मायबोली टीशर्ट आणि बॅग २०१४

Submitted by टीशर्ट_समिती on 23 June, 2014 - 00:56

तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.

मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.

  1. खिश्यासहित कॉलर टीशर्ट
  2. blue-collar-men-2014.jpg

    कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.

  3. राऊंडनेक टीशर्ट
  4. blue-round-men-2014.jpg
  5. लेडिज व्ही-नेक टीशर्ट
  6. T-shirt-Women-2014.jpg
  7. लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
  8. लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

  9. बॅग
  10. maayboli bag with logo 2014.jpg

    बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.

टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअ‍ॅड्रेस असेल.

** साईज :- **

size chart 1.jpg

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

Meassure.jpg

** टीशर्टांच्या किंमती :- **

price chart 2.jpg

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-


**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**

पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्‍यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

sthal 1.jpg

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.

tsh timing - 2.jpgसर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:

  1. कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
  2. पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.

टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.

ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.

अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्‍यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,

कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

** ऑर्डर कशी नोंदवाल?**

इथे टिचकी मारून

ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.

फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.

काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.

१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०

टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.

यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org

याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.

लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.

महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्यक्ष येऊन पैसे भरणे अथवा टीशर्ट घेणे शक्य नाहीये. मुंबईमध्ये कुणी माझे टीशर्ट कलेक्ट करून माझ्या आईकडे दहिसरला नेऊन देऊ शकेल का? पैसेदेखील आईकडूनच घेता येतील.

सुधीर जी,

धन्यवाद . मी ऑर्डर नोंदवलीय.मेल पण आली.पुढची प्रक्रिया काय असेल? टी-शर्ट घेणे आणि रक्कम भरणे दोन्ही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन करणार आहे. (पुणे )

ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, त्याचा स्क्रीन शॉट पाठवत आहे
पहिल्या प्रयत्नात पैसे ट्रांस्फर करताना लास्ट स्टेपला नेट कनेक्शन बंद झाले होते Uhoh चुकून दोनदा पेमेंट झाले असल्यास कांय करावे. शक्यता कमी आहे तरीपण विचारतोय Proud

tsh timing - 2.jpgसर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:

  1. कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
  2. पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.

आत्ता आर्डर नोंदिवली. पल्याड्ची आर्डर याय्ची वाट बघत हुतो... पोच-पावती बी आलीय बघा...
धन्येवाद समिती...
Happy

ववि आला !!! Happy यंदाही घडावा अशी फार फार इच्छा आहे! बघुयात….

टी शर्टसची ऑर्डर मात्र नोंदवतेच! हो, गेल्यावेळ सारखं वरातीमागून घोडं नको! Wink

धन्यवाद टीशर्ट समिती पैसे पोहचल्याची ईमेल मिळाली, शिवाय एकदाच जमा झालेत हे ही समजले
कळावे
लोभ असावा Happy

समजा एखाद्याला कॉलरवाला एल साईझ शर्ट १ पेक्षा जास्त घ्यायचे असतील तर फॉर्म मधे कसे लिहिणार ?
उदा. एखाद्याला एकसारखेच ४ शर्ट घ्यायचे असतील तर ??? Uhoh

तसेच फॉर्म मधे कलर पण दिलेला नाहीये, जर राऊन्ड नेक मधे एक ब्लू कलर आणि एक रेड कलर हवा असेल तर कसे लिहिणार फॉर्म मधे ?

महेश, दिनेशदा :

समजा एखाद्याला कॉलरवाला एल साईझ शर्ट १ पेक्षा जास्त घ्यायचे असतील तर फॉर्म मधे कसे लिहिणार ?
उदा. एखाद्याला एकसारखेच ४ शर्ट घ्यायचे असतील तर ???
>>>
तर त्या एल साईज पुढे संख्या ४ लिहायची Uhoh

तसेच फॉर्म मधे कलर पण दिलेला नाहीये, जर राऊन्ड नेक मधे एक ब्लू कलर आणि एक रेड कलर हवा असेल तर कसे लिहिणार फॉर्म मधे ?
>>>>>>
बहुदा केवळ खालील प्रकारचे टीशर्ट्स मिळू शकतात :
१) र्कॉलर सहित निळा
२) राऊंड नेक निळा
३) व्हीनेक वाईन रेड

या खेरीज केवळ लहान मुलांच्या ऑर्डर्ससाठी पर्याय उपलब्ध आहेत (हो ना संयोजक? )

तुमच्या साईजचे टीशर्ट्स निवडताना वरील तिन्ही पैकीच निवडावे लागतील.

