चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ३ माईल्स चालले.
सकाळी: स्किम्म्ड मिल्क , ओट्स
११ ला सफरचंद
लंच ला केलची (kale) भाजी १ पोळी, दही, १ काकडी, १/२ गाजर
४ ला वडगाभर कलिंगड ( संपल एकदाच Happy )
कोबिच सुप, १ पोळी, मेथी ची भाजी, तुर डाळ १ १/२ वाटी

४/५ मिळायला हरकत नसावी Happy

सकाळी उसळ भिजवली, उद्यापर्यंत होईल. रोज सकाळी एक छोटी वाटी उसळ भिजवणार मटकी मुग आलटुन पालटुन.

माझे सध्याचे वजन ७२ कि.. Sad
टार्गेट - ६० कि.
व्यायाम - आठवड्यातुन ४ वेळा दिवसाला १ तास प्रमाणे योगासने.
ब्रेकफास्ट - अनियमित होतोय.
दुपारचे जेवण - ३ पोळ्या आणि भाजी.
दिवसभरात २ कप चहा/कोफी साखर घालुन.
सन्ध्याकाळी चिवडा/शेव इ. प्रमाणात.
रात्री - २ पोळ्या भाजी आणि घासभर भात.

मला असे २ बदल सुचवा प्लिज ज्याचे परिणाम लगेच जाणवतील.

इथे लिहिल्यावर वाटतय मि एका वेळेला जास्त खाते आहे का? (confused!! Sad )

काल काजू मावा स्वीट्स (की करे कंट्रोलही नही होंदा Sad Sad Sad गोड माझा विकेस्ट पॉईंट आहे Sad ) आणि थोडे केळावेफर्स Sad केदार, उपट माझे कान!!
मग संध्याकाळी खूप नर्व्हस वै. झाले. माव्यातील कॅलरीजचा गोळा डोळ्यासमोर गरगरायला लागला... ३५ मि. घरातल्या घरात चालले. आज सकाळी उठायला कंटाळा येतच होता पण मग कालच्या कॅलरीज आणि या धाग्याचा धाक!!! ३५ मिनीटे मस्त व्यायाम केला. सकाळी पराठा, दूध आणि ऑफीसमध्ये चहा. आज पासून काहीही झालं तरी गोड आणि तेलकट बंद म्हणजे बंद.. बिस्कीटे आणि इतर बेकरी प्रॉडक्स्ट्स घरात येतच नाहीत शक्यतो. (चक्क फेकून देईन कोणी नाही खाल्लं तर) गणपती जवळ येताहेत म्हणून भीती आहे. माहेरी गेले तर आई जाम अडथळा आणेल या डाएटला... मुलगी कायम वाळलेलीच वाटते तिला. Uhoh ती असं बोलली की नवरा कानाशी पुटपुटतो... दरवाजा रूंद करायचा विचार करतोय सांग मातोश्रींना! Sad

व्यायाम नियमित ठेवणारच!! वजनाचं टार्गेट सेट करावं लागणारेय म्हणजे थोडा पुश मिळेल प्रयत्नांना! आज कालच्या आणि आजच्या व्यायामाचे ४ मार्क मिळतील की मायनस?? Sad

मला वजन कमी करण्याचा बराच अनुभव आहे म्हणजे ३-४ वेळा १५ ते २० किलो वजन कमी केलेले आहे (आणि पुन्हा वाढलेले आहे ) वर कोणी तरी तुपाचा विषय काढला आहे. वजन वाढण्यातला मुख्य शत्रू हा तेल तूप नसून कार्बोहायड्रेट आहे कारण कार्बोहायड्रेट्स जरूरीपेक्षा जास्त झाल्यास ते साठवले जातात फॅट्स च्या स्वरूपात. बॅन्क बॅलन्स सारखे. प्रोटीनचे रूपान्तर मसल्स मध्ये होते त्यामुळे कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रोटीन्स वाढवावेत.

