चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे आजचे मार्क ३/५
चालले पण पावसामुळे जलद नाही, म्हणून २ मार्क्स कमी. दुपारी जेवल्यावर १० मिनिटे चालण्याचे ठरवले आहे, बघू.
नाश्ता - १ वाटी ओट्स
दुपारचे जेवण- भाजी (कमी व तेही सफोला तेलातली)व ३ लहान चपात्या
४ वाजता - लो फैट दुधाचे दही वापरुन केलेले ताक
एव्हढं प्लानिंग आहे, संध्याकाळी घरी गेल्यावर व रात्रीचे जेवण नंतर अपडेट करेन

दीप्स ,

तुमचे वजन हवे त्यापेक्षा कितिने जास्त आहे ? कारण तसा तुमचा आहार अन व्यायाम चांगला आहे.

वजन कमी होण्याचा वेग तुम्ही मिडियन पासून किती दूर आहे यावरही अवलंबून आहे . उदा . तुमचे आयडीयल वेट ७० असेल अन तुमचे वजन १०० असेल तर तुम्ही फार भरभर खाली याल , पण जर ते ७३ असेल तर एक एक किलोला वेळ लागेल Happy

तरीही , चहा मधे साखर फार होत असेल तर कमी करा अन चहा अर्धा कप घेत जा अन शक्य होईल तेवढ्या लवकर रात्री जेवा .

केदार, ओके. हाईटच्या मानाने टार्गेट वेट आहे ७० पण अ‍ॅक्चुअल ७७-७८ पर्यंत आहे.
चहात एकच चमचा साखर असते.आता डायरी मेंटेन करतो. म्हणजे नेमकी गोम कळेल. माझ पित्ताशयाचं ऑपरेशन झाल्यापासुन वजनात वाढ झाली आहे. डॉ ने आधीच कल्पना दिली होती अन त्या काळात एक्सर्साईज कमी पडली Sad .

मी रात्री ८ - ९३० जिमला जाते आणि घरी आल्यावर उकडलेले अंड्याचे पांढरे (२), दलिया उपमा, दाळ असे काहीतरी खाते.

whole wheat ब्रेड खाणे चांगले की वाईट ? सकाळी खूप घाई असते मग ब्रेकफास्ट ला ब्रेड शिवाय पर्याय उरत नाही.

माझे सध्याचे वजन ६८.५
टार्गेट : ५७
ऊंची - १६० cm

मी आज फिरायला गेलेच नाही सकाळी......... उपवास .असल्यामुळे सकाळी चहा घेतला........... १०. १५ ला ताक प्यायले............ संध्याकाळी फिरायला जरा जास्त जावे लागेल Happy

whole wheat ब्रेड खाणे चांगले की वाईट ? >>
तो whole wheat ब्रेड किती whole wheat आहे यावर अवलंबून आहे . किमान इथे मिळणार्या ब्राऊन ब्रेडचा तरी फारसा उपयोग नसतो .
मी तरी पोहे , उपमा काही नसले तर ओट्स गेला बाजार चपाती प्रेफर करतो

उन्ची: ५'-३''
वजन- ६७
बीएमआय- २६.२

तुमच सगळ्यान्च वाचुन माझ्या आहाराच्या आणि त्याच्या वेळाबाबतच्या तक्त्यात गडबड आहे अस वाटायला लागलय. Sad

सकाळी फिरण होत नाहीये पावसामुळे. पण जेव्हा व्हायच तेव्हा शेड्युल अस होत.

पावणेसहाला उठुन फिरायला जाणे- साधारणतः साडेतीन कि.मी.
घरी आल्यावर आधी ५० दोरीउड्या. मग बाबा रामदेवने सान्गितलेले योगा प्रकार, प्राणायाम
७.३० ला मध घालुन एक ग्लासभर कोमट पाणी
८.१५ ला रात्रभर पाण्यात भिजवलेला सुका मेवा पाण्यासहीत(११ काळ्या मनुका, एक सुके अन्जीर, दोन खजुर, दोन बदाम)- हे आयुर्वेदीक डॉक्टरने मला कायमच घ्यायला सान्गितलय.
८.३० ला एक कप दुध + चमचाभर साजुक तुप + एक साधा पराठा
१०.३० ला ऑफीसमधे एक बीट पराठा/ आलु पराठा/ कोबी पराठा... किन्वा कधी कधी रात्रीचा परतवलेला भात.अगदीच काही नसल तर शेन्गदाण्याची चटणी एका चपातीसोबत.
१.३० जेवण - दुधी/लाल भोपळा/ गवार/ भेन्डी/ दोडका यापैकी भाजे + तीन चपात्या (घडीच्या) + ताक
४.०० चहा (आता बन्द केला आहे)
सन्ध्या. ७.०० -दीड चपाती व दुपारची उरलेली भाजी
रात्री ९.३०- मुगदाळ + मसुरदाळ घालुन केलेली फोडणीची खिचडी.

प्लीज मला कुणीतरी आहारात योग्य बदल सुचवा.

सॉरी...वरती फक्त फळभाज्या टाकल्या. दुपारच्या जेवणात पालक, मेथी, तान्दुळजा, शेपु या पण भाज्या असतात... सध्या पावसाळ्यामुळे पालेभाज्या बन्द होत्या. Sad नाहीतर जास्त करुन पालेभाज्याच असतात.)