राऊंडनेक चा वाईन रेड. व्हीनेक चा ब्लू, विथ कॉलर वाईन रेड - मिळणार नाहीत Happy

रीया, पण ज्या सुचना दिल्या आहेत त्यामधे काय लिहिले आहे ?

>>१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.

याचा अर्थ काय होतो ? त्या चौकोनात शर्ट्सची संख्या ४ न लिहिता जाहिरातीत जे क्रमांक दिले आहेत, ते लिहावेत.
१ - कॉलरवाला ब्लू - पुरूष
२ - राऊन्डनेक ब्लू - पुरूष
३ - व्हीनेक रेड - स्त्री
४ - राऊन्डनेक - ब्लू आणि रेड - मुले

समजा मला २ फॅमिलिज साठी खालीलप्रमाणे शर्ट्स घ्यायचे आहेत एकूण ८
१ - कॉलरवाला ब्लू - पुरूष - २ शर्टस
३ - व्हीनेक रेड - स्त्री - २ शर्ट्स
४ - राऊन्डनेक - ब्लू आणि रेड - मुले - २६ साईझचे २ ब्लू आणि ३२ साईझचे २ रेड

तर मी एकाच ऑर्डर मधे या फॉर्म मधे कसे लिहू शकतो ? Uhoh
याला उपाय म्हणुन २ ऑर्डर्स प्लेस करा असे सुचवू नये, कारण तो उपाय मला माहित आहे.

महेशजी तुम्ही एका माबो आय्डीने दोन ऑर्डर देवू शकत नाही कारण ते शक्य नाही.
तुम्ही ऑर्डर बदलू शकतात.

जिथे साईज दिली आहे त्याचासमोरच्या रकानात किती टी शर्ट पाहिजे तो क्रंमाक लिहा. जर वेगळ्या साईजच्या एकापेक्षा जास्त पाहिजे तर, साईजच्या रकान्यात सगळ्या साईज लिहा(स्वल्पविराम टाकून) आणि संख्याच्या रकान्यात त्याच क्रमाने किती पाहिजे ते स्वल्पविराम टाकून लिहा.

कॉलरवाले टीशर्ट - फ्कत मोठ्यासाठी आणि रॉयल ब्लूम्ध्ये
राऊंडनेक टिशर्ट - लहान आणि मोट्यासाठी आणि रॉयल ब्लूम्ध्ये
व्हीनेक टिशर्ट - लहान आणि मोट्यासाठी आणि वाईन रेड्मध्ये.

नमस्कार
मी ऑनलाइन पेमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. बँकेमध्ये १४ अंकी नंबर पेयी म्हणून स्वीकारला जात नाही आहे. (आय.सी.आय.सी.आय बँक) काय करता येइल? कृपया मदत करणार का?
धन्यवाद.
वैजयंती

राजू, नाही हे पण सोपे नाहीये.

>>जिथे साईज दिली आहे त्याचासमोरच्या रकानात किती टी शर्ट पाहिजे तो क्रंमाक लिहा.
सुचनांमधे लिहिले आहेच
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
म्हणजे या चौकोनात केवळ १,२,३,४ यापैकी काही तरी एक लिहिता येईल.
आणि याचा अर्थ एका कलरचा एका साईझचा एकच शर्ट लिहिता येईल.

तसेच दुसरा मुद्दा,
>>जर वेगळ्या साईजच्या एकापेक्षा जास्त पाहिजे तर, साईजच्या रकान्यात सगळ्या साईज लिहा(स्वल्पविराम टाकून) आणि संख्याच्या रकान्यात त्याच क्रमाने किती पाहिजे ते स्वल्पविराम टाकून लिहा

हा उपाय केला तरी राऊन्डनेक मधे रंग कसा सांगणार (मुलांच्या शर्ट्ससाठी) ?

