चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त तुमच्या खाण्यात प्रोटीन्स नाहीयेत <<< ओह्ह बरोबर आहे. झोपतांना कपभर दुध प्यावे का?

आज ऑफिसला लवकर पोचायचे होते त्यामुळे मॉर्निंग वॉकला काट मारायचा बेत होता, पण तेव्हढ्यात या ग्रुपची आठवण झाली व पहिल्याच दिवशी कान उपटले जाऊ नयेत म्हणून चक्क अर्धा तास आधीचा गजर लावून वॉक पूर्ण केला.

केदार धन्स !

तरीही माझे कान उपटावे लागणार आहेत कारण सणासुदीचा व गोडधोड खाण्याचा श्रावण सुरु आहे. सर्वांनी हक्काने कान उपटा प्लीज.

दक्षिणा- मला पण अ‍ॅड कर ग्रुपमधे. नं. पाठवते.

सकाळी ५० दोर उड्या येवढच जमलं सकाळच्या गडबडीत आता संध्याकाळी सुर्यनमस्कार घालायला आणी ३० मिन. तरी चालायला वचनबद्ध...
सकाळी काही पर्याय नसल्याने ब्रेड, बटर आणी चहा घेतला..
दुपारी २ पोळ्या आणी भाजी...
मध्यंतरी काही तरी खाण्याचा पर्याय लवकर्च शोधेन..
बर वाटतय इथे कबुली जबाब दिल्यावर..

ओह्ह बरोबर आहे. झोपतांना कपभर दुध प्यावे का? >>

दूध ठीक आहे , पण टोंड घ्या . त्याहीपेक्षा डाळी , उसळी , सोयाच बरे Happy

चांगली सुरूवात आहे , प्रत्येकाने स्वतः काय केले ते लिहा .

महत्वाचे , पहिल्याच दिवशी अगदी स्ट्रीक्ट होऊ नका . आपल्याला हे आयुष्यभर करायचय . काही गडबड नाही .
सुरूवातीलाच खूप चेंज केले तर लवकर कंटाळा येतो .

फक्त व्यायाम चुकवू नका अन तळलेले , गोड , बेकरी पदार्थ अति खाऊ नका (अन शक्य तेवढा प्रोटीन इनटेक वाढवा)

६ कप चहा होत असेल तर थोडे दिवस रोज अर्धा कप प्या . तुम्ही ३-४ कप प्याल .
मग या ६ मधल्या अशा २ वेळा शोधा ज्यावेळी तुम्ही चहा न घेतला तर चालेल. मग तुम्ही इफेक्टिव्हली २ पूर्ण कप चहा घेत असाल .

मला पण ह्या ग्रुपमधे मेबंर म्हणुन अ‍ॅड करा.मला वजन कमी करायचे नाही.पण मी तुम्हां सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आनि प्रसंगी कान पकडण्यासाठी येइन.
माझे वजन मेंटेंन करण्याचे काही फंडे.
भात - बरेच लोक भात टाळतात.मी मात्र सुचवेन की रात्रीचा थोडासाआआअ का होईना पण भात खा.आनि फडफडया भाताएवजी,असा तांदुळ वापरा ज्याने मऊसर गोळा भात होईन.
ब्रेकफास्ट - जितका पोटभर करता येइन तेवढा करा..मी सकाळी ९.३० वाजता दमदार नाश्ता केल्यानंतर मला किमान १.३० पर्यंत भुक लागत नाही.आनि मी अधे मधे सटरफटर पण काही खात नाही.
पाणी- काही वजन वाढलेल्या व्यक्ती जास्त पाणी पिण्यावर भर देतात.. भरपुर पाणी प्या.. आनि वजन कमी करा..अस काही असेल ह्यावर माझा पुर्ण विश्वास नाही बसत.माझ्याबाबतीत..व्हेन बॉडी कॉल्स..ड्रींक वॉटर.. अस आहे...उगीच जास्त पाणी पित बसल की पोट फुगल्यासारख वाटत.आनि वॉशरुमच्या फेर्या वाढतात. Proud
प्रत्येक व्यकतीनुसार पाणी पिण्याची ,आनि पचवण्याची क्षमता वेगवेगळी असते.त्यामुळे मी दिवसाला ४-८ लि पाणी पिलच पाहिजे,,हा वेडेपणा होतो.

भरपुर नाचा - अगदी घरातल्या घरात साध न चालता डुलत डुलत नाचत जा.. मज्जा येते... Happy रोज किमान १० मि गणपती डान्स का होईना करत जा..प्रोपर एरोबिक्स च करायला हव अस काही नाही.. Happy

हे सगळे माझ्याकडुन हसतखेळत वजन कमी करायचे थोडे उपाय.
जमल्यास अजुन टाकेन.

रीये मी तुझ्या पोस्ट फॉलो करनार आहे हया धाग्यावर Wink

पौर्णिमा, तुला काय झालं?
जितक्या स्टेप्स चाललीस तितक्या पोस्टस टाकल्यास की काय?
Wink

वैनी, इथेच व्यायाम केलात काय? पण इथे बोटांचा व्यायाम अपेक्षित नाहिये हो Wink

मी काय केले हे उद्यापासुन लिहिन आज तर गृप जॉईन केलाय ना. Happy

लोखो, केदारचा उत्साह दांडगा आहे. वविच्या वेळी व्हॉलिबॉल खेळताना तो इतरांना ज्या पद्धतीने मोटिवेट करत होता ते पाहुन तो इथे आपल्या सगळ्यांचे वजन घटवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा.

