चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे सगळेच इतका व्यायाम करताहेत बघुन कॉम्प्लेस यायला लागला आहे.

आज सकाळीच ४० मिन एलिप्टीकल केलय म्हण्जे दिवसभर फक्त जेवणावर वॉच केल की झालं. सकाळ लिंबु, मध पाणी घेउन सुरु केली आहे. सन्ध्याकाळी येतेच डिटेल मधे लिहायला. Happy

आहे ते सगळे सुरु ठेवुन (नविन काहि न करता) फक्त, चहा कॉफी बिना साखर पिणे, बिस्कीट / बेकरी टोटल बंद, आणि लंच अगोदर गोड खाणे नाही यावर तुमचे २-३ किलो वजन पहिल्या महिण्यात कमी होउ शकेल. Happy साखर अजिबात खायचीच नाही.

आपले शरीर एक साखर कारखानाच आहे मग वरुन साखर कशाला?

अरे , ४१ पैकी फक्त १२ जणांनी मार्क लिहिलेत Sad
रोज किंवा अगदी २/३ दिवसानी २ मिनिटे वेळ काढून फक्त इथे रोज काय केले अन स्वतःचे मार्क लिहा. यामुळे आपण करतोय ते नीट चाललय की नाही याचा ट्रॅक ठेवता येईल

रच्याकने , सकाळचा मॉर्निंग वॉक १ तासाचा कंप्लिट Happy

पाच पांढरी विषे.....
साखर, मीठ्,मैदा, भात,दूधाचे पदार्थ (दही ताक वगळून...)
ज्या क्षणी बन्द कराल त्या क्षणी वजन कमी व्हायला सुरुवात !

काल तीन किमी वॉक. मोड आलेली कडधान्ये, बिना मिठा आणि फोडणीची तूरडाळ, बिना साखरेचा चहा, दोडक्याची भाजी असं दिवसभर मस्तं ५/५ झालं. पण रात्री हास्पिटलात काम जास्तं असल्याने दोन दोन वडापाव वाटले होते ते खाल्ले.
घरी आल्यावर शिक्षा म्हणून जेवले नाही. कालचा स्कोअर ४/५ म्हणायला हरकत नाही.

आज अद्याप तरी व्यायाम नाही, काल रात्री तीनपर्यंत काम चालू होते. त्यामुळे दोन कप चहा. (मी एरव्ही चहात चार ते पाच चमचे साखर घेते. ते कमी करून दोन चमचे साखर घेतली एवढाच काय तो फरक)

सकाळी ब्रेकफास्ट मिसळ. मी पाव खात नाही. त्यामुळे नुसती उसळ आणि कट. दुपारच्या जेवणाचा अजून पत्ता नाही.
माझे स्कोअर मायनसमध्येच असणर.

तीन महिन्या पूर्वीची गोष्ट आहे. मला जिना चढतांना कष्ट जाणवू लागले. खाली पडलेली वस्तू सहजतेने पटकन वाकून उचलता येत नाही अस लक्षात आल पॅण्ट कमरेला (खर सांगायच तर ढेरी वर ) घट्ट बसू लागली .माझ वजन ८४ किलो ला पोचल आकडा बघून लोक म्हणत तुझ्या उंचीला ८०-८२ ठीक आहे. पण मला मात्र या सगळ्याचा फारच त्रास जाणवत होता. शरीराला एक तर्‍हेच ऑल इज नॉट वेल टाईपच फीलींग! त्यापेक्षाही अधिक म्हणजे जे आपण अगदी सहज करत होतो जिना चढतांना दोन दोन पायर्‍या सहजतेने चढत जाण, सहज खाली वाकण हे जमेना त्याचा मानसिक त्रास जास्त वाटू लागला. ढेरी वाढल्याने स्वतःच बेंगरूळ, बेढब दिसणार रूप हे माझ्याकरता वजन कमी करण्यासाठी मोठ मोटीव्हेशन ठरल. मी फार काही केल नाही पुन्हा एकदा १२ सूर्यनमस्कार शक्य तितके सावकाश, वीसेक मिनीट प्राणायाम ( कपालभाती, अनुलोमविलोम व भ्रामरी हे तीनच मधली विश्रांती पकडून वीस मिनीट पुरतात ) व पाठीवर उताणे पडून सायकल चालवल्या सारखी पायांनी पॅडल मारल्याचा व्यायाम खास तोंद कमी व्हाव या साठी. हे सगळ मी आठवड्यात तीन ते चारवेळच नियमीत करू शकलो कधी आळशीपणा आडवा येत होता कधी थकून गेलो असलो तर काहीच करावस वाटत नसे. शरीर थकल असताना व्यायाम केला तर आणखीच नुकसान होत असही वाचल होत. आहारात मी चीज बटर पनीर एकदम कमी केल, कारण यानी वजन झपाट्यानी वाढल होत अस जाणवल होत. पोळी भाजी ऐवजी भाजीपोळी खाण सुरु केल एक पोळी आपोआपच कमी झाली. बशीभरून सॅलड सुरुवातीला खाण व शक्य तितक हळू सावकाश जेवण एक घास बत्तीस वेळा म्हणतात न तस सुरु केल.आता तीन महिन्यांनी मी ८४ वरून ७८ किलो वर आलोय. जरा बर वाटत आहे. नव्या पॅण्ट घ्याव्या लागणार नाहीयेत Lol टारगेट पूर्वी सारख ७४ गाठाय साठी तुमच्या या खास गृपच्या शुभेच्छा माझ्या समवेत असू दे.

