तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.
- खिश्यासहित कॉलर टीशर्ट
- राऊंडनेक टीशर्ट
- लेडिज व्ही-नेक टीशर्ट
- लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
- बॅग

कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.


लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.
टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअॅड्रेस असेल.
** साईज :- **

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

** टीशर्टांच्या किंमती :- **

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-
**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**
पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
सर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:
- कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
- पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.
टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.
ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.
अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,
कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
** ऑर्डर कशी नोंदवाल?**
ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.
काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.
१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०
टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.
यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org
याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.
लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.
महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..
तुम्ही कॅडबरी...तर आम्ही भजी
तुम्ही कॅडबरी...तर आम्ही भजी खाल्ली.
काका,आम्ही फुकटचा वडापाव आणि
काका,आम्ही फुकटचा वडापाव आणि कटिंग चहा पण हाणला बरं.
अरे वा! मस्तच की, मयुरेश!
अरे वा! मस्तच की, मयुरेश!
काका,आम्ही फुकटचा वडापाव आणि
काका,आम्ही फुकटचा वडापाव आणि कटिंग चहा पण हाणला बरं.
पहिल्यांदाच कोणीतरी संयोजकान्ना पार्टी दिली. कित्ती भर भरुन आलेलं काल आम्हाला...
कित्ती भर भरुन आलेलं काल
कित्ती भर भरुन आलेलं काल आम्हाला.....>>>अगदी.. ऊतू जायचं फक्त बाकी राहिलं होतं.
पण आम्हाला खायला घातलेला एक जुनाजाणता वविसंयोजकच होता. सो त्याला कदर होती संयोजकांची
पण मल्ल्या,तू तर वेगळी चूल मांडुन बसलेलास..
तुला पण फोक्कटका मजा चखनेको मिला क्या? 
संयोजक आणि श्यामली, आय एम सो
संयोजक आणि श्यामली, आय एम सो सॉरी
मी आजारी आहे
तापाने बेजार. अगदी ४ वाजता तयार होऊन बसलेले मी पण घरातुन बाहेर पडवत नव्हतं मग आदितीला फोन करुन सांगितलं की मी येत नाहीये. हिम्याला फोन करत होते प्ण माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय त्यामुळे नंबर सोबत नेमकं काय होत होतं ते कळालं नाही आणि फोन लागला नाही.
मी मज्जा मी आणि कॅडब्री मीस केली 
पण मला यायचं होतं
असो! आय होप की ववि पर्यंत बरी होईन नाही तर बसमधे शांत धिंगाणा न करता बसलेली रीया पहावी लागेल सगळ्यांना
सतिश तुम्चे टी शर्ट माझ्याकडे
सतिश तुम्चे टी शर्ट माझ्याकडे आहेत. मी मुलुंड आणि विक्रोळी इथे असते.
मी आजारी आहे अरेरे तापाने
मी आजारी आहे अरेरे तापाने बेजार.
तापाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
अरेरे... कित्ती वाईट दिवस आलेत.... तापाचे...
चहा-सदरा समितीला काही
चहा-सदरा समितीला काही जादुटोणा येतो का? दरवर्षी ठरवुन माझेच चहा सदरे कसे गायब करतात कोण जाणे...अजुन गेल्या वर्षीचे सदरे मिळाले नाहीत अन या वर्षी देखील माझाच सदरा पार्कापर्यन्त पोचला नाही....:-(
गिरी
गिरी
पहिल्यांदाच कोणीतरी
पहिल्यांदाच कोणीतरी संयोजकान्ना पार्टी दिली. >> मल्ल्या, मागच्या वेळी एकदा मी वडे आणलेले बरं. विवेकदादांना विचार.
गिरीविहार, तुला काय साईझचा
गिरीविहार, तुला काय साईझचा टी-शर्ट लागतो??? ४४ असेल तर जाई. कडे असलेला मी नाही घेत, तू घे.
गिरीची ऑर्डर कॉलर टी-शर्टची
गिरीची ऑर्डर कॉलर टी-शर्टची आहे..
धन्यवाद भ्रमा, पण मला ४२ चा
धन्यवाद भ्रमा, पण मला ४२ चा टी-शर्ट लागतो...बघतो आता काय करायचे ते....
संपादित...
संपादित...
पहिल्यांदाच कोणीतरी
पहिल्यांदाच कोणीतरी संयोजकान्ना पार्टी दिली. >> मल्ल्या, मागच्या वेळी एकदा मी वडे आणलेले बरं. विवेकदादांना विचार.
या वेळेसही मी विचारलेले ना. 
हो हो.. ते कसं विसरीन?
संयोजक, मी मेल केलाय तसा पण
संयोजक,
मी मेल केलाय तसा पण ईथे शेअर केल्याशिवाय राहावत नाहीये, खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.
काल गडकरीला सगळ्यांना भेटून खूप छान वाट्लं , गरमा गरम वडे आणी भजी पण एक्दम मस्त होत्या :-), धन्यवाद मन्जु डि यांचे
घरी सगळ्यांना टी शर्ट्स आणी बॅग्ज खूप आवड्ल्या, मला २ एक्स्ट्रा बॅग्ज अजून हव्या आहेत आणी संयोजकांपैकी एकाला (नाव लिहीणं योग्य वाटत नाहीये) मी चुकून घारुअण्णा समजून मेसेज केला होता त्यांनी सान्गितल्यानुसार पैसे ऑल रेडी ट्रान्सफर केले आहेत. ववि ला येतांना मिळाल्या तरी चालतील
गरमा गरम वडे आणी भजी पण एक्दम
गरमा गरम वडे आणी भजी पण एक्दम मस्त होत्या >>>>मी हे मिस केलं.
मलापण बॅग पाहिजे आहे. आता मिळु शकते का?
जिप्स्या, तू गेलास आणि लली
जिप्स्या, तू गेलास आणि लली वडे-भजी घेऊन आली
सॉरी!!
मी फक्त पैसे दिले.
@संदिप एस... ...आणी
@संदिप एस...

