बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, मिसळीसोबत सांज्याच्या वड्या मस्त लागतील....
गुळाचा सांजा करुन तुप लावालेल्या ताटात थापायचा..वर मस्त ओलं खोबरं पेरायचं...
टिपिकल मराठी मेनु,

कोल्ड कॉफी वुईथ व्हॅनिला आईसक्रीम न चॉको सॉस / चॉको फ्लेक्स
फ्रूट्स + जेली + कस्टर्ड + कपकेकचे पीसेस
फळे + आईसक्रीमचा स्कूप

आणि मग.....

चहा!!! Lol

मैसूरपा देखील छान वाटेल स्वीट डिश म्हणून. रसगुल्ले / सोंदेश मिळत असतील तर तेही चांगले कॉम्बो वाटते. नाहीतर दुधीहलवा / गाजरहलवा आहेतच!

ओ ताई, आईस्क्रीम नी फ्रूट सॅलड वा तत्सम नको म्हणून सांगितलंय ना आधीच.

चहाचा काय प्रश्न नाही. तो अखंड वाहता राहणारच आहे.

अर्धा किलो मटकीचे मोड सहा-सात जणांना पुरतात साधारण- हा माझा अंदाज.>>>> काय बाई पेशन्स आहेत मटकीपासून मोड वेगळे काढण्याचे!!
बरं, मोड काढल्यावर उरलेल्या मटकीचे तुम्ही काय करता?

Proud

मोड काढल्यावर मटकी उरवायची कशासाठी? (प्रश्न नाही कळला). सगळ्याची मिसळ करून टाकायची.

अंदाजापेक्षा जास्त मटकी झाली असेल तर उकडून फ्रीझर मध्ये ठेवायची. नंतर कधी उसळ किंवा आमटी किंवा मिसळ करायची.

मोड काढल्यावर मटकी उरवायची कशासाठी? (प्रश्न नाही कळला). सगळ्याची मिसळ करून टाकायची. >>>> सीमंतिनी, अगं अर्धा किलो 'मटकीचे मोड' पुरतील असं लिहिलंय त्यावरुन मंजूने ती कोटी केली. म्हणजे फक्त मोडच तोडून घ्यायचे का? मटकीचं काय करायचं? असं Happy

Lol Lol

संत्री सोलण्याऐवजी इथं मटक्यांचे मोड काढणं चालू आहे वाटतं. Proud

मिसळीसोबत शिराच पाह्यजे (तो पण सत्यनारायणाचा!!!) अशी डीमांड आज ग्रूप सदस्यांकडून आली आहे. एकदमच सोपं काम झालंय. Happy

नंदिनी Happy
कधी नव्हे ते चान्स मिळतोय म्हणून म्हणून घेतीये एवढच (सिरीयसली घेऊ नकोस Happy ) - मी तर आधीच सांगितल होत शिरा म्हणून Wink (आता लोकांना कोल्हापुरी गुळाची चव माहित नाही म्हणून प्रसाद म्हणतात तर कर प्रसादाचा)

लोक चहाला येणार असले तर मिसळ-पाव + शिरा ठिके. पण जेवायला बोलवल असेल तर मी ह्यात पुलाव्-रायता/ दही-बुत्तीतरी add केली असती.

मंजूडे!!! हद्द झाली बाई. आमच्यावेळी तर हे असं अजिबातमुळीच नव्हतं!

बरं, मोड काढल्यावर उरलेल्या मटकीचे तुम्ही काय करता?>> आम्ही नाऽऽऽ, असं विचारणार्‍या व्यक्तीला दोन धपाटे देतो!! ते शक्य नसेल तर व्हॉट्सॅपवर भयानक स्मायल्या पाठवतो Proud

दोन धपाटे देतो!! ते शक्य नसेल तर व्हॉट्सॅपवर भयानक स्मायल्या पाठवतो >>> Lol

मटकीला मोड आल्यावर ते काढूनच टाकायचे असतील तर आधी ते आणावेत कशाला? Proud
बरं मग त्या मोडांचं आणि भुंड्या मटकीचं तुम्ही काय करता? Lol

बरं मग त्या मोडांचं आणि भुंड्या मटकीचं तुम्ही काय करता? हाहा>> रमड, वाच ना नीट.... मोडांची मिसळ करतो असम पूनमने लिहिलंय.. Proud
म्हणून भुंड्या मटकीचं काय करता असा सोज्वळ प्रश्न मी तिला विचारला तर त्याबदल्यात मला दोन धपाटे मिळाले Sad Wink

लेकाच्या शाळेत सोमवारपासून हेल्थ वीक साजरा करण्यात येणार आहे.

या उपक्रमात सोमवारी प्रत्येकाने टिफिनमध्ये न्युट्रिशियस डीश आणायची आहे. सकाळी ६.३० वाजता तो निघतो. तेव्हा डबा तयार हवा. काही पर्याय सुचवाल का?
मिश्र डाळींचे पराठे व स्प्राउट्स भेळ हे मी या आधी दिले आहे, तेच पुन्हा नको आहे मुलाला. काहीतरी वेगळे, नावीन्यपूर्ण दे म्हणतोय.

ड्रायफ्रुट्सचे लाडू (काजू, बदाम, खारीक, बेदाणे, न खारवलेले पिस्ते एकत्र वाटून) साखर व तेल/तूप काहीच घालावे लागत नाही. असे करते मी, ते कसे वाटतील?

धन्स मंजुडी, फक्त आप्पे पात्र नाहीये, ते आणायला हवं.

सीमंतिनी - रेसिपी पण सांगाल का? किंवा मा.बो. वर असेल तर लिन्क द्या प्लीज.

Pages