आज सव्वा तास स्पिनिंग. सन्डे स्पेशल Happy मोट्।अ ग्लास भरून कलिंगड आल पुदिना सब्जा अश्या कॉम्बिनेशनचा ज्युस. दोन टोस्ट बटर मारके Happy मोठ्या मगातून कॉफी .
हे स्पिनिंग प्रक्रण मस्तय. थकण्यापेक्षा उत्साहच वाढतो माझा .

आज सव्वा तास स्पिनिंग. सन्डे स्पेशल Happy मोट्।अ ग्लास भरून कलिंगड आल पुदिना सब्जा अश्या कॉम्बिनेशनचा ज्युस. दोन टोस्ट बटर मारके Happy मोठ्या मगातून कॉफी .
हे स्पिनिंग प्रक्रण मस्तय. थकण्यापेक्षा उत्साहच वाढतो माझा .

मला पण घ्या ग्रुपमधे.

BMI सध्या २३.२ गाफिल राहीले की २५ कडे झुकू लागतो. मग पुन्हा प्रयत्न. असे यो यो गेली दोन वर्षे सुरु आहे. मला तो सातत्याने २१ च्या आसपास ठेवायचा आहे. शिवाय जोडीला बोन डेंसिटी आणि मसल मास राखणे हे ध्येय आहे. सध्या मी वॉक अ‍ॅट होम ३ मैल आठवड्यातून ५ वेळा करायचा प्रयत्न करते. विक एंडला शक्य झाल्यास बाहेर फिरणे. सध्या जोडीला लाईट यार्ड वर्क.

काल सकाळी साडेसहा वाजता ६ औस कोमट पाणी, साडेसात वाजता ७ औस स्किम मिल्क + १ टीस्पून साखर + १/४ टीस्पून घरी बनवलेले हॉट चॉकलेट मिक्स ( डार्क कोको + साखर ; १:१) , साडेनऊ वाजता छोटे सफरचंद, दुपारी जेवायला ब्रोकोली, रेड बेल पेपर आणि सेलरी घालून सोबा नूडल्स, स्नॅक साबूदाणा वडा ( लेक घरी आलाय म्हणून प्री प्लॅन्ड ट्रीट), पाउणतास ब्रीस्क वॉक, रात्रीचे जेवण दोन पोळ्या आणि चार्ड घालून मूग डाळ, रात्री झोपताना सकाळ प्रमाणे दूध.
आज पुन्हा सकाळी कालचे रुटिन. मात्र आज दुपारी बार्बेक्यु आहे. उद्या अपडेट देते.

साती स्पिनिंग ही एक सायकलींग अ‍ॅक्टीव्हिटी आहे. ग्रुप मधे करायची. रेसिस्टन्स लेव्हल्स , हॅन्डल पोझिशन्,बसून आणी उभ राहून यवढीच व्हेरिएशन्स , पण एका ठराविक क्रमात सलग करायची. ( हे वाचताना फारस इंट्रेस्टिंग वाट त नाहीये पण करोगे तो जानोगे.)

