बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किन्वा खिचडी किंवा साबुदाणा खिचडी
सँडविचेस
बनाना ब्रेड
आलू जिरा (उपासाची बटाट्याची भाजी)ची फ्रँकी वुईथ केचप
आलू पराठे विथ केचप / चटणी / अचार

फिंगर फूड सुचवा. क्रिकेट मॅचच्या वेळेस माईंडलेस मंचिंग साठी. (पॉपकॉर्न सांगू नका.). ३-४ शाकाहारी प्रौढ व्यक्ती.

पालक कबाब, नाचो, इडली फ्राय मस्त! फ्रिटर्स मी केले नाहीत अजून.

शाकाहारी म्हणल तर चिकन टीक्का सांगते... Happy

भाजलेल्या पापडाचे मसाला पापड.
मोनॅको बिस्किटांवर काही टॉपिंग्ज घालून (आधी वेळ द्यावा लागेल मात्र याला)
गार्लिक ब्रेड स्टिक्स
वेगवेगळी फळं बाईट्साईज कापून टूथपिक लावून सर्व करणे (कितीही गेली पोटात तरी चालतीलच)
मिरगुंड असतील तर ते ही धावतील

चिवडा (पातळ पोहे / चुरमुरे / लाह्या), भडंग, कोरडी भेळ, चणे फुटाणे खारे दाणे तिखट दाणे (किंवा खारे / तिखट काजू), सुकामेवा (यात मनुका, बेदाणे, सुके अंजीर, अक्रोड, जर्दाळू जास्त ठेवू शकता)
बटाट्याचा चिवडा
फळांचे काप (सैंधव किंवा काळे मीठ पेरून किंवा नुसते)
पापड्या, कुरडया

अमा, थॅन्क्यु. कलिग्जमध्ये कुणी अंडं न खाणारं वेजिटेरियन आहे का हे विचारायला सांगितलं आहे. त्याप्रमाणे मेन्यु ठरवेन.

सीमंतिनी, मी कालच एका मैत्रिणीकडे फिंगर फूड म्हणून हे खाल्लं आणि फर्मास लागतं.
सालासकट शेंगदाणे २ तास भिजवून कुकरमध्ये उकडायचे आणि मग ते निथळून, त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर घालायचं आणी थोडं मीठ आणि लिंबू पिळायचं..
मजा येते खायला

हे मजेदार आहे! तुम्ही मुली असं धागा पोटेन्शियल मटेरियल वाया घालवता. मस्त 'दाणा चोरगर्म' नाहीतर 'पीनट सॅलड' म्हणून वेगळा रेसिपी धागा काढायचा तर... इथेच! Happy

थँक्यू! नक्की करेन.

मी बरेचदा करते हा शेंगदाण्याचा प्रकार. दाणे उकडुन घेते. कुकरमध्ये २ शिट्ट्यात होतात. गरम असताना चाट मसाला, लाल तिखट, मीठ घालून मिक्स करुन घेते. ऐनवेळी बारीक कोथिंबीर, शेव,लिंबु वरती घालायची. फार मस्त लागते. हे गरम असताना मस्त लागते. या बरोबर उकडलेली कणीस , माल मसाला घालून असतील तर अगदीच मज्जा.
फक्त जरा जपून खावे. Happy

दुसरा एक मेक्सिकन प्रकार , पार्मेजान चीज, टॅको सिझनिंग, जिर्‍याची पावडर, चिली पावडर मिक्स करुन त्यात उकडलेल किंवा भाजलेल कणीस. वरून कोथिंबीर बारीक चिरुन. अतिशय जबरी लागत.
लोक तुटून पडतात अ‍ॅपेटायझर म्हणुन ठेवल तर.

थँक्स सगळ्याना! आमची पूजा सफल ठरली, होम हवन, कार्य आणि स्वैपाक छान झाला होता. चना मसाला तर इतका टेस्टी झाला होता की मी इथे रेसिपी टाकू शकेल "पूजेचा, बिना कांदा लसूण- चना मसाला" Wink Happy

मगज बी,ओलं खोब्रं वापरून केली होती.

ब्रे.फा साठी: आलू टिक्की, कमी तेलाची, विथ पुदिना चटणी. गोरे आणि इंडियन खूप हादडतात असा अनुभव आहे. सारण आदल्या रात्री करून ठेवायचं.

हे दाणे मी पण करते, मस्तच लागतात, उकडलेल्या शेन्गा सारखेच लागतात नुसते किन्वा शुम्पी लिहलय तस जामानिमा करुन पण भारिच लागतात

मी नुकताच एका लग्नात एकदम भारी कॉर्न चाट खाल्ला. घरीही करून पाहिला, एकदम ए१ झाला. पण माझ्याकडे फोटो नाही त्यामुळे पाकृ टाकता येत नाहीये.

सीमंतिनी-
आणखि १ पदार्थ-
कुर्कुरीत मिनी पिझ्झा- थोडिशी पुर्व तयारी-लाल, पांढरा कोबी, कांदा पातीची लसुण, सोया सॉस आणि चिली सॉस घालुन भाजी करुन घ्यवी.
खारी टोस्ट मधले टोस्ट घ्यायचे, त्यावर पिझ्झा स्प्रेड पसरवायचे, त्यावर वरिल भाजी आणि किसलेले चीज घालायचे.
मावे मधे चीज वितळे पर्यन्त गरम करायचे. तवा सुद्धा चालेल.
टोस्ट चा क्रन्च आवडणार्‍यांना नक्की आवडेल.
झाले कि आधी २ तरी खावुन घ्यायचे Happy
नंतर उरतच नहीत Wink

तो चाट की ती चाट? Proud

कृपया कॉर्नचाटची कृती टाकणे. ३ पुडे फ्रोजन कॉर्न संपवणे आहे.

हायला टोस्ट डेंजर दिसतो!! चीज वितळेपर्यंत पण तरी अंदाज ३-४ मिनीट?? (मा.वे वर असत पण तरी विचारते.)
मंजूडी रेसिपी देणे प्लिज. फोटू जाने दो न.

मृण्मयी डिपेन्ड्स ऑन काय चाटणार आहे. ती वाटी चाट, तो पेला चाट आणि ते ताट चाट.

@सी
नाही काही डेन्जेर नाहिये, आपले साधे अमुल चीज क्युब्स- किसुन पसरवायचे आणि (१००%) पॉवर वर १-२ मिनीट..वीतळते चीज.
(मावे साधा आहे..म्हणजे बेकींग वाला नाही...ज्यात अन्न गरम करणे, रवा, पापड भाजणे..तत्सम गोष्टी होतात)

तरीही रेसिपी परग्रहा वरील वाटत असल्यास.. क्षमस्व! Uhoh

Pages