चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ड्रिमे यू ट्यूबवर जेसिका स्मिथ चे व्हिडिओज आहेत, डालो करुन घे. सोप्पे आहेत. सहा पावलं मागं पुढं आजू बाजूला इतकी जागा पुरते.

मला सांगा सुरूवात कशी करायची? चालण्याचा व्यायाम पावसामुळे गंडण्याची शक्यता जास्त. घरीच कुठली योगासनं करावीत? कमीत कमी किती वेळापासून सुरूवात करू?
खाण्यात काय काय घ्यावं? (सांभाळून घ्या बालवाडीतील सदस्याला अरेरे ) आरंभशूर हा किताब फार पूर्वीच प्राप्त केल्याने भीती वाटतेय. अरेरे >>>
योगासनांबद्द्ल फारशी माहिती नाही खरच . सूर्य नमस्कारानी मात्र फार फायदा होतो .
सुरूवातीला तर दहा सूर्यनमस्कारात घाम फुटतो Happy
चालणे आपल फेवरिट , कारण कुठेही अगदी घरातही चालता येत , त्यामुळे कुठेही गेला तरी तो चुकत नाही Happy
कुठलाही व्यायाम किमान २० मिनीटे करा . नंतर जमेल तस वाढवत जा .
खाण्याच्या बाबतीत वर लिहिलेले पदार्थ ताबडतोब टाळा अन डाळी , उसळी यांच प्रमाण वाढवा.

ड्रिमे
दर दोन तासांनी खाणं, हलक. रोजच्या आहारात दोन फळांचा अवश्य वापर हवाच.
पैकी पपई/कलिंगड्/पीच्/पेरू/खरभूज्/आलू बुखार इ. वजन कमी करायला अतिशय उपयुक्त.

केदार दक्स धन्स अ टन!!
चलो आजसेही शुरूवात!! पण अधून मधून टोचन देत राहा लोक्स!!! दोन चार दिवसांतच मान टाकतो आमचा फसफसता उत्साह Sad

Mala pan ya group madhe sameel karun ghya..

Mala 20kg vajan kami karayache ahe.. madhe 4.5 kg kami zale hote.. pan punha ekada control sutala.. Sad

आनंदी ,

५०- ६० दोरी उड्या.. १०-१५ मिन चालणे .. पुरेसे नाही ना?
सायकलिंग शक्य नाही.. ४-५ सुर्यनमस्कार ट्राय करत आहे..
अजुन काय करु शकते घरच्या घरी?

>>
माझ्या मते तरी एखादा व्यायाम किमान २० मिनिटे सलग करावा . हळूहळू तो वाढवत न्या .
सुर्यनमस्काराचही तेच . रोज एखादा वाढवत न्या . साधारण १०च्या आसपास सुरूवातीला घामेघूम होत .

मलाही घ्या ग्रुपमधे.
व्हाट्सॅपला पण अ‍ॅड करा केदार.
सुर्यनमस्कार ३० पर्यंत पोचलो आहे रोज. गेल्या महीनाभर फॉलो केलय.
फक्त चहा कमी करणे होत नाही. दिवसातुन ४-५ वेळेला होतोच.
मला स्वत:ला फरक जाणवतोय चांगलाच. बीपी १४० पर्यंत होते (ठराविक इंटरवलने चेक केले होते २-३ वेळेला) ते ११० पर्यंत आले.
३० सु. न सकाळी थोडंसं पाय वर करुन सायकलींग, प्राणायाम हे सकाळी अन संध्याकाळी ४५ मिन्टं अ‍ॅप्रॉक्स वॉकींग. असं रुटीन आहे. वजन कमी होण्याची अपे़षा सोडलीये पण आता आहे तितके तरी काँस्टंट राहावे असे वाटतेय.

मलाही घ्या ग्रुपमधे.
व्हाट्सॅपला पण अ‍ॅड करा केदार. >> ११११११११

मला ही Happy

असं दिसतंय की प्रत्येकाला आपल्याला काय हवंय ते माहिते, कसं मिळवायचं तेही माहिते. फक्त आळस किंवा काही कारणांमुळे ते होत नाहिये. If you do not have that fire in your belly to achive what you want, sorry, no one else can help you !!. कडु डोस वाटेल पण हेच सत्य आहे.

If you are persistent, you will get it. If you are consistent you will keep it. शुभेच्छा सर्वांना! Happy

मला ही ग्रुप मध्ये अ‍ॅड करा
मला पण वजन कमी करायंचय
माझ्या उंचीच्या मानाने वजन खुप वाढलयं Sad
मला हे कळ्तं नाही वजन कमी करायचं असेल तर किती वेळ लागतो
आणि दोन दिवसात ही लगेच वजन वाढत असं का होतं Uhoh

मी पण. माझं टारगेटः

१. उद्यापासून रोज सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार घालणर. मॉर्निंग वॉकला जायची त्या मोकाट कुत्र्यांमुळे सोय नाही. Sad

२. दिवसातून एकदातरी घराबाहेर पडून फिरून येणार. (२४*७ घरकैदी बनून राहणं फार घातक आहे!!)

