बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यु मॉमसाठी मिरची का सालन आणि बिर्याणी हे दोन्ही स्पायसी पदार्थ बाद होतील की. बिचारीला पनीर माखनी खावं लागेल फक्त.

>>न्यू मॉम साठी मुगाचं वरण , पालकाची किंवा इतर पालेभाजी असे काही ठेवता येईल का ?>>
मला करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण न्यूमॉम काही आवडीने खायची नाही. तिला 'अजून थोडे दिवस, बाळासाठी' असे म्हणत पथ्य पाळायला लावलेय. त्यामुळे तिच्या आवडीचे त्यातल्या त्यात पथ्य पाणी सांभाळून करायचे. Happy

उद्या लंचला एक कपल येणार आहे. हे दोघंही पहिल्यांदाच घरी येणार असल्याने जरा व्यवस्थित मेन्यू हवाय. नेमकं उद्या सकाळी मुलाच्या शाळेत व्हॉलेंटअरींगसाठी जायचंय, दुपारी रेल्वे स्टेशनावर साबांना डबा द्यायला पण जायचंय. खूप गडबड आणि धावपळ होणार आहे. आत्ताच त्यांचं यायचं ठरल्याने तयारी पण करून ठेवलेली नाही.
पनीर माखनी (साबांना पण डब्ब्यात देता येईल), एग करी (हे नवर्‍याचं सजेशन आहे), एखादा रायता, स्टर फ्राय किंवा ग्रील्ड व्हेजीटेबल्स (फ्लॉवर, ब्रोकली, बीन्स, गाजर इइ.) फुलके आणि पुलाव... हा मेन्यू खूप ऑड होणार नाही ना?
(नवरा तर आज रात्रीची उरलेली पावभाजी पण असू देत मेन्यू मध्ये म्हणतोय. )

.

छान आहे मेनू अल्पना! जमलं तर एखादं स्टार्टर अॅड कर. पण खूप धावपळ होणार असेल तर नको. पापड / पापड्या / पकौडे तळायचे आयत्यावेळी नाहीतर. गोड पदार्थ ठेवणार आहेस का?

मुलाच्या दुसर्‍या वाढदिवसाला साधारणपणे २५ मुले बोलविली आहेत. त्यात १-२ वर्षाची ६, ३-७ मध्ये ११ आणि ८ मुले ७-९ वयोगटातील आहेत. सर्व वयोगटाला सूट होईल असा काय मेनू ठेवावा? १-२ वर्षाच्या मुलांबरोबर आया पण असतील. याच ग्रुपसाठी पाव-भाजी, पूरी-भाजी याआधी वेगवेगळ्या निमित्ताने झाले आहे (बाहेरून ऑर्डर देवून).

केक, चिप्स ,इडली-चटणी, पुलाव/म.भा.- रायता अस ठेवू का? पुलाव आउटसोर्स करता येईल. सोबत कोल्ड्रिंक.

या आणि याच्या आधीच्या बीबीवरची सगळी पाने वाचून झालीयेत. पण कन्फुजन होत आहे. प्लिज सुचवा.

केक, चिप्स, इडली-चटणी/ढोकळा/दाबेली/ आवड असेल अन करायची असेल तर पुडाची वडी (आता थंडी असल्याने मिळेल कोथींबीर भरपूर)/ बिर्यानी, पुलाव (दाबेली असेल तर), सोबत सार, सूप करता येईल टोमॅटोच वा लाल भोपळ्याचं...

चैत्रगंधा, डोसा गाडी लावणे शक्य असेल तर गरमागरम, ताजे डोसे / उत्ताप्पे + बटाटाभाजी + चटणी असा मेनू ठेवता येईल. सोबत तवा पुलाव. (डोसागाडीवाला कदाचित त्याचीही व्यवस्था करू शकेल)
हवं असेल तर सोबत गरम टोमॅटो सूप.
केक व चिप्स आहेतच!

डोसागाडी शक्य नसेल तर इडली—चटणीसोबत सांबार ठेवा. किंवा मग वेगळे सूप ठेवा. या सीझनमध्ये गार अन्न नको वाटते. सोबत तवा पुलाव बाहेरून मागवू शकता. रगडा पॅटीसचाही पर्याय आहे इडलीचटणी ऐवजी. किंवा छोले भटुरे.