...आणी संयोजकांपैकी एकाला (नाव लिहीणं योग्य वाटत नाहीये) मी चुकून घारुअण्णा समजून मेसेज केला...>>>...
अण्णा तिथे आनंदाने उड्या मारत आहेत, आणि ज्याला तुमचा 'स-म-स' गेला, तो सोटा घेऊन तुम्हाला शोधतोय... असं आत्ताच कानावर आलंय...
जिप्स्या, तू गेलास आणि लली
जिप्स्या, तू गेलास आणि लली वडे-भजी घेऊन आली>>>>>>>काही हरकत नाही. आम्हीही पुढे जाऊन श्रद्धा मध्ये ब. वडे, मूगभजी खाऊन साईप्रसाद मध्ये चहा प्यायलो.
अण्णा तिथे आनंदाने उड्या मारत आहेत, आणि ज्याला तुमचा 'स-म-स' गेला, तो सोटा घेऊन तुम्हाला शोधतोय... असं आत्ताच कानावर आलंय>>>>>:हहगलो:
आम्ही म्हणजे कोण? गडकरी
आम्ही म्हणजे कोण?
गडकरी तलावपाळी श्रद्धा साईप्रसाद मार्ग जरा गडबडीचा वाटतोय.
अहो नाही विवेक, मी ऑलरेडी
अहो नाही विवेक,
आणी त्यांनी ही ते समजून घेत्लय 
मी ऑलरेडी सॉरी म्हटलय त्यांना
जिप्सी आधी माझा नंबर कारण मला संयोज्कांनी आधी सांगितलय आणी मी पैसे पण ट्रान्सफर केलेत
ललिता-प्रीती सॉरी तुमचं नाव चुकून राहीलं, पण वडे-भजी खरच छान होते, आभार्स..
गडकरी तलावपाळी श्रद्धा
गडकरी तलावपाळी श्रद्धा साईप्रसाद मार्ग जरा गडबडीचा वाटतोय. >>>>>>नाही नाही. तसं काहीच नाही.
जिप्स्या.. वविला येणार आहेस
जिप्स्या.. वविला येणार आहेस का? तसे असेल तरच बॅग मिळेल.. पैसे ट्रान्सफर करुन टाक..
वविला येणार आहेस का?>>>>सॉरी
वविला येणार आहेस का?>>>>सॉरी रे. यंदा, नाही जमणार.
यंदा, नाही जमणार...>>>... तर
यंदा, नाही जमणार...>>>... तर मग 'ब्यॅग' देखिल विसरुन जा...
तर मग 'ब्यॅग' देखिल विसरुन
तर मग 'ब्यॅग' देखिल विसरुन जा... >>>>>भ्याआआआ
हां..ऽऽ राईट! मी वडे
हां..ऽऽ राईट! मी वडे आणेपर्यंत जिप्स्या पण गायबला नाही का! तरीच मी म्हटलं, की आपण माणसं मोजून गेलो होतो, तरी इतके वडे उरले कसे
यंदा, नाही जमणार...>>>... तर
यंदा, नाही जमणार...>>>... तर मग 'ब्यॅग' देखिल विसरुन जा. >> टांगारुना छळणार्यांचा णिषेद!!
Pages