तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.
- खिश्यासहित कॉलर टीशर्ट
- राऊंडनेक टीशर्ट
- लेडिज व्ही-नेक टीशर्ट
- लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
- बॅग

कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.


लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.
टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअॅड्रेस असेल.
** साईज :- **

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

** टीशर्टांच्या किंमती :- **

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-
**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**
पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
सर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:
- कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
- पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.
टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.
ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.
अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,
कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
** ऑर्डर कशी नोंदवाल?**
ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.
काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.
१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०
टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.
यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org
याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.
लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.
महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..
ओ पेमेन्ट कसं करायचं? मला
ओ पेमेन्ट कसं करायचं? मला काही इमेल नाही आली ऑनलाईन पेमेंट साठी. ऑर्डर नोंदवून १२ तास झाले.
मंजूडी, धन्यवाद, सविस्तर
मंजूडी, धन्यवाद, सविस्तर माहितीबद्दल,
खरे तर मी आधी हा विचार केला होता पण सुचना क्र. ३ मुळे गोंधळात पडलो होतो.
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
समजा मी ऑर्डर नोंदवली आणि ऑनलाईन पैसे अन्य कोणाच्या अकाऊन्ट मधुन भरले (नातेवाईक, मित्र, इ.) तर चालू शकेल ना ? किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन कोणी भरले तर ?
ऑपरेशन ऑर्डर सक्सेसफुल ऑर्डर
ऑपरेशन ऑर्डर सक्सेसफुल
ऑर्डर नोंद अशी एक मेल लगेच आली आहे. पण पैसे भरण्याची माहिती नाहीये, वेगळी मेल येईल ना त्यासाठी ?
महेश, पैसे कुठ भरायचे त्या
महेश, पैसे कुठ भरायचे त्या संदर्भात वेगळी मेल येईल.
ऑर्डर नोंदवली आहे. पोचपावती
ऑर्डर नोंदवली आहे. पोचपावती मिळाली धन्यवाद.
३. कुठल्याही चौकोनात हवे
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.>> एकूण म्हणजे मराठीमध्ये 'टोटल'. म्हणजे सगळ्या साईजच्या टीशर्टची टोटल संख्या किती होतेय हे कुठल्याही चौकोनात लिहिण्याची आवश्यकता नाही असा त्याचा अर्थ होतो.
लोकहो, ऑनलाईन पेमेंटचे डिटेल हे पोचपावतीसारखे ऑटोजनरेटेड ईमेलसारखे पाठवले जात नाहीत. यादी बघून कोणी कोणी हा पर्याय स्वीकारला आहे हे तपासून प्रत्येकाला एक वेगळी ईमेल पाठवली जाते. या सगळ्याला वेळ लागू शकतो, तेव्हा तुम्ही ऑर्डर नोंदवल्यापासून २४ तासांनंतरही ऑनलाईन पेमेंट डिटेल मिळाले नाहीत तर इथे कळवा.
आणि हो, इथे कळवायच्या अगोदर आपापल्या ईमेलचे स्पॅम फोल्डर तपासायला विसरू नका.
किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन
किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन कोणी भरले तर ?>>> कॅश भरू नका, त्यासाठी चार्जेस लागतात व ते चार्जेस ज्याच्या अकाऊंटला पैसे भरताय त्याला सोसावे लागतात.
V neck M ४० आणि लहान मुलाचा
V neck M ४० आणि लहान मुलाचा Round neck Blue २८ अशी ऑर्डर नोंदवली काल संध्याकाळी. तशी मेल आलीय. पण अजून ओनलाइन पेमेंट चे डिटेल्स मिळाले नाहीयेत.
लोकहो, ऑनलाईन पेमेंटचे डिटेल