तुम्हा डाळी ़ खाणार्या लोकांना सालवाली डाळ खायचं कधी सुचलंय का? तुरडाळीमध्ये कार्ब्जपण जास्त असतात. साध्या भाताऐवजी ब्राऊन भात, फॅट कमी म्हणून लीन मीट, नॉन फॅट दही इ.इ. Alternatives. मी प्रकॄतीच्या इतर कारणांमुळे डाएट केला होता, त्यावेळी complex carbs खा with protein of course हा सल्ला होता. तेव्हा जो काही अभ्यास केला होता त्यातून जे कळलं ते इथे लिहिते आहे.
तुम्हा सर्वाना शुभेच्छा Happy

४.५/५
नेहमीची योगासनेच्या ऐवजी फिटनेस व्यायाम करण्याचा प्रयत्न केला. (२ वर्षापूर्वी नियमित करीत होते.) स्क्वाट, पुश-अप इ. २०-२५ मिनिटात दम लागला, ३० मिनिटेच व्यायाम झाला. म्हणून अर्धा मार्क कापला.

जेवण सलाड आणि पिटा सँडविच दोन्ही वेळेला. दोन कप चहा. ब्रेकफास्ट केला नाही कारण घरकामात बिझी होते. पण लंचला फार भूक भूक झाले नाही. अर्थात प्रोटीनयुक्त बेफा. यापुढे करत जाणार. इतर अरबटचरबट काहीही खाल्ले नाही.

आहार माझा तसा बरा असतो. फक्त गेले काही दिवस गोड खाणे चालू झाले होते. ( लाडू बर्फि केक्स!) ते बंद झाले आहे ( संपले पदार्थ..) पण काल फार इच्छा झाली म्हणून एक चमचा आइसक्रिम खाल्ले. बाकी Okie Dokie ..
व्यायाम म्हणून वेगळा अजिबात होत नाहीये. पण मुलाबरोबर भरपुर पळापळी, पकडापकडी, डान्स असं चालू असतंच. पण करायचाय व्यायामही. बीएमआय २२ आहे. तो साधारण २०-२१ च्या मध्ये आला की जरा बरे होईल.

वर श्रीकांत यांनी लिहिले आहे तेच माझ्याबरोबर होते. वजन वाढत ५५-५६ च्या आसपास आले की मला शरीर असहाकार पुकारतेय असे वाटू लागते. जीने चढताना अगदी जाणवते व मी परत वजन कमी करायच्या मागे लागते. मला हेही थांबवायचे आहे. एक फिक्स वजन, डाएट, व्यायाम इत्यादी.
मार्क्सः २.५/५

माझ्या म्हणण्यात चूक असेल तर डॉक्टर मंडळीनी दुरुस्त करावी. गरजे पेक्शा जास्त कार्बोहायड्रेट्स घेण्यात आले तर ते अनुक्रमे साखर,ग्लायकोजेन , आणि फॅटबॉडिइजच्या स्वरूपात शरीरात साठविली जाते . भविष्यातील उपयोगासाठी. नॉर्मल पेक्षा अधिक फॅट्स झाल्यास त्या साठविन्यासाठी पेशींचा समूह तयार होतो (टिस्श्यूज)त्या टिश्यूजना अ‍ॅडिपोज टिश्यू म्हणतात. त्याना पिशव्यांची उपमा देता येईल. त्यात हे फॅट्स साठवले जातात. बाहेरून कार्बोहाय्ड्रेट्सह्कमी झाल्यास, उपासमारीत, आजारात, व्यायामाने, शारिरीक कष्टाने यातील फॅट्स वापरले जाऊन या पिशव्या मोकळ्या, चपट्या होतात. जात मात्र नाहीत. पुन्हा फेवरेबल कंडिशन्स म्हणजे कारबोहायड्रेट्स चा अतिरिक्त पुरवठा सुरू झाल्यास नेहमीच्या प्रोसेसप्रमाणे कार्बोहायड्रेट्स ते फॅट बॉडीज असा प्रवास होउन पुन्हा या अ‍ॅडिपोज टिश्यू फुल होतात आणि वजन रिस्टोअर होते.त्यामुळे घेतलेल्या कॅलरीज पेक्षा खर्ची पाडलेल्या कॅलरीजचे प्रमान जोपर्यन्त जास्त असते तोपर्यन्त फॅट डिपॉझिटचा प्रश्न येत नाही आनि वजन नियंत्रणात राहते.खर्च केलेल्या कॅलरीज पेक्षा घेतलेल्या कॅलरीज जोवर अधिक, जास्त, भरपूर, भरमसाठ असतात त्या त्या प्रमानात डिपॉझिट्स वाढत राहर्तात व वजन वाढत जाते. मस्क्युलर मासने वाढलेले वजन उपकारक असते पण फॅट्सनी वाढलेले नुकसानीचे, आणि धोकादायकही.मात्र एकदा प्रथम वजन वाढून अ‍ॅडिपोजची निर्मिती झाली की वजनावर नियंत्रन मिळवणे अधिक अधिक कठीन होत जाते.....