माझी लाडकी गायिका, अभिनेत्रि मॉडेल Wink कोमल रिझवी हिने वजन कमी केले त्याचे रहस्य सांगताना तिने बाकी काही न करता केवळ रोज रात्री साडेसात पूर्वी जेवण घेतले तरी बराच फरक पडतो असे सांगितले हय...

माझे कालचे ४/५ रात्री गोड आणि तळकट खाल्लं पण नंतर अर्धातास फिरले.
आजचे अजूनतरी ५ कारण ब्रेफा आणि व्यायाम नीट केला.

ड्रीग, मी आहे तुझ्यासोबत. मध्यंतरी तर कमी केलेले परत आले. फार काही गोड खाल्ले, तेलकट खाल्ले असेही नाही. शप्पथ Sad पण लगे रहो, हम होंगे कामयाब.. एक(तरी) दिन!

फिरण्याबाबत माझ्या डॉक्टरानी दिलेला सल्ला....
(इथल्या फिरण्याच्या कल्पना पाहून सांगण्याचा मोह आवरत नाहीये)

बर्यापैकी वेगाने चालल्यावर (पळणे नव्हे)... अर्ध्या तासाने फॅट बर्निंगची प्रक्रिया चालू होते. पहिला अर्धा तास हा वजन कमी होण्याच्या दृष्तीने उपयोगाचा नसतो. तो मसल्स वार्मिंगसाठी उपयोगात येतो. त्यांउळे पहिला अर्धा तास चालणे हे केवळ हवापलटाकरता उपयोगाचे आहे. शिवाय चालताना गप्पा मारणे मोबाईल वापरणे टाळावे त्याने श्वासाच्या लयीत अडथळा येतो. गाणी ऐकणे अलाऊड आहे Happy

कमाविलेले वजन पाहता चालण्याचे प्रमाण फारच नगण्य आहे. किमान ८-९ किमी रोज चाललेपाहिक्जे त्याच वेळी कार्बोहायड्रेट कमी करणे अन्यथा १०० क्यालरी जाळून ५०० क्ञालरी खाणार असाल तर निरुपयोगी....

हम होंगे कामयाब.. एक(तरी) दिन!>> शैलजा Happy

मी ठरवलं ना तर करतेच Proud पण ते ठरवेपर्यंतच संयमाची कसोटी Sad
आता ठरवलंय... नो स्वीट्स नो तेलकट!! रोज व्यायाम!! Happy आणि रोज इथली फेरी. कौतुक केलेलं लहानपणापासून आवडतं. म्हणून तरी उत्साह टिकेल असं वाटतेय.

१०० क्यालरी जाळून ५०० क्ञालरी खाणार असाल तर निरुपयोगी....>> अगदी रॉहू Sad
आणि त्यासोबत चालण्यापेक्षा म्हणून व्यायामावर भर द्यायचं ठरवलंय. घरात वेगानं चालणं होणार नाही. पावसाळा ओसरेपर्यंत चिखल खड्डे चुकवत तास तास फेरफटका मारणे ही जमेलसं वाटत नाही.

मी तळलेले पदार्थ खातच नाही............ व्यायामाचा आळस पण फिराय्ला रोज जाते........ Happy

मला किती गुण ??

रॉबिन्हुड शी एकदम सहम्त ........ ...बागेत फिराय्ला गेल्या सारखे फिरणे ह्याला फिरणे म्हणतच नाही.....

१००० उड्या... १०० म्हणायच होतं की खरच १०००..
माझ्या ५० उड्या बापुडवाण्या दिसायला लागल्या...

डायट रेसीपीचा एक धागा आहे ना तो पण टाका ना हेडरमध्ये. निपा म्हणतात त्याप्रमाणे प्रतयेकाची प्रक्रुती वेगली असते. माझ्या एका मैत्रीणीने रुजुता फाॅलो केलं वजन खूप कमी झालं नाही पण इंचेसमध्ये खूप फरक पडला तीन महिन्यात. मला मात्र दोन दोन तासाने आठवणीने खाणं जमत नाही. आपलं शरीर तहान भूकेची जाणीव देतं असतं त्याप्रमाणे खावं प्यावं असं मला वाटतं. रुजुताचा 'फिटनेस' फंडा मात्र पटतो.

