तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.
- खिश्यासहित कॉलर टीशर्ट
- राऊंडनेक टीशर्ट
- लेडिज व्ही-नेक टीशर्ट
- लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
- बॅग

कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.


लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.
टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअॅड्रेस असेल.
** साईज :- **

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

** टीशर्टांच्या किंमती :- **

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-
**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**
पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
सर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:
- कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
- पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.
टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.
ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.
अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,
कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
** ऑर्डर कशी नोंदवाल?**
ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.
काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.
१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०
टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.
यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org
याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.
लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.
महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..
Please udya paryant mudat
Please udya paryant mudat vadhavnar ka sameetee? Kahee apariharya karanane jamale nahee velet order dyayala....
पेमेंट करायला गेल्यावर नक्की
पेमेंट करायला गेल्यावर नक्की किती रक्कम हे शोधणे आले. तर त्यासाठी माबो लॉगिन करुन या धाग्यावर येऊन पहावे लागले. पुढच्या वर्षीसाठी - जेव्हा ऑर्डर कन्फर्मचे इमेल येते त्यातच टोटल किती अमाउंट होते हे लिहुन आले तर चांगले ( इन्व्हॉइस प्रमाणे ) <<< सावली, हो. अनुमोदन. हे लिहायचं सकाळीच मनात आलं होतं. पण वाटलं, किती त्रास द्यायचा टी-शर्ट समितीला...
(माझ्या अंदाजाप्रमाणे यासाठी ऑर्डर द्यायचा जो फॉर्म आहे त्याचे डिझाईन आणि कोडींगच पार बदलावे लागेल.)
तुमची सूचना आम्ही पहिल्या
तुमची सूचना आम्ही पहिल्या वर्षीच अॅडमिनला सांगितली होती. पण टेक्निकली शक्य नसल्यामुळे तसे केलेले नाही..
टीशर्ट समिती, ऑनलाईन
टीशर्ट समिती, ऑनलाईन पेमेंटसंदर्भात ईमेल मला अजून आली नाही (स्पॅम फोल्डर चेक केले आहे).
वर सांगितल्याप्रमाणे ऑर्डर नोंदवून अजून २४ तास झाले नाहीत पण ते होईपर्यंत पैसे भरायची मुदत उलटून जाईल
महत्त्वाची सूचना - टी-शर्ट
महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..
डिटेल्स आत्ता मिळाले. ऑनलाईन
डिटेल्स आत्ता मिळाले. ऑनलाईन पेमेंट केलं आहे, त्याचा स्क्रीन शॉट पण पाठवला आहे. धन्यवाद.
डिटेल्स आत्ता मिळाले.. ऑनलाईन
डिटेल्स आत्ता मिळाले.. ऑनलाईन पेमेंट केलं आहे.. त्याचा स्क्रीन शॉट पण पाठवीला आहे.. धन्यवाद..
ऑनलाईन पेमेंट केलं आहे,
ऑनलाईन पेमेंट केलं आहे, त्याचा स्क्रीन शॉट पण पाठवला आहे. धन्यवाद.
टी शर्ट समीती नोंदवली ओर्डर
टी शर्ट समीती नोंदवली ओर्डर मेल ची वाट पाहात आहे.
मी पण ऑर्डर नोंदवलीये काल.
