मायबोली टीशर्ट आणि बॅग २०१४

Submitted by टीशर्ट_समिती on 23 June, 2014 - 00:56

तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.

मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.

  1. खिश्यासहित कॉलर टीशर्ट
  2. blue-collar-men-2014.jpg

    कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.

  3. राऊंडनेक टीशर्ट
  4. blue-round-men-2014.jpg
  5. लेडिज व्ही-नेक टीशर्ट
  6. T-shirt-Women-2014.jpg
  7. लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
  8. लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

  9. बॅग
  10. maayboli bag with logo 2014.jpg

    बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.

टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअ‍ॅड्रेस असेल.

** साईज :- **

size chart 1.jpg

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

Meassure.jpg

** टीशर्टांच्या किंमती :- **

price chart 2.jpg

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-


**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**

पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्‍यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

sthal 1.jpg

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.

tsh timing - 2.jpgसर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:

  1. कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
  2. पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.

टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.

ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.

अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्‍यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,

कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

** ऑर्डर कशी नोंदवाल?**

इथे टिचकी मारून

ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.

फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.

काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.

१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०

टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.

यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org

याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.

लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.

महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिरुद्ध२६, शक्यतो तुम्ही प्रत्यक्ष यावे असा आमचा आग्रह असतो. त्या निमित्ताने इतर मायबोलीकरांशी ओळखी, भेटी होतात. पण तुम्हाला अगदीच शक्य नसेल तर तुम्ही तुमचे इतर मायबोलीकर मित्र/ नॉन-मायबोलीकर मित्र/ नातेवाईक यांनाही पाठवू शकता टीशर्ट/ बॅग घ्यायला. तेही शक्य नसेल तर संयोजकांना विनंती करून त्यांना टीशर्ट/ बॅग घेऊन ठेवायला सांगू शकता आणि नंतर तुमच्या सवडीने पिक-अप करू शकता. हेही शक्य नसेल तर पोस्टाने पाठवायचाही ऑप्शन आहेच. Happy

माझे टिशर्ट कोणी घेउ शकेल का?मागच्या वर्षी आयडुने कलेक्ट केले होते .पण सध्या त्याच्याशी कॉटॅक्ट होत नाही आहे.

माहितीसाठी धन्यवाद. मी नातेवाइकांना विचारतो आणी त्यांना शक्य असेल तर ऑर्डर देतो Happy

केया, आणि अनिरुद्ध, आपले ठाणे, मुलुंड भागात कोणी नातेवाईक असतील तर मी पोचवु शकेन त्यांच्याकडे आपल्या ऑर्डर्स.

कमलेश्,तुम्ही ऑर्डर फॉर्ममध्ये पैसे भरायचा ऑप्शन ऑनलाईन असा सिलेक्ट केलाय ना? तसं असेल तर तुम्हाला एक दोन दिवसांत सयोजकांकडून मेल येईल ज्यात ऑनलाईन पैसे कुठल्या अकाऊंटमध्ये भरायचे त्याची सविस्तर माहिती दिलेली असेल.

कमलेश्, third party transfer साठि अगोदर नोद करावि लागते, ते केल्यावर १२ तासानन्तर तुम्हि पैसे transfer करु शकता

ऑनलाईन व्हेरीफेकेशन साठी आमची ब्यांक २४ तास लागतील सांगतेय Uhoh त्यात मी ईमेल पण आज चेक केलेय आजून वेळ आहे पण जर पैसे ट्रांस्फर नाही करता आले तर मित्रा मार्फत पाठवलेतर चालतील कां ?

download.jpg शर्ट समिती

ते ट्रान्सफर का काय म्हण्त्यात ते केलय आन चिठ्ठी बी पाठविलीय मेलान वाईस तेवढी पोच पाठवा म्हंजी कारभारणीला हिशेब द्याला बर- नायका Happy

मी ऑर्डर नोंदवलीय.मेल पण आला. माझी मैत्रीण येइल पैसे भरायला आणि शर्ट, बॅग घ्यायला.
मुग्धानन्द जी धन्यवाद पण मी तळेगाव दाभाडे येथे रहायला आहे. आणी ठाणे, मुलुंड भागात कोणी नातेवाईक नाही.

टीशर्ट समितीतले कुणी ऑनलाईन आहे का? Happy

"वेगळी साईझ" प्रकारातले दोन टीशर्ट घ्यायचे असतील ( दोन्हींची साईझ वेगवेगळी पण गळा आणि रंग एकच) तर दोन ऑर्डरी द्याव्या लागतील का?

वेगळी साईझ" प्रकारातले दोन टीशर्ट घ्यायचे असतील ( दोन्हींची साईझ वेगवेगळी पण गळा आणि रंग एकच) तर दोन ऑर्डरी द्याव्या लागतील का?..>>> गजानन,एक साईझ ऑर्डर फॉर्ममध्ये टाक. आणि दुसर्‍या साईझची मेल कर टि-शर्ट आयडीवर. त्यात लिही की ऑर्डर फॉर्ममध्ये दिलेल्या ऑर्डरबरोबरच अजुन एक अशी अशी ऑर्डर हवी आहे.

गजा.. वेगळी साईज असलेल्या बॉक्स मध्ये २२,२८ अश्या प्रकारे दोन्ही साईज लिही आणि नंतर पुढे संख्या बॉक्स मध्ये १,१ असे लिही..

मयुरेश, हिम्या धन्यवाद.

हिम्याच्या सांगण्याप्रमाणे ऑर्डर केली आहे. (एकूण ३ टीशर्ट्स.)

Pages