चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Please excuse me in writing in English
as Its difficult and time consuming to write in Marathi, specially in office
I started my weight loss process in February,
Was weighing 71 KGs, My goal is to come to 55, which is good for my height.
My today weight is 62.3 KGs, so far lost 9 KGS in 5 months
Which I think is good progress isn't it?
Currently i am stuck at 62, from last 4 weeks weighing scale not moving down,
Does it happen that you get stuck at some point after you reduce weight
Please suggest something, how do I trigger this again

दक्षिणा, बीट, शेंगदाणे, पनीर पूर्ण बंद का करायचं?
शेंगदाणे, पनीर हे तर प्रोटिनचे स्रोत आहेत. म्हणून रोज खा असम नाही पण पूर्णपणे बंद करूनही चालणार नाही ना?

http://www.lovebeetroot.co.uk/healthy_info/beetroot-benefits.asp#.U9ow7_... - ह्याच बीटाबद्दल बोलतो आहोत ना? इथे ह्या लिंकवर तर बीटाचे चांगले परिणाम दिलेत. ब्लड प्रेशर, कोएस्टेरॉल वगैरे कमी करायला, ब्लड शुगर स्टॅबिलाइज करायला वगैरे उत्तम आहे असे दिलेय.

ऑस्टिओपोरॉसिस, अ‍ॅनिमिआ वगैरेसाठी पण चांगले असे दिले आहे.

शेंगदाणे , काजू , बदाम शक्य तितके कमी करायचे . प्रोटीन्स हवे असतील तर डाळी , उसळी , सोयाबीन (मांसाहारीना चिकन उकडलेले , अंड्यातला पांढरा भाग ) घ्या .

माझ्या दुसर्या धाग्यावरून ,

Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क , उसळी )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे

वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो

या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .

या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने स्मित) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .

मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील स्मित
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना स्मित )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका स्मित
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .

पण मित्रानो ,
पहिल्याच दिवशी फार डीप नको Happy
आपल्याला काही गडबड नाहीये .
पहिले ३-४ दिवस हेडरमधील २ गोष्टी सर्वानी करू अन नंतर वाढवत जाऊ .

वजन कमी नाही करायचय पण नियमित व्यायाम सुरु करायचाय.
काल हॉटेलमधून आणलेली भाजी उरलेली ती, आणि फ्रीज मध्ये पोळ्या होत्या त्या गरम करून डब्यात आणल्यात. आज ते खाण्याशिवाय पर्याय नाही. लॉंग विकांताला टोरोंटोला जायचा प्लान आहे, तिकडे खाणे या एकाच हेतूने जातो. जास्तीतजास्त हेल्दी (पण) खायचा प्रयत्न करतो, अर्धा तास पळतो तरी. म्हणेज हा बाफ मी अजून वाचलाच नाहीये, मंगळवारी वाचणारे हे मनाला बजावायला नाही लागणार. Sad

व्यायाम करायचाय व्यायाम करायचाय... घरी जाईपर्यंत सेल्फ इंस्ट्र्क्ट करेन... उद्या अप्डेट्स टाकते लोक्स... सुरूवात करतेच आज!! Happy आल द बेस्ट टू मी Happy

केदार, तुम्ही बदाम खाऊ नये असे लिहिले आहेत. पण मला डाएटिशियनने बदाम खाऊन एच्.डी.एल. म्हणजे चांगले कॉलेस्टेरॉल वाढते असं सांगितलंय. बदाम व अक्रोड हे दोन्ही खाऊ शकतात, असे वाटते.

बदाम सकाळी खायचे आणि फक्त दोन खायचे.
बकाणा भरला की संपलं फिदीफिदी >> +१००

केदार, तुम्ही बदाम खाऊ नये असे लिहिले आहेत. पण मला डाएटिशियनने बदाम खाऊन एच्.डी.एल. म्हणजे चांगले कॉलेस्टेरॉल वाढते असं सांगितलंय. बदाम व अक्रोड हे दोन्ही खाऊ शकतात, असे वाटते. >> मी शक्य तितक कमी खा अस लिहिल होत . सकाळी २-३ बदाम पाण्यात भिजवून एकदम मस्त . पण शेंगदाणे , काजू (बेसिकली नट्स) मात्र फारच कमी . एक तर त्या खूप खाल्या जातात अन प्रचंड कॅलरी कॅरी करतात

काजू तर अजिबातच नको.
शेंगदाणे शरिराला उपायकारक असतात पण आपण ४-५ खाऊन गप्प बसत नाही म्हणून निदान वजन कमी करताना तरी शेंगदाणे भात वगैरे वातूळ पदार्थ टाळले पाहिजेत.

भ्रमर, मला नेमकं काय म्हणायचंय ते समजुन घेतल्याबद्दल थँक्स Happy

मला टेंन्शन आलेलं आता वाद वाढतात की काय म्हणून Happy

उद्या पासुन व्यायामाला सुरुवात.
आत्ता मिसळ खायची खुप इच्छा होतेय, भुक लागलीये मग काय खाऊ आता मी?
इथे आल्याने मिसळ खायची हिंम्मत होत नाहीये Uhoh

मोनॅको बिस्किट्स आणि चहा चालेल ना थोडासा?

आपापल्या मोबाईल ची रिंगटोन स्वतःच्या आवाजात खालील शब्द रेकॉर्ड करा....

व्यायाम कर व्यायाम फोन उचलत व्यायम कर व्यायाम सकाळ संध्याकाळ व्यायाम कर व्यायाम........

म्हणजे सगळे तुम्हाला आठवन करुन देतील Happy

स्वतःच्या आवाजात खालील शब्द रेकॉर्ड करा.... >> लग्न झालेल्ल्यानी जोडीदाराच्या आवाजात करा रेकॉर्डिन्ग.
जास्त परिणामकारक असेल. Wink

मी हलक्या पावलानी आलोय बरे ग्रुपच वजन धाडदिशी वाढु नये म्हणुन.

मी ही कळतय पण वळत नाही ग्रुपचा मेम्बर..

रीया ,
रोजची सवय असेल तर चहा अन चार बिस्किट खा . पहिल्याच दिवशी अगदी स्ट्रीक्ट व्हायची गरज नाहेये Happy

इथे प्रत्येकाने लिहिलंय की मला अमूक अमूक इतकं वजन कमी करायचं आहे. माझ्या मते
प्रत्येक (सिरियस्ली) वजन कमी करू ईच्छिणार्‍याने इथे आपलं करंट वजन आणि टारगेटेड वजन लिहावं. वजन कमी करण्यासाठी काय व्यायाम आणि इतर उपाययोजना करतोय ते डेली लिहू शकतो. दर आठवडा किंवा दोन आठवड्याला अपडेट लिहायचा. आणि प्रगती लिहायची,

वजन जास्त असण्याची लाज वाटल्याशिवाय वजन कमी होत नाही. (स्वानुभव्व)

मी माझं वजन लिहायला तयार आहे.

http://www.oddcast.com/home/demos/tts/tts_example.php

इथे रिंगटोन बनवा....

Enter Text: च्या जागी ...... मराठी टायपिंग करुन हवे ते लिहा... आणि Language: मधे हिंदी सिलेक्ट करा...

मराठी बोलेल..... हा आवाज रेकॉर्ड करा ...... Happy

बिस्किटात सुद्धा फक्त दोनच बिस्किटं रेकमेन्डेड आहेत वजन कमी करायचं असेल तर. ओन्ली ब्रिटानिया मारी आणि मोनॅको.

बाकी गुड डे, पार्ले वगैरे वजनं वाढवतात फक्त.

Pages