बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकुचा मेन्यू वाचून मला (पुन्हा) भूक लागली. कुणी हे सगळं ताटात वाढून 'जेवण वाढलंय. आता ये (गिळायला)' असं म्हणेल तर बरं असं वाटतंय. Proud

वाव मस्त सजेशन्स. खूप थँक्स आणि एक हग Happy

वरण भात आहेच, तर वेगळा मसालेभात करावा तरी? किंवा मग म.भात आणि मठ्ठा केला तर वरण भाताला बुट्टी, पण वरण भाताशिवाय असं पूजे चं ताट अपुरं वाटतं.
आज नक्की काय ते फायनल करते.
पातळ भाजीचा मसाला आदल्या रात्री करून ठेवला फ्रीजमधे तर चालेल ना? कारण सक्काळी लग्गेच पूजा गडबड सुरू होईल.

नैवेद्य असेल तर थोडी गव्हल्याची किंवा शेवयाची खीर पण लागेल. एक मूद वरण भाताची एक मसाले भाताची असे नैवेद्याच्या पाना त असेल. वास्तू शांती च्या शुभेच्छा.

अहो आशु तुम्ही नवे घर एंजॉय करा. साधा नैवेद्य करा टेन्शन घेउ नका. मी पण इतके पदार्थ एकावेळी करून जमाना झाला. मदतीला कोणी नसेल तर कसे करणार इतके परत पूजेलाही बसायचे असेल. जबरी मेन्यू आहेत बाकी दोन्ही.

आशू२९,
नव्या घरात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भरपूर सुखसमाधान मिळो.

भाजीचा मसाला आधी करुन ठेवता येइल. बटाट्याची भाजी करणार असाल तर बटाटेही आदल्या दिवशी उकडून फ्रीजमधे ठेवायला हरकत नाही.

आशू२९,
नव्या घरात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भरपूर सुखसमाधान मिळो.
>> +१

ह्या पोस्ट्चा मला पण फायदा झाला कारण मी पण वास्तूशांतीसाठी मेन्यू चा विचार करतच होते Wink
मी शीर्‍यासाठी रवा अद्ल्या रात्री भाजून ठेवीन म्हणते, शिवाय भाजीसाठी बटाटे उकडणं पण. मी अलका मावशीची बटाट्याची भाजी करायचं म्हनते आहे आणि लग्नातल्या आळूच्या भाजीच्या रेसिपीने पालक+केल ची पातळ भाजी. काकडीची कोशिंबीर दाण्याचं कूट, दही घातलेली.
पोळ्या विकत आणणार आणि वरण/आमटी भात.

इथले मेन्यू सजेश्न्स वाचून सॉलिड मजा येते हे खरय.

शुम्पी! हाच सेम मेनु माझ्याकडे गणपतिला होता , केल नव्हता, आणि शिरा + जिलेबी+ मठठा होता.

स्वाती आणि शुंपी थँक्स!
मेनू ठरला.

बटाटा सुका (हिरवी मि, आलं, ओलं खोब्रं), जैन स्टाईल चना मसाला रस असलेला, अवाकाडो+ काकडी कोशिंबीर, वरण भात, शिरा, पोळ्या, पालक भज्जी,पापड, कुरडया वगैरे Happy

चपाती, व्हेज्/नॉन व्हेज करीज, पुलाव, सलाड इ.इ. जेवणाबरोबर अपेटायझर आणि डेझर्ट म्हणून काय करावं? माझ्या वाट्याला तेच आलंय. पण जरा कमी कटकटीचे पर्याय सुचवा.

मी अव्हनमधल्या तंदुर चिकन तंगडी (आणि किंवा) विकतच्या अळूवड्या म्हणत होते. हॉ अबाऊट मँगो पाय फॉर डेझर्ट. ७ मोठे आणि ८ छोट्यांना किती पाय (खायचे ;)) लागतील. फक्त मी ही रेस्पि प्रत्यक्ष करून पाहिली नाही आहे पण एकीने ट्राइड रेसिपी दिलीये. की विकतचं काही आणू?

ओपन टू ऑल सजेशन आणि हल्ला-गुल्ला. डायवर शिकतोय तस्मात आम्ही किचनमध्ये काही डिपार्टमेंटमध्ये कायम शिकत मोडला असतो सो नो हार्ट फिलिंग्ज.

डेव्हिल्ड् एग्ज्

गज्जर का हलवा/रसमलाई/जिलबी/गुलाबजाम्/गुलाबजाम विथ रबडी

इनफिनीट ऑप्शन्स् मिळतील ..

७ मोठे आणि ८ छोट्यांना किती पाय >>>> पाय करणारच असशील तर मिनि पाय क्रस्ट आण. प्रत्येकी १.

अ‍ॅपेटायझरमध्ये सुलेखाताईंचा रविवार स्पेशल ढोकळा कर.