मस्त! मी पण गेल्या डिसेंबरपासून करतोय. मध्ये छान ९ किलो कमी झाल होत, पण खंड पडला आणि परत ५ किलो वाढला Lol सो आता परत रेगुलर सुरुय Happy

माझा अनुभव आत्तापर्यंतचा:

आधी मी चालायला सूरवात केली, मग हळू हळू जॉगिंगकडे वळलो. मग ३ ४ महिन्यात ८ किमी एका तासात पोचलो. परंतु मग स्पीड वाढत नाही लक्षात आल अन वजन पण कमी होत नव्हत. म्हणून हल्ली पाय मजबुतीसाठी सर्किट ट्रेनिंग करतोय.

खाणपिण नियंत्रित ठेवतोय, बाहेरच खाण कमीत कमी आणि तळलेल अगदी उपाय नसेल तरच. बस बाकी जास्त नियम नाही. नॉर्मली मी जेव्हा जेव्हा नियम करून खायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा फ़सलोय.

शिवाय, myfitnesspal म्हणून app आहे android वर. त्याची खूप मदत होते.

आणि मला पण whatsapp वर गृपमध्ये घ्या. नंबर: ९०९६७००१४९!!

ये ए ए ए..... सुरुवात!!! आज पासून अर्धा तास !! बैठे उभे जसे जम्तील तसे व्यायाम... पंधरा मिनीटांतच थकायला होतं... काय अवतार झालाय बापरे... एकेकाळी ३-३ किमी न थकता चालत जायचे कॉलेज रोडवर!! आता चार पावलांत धाप लागते. Sad

सूर्यनमस्कार चक्क विसरले.. Uhoh यू ट्यूब झिंदाबाद. टाईम मॅनेजमेंट, सातत्य आणि खाण्यावर कंट्रोल राखला तर पॉझीटीव्ह चान्सेस बरेच आहेत वजन कमी व्हायचे... सकाळी नाश्त्याला बीटरूट, तांबड्या भोपळ्याचा व मिश्र पीठांचा पराठा आणि चहा! गरम पाणी पिणार होते उठल्यावर पण विसरले आज. (सगळं करायला जाणार उत्साहाने, टिकवलं पाहीजे तर खरं!! )

एकमेकांना चीयर पण करा रे हुरूप वाढतो. धन्स लोक्स!!! हा ग्रूप मला मस्त स्लीम ट्रीम करून सोडेल बहुतेक.. स्वीट ड्रीम्स चालतील ना??? Happy

हा ग्रूप मला मस्त स्लीम ट्रीम करून सोडेल बहुतेक.. स्वीट ड्रीम्स चालतील ना??? स्मित >>
Yes , but it will take time .

Let us take it one day at a time .

पहिले १-२ महिने " कर्म किये जा , फल की इच्छा मत कर " Happy

"वजन कमी करायय म्हणून व्यायाम अन डाएट करू नका . व्यायाम अन डाएट नीट करा , वजन आपोआप कमी होईल " Wink

माझे वजन ५-६ किलो जास्त आहे. मी रोज सकाळी ५.०० वाजता पार्वती वर फिरायला जातो. आत्ता पावसामुळे फिरणे बंद आहे. पाऊस थांबल्या वर पुन्हा जाणार आहे. माझे रोजचे फिरणे २ तास होते.

पारले जी तर नावसुद्द्धा काढू नका .>> काखुप्मी मारी ३ अन पारली २ असे रोज खा ते

आज लेकी ला बस मधे सो डुन लांबुन एक मोठा राउंड मारुन घरी आ ले तेवधाच आजचा व्या याम

पहिले १-२ महिने " कर्म किये जा , फल की इच्छा मत कर " >> सुस्कारा सोडणारी बाहुली!!!
केदार, कान उपटच माझे रोजच्या रोज!!

नवर्‍यापासून लपून करावे लागतात हे व्यायामाचे उद्योग!! Sad दात काढून नाउमेद करतो वरचेवर Sad

वरील काही प्रतिक्रियांमध्ये पनीर आणि प्रोटीन्स बद्दल वाचले म्हणून थोड लिहावस वाटल. मासे पनीर चिकन डाळी यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळू शकतील पण त्याचेही प्रकार आहेत. सहज ब्रेक होऊन पचून जातील असेच प्रोटीन्स घ्या. खर तर प्रोटीन्स ची गरज muscle wear and tare झाले कि त्यानंतर परत rebuild करायचे असतील तर किंवा muscle gain (ताकद) हवी असेल तर करावी. Carbohydrates हे आपल्याला लागणार इंधन आहे. दररोज ची काम आणि बाकी धावण पळण यासाठी त्याचा निश्चितच उपयोग आहे. तेव्हा आपापला इंटरेस्ट पाहून निर्णय घ्या. आपला दैनंदिन महाराष्ट्रीयन आहार हा परिपूर्ण आहे. त्यात हवा त्या प्रमाणात दैनंदिन गरजेनुसार आपल्याला कार्ब्स, प्रोटीन्स इत्यादी घटक पदार्थ मिळतात. आवडीनुसार पोळीऐवजी alternate दिवस ज्वारीची भाकरी खाऊ शकता ज्यामध्ये fibers असतात.

बाकी केदार लवकरात लवकर व्हात्स whats app group चालू करा. मला वाटतय कि Max सदस्य संख्या ५० असते त्यामुळे जर लवकर करा प्लीज. दक्षिणा बिझी असतील तर तू ग्रुप चालू करतोस का ? माझा नंबर तुला संपर्कातुन पाठवलाय

दक्षिणाने ऑलरेडी गृप चालू केलेला आहे. तिला लोकं अ‍ॅड करायला जमत नाहिये ती बिझी असल्याने. तिला संपर्कातुन तुमचे नाव आणि नंबर कळवा म्हणजे ती अ‍ॅड करेल.

Pages