वाचतेय वाचतेय धागा.. जसा हा धागा पळतोय्..तसे पळा लोक्स!!!

केदार , या धाग्याची आयडिया ग्रेट आहे.. दक्षु मुझे भी अ‍ॅड करो..

तीन महिन्यांपूर्वी वजन ५७ होतं.. रोज सकाळ संध्याकाळ एकेक तास ब्रिस्क वॉक आणी स्टेशनरी एक्सरसाईझेस तीस , तीस मिनिटे ,
खाण्यात सकाळी चहा + १ खाखरा, ११ वाजता एक फळ, १२ वाजता स्प्राऊट्स आणी काकडी,गाजर , इतर कच्च्या भाज्यांचे सॅलड लिंबुरस + मीठ + पेप्पर घालून( नो रेडीमेड ड्रेसिंग), १.३० ला भाजी ( कुक्ड इन १ टी स्पू. तेल), एक वाटी दही+ १ फुलका
दुपारी १ कप चहा + अर्धी वाटी फुटाणे
संध्याकाळी ८ वाजता बेक्ड चिकन |फिश| भाज्या + कच्च्या भाज्यांचे सलाद+ चीज + उकडलेलं अंड( एग व्हाईट) केंव्हा केंव्हा उकडलेले बीन्स, किंवा कच्चे ,भिजवलेले चणे इ. इ.
मी रात्री कार्ब्स अवॉईड करते.
११ वाजता झोपाण्यापूर्वी भूक वाटत असेल तर अर्धा कप गरम दूध (साखर नाही) + १ खजूर

सुरुवातीला एक महिना , केदार ने सांगितल्याप्रमाणे काही हलंलं नाही वजन.. मग स्टेडिली कमी होऊ लागलं
आता वजन आहे ५१
एक किलो अजून कमी करायचय टारगेट वर पोचायला..
रिझल्ट दिसू लागल्यावर व्यायामाचा कधी कंटाळा येत नाही,एक दिवस ही खंड नाही पडू देत
काही कमिटमेंट असल्यास त्या दिवशी दोन दा करण्या ऐवजी एकदा करते..
चिकाटी अँड नो चीटिंग इज द की
टारगेट वर पोचल्यावर कधीमधी पिझ्झा विथ एक्स्ट्रा चीज ची ऐश करावी... पुढचा एक आठवडा कंपनसेट करावा.. Happy
इन माय केस, गोड्,मिठाईज, तळकट आवडतंच नाही त्यामुळे या गोष्टी मिस होतंच नाहीत
बिस्किटं , ब्रेड, केक्स मात्रं अजिबात अवॉईड करावीत.... फॉर एवर

काल ६ कि मी चालले ४०० कॅलरी बर्न केल्या पण २.५ गु जा खाल्ले. जेवणात कोलंबी करी भात. माझे गुण ४/५ का? कोलंबी हायकॅल आहे का? कोकोनट मिल्क वापरले नाही.

वाचतेय .. मला पण अ‍ॅड करा या लिस्ट मधे ..