गाडीचा ड्रायव्हर धसमुसळा नसेल तर अ‍ॅपल क्रंबल/ कॅन बेरी (क्रॅनबेरी मिळाली तर बर नाहीतर कुठ्लीही कॅन मधली बेरी) क्रंबल बेक न करता यजमानीणी कडे बेकिंग ट्रेमध्ये घेवून जावी. तिथेच बेक केल तर गरम गरम मस्तं लागतं Happy

(ड्रायव्हर धड नसेल तर ट्रे फुटतो, गाडीत मेस होतो इ इ...)

हो, अ‍ॅपल क्रिस्प + व्हनिला आइसक्रीम मस्त काँबो आहे. सिनॅमन आवडत असेल तर रेडी क्रिस्प वापरू शकतेस.

क्रिस्प करण्याचा काहीच अनुभव नाही पण मिनी क्रस्टच लॉजिक भारी आवडलंय. नाहीतर मां के हाथ का गाजर का हलवा खाऊन खूप दिवस झाल्यामुळे (आणि खिसणं संपूर्ण आउटसोर्स होऊ शकत असल्यामुळे) तो पण ब्येस्ट पर्याय आहे.

ढोकळा या विकेंडला ट्राय मारून जमला तर करेन नाहीतर उगाच वडा. बरं वड्याचं नाव निघालंय तर छोटे बटाटेवडे केले आणि जर गरम राहणार्^या डब्यात ठेवले तर किती आधी केल्यास चालतात? आय क्नो तळण अँड ऑल पण बच्चेकंपनी खाऊ शकेल आणि मोठ्यांना तिखट चटणी बाजुला ठेवली की झालं असा विचार मनात आलाय.

ठ्यँक्स लोक्स.

माझ्याकडे ४ -५ जण जेवायला येणार आहेत. २ लोकांना डायबेटीस आहे, तर मग डेझर्ट म्हणुन काहीच सुचत नाहिये.
काय करता येईल?
आणि बाकी साधच काहितरी पोळी भाजी वैगरे करा अस त्यांच्या सुनेने सांगितले आहे. म्हणुन ताटात डाव्या बाजुला सुरळीवडी किंवा कोबी वडी अस ठेवणार होते. पण बेसन/हरभरा डाळ पण नको अस आज कळाल आहे. त्यासाठी पण एखादा पदार्थ सुचवा

हा हा सशल...

इकडे करावे मनाचे आणि त्या दिवशी आणलेल्या ग्रोसरीचे Wink नैतर नेमका गाजरच विसरायचे किंवा मिनी क्रस्ट्स मग आहेच पुन्हा माकाचु किंवा बेकाक Proud

अनुश्री काहीही वैट वाटून घेऊ नकोस पण डायबेटीस वाल्यांना डाव्या भागात काकडी/सेलरीचे तुकडे आणि लो फॅट कॉटेज चीज बास! डेझर्ट तर नाही दिलंस तरी चालेल तुलाच वैट वाटत असेल तर कमी गोड फळं जसं पेअर वगैरे श्रीखंडाच्या चक्क्यात घालून दिलंस तरी चालेल. बाकीच्यांसाठी श्रीखंड करायची वेळ आल्यावर मी हे केलंय बरेचदा. त्यांना माहित असतं किंव मग गव्हल्याची खीर इतरांसाठी नेहमीची आणि त्यांच्यासाठी शुगर फ्री वापरून. मी शक्यतो शुगर फ्रीचा वापर टाळते पण एक दिवस ठीके.

मला पण तेच वाटत होत की फळ कापून दयावीत त्यांना. कारण दुसर काहीच सुचत नाहिये.
पहिल्यांदाच घरी येतायत आणि वयस्कर पण आहेत ते दोघे.
बाकी लोकांना करेन काहीतरी वेगळ.

वेका,
डेझर्ट म्हणून सीमाच्या रेसीपीने तीरामिसू ट्रायफल कर. आधी करुन ठेवता येते. सांडवासांडवी न होता गाडीतून नेता येते. क्राऊड साठी मस्त! एकदम सोपा प्रकार असल्याने घरातल्या इतर मेंबरांकडे आउटसोर्स करता येतो. Happy

वेका!
अ‍ॅपेटायझर--- ढोकळा, हाण्डवो, मिनि दिप समोसे, दिपची तुवर-लिलवा कचोरी
गोड--- फिरनी, फ्रुट-सॅलेड, डिजेच्या आइच्या रेसिपीने आबा-शिरा,

फळासोबत एखादे लो फॅट- शुगर फ्री असे आईसक्रिम किंवा सोर्बे असलं काही डीस्पोजेबल शॉट ग्लास मध्ये ठेवू शकतो डायबेटीक लोकांसाठी. आवडल पण ए..व..ढं नको म्हणाले तर घेऊन जा बरोबर म्हणून फॉईल लावून देवून टाक Wink

http://www.redbookmag.com/food-recipes/advice/g665/shot-glass-desserts/?...

ही लिंक इन्स्पीरेशन साठी.

Pages