बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुगाचे बिर्डे कर ना. चांगले मोड आले की कोमट पाण्यात बुडवून ठेव थोडावेळ. सालं मस्त सुटून तरंगतात. पातेले कलतं करुन पाणी ओतलं की सालं पण जातात बाहेत. अगदी १००% सालं निघालीच पाहिजे असं नाही. थोडी राहिली तरी चालतात .

दोई बेगुन किंवा बघारे बैंगन पण कंसिडर करा .

दाल पालक, मटार उसळ, धानसाक हेही करता येऊ शकेल.
धानसाकचा एव्हरेस्टचा मसाला मिळतो त्यावर कृती असते. त्याप्रमाणे केलं तर मस्त होतो धानसाक प्रकार. भाज्या व डाळ दोन्हीचे काँबो, भात / पोळीबरोबर खाता येते आणि मिडियम स्पाईसी चव.

माझाही एक अनुभव .

लेकाचा पाचवा वाढदिवस घरीच करायचा होता .
त्याचा मित्र परिवार , आमच्या काही मित्र-मैत्रिणि , शेजारी , घरातले नातेवाईक - अगदी वय वर्श २ पासून ७० पर्यन्तची वेरायटी . मित्र परिवारासाठी स्नॅक्सचा प्लॅन पण मग नातेवाईकाना फक्त नाश्त्यावर फुटवता येणार नाही असं मत पडल. २ वेग-वेगळे दिवस प्लॅन करायचा ठरला .
पावभाजी ,पुलाव , गाजर हलवा असा मेन्यु खूपच कॉमन होतो , म्हणून तो नको होता. चिरंजीव आणि त्याचा मित्र परिवार पिझ्झा फॅन. सिनिअर सिटीझन आणि अगदी किल्बिल गट पिझ्झा खातील का? . इतक्या लोकांसाठी पिझ्झा बनवणं वेळखाउ काम .मग काय करावं . घरातल्यांशी सल्ला मसलत करून बेत ठरला आणि हिट गेला Happy

मित्र आणि शेजार्यांची एक पार्टी:
पिझ्झा : नुसता मार्गारिटा टाईप्स , फक्त पिझ्झा स्प्रेड आणि भरपूर चीझ. मिनी पिझ्झा बेस आणले - नॉर्मल साईज नाही . कुमारवयीन लोक स्वयंसेवक म्हणून आले कीचनमध्ये Happy भराभर बनवून आणि तव्यावर चटाचटा तयार झाले.
ईडली-चटणी : ईडल्या अगोदरच तयार करून ठेवल्या होत्या . फक्त आयत्यावेळी गरम केल्या . सिनिअर सिटीझन्स खूश लहान मुलानीही आवडीने खाल्ल्या.
शिरा : साबांच्या हातचा शिरा एक्दम हिट आहे . प्लेट्मध्ये केक व्यतिरिक्त गोड पदार्थही झाला आणि कच्च्च्चीबच्ची मंडळीना ही खाण्यासारख काहेतरी मिळालं .

नातेवाईक :
स्टार्टर्स म्हणून कॉर्न कटलेट आणि कोथिंबिर वडया. ( साबा झिन्दाबाद)
चिकन बिर्याणी ( काही वेज खाणारी लोक होती त्यान्च्यासाठी वेज बिर्याणी) ( ही बाहेरून आणली )
आणि अगदी सुकं सुकं होत म्हणून दहिवडे .( जय माता दी! )

मोजकच खाणं पण पोट्भरीच ,थोडा ऑफबिट मेन्यु , सर्व वयोगटांचा मान ठेवला गेला:) . सगळ्याना जाम आवडला.

स्वस्ति अभिनंदन आणि या मेन्युला मोजकं म्हटलं तर आम्ही काय प्लान करतो त्याला काय म्हणावं बरं याचा विचार करतेय. इतक्या लोकांचा इतक्या प्रकारे विचार केल्याबद्द्ल तुम्हाला (आणि तुमच्या साबांना) एक साष्टांग दंडवत Happy

स्वस्ति, मस्त मेन्यु !! पिझ्झा तव्यावरपण होतो का बेस आणला तर.. का ओव्हन लागतो ?
कॉर्न कटलेटची रेसिपी दे प्लिज..