मी पण ऑर्डर नोंदवलीये काल. मेलची वाट बघत आहे.
घारूअण्णा, नीरजा, तुमच्या
घारूअण्णा, नीरजा, तुमच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत, धन्यवाद
मंडळी, ऑर्डर्स घ्यायचे आता थांबवत आहोत. दरवर्षी आपण देता तसाच यावर्षीही भरघोस प्रतिसाद मायबोली टीशर्ट्स आणि बॅग्ज यांना दिलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
जे प्रत्यक्ष पैसे भरणार आहेत त्यांना आता त्या त्या ठिकाणी उद्या भेटण्यास उत्सुक आहोत
कृपया सुट्टे पैसे आणावेत
-टीशर्ट समितीतर्फे.
Change will not be given to
Change will not be given to you, but you will have to bring change !
सांगा पाहू हे वाक्य कोणत्या विचारवंताचे आहे ?
कंडक्टर जुना है यह
कंडक्टर
जुना है यह
धन्यवाद टीशर्ट समिती.
धन्यवाद टीशर्ट समिती.
>>कंडक्टर फिदीफिदी >>जुना है
>>कंडक्टर फिदीफिदी
>>जुना है यह
येस जुना है पण येथे टीशर्ट समितीचे वाक्य आहे हे
म्या उद्या येनार आहे
म्या उद्या येनार आहे
दादरला माझा पैला नंबर. लवकर
दादरला माझा पैला नंबर. लवकर या.
टी-शर्ट समिती, माझे टी-शर्ट्स
टी-शर्ट समिती, माझे टी-शर्ट्स इन्द्राला घेऊन ठेवण्याची विनंती केली आहे.
पैसे भरले. धन्यवाद.
पैसे भरले. धन्यवाद.
पैसे भरले. लगो... हॅ!!
पैसे भरले.
लगो... हॅ!! समोरच्या कोनाड्यात हुभी ह्विंदमाता आणि माझा नंबर पयला
ड्रीमगर्ल दादरला गेली होतीस
ड्रीमगर्ल दादरला गेली होतीस काय? किती वाजता?
वेल, तू गेल्यावर लगेच ती आली
वेल, तू गेल्यावर लगेच ती आली
काल दादर चा कट्टा एकदमच शांत
काल दादर चा कट्टा एकदमच शांत शांत होता. पहिल्यांदाच हा अनुभव घेतला. माबो करांना पहिल्यांदा एवढ्या कमी संखेने आणि शांत बघितले.
अरेरे. कोणा दुसर्यावर माझं
अरेरे. कोणा दुसर्यावर माझं काम टअकू शकले असते तर ड्रीमगर्ल आणि सामी दोघींना भेटले असते.
माबो करांना पहिल्यांदा एवढ्या
माबो करांना पहिल्यांदा एवढ्या कमी संखेने आणि शांत बघितले. >>> तिथले उदबत्तीवाले काका पण काल मनोमन हेच म्हणाले असतील
वेल , अग भेटू २०
वेल , अग भेटू २० तारखेला.
संयोजक, भेटायचे ठिकाण शिवाजी पार्क च्या एन्ट्रन्स ला नाही चालणार का? गणेश मंदिरा साठी संपूर्ण वळसा घेऊन जावे लागते..
काल गडकरीला देखिल रस्त्यावर न
काल गडकरीला देखिल रस्त्यावर न जमावं लागता आत भेटता आलं. आतमध्ये अजिबात गर्दी नव्हती. फक्त माबोकर्सच होते त्यामुळे निवांतपणे गप्पा झाल्या. सर्वांनी एक्झॅक्ट सुट्टे पैसे आणले होते
अरे हा! ते उदबत्ती॑वाल्या
अरे हा! ते उदबत्ती॑वाल्या काकांना मिसलं की! पण लोक्स जास्त नव्हतेच मुळी...
ऑनलाईनचा ऑप्शन आल्यामुळे
ऑनलाईनचा ऑप्शन आल्यामुळे सगळ्यांनीच त्याचा फायदा घेतला असणार..
आता शर्टवाटपासाठी तरी हा ऑप्शन नको यायला.. नाहीतर माबोकर कायमचे वर्चुअलीच भेटत राहतील
वेल अगं मी ५ वाजता बरोब्बर
वेल अगं मी ५ वाजता बरोब्बर आलेले. मी आले तेव्हा राखी होती फक्त आणि नंतर लगो आले माझ्या मागोमाग. मुलगा कंटाळलेला म्हणून फार वेळ नाही थांबले. सव्वा पाच साडे पाचला लगेच निघाले.
योकु नाही वेल उशीरा आलेली ना?
वेल , अग भेटू २० तारखेला. >> टायमिंग टाका या धाग्यावर. त्या दरम्यान येता येईल म्हणजे भेटता येईल
संयोजक, भेटायचे ठिकाण शिवाजी पार्क च्या एन्ट्रन्स ला नाही चालणार का? गणेश मंदिरा साठी संपूर्ण वळसा घेऊन जावे लागते..>> हो आम्ही जिमखान्याजवळ बराच वेळ बसून होतो... तिथून मग वळसा घालण्यापेक्षा पार्कातून मधून आलो पण बॉल लागेल याची धाकधूक होतीच... जर जिमखान्याच्या एन्ट्रन्स ला बस्तान हलवणार असतील तर काय ते ठरवा आणि इथे टाका...
Pages