हो खरे आहे मंजुतै ...मला पण ते दोन दोन तासाने नाही जमत........

पण मंजुतै तुमची हाईट, वेट एकदम परफेक्ट वाटले मला... Happy

रॉबिनहूड,

तुमच्या इथल्या संदेशाशी सहमत. मला वाटतं की सपाटीवर चालण्यापेक्षा चढउतार केलेले अधिक चांगले. जे उंच इमारतीत राहतात त्यांनी अर्धा तास जिने चढउतार करावेत. किंवा जवळ टेकडी असेल तर तिच्यावर चढउतार करत फिरावे.

आ.न.,
-गा.पै.

वैदेही....तुम्ही चहा / कॉफी मधली साखर बंद करुन सुरुवात करु शकता. तसच सकाळी उठल्याबरोबर आधी चहा ना पिता २ ग्लास पाणी आणि एखादे फळ घ्या. अर्ध्या तासाने चहा / कॉफी घ्या. मग साधारण दिड तासाने ब्रेकफास्ट.

माझे सध्याचे वजन ७२ कि.. अरेरे
टार्गेट - ६० कि.
व्यायाम - आठवड्यातुन ४ वेळा दिवसाला १ तास प्रमाणे योगासने.
ब्रेकफास्ट - अनियमित होतोय.
दुपारचे जेवण - ३ पोळ्या आणि भाजी.
दिवसभरात २ कप चहा/कोफी साखर घालुन.
सन्ध्याकाळी चिवडा/शेव इ. प्रमाणात.
रात्री - २ पोळ्या भाजी आणि घासभर भात.

मला असे २ बदल सुचवा प्लिज ज्याचे परिणाम लगेच जाणवतील.

इथे लिहिल्यावर वाटतय मि एका वेळेला जास्त खाते आहे का? (confused!! अरेरे )

>> वैदेही , तुमच्या आहारात २ वाट्या डाळी , उसळी किंवा सोयाचा समावेश करा .
शक्य असल्यास संध्याकाळी थोडे खाणे वाढवून रात्रीची एखादी पोळी कमी करा अन जेवण शक्य असल्यास ८-९च्या आधी घ्या

दक्षिणा, सम्पर्कातुन नम्बर पाठवलाय. प्लीज अ‍ॅड कर.
मला पण ग्रुप मध्ये add करा. काल पासुन सुरु केला आहे व्यायाम. सध्या ६ सु. न. आणि walk ३० min एवढेच होत आहे. पण हळु हळु वाढ्वीन.

काल ६ किमी चाललो.

आज २५ सूर्यनमस्कार.
दोरीवरच्या १००० उड्या.
योगासनं.

>> सही चिनूक्स

मी ब्रेफासाठी काही पदार्थ सुचवते
कोबी पराठा - कोबी किसायचा त्यात कणिक आणि चमचाभर डाळिचं पीठ नेहमीचं तिखट मिठ मसाला, आणि सरळ थालिपिठासारखं थापायचं.

रवा ताकात भिजवायचा विस मिनिटं, त्यात ढबू किसून घालायची तिखट मीठ नेहमीप्रमाणे आणि ओतीव करून तव्यावर घालायचं. अप्रतिम लागतं.

कोबी प्रमाणे पालक, दुधी+मुळा असं ही करू शकतो.
डाळिच्या पिठाचं धिरडं प्रोटिन मध्ये हाय असतं. ब्रेफाला उत्तम.
मशरूम पराठाही उत्तम (हाय प्रोटिन)

वरिल पैकी एक पदार्थ मी रोज करून खातेय. मला खूप फायदा होतोय. थोडे कष्ट घेतले तर वजन कमी व्हायला वेळ नाही लागत. तुम्ही पण ट्राय करा.

आता माझा अपडेट ३ महिन्यापुर्वी मी वजन कमी करायला सुरूवात केली तेव्हा माझं वजन ७२.६ किलो होत. ३ आठवड्यापुर्वी ते ६८.८ ला पोचलं होत. ३ आठवड्यात फक्त अर्धा किलो उतरलंय. बट आय अ‍ॅम ओके विथ इट.

