ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ बाई याच्यात खूपच चुका आहेत.
०. जळजळीत कटाक्ष
१. ठेवणीतली मद्याची बाटली
२. दारु पिणार्‍या बायका (नकोत असं सांगितलय ना वर अनेकांनि)
३. मन फुलपाखरासारखे हलके
४. तिरपी नजर
५. गुलाबी ओठ
६. काळीज चिरणारे सूर
७. फसलेले प्रेम
८. मुसमुसत रडणे

हे वरचं काहीहीहीहीही नसलेली गोष्ट हविये

मन फुलपाखरासारखे हलके >>>
तिचे गुलाबकळीसारखे गुलाबी ओठ विलग >>>
.दूर सनईचे सूर तिचे काळीज चिरत गेले>>>
उसवलेले हृदय>>>

लाजो... प्रचंड फाऊल! Proud

Proud

हे वरचं काहीहीहीहीही नसलेली गोष्ट हविये<<

असं आहे का? हरकत नाही... या सगळ्या शब्दांवर बंदी घाला.... Happy

आमचे नायक नायिका घरी आले की रुप बदलातात... बाहेर दाखवायचे आणि घरी खायचे दात वेगळे Proud

घसरलेली गाडी आणा तुम्ही रूळावर Happy

अशा वेळेस तिला कंबरनाथांची आठवण येई. तशीच ती आजही आली आणि ती मनोमन स्वर्गसुखात नाहू लागली. कंबरनाथांनी स्वर्गसुखात नाहायचा प्रश्नच नव्हता. तिच्या मनाचा सुरवंट सी३ए१ च्या उबदार कोषात गुडूप होणार तितक्यात काहीतरी होईल असे तिला वाटले. परंतु तसेच काहीच घडले नाही. दाराची घंटीदेखील वाजली नाही. त्यामुळे ही गोष्ट पुढे चालू राहण्यासाठी आपण कंबरनाथांच्या आठवणीत गढून जाण्याऐवजी काहीतरी सॉल्लिड राडा केला पाहिजे हे तिच्या लक्षात आले. घरी आल्यावरचे खायचे दात वेगळे असल्याने ती त्याच्या जवळ जाऊन मायेच्या सुरात त्याच्या कानात 'I hate you' असे कुजबुजली. तेव्हा काळं कुत्रं सप्तरंगी बोक्याबरोबर विजेच्या खांबावर चढायच्या प्रयत्नात होतं.

ललितकथा लिहिणे हे फारच कठीण काम आहे. इचिभनं! ग्रामीन मातुर येवस्तित यील आपल्याला.

अरारा, इथं पार एस्टीवाय चालूझालं की!!

तिनं त्याला "जेवायला काय?" असं विचारलं. तो म्हणाला "बाहेरून मागव" तिनं त्याच्या हातात फोन दिला "तू मागव" त्यानं नंबर लावला. "रंड पुळिक्कासादम, ओरू तेंगाईसादम, रंड शक्रपोंगल" त्याने ऑर्डर दिली. ती बेडरूममधून बाहेर आली आणि त्याच्या डोक्यात त्याचीच बॅट घातली. "मुडदा बशीवला तुझा. एवढ्या भाताचे काय डोंगर रचणार आहेस?" तिनं विचारलं.

तो रडायला लागला, तिने त्याचा मोबाईल उचलला आणि बाल्कनीमधून खाली फेकून दिला.

फारेंडा Rofl
या लेखाचा बाण लागायचा तिथे कचकावून लागला आहे, अभिनंदन!
प्रतिसादही एकसेएक!
ते 'तरुणानाही लाजवणारे' म्हातारे, उत्फुल्ल तरुणाई वर ही बंदी घाला.

Rofl

चुंबनावर प्रतिबंध नको द्यायला. नाहीतर पर्यायी शब्द द्या. चुंबन बरा आहे (शिवाय ही उपमाही नाही). नाहीतर लोक मुका वापरतील.

गजाभाऊ, चुंबन क्रियेवर प्रतिबंध नको, त्या शब्दावर बॅन हवाय. "मुका" म्हणजे "चुंबन" (यक्क!!) नव्हे.

