Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजूडे, रेसिपी लिही
मंजूडे, रेसिपी लिही बिनधास्त आणि फोटो नाहीये त्यामुळे टाकता येणार नाही असं ठणकावून सांग, त्यात काय. हल्ली रेसिपीज अशाच पद्धतीने लिहितात
( इच्छुकांना
)
(No subject)
व्हिडिओ टाका आणि लिंक द्या
व्हिडिओ टाका आणि लिंक द्या फोटोसिस्टिम बहुत पुराना होगया.
कॉर्न चाट पाकृ लिवलीय.
कॉर्न चाट पाकृ लिवलीय.
घट्ट पिठले झुणका रात्री करुन
घट्ट पिठले झुणका रात्री करुन डब्यातुन न्यायचा आहे... घट्ट पिठले दीर्घ काळ टिकायला काय करावे ? वड्या करणे , घट्ट करणे , कांदा लसुण न घालता केले तर जास्त टिकते का ?
बेसन भाजून घ्यायचे. जरा जास्त
बेसन भाजून घ्यायचे. जरा जास्त तसेही पिठल्याला जरा जास्त तेल हवे.. फोडणीत तीळ ओवा हळद तिखट (सोसवेल) हिंग कोथिंबीर व बेसन घालावे व त्यात दूध घालावे .... चांगली वाफ काढावी ...
उद्या ७ मोठे आणि ३ लहान
उद्या ७ मोठे आणि ३ लहान जेवायला आहेत.
स्टार्ट - मुगभजी, गाजर सेलेरी रँच डिप, क्रॅकर्स चिज
मेन - चिकन करी करणार आहे बरोबर पोळ्या.
जिरा राईस, दाल माखनी. ३ जे लहान मेंबर त्यांच्यासाठी वेगळी भाजी करीन पनीर वगैरे अशी पण वेळ मिळाला तर.
मला प्लिज अंदाज पाहिजे चिकन किती आणायचे. पहिल्यांदाच इतक्या लोकांसाठी करणार आहे. कॉस्कोतले चिकन कसे असते? रेफ्रिजरेटेड? हलाल मधे जायची हिम्मत नाही व्हायची बहुतेक. आणि किती कसं काय मागयचं तेही कळायला पाहिजे
फक्त बोनलेस ची करी चांगली होते का? की लेग पिसेस ची?
गोड काय करणार??
गोड काय करणार??
चिकन करी लेग पीसेसचीच चांगली
चिकन करी लेग पीसेसचीच चांगली लागते.. शिजतानाच मस्त चव उतरते चिकनची रश्श्यात..
बोनलेस चिकन वापरणार असाल तर बटर चिकन, चिकन पेशावरी चिकन दो प्याजा असले काही तरी ट्राय करा..
अंजली, चिकन करी साठी
अंजली,
चिकन करी साठी ड्रमस्टिक्स आण. माणशी १ किंवा २ असे धर. चिकन ब्रेस्ट वापरणर असल्यास बोन-इन वाले वापर. मॉइस्ट रहाते. बोनलेस वापरायचेच असेल तर बोनलेस थाईज मिळतात.
सीमांतिनी गोड आम्रखंड आहे.
सीमांतिनी गोड आम्रखंड आहे. मैत्रीण आणणार आहे.
धन्यवाद हिम्सकूल आणि स्वाती.
Anjali, If you go to the
Anjali,
If you go to the butcher counter in your grocery store and ask them ( politely) they may cut and clean a whole chicken for you. If your guests are avid chicken eaters and will eat bone-in pieces this is a better option.
If your guests are also newbies and / or prefer boneless chicken I would recommend getting boneless skinless thighs from Costco. Easy to manage during marination and cooking. Plus I think it is easier that drumsticks during serving as well.
For 7 adults, I would use at least 3-4 pounds of chicken.
मी शेवटी आज ब्रेकफास्ट
मी शेवटी आज ब्रेकफास्ट द्यायचा होता त्याला कांदा+मिरच्या+पेपर्स्+झुकिनी+कॉर्न+ अर्ध्यात पनीर आणि अर्ध्यात एग्+चीज असं स्टफिंग करून रॅप्स दिले. फक्त त्याची घट्ट गुंडाळी काही मला मनासारखी जमली नाही.
मेधा धन्यवाद .. येणारी मंडळी
मेधा धन्यवाद .. येणारी मंडळी पट्टीचे चिकन खाणारी आहेत. रादर त्यांच्यामुळेच मी शिकतेय नॉन्वेज बनवायला.
