मायबोली टीशर्ट आणि बॅग २०१४

Submitted by टीशर्ट_समिती on 23 June, 2014 - 00:56

तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.

मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.

  1. खिश्यासहित कॉलर टीशर्ट
  2. blue-collar-men-2014.jpg

    कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.

  3. राऊंडनेक टीशर्ट
  4. blue-round-men-2014.jpg
  5. लेडिज व्ही-नेक टीशर्ट
  6. T-shirt-Women-2014.jpg
  7. लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
  8. लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

  9. बॅग
  10. maayboli bag with logo 2014.jpg

    बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.

टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअ‍ॅड्रेस असेल.

** साईज :- **

size chart 1.jpg

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

Meassure.jpg

** टीशर्टांच्या किंमती :- **

price chart 2.jpg

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-


**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**

पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्‍यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

sthal 1.jpg

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.

tsh timing - 2.jpgसर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:

  1. कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
  2. पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.

टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.

ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.

अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्‍यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,

कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

** ऑर्डर कशी नोंदवाल?**

इथे टिचकी मारून

ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.

फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.

काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.

१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०

टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.

यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org

याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.

लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.

महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिमखान्याच्या एंट्रन्सला असेल तर मस्तच. मूव्ह एन पिक चा फ्रॅन्की स्टॉल सुद्धा त्याच बाजूला आहे. मस्त फ्रॅन्की घेऊन खात खात गप्पा होतील.

आता असं म्हणू नका वेल ला काळजी फक्त खाण्याची

मायबोलीवाल्यानु,

चार पावलं मोक्ळ्या हवेत. चाललं तर बिघडणार. आहे का?

मी चार वाजता पोहोचलो तेंव्हा कुणी नव्हते. मी पूर्ण मैदानाला एक फेरी मारली.

शिवाजी पुतळा उद्यानगणेशच योग्य वाटते.

मी २० ला टिशर्ट घ्यायला येऊ शकणार नाहीये. कोणी पार्लेकर/ पार्ल्याच्या जवळपासचे आहे का टिशर्ट घेऊन ठेवायला?
नाहीतर ठाणेकर पब्लिकपैकी कुणीतरी घेऊन ठेवाल का?

सामी योकु नीधप राखी भेटले
राजू७६ शेवटी आले

मुग्धानंदची वाट पाहिली
पण तिला उशीर होणार कळताच जाव लागल

आणि सामीला अनुमोदन
मीनाताई ठाकरे पुतळ्याज्वळ ठेवा कलेक्शन सेंटर
फार वळसा घालून याव् लागत
अर्धी शक्ति तिथेच संपते

>>मी चार वाजता पोहोचलो तेंव्हा कुणी नव्हते. मी पूर्ण मैदानाला एक फेरी मारली.
पण मग नंतर भेटले का लोक ? Uhoh

नी...
तुझे टी-शर्ट्स 'पुण्यात' घेतले तर चालतील का?... मी २०-जुलै ला पुण्यात ताब्यात घेईन, २१-जुलैला मुंबईत घेऊन येईन... मुंबईमधे तू तुझ्या सवडीने माझ्याकडुन टी-शर्ट्स ताब्यात घेऊ शकतेस... बघ विचार करुन...
Happy

विवेक देसाई, मुंबईचे टीशर्ट पुण्यात घ्यायचे म्हणजे डिस्ट्रीब्युशनचा गोंधळ होतो. जरा संयोजकांच्याही सोयीचं होईल असं बघायला हवं. नीधपचे टीशर्ट यादीप्रमाणे मुंबईलाच येऊ देत.

ते माझ्याकडे राहतील. आम्ही दोघी ठरवून भेटू.

