चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्रीच्या जेवणानंतर..... एक चमचा रोज खायचे.... ..मग त्यानंतर काहीच पाणी सुद्धा नाही प्याय्चे...

पण पायी फिरणे मस्ट आहे... Happy

ललित लिंक साठी धन्यवाद! माझ्या उंचीला आणि वजनाला ६२ किग्रॅ. पर्यंत नॉर्मल सांगतंय!! चार्टमध्ये ५५-५७ सांगितलंय!! असो! पहिल्यांदा नॉर्मल कॅटेगरीपर्यंत आणायचा मानस आहे मग आणखी कमी करता आलं तर चांगलंच!!

केदार, दक्षिणा उपयुक्त टिप्स!! दक्षि प्लीज नॅचरल आहार सांगतेस तर डाएट सांगच. कारण मी शक्यतो ओट्स फ्लेक्स वगैरे पेक्षा घरी केलेले पदार्थच (पराठे, इडली, डोसा, उपमा वै.) प्रेफर करेन हिमोग्लोबीन, कॅल्शीयम (मी नेहमीच मायनस रेंज मध्ये असते हिमोग्लोबीनच्या Sad ) वगैरे शाबूत ठेऊन डाएट फॉलो करणे म्हणजे पनीर, शेंगदाणे, बीटरूट यांचा माफक तरी उपयोग आलाच.!!

ड्रिम्गर्ल तु रोजच्या कणकेत बरोबरिने नाचणीचं पीठ मिक्स करून त्याच्या पोळ्ञा करत जा. पोळ्या थोड्या लाल आणि कडक होतात (माझ्या होत नाहीत) पण खायच्या. त्याने हिमोग्लोबिन नीट रस्त्यावर यायला मदत होते. दुसरी गोष्ट आठवड्यातून कमीत कमी ३ वेळेला भाजी करून किंवा रोज एक वाटी कच्ची पालेभाजी खायची. मेथी/पालक

एक लक्षात घेतलं पाहिजे की नॅचरली जे प्रोटिन शरिराला मिळतं त्याचा उपयोग शरिराला हळू हळू होतो पण लाँगटर्म असतो. सप्लिमेंट्स मधून फास्ट रिझल्ट्स मिळतात पण झटक्यात ते कमी सुद्धा होतं.

ब्रेफासाठी ओट् मिल (तयार) किंवा कॉर्नफ्लेक्स वगैरे खाणं मला थोडं पटत नाही कारण ते प्रोसेस्ड आणि प्रिझर्व्ह्ड आहे. वजन कमी करताना हे दोन्ही घातक.
लोणचं रोज खात असाल तर ताबडतोब कमी करावे.

सकाली माॅर्निंग वाॅक केला Happy सकाली बशीभर पोहे १ वाजता १ पोली १वाटी वरण १/२ वाटी लाभो भाजी १/२ भात व १ लालभो घारगा (१च खाल्ला मोह आवरला) माझेही दोन... भाज्या शक्यतो भोपला वर्गातली खावी उदा: दुधी, पडवल, लाभो, दोडके, गिल्के इ. ह्या भाज्यांना तेल कमी लागतं.....

दक्षि, धन्स! सध्या सोया मिक्स करून वापरतेय. ठीक आहे अनायसे नाचणी आहेच घरी सत्वासाठी आणलेली. करेन!!

नॅचरल प्रोटिन>> अनुमोदन!! तुझं हे ही म्हणणं पटलं की डाएटच्या नावाखाली उपाशी राहण्यापेक्षा योग्य प्रमाणात योग्य आहार घेतला पाहीजे.
दुधी, पडवल, लाभो, दोडके, गिल्के इ. ह्या भाज्यांना तेल कमी लागतं>> अगदी!! पण मग रोज दोन भाज्या बनवाव्या लागतील. नावडत्या ग्रूपमधील आहेत इतर सदस्यांच्या Happy

दुधी आणि लाभो तर खूप बहुगुणी भाज्या आहेत. पावसाळ्यात पालेभाज्या नाही खात जास्त. म्हणून सध्या फळभाज्या आणि कडधान्यांवर भर!!

सर्व भाज्या उपयुक्त आहेत हे लक्षात घ्या. अगदी रताळी सुद्धा. कंद सुद्धा खाल्ले (सुरण्/बटाटा/रताळी) तर चालतील पण अगदी कमी. वारंवार दुही, लाल भोपळा, पालेभाज्या खाऊ शकतो.
वेगवेगळ्या पद्धतीने केल्या तर कंटाळा येत नाही.

I was weighing 98 kg in july 2010. after I took up diet programand daily 6km of walk, I could shed 22 kg and last 3 years I am maintaining between 76-78 kg. it was 73 also at one point of time 6 months back.
increase in metabolism rate is the key to reduce your weight. check b12 vitamin level.

morning begins with 3 glasses of lukewarm water with 1/4 lemon.
1 bowl of wheatflex with milk.
lunch : 1 jawar bhakri + leafy vegetable + koshimbir+ curd
tea time digestive marie with black tea
dinner: varan+ only vegetable or only 2 to 3 fruits + buttermilk.
no sugar strictly
6km walk

observe this for a month and you see the results.

excuse me for writing in english. I have a difficulty writing marathi using tab. contents are important here than the script.:)

अरे काय ३३ मधल्या फक्त हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्यानीच आजच स्टेटस दिलय .
चांगल , वाईट जे काही असेल ते लिहा

माझे चालणे संध्याकाळी . आज किमान १/२ तास तरी ट्रेड मिल करणारच
वरई चालते का ? म्हणजे वरई खावून वजन वाढणार नाही ना ?
सोबत दही नो दाणे कुट

@ दक्षिणा माझा मेल मिळाला का? add कर मला

अरे तुमचे आयडी वेगळे आहेत मला कन्फुजन होतेय.
मी अत्तापर्यंत केदार, वल्लरी, गप्पेश, कलोल्कर, आशिका याना अ‍ॅड केलंय

मी पण अपडेट करीन इथे.
गेल्या वर्षभरात ७-८ कि वजन कमी केल. आता हव्या त्या रेंज मधे आहे. आता ते तिथेच टिकवणे, एन्ड्युरन्स वाढवणे यासाठी व्यायाम चालू आहे.
बीएमआय २१.५

आज नो व्यायाम,
खाणे - सकाळपासून आतापर्यंत इडली सांबार. रात्रीला पोळी आणि एग बुर्जी (बहुतेक!)
चहा: तीन कप
कोल्ड्रिंकः एक ग्लास
दही: एक वाटी

(मी इथला सर्वात नाठाळ माणूस असणारे!!!!)

Pages