वजन हळू वाढलंय तर हळूच उतरणार ना Happy

२०१० साली तर मी ७६.६ होते आण ते कमी करून मी ६४ पर्यंत आणलं होतं. पण पुन्हा वाढलं (टेन्डन्सी) आता सिरियसली फॉलो करून ६० वर जाणार

आज व्यायाम आणि ब्रेफा दोन्ही स्किप झालं. कारण डा कडे अपॉ होती सो मला ३/५

अजून एक आठवलं - बीट का खायचं नाही असं वर कुणितरी विचारलंय बीटाह कार्बज खूप प्रमाणत आहेत आणि शुगर सुद्धा ते ब्रेक करायला फार कष्ट पडतात शरिराला. प्रोटिन ची ही तिच कथा त्यात फॅट्स इक्वल टू प्रोटिन आहेत. त्यामुळे पनीर खल्ल्याने प्रोटिन मिळतं पण फॅट्सही तितकेच मिळतात. मग उपयोग काय? त्यापेक्षा डाळी उसळी बर्‍या. Happy

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते वरुन

मला सांगा.......वजन हे नक्की काय असते

काय सुख आहे की जे ....... सारखेच वाढते... Happy

आज मी टेकड्यांमध्ये फिरलो, जवळपास एक तास अन अर्धा तास घरी व्यायाम. सकाळी १ कप चहा (८ कडे), ब्रेकफास्ट १ प्लेट पोहे (१० वाजता). लंच उशिरा झालं, २.५ ज्वारी भाकरी, वांग्याची भाजी, वरण भात. संध्याकाळी २ कप चहा. चहा कमी करायचं टार्गेट आहे. ऑफिसमध्ये व्यवस्थित पाळतो, पण घरी असल्यावर फिस्कटत.

डिनर मोस्टली वरणभात बस.

सो माझे आज ४/५.

मित्रांनो , मी मोकळ्या हवेतील व्यायामाचा तसेच सुयोग्य आहार (ज्याला मराठीत डाएट म्हणतात त्याचा) खंदा समर्थक असल्याने आपणा सर्वांना हितचिंतक म्हणून पाठींबा जाहीर करतो

वजन व्यवस्थित असल्याने व वजनवाढीचा संभव नसल्यने बाहेरूनच Happy

@रोबिनहूड,

तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी भरपूरठिकाणी हे वाचलंय.

चालणे हा एरोबिक प्रकारात मोडणारा व्यायाम आहे. ह्यामध्ये साधारण ३० मिनिटांनी परिणाम होतो. त्यातही मेख अशी कि एका लिमिटनंतर शरीराला ह्या प्रकारच्या व्यायामांची सवय होते अन मग अपेक्षित परिणाम दिसत नाहित Sad

मग व्यायामाची तीव्रता वाढवत नेणे हाच एक उपाय असतो. साधा चालण, हळू हळू स्पीड वाढवत नेण, मग स्लो जॉगिंग, जॉगिंग आणि सरतेशेवटी धावणे असे वाचण्यात आले होते.

आपण बर्याचदा ऐकतो कि फिरून काही परिणाम होत नाही, त्याचे हे एक कारण असावे Happy पण प्रत्येकास हे लागू होईलच असेही नाही. मला आणि माझ्या २ ३ मित्रांना मात्र लागू पडले.

माझे निरीक्षण Happy

मी घरी चहा पित नाही बिनसाखरेची कॉफी पिते. तलफेसाठी एक दोन घोट चहा केव्हातरी.
पण हास्पिटलात गोडमिट्ट चहा प्यायला लागतो.
तर आजपासून हॉस्पिटलात बिनासाखरेचा चहा बनवायला सांगितला आहे. आज दोन्ही वेळा बिसाच प्यायले.

सकाळी उशीरा उठले ,म्हणून प्राणायाम, योगासने नाही. माबोवर वाचत बसल्यामुळे अजून फिरायचे आहे.

Pages