अरे, दुखत्या नसेवर बोट ठेवलंस! (हे पण चालणार नाही) Lol
आणखी काही -
1. दुपारच्या वेळी नायिका झोपा काढत असताना एक्स बॉयफ्रेंडने बिनडोक सेल्समनसारखे बेल वाजवू नये. दारात कुणीही असो नायिका कपडे सारखे न करताच दार उघडते. इमारतीचे नियम पाळा अनर्थ टाळा.
2. ऐन मोक्याच्या वेळी नातेवाईक टपकले पाहिजेत. मोक्याची व्याख्या आपापली.
3. नायिकेचा शेलाटा तरीही पुष्ट बांधा असल्यास वजन उंची लिहीणे बंधनकारक आहे.
4. गाडीने झोकदार वळण घ्यायचे नाही. त्याचे क्रेडिट रस्त्याला द्या.
5. केस भुरूभुरू उडवायचे नाहीत.
6. नायिकेला तिची मैत्रिण मंडईत भेटणार नाही.
7.एक्स बॉफ्रे वा गफ्रे करंट नवऱ्याच्या वा बायकोच्या हपिसात एकाच सेक्शनमध्ये असणार नाही व गाठीभेटी होणार नाहीत.
8. हातचे सारे गेले तरी नायिका धुणीभांडी, स्वयंपाक आणि शिवणकाम करून मुलाला वाढवणार नाही. ती कंडक्टर, टॆक्सी ड्रायव्हर होईल. इस्त्रीवाली झाली तर मजाच!
9. लग्नाआधीच्या संबंधातून मुलगीही होऊ शकते. कुंती कर्ण बाद.
10. समाप्तीला अश्रू की आनंदाश्रू यावर मौलिक चर्चा करायची नाही.

हाहाहा! मस्त धागा आणि प्रतिसाद!
तळहातावरच्या फोडासारखं जपलं. ई! फोड ही काय जपण्याची गोष्ट आहे!

केस भुरूभुरू उडवायचे नाहीत. >> हायला इथेच मार खाते मराठी हिरोईन.
काळी तेरी गुत वर पंजाबी नायिकेचा हक्क आहे. कुरळ्या केस दाक्षिणात्य मालिनी लोकांची जहागीर आहे. जादू करणारे मोकळे केस बंगाली नायिकेला. येऊन जाऊन उरल काय? तर जसा पदार्थ तयार झाल्यावर कोथिंबीर भुरभुरतो तशी लेखकाच्या मनात मराठी नायिका तयार झाल्यावर तो तिचे केस भुरभुरतो. ते हि बंद म्हणता मग आता केशवपन करायचं का नायिकेच? Wink

अनुदोनचा व्यासंग ताकावर लोणी तरंगावे तद्वत या बाफावर तरंगत आहे.

आता सगळ्यांनी दोन श्टोर्‍या लिवा. एक बॅनर्सकट आणि एक दुपारच्या जेवणानंतर सुपारी चघळत चघळत वाचता येईलशी.

वेडाबाई, डोळ्यांसमोरून झरकन सरकलेला भूतकाळ, चुंबन Biggrin

Kiss शब्द चालतो, आणि अस्सल मातीतला 'चुंबन' हा शब्द चालत नाही म्हणता? मर्‍हाटीचा अशानेच र्‍हास होत चाललाय Proud

गजा, प्रतिशब्द सुचवा. नाहीतर त्याऐवजी जो शब्द येईल तो वाचा. >>> Lol

ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा>> Lol
झक्का म्हणले की झक्की आठवतात >> Lol
उपमा ठोकळा. >>:हहगलो:

लांबसडक मोकळे सोडलेले किंवा कुरळे ह्याशिवाय केसांची काही व्हरायटी असेल तर ती देण्यात यावी.

>>> बरोबरे. पर्मनंट स्ट्रेटनिंग करून सोनेरी स्ट्रीक्स केलेले आउबर्न केस असे म्हणण्यात यावे.

समुद्रकिनार्‍यावरचे सूर्यास्त, पाण्यावर तरंगणार्‍या होड्या, वाळूमध्ये बोटांनी गिरवत बसली होती वगैरे आवरा. पर्सनल यॉट असलेला/ली नायक/नायिका चालेल. यॉटवर सांद्र स्वरातले संगीत आणि वारूणी मात्र नकोत.

Pages