मी विचारल्याप्रमाणे ८ जाऊद्या साधे एकाच फॅमिलीसाठी जर २ मोठे आणि २ छोटे घ्यायचे असतील तरी प्रोब्लेम आहे.
उदा. समजा २ मुले आहेत आणि राऊन्डनेक मधे एक ब्लू साईझ २६ आणि दुसरा रेड साईझ ३२ हवा असेल तर फॉर्ममधे जो मधला कॉलम आहे त्यात काय लिहावे ?

आत्तापर्यंत कोणालाच कसा प्रोब्लेम आला नाही हा ? की माझी समजण्यात काही मेजर चूक होते आहे. Uhoh

Mahesh, attaparyant 64 maaybolikaranni tshirt ani bagchya order nondavalya ahet. Konalahi asa problem alel nahi. Tumhi thoda vel thambu shakanar asal tar tumhi order kashi deoo shakal tyacha screenshot taku shaken.

Dineshda. Order nondava. Apan kahitari karoo.

मंजूडी, धन्यवाद !
तसे केलेत तर कळू शकेल.

उदा. एकूण शर्ट्स ४
१. कॉलरवाला ब्लू - एल
२. व्हिनेक रेड - एम
३. राऊन्ड नेक - ब्लू २६ चा एक
४. राऊन्ड नेक - रेड ३२ चा एक

समजा एखाद्याला कॉलरवाला एल साईझ शर्ट १ पेक्षा जास्त घ्यायचे असतील तर फॉर्म मधे कसे लिहिणार ?
उदा. एखाद्याला एकसारखेच ४ शर्ट घ्यायचे असतील तर ??? अ ओ, आता काय करायचं

तसेच फॉर्म मधे कलर पण दिलेला नाहीये, जर राऊन्ड नेक मधे एक ब्लू कलर आणि एक रेड कलर हवा असेल तर कसे लिहिणार फॉर्म मधे?>>>>>>>>>

Tshirt order example.jpg

या ऑर्डरमध्ये लेडीज ( व्ही नेक) टिशर्ट - वाईन रेड कलर - M साईज ४, L साईज १, XXL साईज १ आणि वेगळी साईज ३० (हा लहान मुलांचा असल्याने राऊंड नेकमधे बनेल, पण रंग वाईन रेड असेल) १ टीशर्ट अशी संख्या आहे.

तसंच, राऊंड नेक टीशर्ट - रॉयल ब्लू कलर - S साईज १, M साईज १, L साईज ८, XL साईज १ आणि वेगळी साईज २४ (हा लहान मुलांचा असल्याने राऊंड नेकमधे बनेल, पण रंग निळा असेल) १ टीशर्ट अशी संख्या आहे.

कॉलर टीशर्टमधे वेगळा साईज ४८ हवा आहे १ टीशर्ट, ऑर्डर नोंदवलेली आहे, तो साईज बनवून घेता येणं शक्य आहे की नाही हे बघून संयोजक ऑर्डर देणार्‍याशी संपर्क साधतील. बनवता येणार असेल तर पैसे घेतील, बनवता येणार नसेल तर पैसे घेणार नाहीत.

आय होप आता व्यवस्थित स्पष्ट झालं असावं.

टी-शर्ट समिती तुम्हाला इमेल केली आहे पेमेन्ट संबंधी एक प्रश्न आहे त्याकरता .. माझ्या इमेल मध्ये पिक-अप बद्दलही कळवलं आहे पण आताच कळलं की पुण्याची एक मैत्रिण ही टी-शर्ट तिचा घेणार आहे तर शक्य झाल्यास मी माझे टी- शर्ट्स तिला पिक-अप करायला सांगेन आणि तिच्याकडून घेईन .. तिचा आणि तुमचा रिस्पॉन्स् आला की तुम्ही सांगितल्या प्रमाणे फॉर्म वर बदल करते .. तुमच्या उत्तराची वाट पहात आहे .. थँक्यू! Happy

Pages