३. आहारावर नियंत्रण. खूप भूक लागेपर्यंत काही खायचं नाही, हाततलं काम संपू देत मग बनवून घेऊ असा टाईम्पास करायचा आणि सरतेशेवटी भूक काठवली की मॅगी, चिवडा, लोणचं (नुसतं!!!), आईस्क्रीम वगैरे ऑप्शन्स....

४. लंच आणि डिनर हे दोन मीलटाईम वेळेत पाळले जातात. ब्रेकफास्टची वेळ इकडे तिकडे होते, ती योग्य कराय्ची आहे.

५. आहारामधले भाज्या आणी फळांचं प्रमाण वाढवायचं आहे, इकडे ताज्या भाज्या दिसत नसल्यानं फार प्रॉब्लेम होतोय.

bhramar I agree!
but I need push and that's what I am gonna get from this group

after few days, every morning first thing in my mind will be 'exercise'
that is what main motto is.....

je nahi karanar vyayam tyana amhi sodun deu....

I request, plz dnt post such comments which may take our moral down Happy

I hope you understand....

Last two lines are not for bhramar, those are in general for everyone

सूर्यनमस्कार सकाळीच घातले पाहीजेत ना? एखाद्या वेळेस सकाळ चुकली तर रात्री भरून काढू शकते का??
हिप्स आणि थाईज साठी (पियर शेप बॉडीसाठी) योगासने सुचवा रे!!!

लोणचं आणि आईस्क्रीम?
त्यापेक्षा १पोळी आणि बरीच भाजी कधीही उत्तम.
आईस्क्रीम शक्यतो टाळावे

गेल्या ३ महिन्यात मी टाळलेल्या गोष्टी-> आईस्क्रीम, चहा, बटर, चीज़, गोड
वजन १३ किलो कमी झाले
अर्थात चालणे मस्ट

उदय व्हॉट डू यू मिन? Uhoh
मी तर कायम वजन जास्त याच कॅटेगरीत मोडते Proud पण सुदैवाने फार नाही.
मी तर ४० किलो वगैरे ओव्हरवेट सुद्धा पाहिलेत, त्यांच्याकडं पाहिलं की आपण बरे असं वाटतं

सॉरी, मला कुणाचंच 'मोराल' खाली आणायचं नाहिये.

एक सुचवु का? प्रत्येकाने आपापला goal ठरवा आणि त्याला time bound करा. एका कागदावर लिहुन तो कागद आरशाला लावा किंवा तसा वॉलपेपर मोबाईलमधे सेट करा. जेणेकरुन तुमच्या अंतर्मनाला सतत टोचणी असेल की मला हे करायचंय. नक्की कराल तुम्ही सगळे. यात मी पण आहेच. Happy

धन्यवाद केदार.. माझ पण टारगेट कुठेतरी लिह्कित असाव म्हणुन...
१) नो मॅगी,
२) रोज किमान एखादं तरी फळं
३) गोड कमी (आधीच आवडत नाही.)
४) रोज ५ सुर्यनमस्कार पासुन सुरुवात
५) ५० पर्यन्त दोर उड्यांना सुरुवात..
६) घरातल्या घरात निदान २० मिन. चालणे..
७) बेकरी (खारी, बिस्किट) बंद..
८) भात कमी..
९) मोड ई. आहारात वाढवणे..
१०) अजुन व्यायाम प्रकार वाढवणे..
बघु काय होत निदान काय केल पाहिजे हे तर नमुद झाले..

केदार,
मला पण अ‍ॅड करा ह्या ग्रुप मधे....:D
मी सध्या १२ सुर्यनमस्कारांपर्यंत पोहोचलो आहे.
ते पण एका दमात.
संध्याकाळ चे जेवण अतिशय कमी/लाईट घेतो.
<<पाउस असल्याने सुरु झालेला व्यायाम थंडावला आहे
पण ह्याला कंटाळा कारणीभूत आहे खर तर<< अगदी अगदी !!!
६ महिन्यांमधे फक्त ३ किलो उतरले वजन....पण ठीक आहे !!

भात, बिट, साबुदाणा, शेंगदाणे, कॉर्न, पनीर हे बंद केल्यास बराच फरक पडेल.
आणि जे जे खावसं वाटतं आणि वारंवार खाल्लं जातं ते निम्म्यावर आणा.

बाहेर पार्टिला वगैरे जाताना घरूनच बरंचसं डाएटचं खाऊन जायचं. बाहेर खाण्याचं क्रेव्हिंग आपोआप कमी होतं. अगदीच खायचं झाल्यास लिक्विड वर भर द्यायचा.

Pages