पण दुपारच्या जेवणात ३ घडीच्या चपात्या जास्त होतात का? तसच सकाळी भाराभर खाण होतय तर दुपारनन्तर जास्त गॅप येतोय अस वाटतय का? Uhoh

माझा रविवार:

फिरायाला गेलो तर गर्मागरम वडापाव तळणे सुरु होते. मग काय लागला राहिल डाएट बाजुला. ब्रेकफास्ट गेला तेलात. जेवणात चण्याची उसळ अन ३ पोळ्या. दुपारी एक चहा. अन रात्रि १ सलाड अन ४ मोमो.

व्यायामः जवळपास ४५ मिनिटे सर्किट ट्रेनिन्ग.

Calorie हिशोबानी मी डेफिशिएट मधेच राहिलो. सो ४/५. (१ मार्क तळलेले खाल्ले म्हणुन् कटाप Lol )

आताच डॉक्टर कडून आले. मला १० किलो कमी करायचे आहेत. इतके दिवस केलेला आळस नडला. आजपासून या ग्रुप्चे आम्ही मेंबर.

मित्रानो ,

वरच्या गुणांच्या पद्धतीत आणखी २ मुद्दे वाढवले आहेत . किमान या ४ गोष्टी जर तुम्ही रोज करत असाल तर तुम्ही On Right Track रहाल .

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. अति प्रमाणात तळलेले गोड (गुलाबजामून , जिलेबी इ) अन पिझ्झा ,बर्गर वगैरे टाळणे.
३. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
४. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग ) असणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन २ ते ४ क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण ७.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन २ ते ४था क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/७ गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/१४ किंवा १५/२१ असे लिहा . मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन

आशिका ,
केदार, यामध्ये कमी तेलात शिजवलेले मासे व चिकन यांचा उल्लेखही असु द्या. >> चिकन ब्रेस्ट मी लिहिता लिहिता खोडल होत. Happy शिजवलेले तर अतिउत्तम . पण सुरूवातीलाच नको म्हणून Happy

नमस्कार मंडळी,
अतिशय उपयोगी धागा..

माझी उंची- "५.३" इंच
BMI- " २२.५८ "
वजन- "५६ kg "

उंचीनुसार वजन योग्य असले तरी मला पोटावरची चरबी कमी करायची आहे. ३ ते ४ kg कमी करायचा मानस आहे. सध्या cycling आणि आसने करते. अजून काही व्यायाम सुचवताय का?

सुकामेवा बंद करा. स्मित>>> आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलंय म्हणून बंद करायला सांगताय का इब्लिस? Proud
भिजवलेल्या मनुका+बदाम+खजूर बंद का करायचं त्याचं कारण सांगितलंत तर बरं होईल.

रविवार - सकाली४ किमी वाॅक व संध्याकाली ३० पोहणे
नाश्ता कमी तेलाचा दलिया उपमा, दुजे - एक भाकरी भाजी व वरण अगदी थोडा भात राजे - एक थालीपीट न ताक दोनदा चहा.किती गुण ? दोन वाट्या वै इतकं मी खाऊ नाही शकत रे Happy
इब्लिस - ड्रायफ्रुट्स किती व कोणते खावे? मोसमी फल रोज खाते. सकाली दोन भिजवलेले बदाम व दोन खजूर बिया खाते.

9/10

केदार, रॉहू, दक्षिणा मला सांगा भाजके चणे (फुटाणे) किंवा वाटाणे संध्याकाळच्या वेळी खाल्ले तर चालेल का? तसंच उकडलेल्या मुगाच्या, भुईमूगाच्या शेंगा आणि भाजलेला भुट्टा किंवा उकडलेले कॉर्न्स? संध्याकाळची वेळ फार घातक. चहा घेते पण पाच नंतर कडकडून भूक लागते. पुन्हा जेवण १० वाजता. (पिल्लूला भरवून वेळ होतो) बाकी डाएट बरचसं सांभाळलं जातंय आठवड्यातून तीन दिवस फळभाज्या आणि तीन दिवस उसळी. एक किंवा दोन दिवस अंडी/मासे/चिकन घरी केलेलं. चिकन/मच्छी करी चालेल का? त्यात नारळाचं दूध असतं तेही पोषकच म्हणून विचारलं. उकडून नाही खाता येणार मासे Sad

फळं अजून चालू केलेली नाहीयेत. (मार्केटमध्ये जायचा आळस केला. ) पण फळभाज्या खातेय.

३०-३५ मि. व्यायाम होतोच होतो रोज. सून, बैठे सायकलिंग, हाता पायाचे व्यायाम प्रकार वै. टाईम मॅनेजमेंट करून आणि थोडा आळस दूर सारून वेळ वाढवत न्यायचाय. आता खायचे तंत्र सांभाळले तर बघूया फरक पडतोय का... छोटे माईलस्टोन्स सेट केलेत. उत्साह कायम राहण्यासाठी Happy सध्या तरी आवडते जुने ड्रेसेस फिटींगला झाले पाहीजेत Happy तेही लो बीपीचा वै. त्रास होऊन चक्कर वै. न येण्याइतकी तंदुरूस्ती राखून.

बाळंतपणानंतरच्या गंजगंजभर भाताच्या पेजेने घात केला Sad असो...

माझे आजपर्यंतचे गूण १८/२२.
ब्रेफा चं आणि रात्रीच्या जेवणाचं आठवड्याचं डाएट टाईम टेबल केलेय. फॉलो किती होतंय बघायला हवं.

Pages