तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.
- खिश्यासहित कॉलर टीशर्ट
- राऊंडनेक टीशर्ट
- लेडिज व्ही-नेक टीशर्ट
- लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
- बॅग

कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.


लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.
टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअॅड्रेस असेल.
** साईज :- **

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

** टीशर्टांच्या किंमती :- **

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-
**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**
पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
सर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:
- कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
- पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.
टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.
ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.
अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,
कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
** ऑर्डर कशी नोंदवाल?**
ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.
काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.
१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०
टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.
यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org
याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.
लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.
महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..
पाउस असला तरी जागा व वेळ तेच
पाउस असला तरी जागा व वेळ तेच रहाणार का ?
हो!
हो!
मला अजन एक बॅग हवी. मिळेल का
मला अजन एक बॅग हवी. मिळेल का ?
मायबोलीकरहो, मायबोली टीशर्ट
मायबोलीकरहो, मायबोली टीशर्ट आणि बॅग तयार आहेत! तुमची वाट बघत आहेत..
कधी आणि कुठे? अहो, जिथे पैसे भरलेत त्याच ठिकाणी, त्याच वेळी.
विसरलात कुठे ते? बरं हे घ्या डिटेल्सः
महत्त्वाचे:
१) टीशर्टच्या ऑर्डरचा फॉर्म भरतेवेळी टीशर्ट घेण्याचे जे स्थान निवडले होते, तिथेच टीशर्टस् पाठवले गेले आहेत. त्यामुळे पिक-अप पुणे लिहिले असेल तर टीशर्ट पुण्यातच मिळेल. ठाण्याचे टीशर्ट वाशीला, पुण्याचे दादरला असे पत्ते ऐनवेळी संयोजकांना पिसायला लावू नयेत!
२) तुम्हाला प्रत्यक्ष टीशर्ट/ बॅग घ्यायला करायला जमत नसेल तर तुमचे नातेवाईक/ मित्र/ मायबोली मित्र यांना तुम्ही तुमची ऑर्डर घ्यायला सांगू शकता. फक्त एकदा त्या-त्या संयोजकांना फोन करून कृपया तशी कल्पना द्यावीत.
ठाण्याचे टीशर्ट वाशीला,
ठाण्याचे टीशर्ट वाशीला, पुण्याचे दादरला असे पत्ते ऐनवेळी संयोजकांना पिसायला लावू नयेत!>>>>>हे भारीए
लिंबू.. उद्या प्रत्यक्ष
लिंबू.. उद्या प्रत्यक्ष भेटल्यावर बघुया.. जास्तीची असल्यास नक्की मिळेल..
उद्या नाही रे परवा हिम्या..
उद्या नाही रे परवा हिम्या.. लिंब्या,हिम्याकडुन नाही मिळाली तर माझ्याकडुन नक्की मिळेल. मी मुद्दाम दोन बॅग्स जास्तीच्या घेऊन ठेवल्या आहेत.