विवेक,
मंजू म्हणतेय ते बरोबर आहे. डिस्ट्रिब्युशनमधे गोंधळ व्हायला नको. त्यासाठीच मी मुंबई/ ठाणेकरांनी घेऊन ठेवा म्हणले.
माझ्यापर्यंत टिशर्ट पोचण्यासाठी दुसर्‍या देसायांना कामाला लावलंय. ते रोज येतात पार्ल्यात. Happy

छे विचारून काय होणार?
आण्णांना ऑब्झर्व्ह करा म्हण!! Wink

@मंजूडी आणि नी...
ओक्के... हरकत नाही... कूट-प्रश्नाचं उत्तर सापडणं, म्हत्वाचं होतं एवढंच... Wink

माझ्यापर्यंत टिशर्ट पोचण्यासाठी दुसर्‍या देसायांना कामाला लावलंय....>>>... म्हण्जे - थोडक्यात 'नी पुण्यात', 'टी-शर्ट कलेक्शन ठाण्यात', आणि 'टी-शर्ट डिलेवरी पार्ल्यात' असा प्रकार होणार तर... Proud ...

अण्णा अजुन व्यवस्थित रीत्या कार्यरत झालेले दिसत नाहीत... मागच्या आठवड्यात म्हणे अण्णांचे प्रकॄति अस्वास्थ्य चाळवलेले होते, त्यामुळे अण्णांंना आजुन 'ववि-ताप' चढलेला दिसत नाही... Proud

योकु आणि वल्लरी कुठल्या ड्रिमगर्लला भेटले? दोन ड्रिमगर्ल आहेत का माबोवर? Uhoh मी चार वाजल्यापासून जिमखान्याजवळ टीपी करत होते... पाच वाजेपर्यंत मुलगा खेळून दमला मग राखी आणि नंतर आलेल्या लगोंना भेटून साडेपाच च्या दरम्यान निघाले.
मुंबईकरांनी २० ला तरी वेळ ठरवा म्हणजे भेटता येईल...

ड्रीमगर्ल - मी नाही तुला भेटले. मी निघाल्यावर तू आलीस असं योकुच म्हणणं पडलं. जाउ दे ग त्याने शेवटच्या क्षणाला जबाबदारी घेतलेली, मग थोडी जरा गडबड होणारच ना... घोळ...

नी, मला ड्रीमगर्ल बोलली तसं. सामीशी सुद्धा बोलणं झालं.
पण योकु म्हणाला ड्रीमगर्ल मी गेल्यानंतर आली. घोळ योकु घालतोय..मी नाही काही. घोळ घोळ घोळ... आणि तो घोळ का घालत असेल ह्याची मी कारण मिमांसा करते आहे...

योकु - इस घोळ का कारण क्या है? नागपूर कारण है या अण्णासे फोनपे बात करके घोळ करनेका इन्फेक्शन लगा?

लगो, गणेश मंदिरासमोर बसून चिकन फ्रॅन्की खायला बरं नाही वाटणार हो. आणि एक फ्रॅन्की जास्त खावी लागेल पार्काला फेरी मारायला लागली तर. म्हणून म्हणतेय जिमखान्याच्या बाजूला भेटूया.

चिकन ?

घरे रविवारे पराथे काउन माझी सुगर वाढली होती.

म्हणुन मैदान समोर. दिसल्यावर मुकात्याने एक. फेरि मारली.

कुठेही बसलो तरी म्या चिकन फ्र्यान्की खानार नै

मुळात आण्णांच्या घोळामुळेच योक्या आला होता तिथे. तेव्हा तो घोळदारपणा करणार हे आलंच की नाही ओघाने! >> Lol
चिकन फ्र्यान्की>> मी मिसली.. सायबिणीत फिश चापल्यामुळे!! Sad २० ला कसर भरून काढावी Happy

हे राम काय गोंधळ चालू आहे इकडे, काहीच कळत नाहीये.
माझा एक सरळ साधा प्रश्न आहे त्याचे साधे सरळ उत्तर द्या पाहू.
पुण्यात शर्ट्स केव्हा आणि कुठे मिळणार आहेत ?

माझा एक सरळ साधा प्रश्न आहे त्याचे साधे सरळ उत्तर द्या पाहू.
पुण्यात शर्ट्स केव्हा आणि कुठे मिळणार आहेत ?>>>

महेश, लक्षपूर्वक या बाफचे हेडर वाचलेत तर टीशर्ट वाटप कधी हे कळेल.

Pages