सध्याच खाणं - सकाळी ८ ला ब्राऊन ब्रेड + चहा , १० वा- अर्धा कप कॉफी + १ बिस्कीट , १२ वा - भाजी + २ फुलके + दही काकडी/स्प्राऊट , दु. ३वा अर्धा कप कॉफी + १ बिस्कीट , ५ वा - १ सफरचंद/ स्ट्रॉबेरीज्/संत्र
संध्याकाळी ६ - १ / सव्वा तास जिम - ४५ मिनीट ब्रिस्क वॉक + ३० मि. इलिप्टिकल्/सायकलिंग
रात्री ८:३० - भाजी + १ फुलका + दही (नो फॅट)

वजन केलं नव्हत आधी पण इंचेस मधे फरक वाटलाय .. Happy

काही बदल लागतील तर सुचवा ..

chanas, try to avoid bread and biscuits completely, u will see the amazing results

hv to wait n watch पेशंटली बट

वर्षुतै .. अगं सकाळी भुक लागते नि बाकी काही बनवु शकत नाही ब्रेफा साठी ..
थालिपीठ, डोसा ( जास्त न आंबवता) वगैरे चालेल का?

काल सकाळी बिनातेलाचे मेथी पराठे, तीन किमी हिली एरियातून वॉक.
दुपारी स्प्राऊटस +भात +चपाती , रात्री मात्र तेलातूपातला जिरा राईस.
३/५
Sad

चनस, चहाबरोबर दोन खाखरे खाऊन बघ!! भारतात डाएट खाखर्‍यांतही खूप सारे टेस्टी ऑपशन्स अवेलेबल आहेत..
लगेच कामावर जायचे असल्यास बॅगेत फुटाणे किंवा ड्रायफ्रूट्स चे पाऊच किंवा एक फ्रूट ठेव. थोडी भूक लागलीशी वाटली कि यातील एक वस्तू खा. फार वेळ भुकेल्या परिस्थितीत राहिलीस तर जेवायच्या वेळेपर्यन्त
भूक अनावर होऊन अव्वाच्यासव्वा खाल्लं जाण्याची शक्यता वाढते.

आज सकाळी ओट स्किम्ड मिल्क बरोबर, दुपारी १ पोळी मटकीची उसळ, दुपारी बराच फलाहार झाला. २ पिच १पेअर, १ चकली. संध्याकाळी १ १/२ पोळ्या पालक भाजी आणि उसळ.

१ तास चालणे झाले. मला वाटत ४.५/५. चकली टाळायला पाहीजे होती.

उसळी च्या रेसीपीज सांगाना लोकहो. मी आपल नेहमीचे २/३ प्रकार करते.

स्वाती२ , ते वॉक अ‍ॅट होम सर्च केले इंटरेस्टींग दिसतोय तो व्हीडीओ. पण रीअली काही फरक पडतो का वजनावर त्याने ?
मला एकच एक व्यायाम खूप लवकर बोर होतो. सु न केले एक महीना ३० पर्यंत गेलो पण कंटाळा यायला लागला आता. अल्टरनेट डे करेन. म्हणजे वेगळा व्यायाम प्रकार. मला खूप घाम येईपर्यंत व्यायाम करावा वाटतो अंग मोकळे मोकळे वाटले की मी ४०-५० मिन्टांनी बंद करतो. अ‍ॅरोबिक्स चे विथ म्युझिक व्हीडीओ आहेत का काही चांगले? वर म्हटल्याप्रमाणे स्पिनिंग चे?
मला सकाळ सु. न आणि संध्याकाळी वॉक अशी सवय आहे. वॉक गेले ३ वर्ष कंटीन्यु आहे मधे मधे काही दिवस खंड पडतो गावी वगैरे गेले की.
वजन मात्र ढिम्म आहे. अगदी काहीही फरक पडलेला नाही पण इटस ओके. माझा दिवस मस्त जातो आधी पार मरगळल्यासारखे वाटायचे माझे मलाच.
खाण्यात रात्री फक्त मुग वरण, एक-दीड पोळी, सुकी भाजी. हे कंटीन्यु कारण पिल्लुला मुगाचे वरण अन पोळी फार आवडते. त्यात नो चेंज. म्हणावं तसं हेवी खाणं नसुनही फक्त चहा मुळे (दिवसात्न ४-५ कप) वजन कमी होत नसावं का? मी गोड, तेल्कट काहीच खात नाही. Sad

Pages