नताशा, माझ्या आईचा पण सेम मेन्यू असतो. (मी वाचली होती पोस्ट. :डोमा:) पण नवर्‍याला तो मेन्यू तितकासा आवडत नाही. त्याची मैत्रिण येणार असल्याने त्याच्या आवडीचा मेन्यू होता. Happy

आम्ही अंडाकरी, स्टर फ्राइड व्हेजीटेबल्स, गाजराची कोशिंबीर, बटाटा-पनीर-कोथिंबीर टिक्की (आप्पेपात्रात शॅलो फ्राय करून), जीरा राईस (जीरे, कांदा, एक मिरची आणि थोडा शानचा बिर्याणी मसाला घालून), काकडी रायता, फुलके असं ठेवलं होतं. आणि चवीला पावभाजीची भाजी पण होती. Happy मला टॉमॅटोचं सार पण करायचं होतं पण नवरा म्हणाला खूप होईल.. इतकं जास्त करायची गरज नाही. नंतर गोडात आईसक्रीम आणणार होता नवरा पण गप्पांच्या नादात विसरला. Happy
जेवणं-खावणं झाल्यावर थोड्या गप्पा मारून आम्ही सगळेच चांदनी चौकात गेलो होतो. तिथे जिलेब्या, रबडी असं गोड (आणि नंतर इतरही बरंच) खाणं झालं. Happy

थँक्स योकु आणि अकु .. Happy

अकु, डोसागाडी लावणे नाही जमायचे, घरातच करणार तर तेवढी जागा मिळणार नाही.
एक बाई आहेत ओळखीच्या, त्यांना ऑर्डर सांगितली की घरगूती चवीचं देतात करून. त्यामुळे आधी करून ठेवता येतील आणि ऐन वेळी गरम करून देता येईल अशा कॅटेगरीतलं चालेल.

रगडा पॅटिस ठेवता आले तर बघा. रगडा गरमागरम या हवेत मस्त वाटतो. किंवा छोले पुरी. गरमागरम बटाटेवडे - चटणीचा बेतही छान जमून जाईल. बवडे सौम्य चवीचे करायचे. सोबत लसणाची चटणी व हिरवी चटणी.

डोसावाला माणूस टेरेस किंवा बाल्कनीतही डोशाची शेगडी लावू शकतो.

नेहेमीच्या पांढर्‍या वाटाण्याच्या रगड्याऐवजी एक नवीन प्रकार खाउन पाहीला त्यादिवशी अकोल्यात... गरम गरम आलूटिक्कीवर चक्क छोले अन बाकी चटण्या, कां-टो-को-हिमी वगैरे. गरमगरम अफलातून लागत होतं... हाही एक पर्याय होऊ शकेल.

उद्या साबा-साबु चा ४० वा लग्नाचा वाढदिवस आहे.. संध्याकाळी सगळे बाहेर जाऊ जेवायला पण दुपारी करु?

दुपारी खूप हेवी लंच झाले तर रात्री बाहेर हॉटेलात जास्त जेवता नाही येणार. त्या दृष्टीने मेनू प्लॅन करा.

राखी, त्या दोघांचे आवडते पदार्थ..
किंवा त्यांच्या लग्नाचाच(त्यावेळी जो होता तोच) मेनु करा..

दुपारी खूप हेवी लंच झाले तर रात्री बाहेर हॉटेलात जास्त जेवता नाही येणार. त्या दृष्टीने मेनू प्लॅन करा.
>>
+१११

एकदमच लाईट्मेन्यु कर!
वन मिल डिश आणि एक गोड काहीतरी!
पुरे इतकंच

उद्या साबा-साबु चा ४० वा लग्नाचा वाढदिवस आहे.. संध्याकाळी सगळे बाहेर जाऊ जेवायला पण दुपारी करु? >> कही करु नका, संध्याकाळी बरोबर असणार आहातच, तेव्हा दुपारी त्यांचे त्यांना बाहेर जाउ द्या.

दाल-बाटी/बाफले, मसालेभात (आवश्यक वाटल्यास) व सोबत रायता, गोड पदार्थांत मूग शिरा / ड्राय फ्रूट्स घालून शेवयांची खीर / फिरनी / पायसम् हा एक पर्याय होऊ शकतो. तरी दाल-बाटी तशी जडच होते.

किंवा साग्रसंगीत जेवण हवे असेल तर हमखास यशस्वी व पारंपरिक महाराष्ट्रीयन मेनू : पुरी, बटाट्याची भाजी / रस्सा किंवा मटकी उसळ, वरण-भात किंवा मसालेभात, पापड-कुरड्या, काकडी-टोमॅटोची कोशिंबीर / रायता. सोबत श्रीखंड / आम्रखंड / बासुंदी / अंगुरमलाई.
लोणचे, चटणी, दही, ताक वगैरे ऐच्छिक.

उद्या दुपारच्या जेवणाकरता (दहा जण. चार तरुण, सहा म.वयीन) मेनू ठरवते आहे. उंधियो, गाजर हलवा सीझनचा करुन झाला आहे. त्यामुळे तो नको आहे.

मेथी मटर मलई, टोमॅटो+बीट सार, रशियन सॅलड (तरला दलाल पद्धतीने), पोळ्या, पुदिना चटणी, काश्मिरी पुलाव हा बेत ठीक वाटतो आहे का? गोड स्वीट बेंगाल मधून काहीतरी.

भाजी अजून एखादी वेगळी सुचवता येईल का?

सायो ची पनीर माखनी>>>>>+१
काश्मिरी पुलावा बरोबर खुप छान लागेल. पण मग टोमॅटो+बीट सार थोडे repetitive वाटेल काय? मग डाल fry कसे जाईल ??

Pages