तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.
- खिश्यासहित कॉलर टीशर्ट
- राऊंडनेक टीशर्ट
- लेडिज व्ही-नेक टीशर्ट
- लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
- बॅग

कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.


लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.
टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअॅड्रेस असेल.
** साईज :- **

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

** टीशर्टांच्या किंमती :- **

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-
**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**
पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
सर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:
- कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
- पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.
टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.
ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.
अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,
कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
** ऑर्डर कशी नोंदवाल?**
ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.
काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.
१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०
टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.
यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org
याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.
लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.
महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..
संयोजक (मुंबई), मी नोंदविलेली
संयोजक (मुंबई), मी नोंदविलेली ऑर्डर (टी०शर्ट -१ व बॅग्स -२) जाई. माझ्यावतीने स्विकारेल. धन्यवाद.
punyatalya lokani mala bhetun
punyatalya lokani mala bhetun java
-hukumawarun!
रीया... पुण्यातल्या एकूण किती
रीया...

पुण्यातल्या एकूण किती मेंबर 'जावा' आहेत...?...
>>टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या
>>टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.
ओके, पण वेळ दिलेली नाहीये.
मी नातेवाईक हा पर्याय निवडला आहे आधीच,
समजा काही कारणाने त्यादिवशी कोणीच जाऊ शकले नाही तर काय ?
रीया, पुण्यातल्या लोकांनी
रीया, पुण्यातल्या लोकांनी तुला भेटून जावा ---

पण काय ? जावा शिका ? जावा शिकवा ?
जावा के साथ तुम्हारा बहोत याराना लगता हैं
रीया, पुण्यातल्या लोकांनी
रीया, पुण्यातल्या लोकांनी तुला भेटून जावा ---

पण काय ? जावा शिका ? जावा शिकवा ?
जावा के साथ तुम्हारा बहोत याराना लगता हैं
समजा काही कारणाने त्यादिवशी
समजा काही कारणाने त्यादिवशी कोणीच जाऊ शकले नाही तर काय ?...>>>... तर, टी-शर्ट समिती मधील संयोजकांशी संपर्क साधून(ववि-२०१४ पार पडल्यावर) आपले टी-शर्ट, आपण स्वतः न्यायची व्यवस्था करावि लागेल...

वि.दे. - धन्यवाद, पण २०
वि.दे. - धन्यवाद,
पण २० जुलैला किती वाजता यायचे आहे कलेक्शनसाठी ?
रविवार दि. २०-जुलै-२०१४ रोजी
रविवार दि. २०-जुलै-२०१४ रोजी संध्याकाळी ०५.०० ते ०७.३० या वेळेत येऊन आपले टी-शर्ट ताब्यात घेऊ शकता...

आम्ही सगळे(च) तिथे हजर असणार आहोत...
punyatalya lokani mala bhetun
punyatalya lokani mala bhetun java
रियाकडून सर्वांना बर्गर किंवा पिझ्झा फ्री फ्री फ्री (अधिकृत घोषणा )
वि.दे. - धन्यवाद ! कोणाला तरी
वि.दे. - धन्यवाद ! कोणाला तरी देतो धाडून !
पण येऊन केवळ नाव सांगून चालणार आहे की ओळख पटविण्यासाठी काही आणणे आवश्यक आहे. उदा. माबो आयडीचे ओळखपत्र प्रत, पैसे भरल्याची काही माहिती, इ.
माफ करा खुप प्रश्न विचारतो आहे त्याबद्दल, पण असे नको व्हायला की तिकडे गेल्यावर कळायचे की अमुक तमुक गोष्टीची पुर्तता केलेली नसल्याने लगेच देऊ शकणार नाही.
किरण उगाच? जावासे बोहोत
किरण
उगाच?
जावासे बोहोत पुराना याराना है ओ! आय लव्ह जावा.
असो!
मी असेन त्या दिवशी टी शर्ट वाटायला.. काळजी नका करू
...की ओळख पटविण्यासाठी काही
...की ओळख पटविण्यासाठी काही आणणे आवश्यक आहे...>>>... एक करा - जी कुणी व्यक्ती तुमचे 'टी-शर्ट' ताब्यात घ्यायला येणार आहे, त्याची/ तिची थोडक्यात माहिती (नांव आणि भ्रमण-ध्वनी क्रमांक) संयोजकांपैकी कुणालाही 'समस' करा. समस मधे तुमच्या तर्फे 'ती व्यक्ती टी-शर्ट स्विकारेल' असे लिहा... तुमचा संपर्क क्रमांक कुणाजवळ असण्याची शक्यता कमी असल्यामुळे, समस खालि तुमचा 'मायबोली-आय्डी' (अर्थातच 'महेश') लिहा... तुमचे 'टी-शर्ट' संबंधीत व्यक्ती जवळ सुपुर्द केले जातील... समस शक्यतो रविवार २०/जुलै/२०१४ ला दिवसभरात केलात तर तुमचे 'टी-शर्ट' संबंधीत व्यक्ती जवळ देणे सोपे होईल, जेणेकरुन 'टी-शर्ट' ताब्यात घेणार्या व्यक्तीचा वेळ वाया जाणार नाही...