थँक्स वेका आणि चैत्रा Happy

इतक्या लोकांचा इतक्या प्रकारे विचार केल्याबद्द्ल तुम्हाला (आणि तुमच्या साबांना) एक साष्टांग दंडवत >>> Happy तुम्हाला नकाहो म्हणू !
किचन हे साबांच डिपार्ट्मेंट आहे . मला त्यातल फारस काही जमत नाही आणि रसही नाही .
एका वर्शी असाच अगदी घरच्या घरी वाढदिवस केला , तरीही १०-१५ जण होती .
साबांनी स्वता:च्या हाताने बनवून भरपूर खाउ घालायच्या उत्साहात नको नको म्हणत असतानाही ईतका भरगच्च मेन्यु ठरवला आणि अमलात आणला की संध्याकाळी ७-७:३० पर्यन्त आम्ही कीचनमध्येच आवरत होतो .
मोठी लोक त्यावेळी आवडीने जेवली पण लहान मुलानी मात्र फारस काही खाल्ल नाही . मला जरा वाईट वाटलं
म्हणून यावेळेचा मेन्यु फार ब्रेनस्तॉर्मिन्ग करून ठरवला Happy

पिझ्झा तव्यावरपण होतो का बेस आणला तर.. का ओव्हन लागतो ? >> मी तव्यावरच करते. मावे किंवा अव्हन्मध्ये माझे टेम्प. आणि वेळेचे गणित हमखास चुकते , मग पिझ्झा करपतो किन्व्हा कडक नाहेतर चिवट होतो.

बेसवर टॉपिन्गस टाकायचे , खाली तळाला थोडे बटर लावायचे आणि फ्राय पॅन किन्वा तव्यावर मध्यम आचेवर ठेवायचे. त्यावर झाकण ठेवायचे. ५-७ मि. लागतात. चीज वितळलं किन्वा खालून भाजला गेला की काढायचा. मी यावेळेला मिनी बेस आणले होते , बेकरीत, जास्त पिसेस असतिल तरच ऑर्डरने बनवू साण्गितलं. त्यामुळे अगदी फ्रेश होते , जास्त वेळ लागला नाही पिझ्झा तयार करायला .

कॉर्न कटलेटची रेसिपी दे प्लिज..>> मला साधारण माहित आहे , साबांना डिटेल्स विचारून नक्की टाकेन.

ओके .. Happy

मुलाच्या पाचव्या वाढदिवसाला साधारणपणे २० मोठे, ३० मुले(५-१२ वयाची) आणि १० अगदीच लहान चिल्लीपिल्ली बोलावली आहेत. भेळ, चीज सँडविच आणि कलिंगडाचे तुकडे असा बेत ठरवला आहे. लहान मुलं फक्त सँडविच आणि कलिंगड खातील असं धरलं तर मोठ्यांना आणि मोठ्या मुलांना भेळ किती लागेल? १-१ किलो शेव आणि फ़रसाण पुरेल का? चुरमुरे वजनी किती लागतील? कांदे किती लागतील? कलिंगडाचे सुबक तुकडे करण्याची काही युक्ती आहे का?

cheese croquettes

डिपेंडस ऑन व्हॉट रेड वाईन.
(मी त्या विषयात दर्दी नाही पण मैत्रिण 'बेटी क्रॉकर' वरून अ‍ॅपेटाझयर्स बनवते.)

http://www.savory.tv/food-wine-pairing/ ही लिंक कदाचित उपयोगी पडेल.

रेड वाइन खरेदी झाली नाही. चांगली माहित असेल तर ती ही द्या. भारतात मिळेल अशी. ग्लासेस पण घ्यायचे आहेत. नकटीच्या लग्नाला टाइप तयारी आहे. Wink

चीज कटलेट एक झालं मग बारक्या भाज्या कापून योगर्ट डिप बरोबर द्यावे.
रेड वाइन रेड मीट बरोबर सर्व करायची व स्वीट डिश बरोबर शिराज वगिअरे देतात एव्ढेच प्राथमिक ज्ञान आहे.

