे (पुन्हा १ तास). मी तळलेले खात नाही, दारु जवळपास बंद (म्हणजे आठवड्यातून एकदादेखील बीअरपण नाही), जेवण दोन वेळा + १ ब्रेकफास्ट. सकाळी चहा, संध्याकाळी कॉफी. वजनात तसूभरही फरक नाही Sad

काल १/२ तास ट्रेड मिल
रात्री १ प्लेट वरई + १ कप दुध

आज सकाळी
१ कप चहा+ २ मारी
१ प्लेट फोडणीचा भट + १ कप कॉफी

इथे लिहिताना कळले कि माझा प्रोटीन इन टेक किती कमी आहे
आता दुपारी वरण, , २ पोळी भाजी

मेल केल आहे मला पण घ्या ग्रुप मधे

मी ७/१०

५/५

आत्ताच वजन ५७
जायच आहे ४७
१० किलो कमी करणे ध्येय...
कालचे मार्क्स २/१० .. ५० उड्यांवर व्यायाम नाही झाला...

आज ऑफिस.. घरी गेल्यावर पुर्ण व्यायामाचा निर्धार...

Pages