@रिया... मी असेन त्या दिवशी
@रिया...

मी असेन त्या दिवशी टी शर्ट वाटायला...>>>... तेव्हढीच 'हळदी-कुंकू'ची प्रॅक्टिस होईल... असंच ना.!!!...
वि.दे. - धन्यवाद !
वि.दे. - धन्यवाद !
मी अणि आमचे बाळ येणार आहे.
मी अणि आमचे बाळ येणार आहे.
२० ला मला येता येणार नाही .
२० ला मला येता येणार नाही :-(. कुणी माझे टीझ आणि बॅग कलेक्ट करू शकेल का?
सामी, मग ववि च काय ?
सामी, मग ववि च काय ?
सामी - मी करू का?
सामी - मी करू का?
वेल, थॅन्क्स ग. अग राखी
वेल, थॅन्क्स ग. अग राखी तिच्या कडेच ठेवतेय , तिच्याशी बोलणे झाले.
नवी मुंबई तुन कोणी आहे का
नवी मुंबई तुन कोणी आहे का कलेक्ट करणार तर प्लिज माझी बॅग करणार का??
मला २० तारखेला कदाचित जमणार
मला २० तारखेला कदाचित जमणार नाही .
पुण्यातून माझे २ टी शर्ट घेऊन ववि दिवशी मला कुणी देऊ शकेल का प्लीज ?
केदार, मी घेईन.
केदार, मी घेईन.
मल्ल्या,नुसते घ्यायचे नाहीयेत
मल्ल्या,नुसते घ्यायचे नाहीयेत तर द्यायचे पण आहेत..
मल्ल्या,नुसते घ्यायचे नाहीयेत
मल्ल्या,नुसते घ्यायचे नाहीयेत तर द्यायचे पण आहेत..
अरे हो, दुसरा पार्ट मी वाचलंच नव्हतं...
केदार, मी माझ्याकडे घेऊ
केदार, मी माझ्याकडे घेऊ शकते
हवं असल्यास मधे एकदा सांगवीत भेटुन परत देऊही शकते नाही तर वविच्या दिवशी आहेच
navyaa mumbaitum mi gheu
navyaa mumbaitum mi gheu shaken.. tasaa mesej raaju76 la paathav .
माझी बॅग घेणे व वविचे पैसे
माझी बॅग घेणे व वविचे पैसे भरणे हे स्नेहश्री करणार आहे. (ठाण्यात)
ओके पाठवते.
ओके पाठवते.
अरे कशाला त्रास घेताय.. जे
अरे कशाला त्रास घेताय.. जे येणार नाहीत त्यांचे टी-शर्ट माझ्याकडेच राहतील... अजून संभाळून ठेवलेत दोन वर्षांपासूनचे..
Pages