वाइन्समधे
इंडियन ब्रॅण्डसमधे ९ हिल्स(सीग्रॅम), इण्डेज वाइन्स, सुला हे ब्रॅण्डस आघाडीवर आहेत. अजूनही आहेत पण आत्ता आठवत नाहीयेत. .
९ हिल्सच्या अक्षरशः डोळे झाकून घ्याव्यात इतक्या बेस्ट आहेत पण.

शिराझ, कॅबरने, कॅबरने सॉविनॉन, मर्लो (हे सगळे फ्रेंच शब्द असल्याने उच्चार वेगळे असू शकतात. पण साधारण या उच्चारांच्या जवळ जाणारी स्पेलिंगे आहेत) हे रेडमधले जनरली चालणारे प्रकार.
यातली एकही वाइन गोड बिड नसते.

वाईनबरोबर चीझ, फळे, सॅलडस आणि स्पेशालिटी ब्रेडस उत्तम जातात.
फिंगर फूड मधे ब्रुश्चेटा करायला सोपा आणि एकदम टेस्टी प्रकार.
पनीरचे तुकडे करून त्याला इटालियन हर्ब्ज चोळून ठेवायचे आणि मग ऑ ऑ मधे शॅलो फ्राय हे पण उत्तम जाते. (देसी असले तरी)
गाजर काकड्यांच्या सळ्या आणि एखादे डिप
चेरी टोमॅटोज आणि चीज टूथपिकला खोचून
पायनॅपल किंवा अ‍ॅपल पिसेस किंवा एकेक द्राक्ष आणि चीज टूथपिकला खोचून

असे बरेच उद्योग करता येतील.

प्लीज वाइनबरोबर नाचोज वगैरे लॅटिनो गोष्टी देऊ नका. मजाच निघून जाते. नाचोज वगैरे हार्ड ड्रिंक्सबरोबरच मस्त जातात.

धन्यवाद. मी पिझा एक्स्प्रेसला घेउन जाणार.घरी करायचा प्रयत्न सोडून दिला. तिथे वरील पैकी एखादी ऑर्डर करेन. आणि ब्रुशेटा. पण नाचोज बद्दल चांगली माहिती. . इथे एक आल्फ्रेडोज म्हणून आहे. तिथे कमाल के नाचोज मिळतात.
ते चीज पायनापल तुकडा ग्रेप्स हे फार पूर्वी केलेले आहे. एकदा परत करून पाहिन. एकदा आमच्याकडे पाहुणे सर्प्राइज व्हाइट वाइन घेउन आले आणि बरोबर हॉट चिप्सच्या तिखट चिप्स. अतिश्य वाइट काँबिनेशन वाटले मला हे. उगीच त्या वाइनचा अपमान केल्यासारखे.

९ हिल्स च्या वायनी मिळतात का बघते.

लिंक बद्दल पण धन्यवाद नोटून ठेवले आहे म्हणजे खरेदी करताना काय घ्यायचे ते कळेल. व डिप करायला घरी मस्त चितळे दही आहेच. वीकांताला करता येइल. वर्किंग डेला तयारी करायला वेळच मिळत नाहिये.

मी बीअर, चिप्स व बटर चिकन रोटी अशी ऑप्शन दिली होती पण रिजेक्ट झाली. साध्या चिवड्यात कांदा कोथिंबीर लिंबू घालून पण अगदी जीवघेणे लागते.

वाईन आणि हॉट चिप्स... अरेरे कॉम्बो आहे.

वाईनची चव अनुभवायची तर बरोबर ओव्हरपॉवरिंग चवीचे काही नको इतके साधे आहे ते.

साध्या चिवड्यात कांदा कोथिंबीर लिंबू घालून पण अगदी जीवघेणे लागते. <<
याच्याबरोबर गारेग्गार बियर.. ओहोहो!

वावे, वजनावर चुरमुरे माहित नाही. पण मापी दुप्पट घेते. १ फुलपात्र शेव असेल तर २ फुलपात्र चुरमुरे असे साधारण प्रमाण मी घेते. (तरला दलाल च्या साईट वर आता पाहिल तर त्यांनी १:४ प्रमाण दिले आहे !!) तेव्हा (इतर कुणी सांगितल नाही तर) गो बाय युअर इंस्टीक्ट म्हणेन Wink

Pages