संयोजक, माझा टिशर्ट मी आधीच
संयोजक, माझा टिशर्ट मी आधीच सांगितल्याप्रमाणे अमित देसाई यांच्याकडे द्यावा कृपया.
किंवा मग मंजूडीकडे ठेवून द्या.
संयोजक हुशार झालेत. स्वतःहूनच
संयोजक हुशार झालेत. स्वतःहूनच जास्तीच्या बॅग्स करुन ठेवताहेत..
(No subject)
शिवाजी पार्कात कोण कोण येणार
शिवाजी पार्कात कोण कोण येणार आहे रविवारी?
मी, योकु आणि मुग्धानंद
मी, योकु आणि मुग्धानंद असणारेत शिवाजी पार्क ला..
ओक्के
ओक्के
माझे टीशर्ट्स पुण्यात हर्षा
माझे टीशर्ट्स पुण्यात हर्षा हा आयडी (अदिती) कलेक्ट करेल. ऑर्डरचा फॉर्म भरतेवेळीच टीशर्ट घेण्याचे स्थान "पुणे"च निवडले होते हां
तर काही प्रॉब्लेम नसावा !
बाकी, यंदा ववि घडण्याचे योग दिसत नाहीत …
मज्जा करा सगळे! आणि छान वृत्तांत लिहा!!
ओवी, आय विल मिस यु..आत्ताच
ओवी, आय विल मिस यु..आत्ताच तुझी आठवण आली होती आणि तुझा प्रतिसाद आला...
ओवी, मुकाट्याने वविला यायच
ओवी, मुकाट्याने वविला यायच आहे?
मुग्धा,तुला आग्रह करायचाय की
मुग्धा,तुला आग्रह करायचाय की प्रश्ण विचारायचाय नक्की??
मयुरेश
मयुरेश
लोक्स! मी पण तुम्हा सगळ्यांना
लोक्स! मी पण तुम्हा सगळ्यांना खूप miss करीन ….
हिम्स, मयुरेश, धन्यवाद. एक
हिम्स, मयुरेश, धन्यवाद.
एक बॅग जास्तीची हविच्चे , रविवारपर्यन्त राखुन ठेवा, रविवारी घेऊन जातो.
मनःपूर्वक पुनःश्च धन्यवाद.
<मी, योकु आणि मुग्धानंद
<मी, योकु आणि मुग्धानंद असणारेत शिवाजी पार्क ला..>
... (संयोजक, हलके घ्या)
पण मुग्धानंद तर ठाणे येथे असतील असे दिले आहे ना वरती :-), कारण वरती मोबाईल नं. पण दिलाय, असं नको वा व्हाय्ला कि ठाण्याला पोहोचल्यावर कळेल कि दादर ला या
.
.
दरवर्षीप्रमाणेच (atleast)
दरवर्षीप्रमाणेच (atleast) टिशर्ट वाटप(तरी) एकाच ठिकाणी पाहिजे होतं. सगळ्यांना एकत्रित भेटता तरी आले असते.
संयोजक योग्य ठिकाणी असतीलच.
संयोजक योग्य ठिकाणी असतीलच. आपण फॉर्म मधे दिलेल्या ठिकाणीच टी-शर्ट घेण्यास जावे.
काही अडचण आल्यास त्या त्या ठिकाण्च्या संयोजकास फोन करावा.
दरवर्षीप्रमाणेच (atleast)
दरवर्षीप्रमाणेच (atleast) टिशर्ट वाटप(तरी) एकाच ठिकाणी पाहिजे होतं. सगळ्यांना एकत्रित भेटता तरी आले असते.
>>.
vaa.... tu paravaa fir ki sagalikade pach pach minite.. aadhi vashila yeun tujhe t shirt ghe, tithun shivaji park la jaun tithalya lokanna bhet aani mag thanyat mukkaamaalaa ye.. aata punyatalya lokaannaahi bhetayache asel tar mag kathin aahe.
varache kahich jamale naahi tar final destination VAVI.
जिप्स्या, सकुसप ववि नोंदणी कर
जिप्स्या, सकुसप ववि नोंदणी कर पाहु. आजुन नाव आलेले नाही तुझे. :हेड्मास्टर् मोड ऑन:
(No subject)
साधना, मुग्धा aadhi
साधना, मुग्धा

aadhi vashila yeun tujhe t shirt ghe>>>>मी दादरला नोंदणी केली आहे.
टी-शर्ट संयोजक, मी नोंदणी
टी-शर्ट संयोजक, मी नोंदणी केल्यानुसार १ टी-शर्ट आणि २ बॅग्स जाई. यांच्याकडे सुपुर्द करण्यात याव्या.
धन्यवाद मल्लि आणि रीया रीया
धन्यवाद मल्लि आणि रीया
रीया , माझे टी शर्ट घेऊन ठेवशील का ? मी वविवारच्या आधी कधीही तुला वेळ असेल त्यावेळी तुझ्ह्याकडून घेईन .
Pages