एकूणातच आता बुचर शॉप मधे जायची हिम्मत करायलाच हवी.
होल फूड्स आहे का जवळपास ?
होल फूड्स आहे का जवळपास ? त्यांच्याकडे बोन इन, बोनलेस ब्रेस्ट, थाईज, सर्व प्रकार उपलब्ध असतात. हवं तसं काँबिनेशन करून देतात आणी तुम्हाला हवं असल्यास डीस्किन करून पीसेस करून पण देतात.
प्रॅडी होल फूडस नाही पण काल
प्रॅडी होल फूडस नाही पण काल कॉस्ट्कोच्या ड्रमस्टिक्स आणल्या.
बेतकरांनो - ते उकडलेले
बेतकरांनो - ते उकडलेले शेंगदाणे थेट हाऊस ऑफ कार्ड्स मधे आले की .... अगदी सफेत घरात
(सीझन ३). जियो जियो बेतकरो!! 
Really? I m still not on
Really? I m still not on that episode yet.
well Talya.
एखादी रस्सा भाजी सुचवा प्लीज.
एखादी रस्सा भाजी सुचवा प्लीज. मला सारखी फ्लॉवर-मटार च सुचते आहे.
पाडव्या निमीत्त पॉटलकसाठी.
पनीर ग्रेवी होईल की... भरपूर
पनीर ग्रेवी होईल की... भरपूर प्रकार करता येतील
भरली वांगी, मिरची का सालन ,
भरली वांगी, मिरची का सालन , मुगा मोळो किंवा बिरडं , कमी तिखट मिसळ, पालक / केल चं फदफदं, तुरिया - पात्रा वाटाणा , अवियल, खतखते, लसूणी पालक
बटाट्याचे प्रकार चालणार असतील
बटाट्याचे प्रकार चालणार असतील तर डुबकीवाले आलू, झांसी स्टाईल आलू, आंबट बटाटा करता येईल.
तोंडल्याची रस्सा भाजी, भरली वांगी, पनीरच्या ग्रेव्हीवाल्या भाज्या, टोमॅटो सालन / मिरची सालन, नारळाच्या दुधातील केरळी स्टाईल भाज्या असेही करता येईल.
अळुच्या फदफदं रेसिपीनं
अळुच्या फदफदं रेसिपीनं पालकाची पातळभाजी किंवा मिरची का सालन किंवा अख्खा मसूरला माझं मत
अख्खे मसूर संजीव कपूरच्या
अख्खे मसूर संजीव कपूरच्या रेसिपीने सह्ही होतात आणि करायला अतिशय सोपे आहेत. साबुत मसूर की दाल नावाने त्याच्या साईटवर रेसिपी आहे.
एकजण बटाट्याची सुकी भाजी
एकजण बटाट्याची सुकी भाजी आणणार आहे, त्यामुळे तो बाद. पनीर आणायला खूऊऊऊउप लांब जावे लागते (ऐनवेळी शक्य नाही) म्हणुन ते बाद.
२५ माणसांच बिरडं सोलायला किती वेळ लागेल ??
लसूणी पालक, मिरची सालन, पलकाच फदफदं यापैकी एक करेन.
धन्यवाद मैत्रीणींनो. अजिबातच काही सुचत नव्हतं मला.
संजीव कपूरचे मसूर बघते.
मेधा, तुझे मिरची सालन आमची आई भरली मिर्ची नावाने करते. फक्त चिंच नसते.
मिरची का सालन किंवा अवियल ला
मिरची का सालन किंवा अवियल ला माझे मत. केरळी पद्धतीचा कुर्मा इतर काहीही मेन्यू असेल तरी फिट होवून जातो.
केरळी पद्धतीचा कुर्मा इतर
केरळी पद्धतीचा कुर्मा इतर काहीही मेन्यू असेल तरी फिट होवून जातो. > +१. माईल्ड चवीचा, गारही चांगला लागतो. + भरपूर भाज्या असतातच
२५ लोकांकरता बिरडं सोलायची तयारी आहे म्हणजे सलामच!
नाही, तयारी नाही ... म्हणुनच
नाही, तयारी नाही ... म्हणुनच त्याला बाद केले.
केरळी पद्धतीचा कुर्मा माबोवर आहे का ? शोधते.
मायबोलीवर असेल. वाहशेफ ची
मायबोलीवर असेल. वाहशेफ ची रेसिपी मस्त आहे. अजिबात बिघडत नाही. सापड्ली तर विपूत देते जरावेळात.
ओक्के ...
ओक्के ...
Pages