लोकहो, ऑनलाईन पेमेंटचे डिटेल हे पोचपावतीसारखे ऑटोजनरेटेड ईमेलसारखे पाठवले जात नाहीत. यादी बघून कोणी कोणी हा पर्याय स्वीकारला आहे हे तपासून प्रत्येकाला एक वेगळी ईमेल पाठवली जाते. या सगळ्याला वेळ लागू शकतो, तेव्हा तुम्ही ऑर्डर नोंदवल्यापासून २४ तासांनंतरही ऑनलाईन पेमेंट डिटेल मिळाले नाहीत तर इथे कळवा.
आणि हो, इथे कळवायच्या अगोदर आपापल्या ईमेलचे स्पॅम फोल्डर तपासायला विसरू नका.>>> +११११! पर्फेक्ट.
टीशर्ट्ससाठी तुम्ही किती उतावीळ झाला आहात हे समजू शकतो. पण जऽऽरा धीर धरा लोकहो!
सगळ्यांना सगळे डिटेल्स पाठवले जातील.
ऑर्डर नोंदवली आहे. ऑनलाईन
ऑर्डर नोंदवली आहे. ऑनलाईन पेमेंटचा पर्याय दिला आहे. डिटेल्स कळताच पैसे ट्रान्सफर करते.
टीशर्टस पिकपची काही सोय होते का ते बघते.
डिटेल्स मिळाले. ऑनलाईन पेमेंट
डिटेल्स मिळाले. ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, त्याचा स्क्रीन शॉट पण पाठवला आहे. पैसे पोहचल्याच्या ईमेलची वाट पाहते आता …
धन्यवाद!!
ऑनलाईन पेमेंट केले आहे.
ऑनलाईन पेमेंट केले आहे.
मंजूडी, स्क्रीनशॉटसाठी
मंजूडी, स्क्रीनशॉटसाठी धन्यवाद! ती पोस्ट जिथे नियम लिहिलेत तिथे टाकली तरी चालेल. खरंच गोंधळ कमी होईल. तो 'संख्या' हा डब्बा सगळ्यात शेवटी असल्याने 'तो फक्त वेगळ्या साईझसाठीच्या टी-शर्टांच्या नगांच्या संख्येसाठी वापरायचा आहे' असे समजले जाण्याऐवजी त्यात टोटल लिहायची आहे, असेच समजले जातेय.
(टी-समिती: नियम लिहिलेत ना? ते वाचा आधी! आलेत टीशर्ट्स ऑर्डर करायला! :खोखो:)
तो 'संख्या' चौकोन 'वेगळी साईज' च्याच ओळीत असता तर गोंधळ कमी झाला असता.
गजा.. तो 'संख्या' चौकोन
गजा..
तो 'संख्या' चौकोन 'वेगळी साईज' च्याच ओळीत असता तर गोंधळ कमी झाला असता.>>
ह्य बद्दल धन्यवाद, पुढच्या वर्षी हा बदल नक्कीच सुचवला जाईल
ऑनलाईन पैसे भरून स्क्रीन्शॉट
ऑनलाईन पैसे भरून स्क्रीन्शॉट पाठवला आहे.
कृपया आमचे टी-शर्ट आधी रंगवायला / बनवायला घ्या!
आज आत्ता काही वेळापुर्वी
आज आत्ता काही वेळापुर्वी ऑनलाईन पेमेन्टची माहिती मेल मधे मिळाली आहे,
पण मी काही तांत्रिक कारणाने करू शकत नाहीये. म्हणुन नात्यात एकाला सांगितले करायला.
पण त्याचे म्हणणे असे आहे की पेयी अॅड केल्यावर पैसे ट्रान्स्फर करायला १२ ते २४ तासांचा काळ लागू शकतो.
त्यामुळे आज ट्रान्स्फर होईलच याची खात्री नाही. आणि शेवटची तारीख आजच आहे.
म्हणुन आधीच विचारत होतो की बँकेत जाऊन कॅश भरले तर नाही का चालणार ?
कृपया काही सुचवू शकाल का ? किंवा येथे कोणी जर माझ्या वतीने ट्रान्स्फर करू शकत असेल तर मी उद्या पर्यंत त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे भरायची सोय करू शकेन.
ऑनलाईन पेमेंट केले. पोचही
ऑनलाईन पेमेंट केले. पोचही मिळाली . धन्यवाद
पण त्याचे म्हणणे असे आहे की
पण त्याचे म्हणणे असे आहे की पेयी अॅड केल्यावर पैसे ट्रान्स्फर करायला १२ ते २४ तासांचा काळ लागू शकतो.
त्यामुळे आज ट्रान्स्फर होईलच याची खात्री नाही. आणि शेवटची तारीख आजच आहे. >>>
महेश, पेयी अॅड झाल्यावर पैसे ट्रान्स्फर करा. पेयी अॅड व्हायला वेळ लागतो, ते झालं की पैसे ट्रान्स्फर करायचे. लगेच होतात, त्याला वेळ लागत नाही. पण पेयी मात्र आजच्या आज अॅड करा.
>>पेयी अॅड व्हायला वेळ
>>पेयी अॅड व्हायला वेळ लागतो
त्यामुळेच विचारत होतो की यामुळे समजा आज नाही ट्रान्स्फर झाले आणि उद्या झाले तर चालेल का ?
>>पण पेयी मात्र आजच्या आज अॅड करा.
ते आजच करणार आहे लवकरात लवकर.
हो! धन्यवाद!
हो!
धन्यवाद!
ओके, धन्यवाद !
ओके, धन्यवाद !
पेमेंट मिळाल्याची मेल पण आली
पेमेंट मिळाल्याची मेल पण आली !
धन्यवाद!!!
आमचेही टी शर्टस शिवायला घ्या !
बुकिन्ग केलय. धन्यवाद. भेटूच
बुकिन्ग केलय.
धन्यवाद.
भेटूच रविवारी.
मी आताच मागणी नोंदवलीय.. ६
मी आताच मागणी नोंदवलीय.. ६ तारखेला दुपारीच भारतात येतोय.. पण येईनच दादरला.
ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे,
ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, त्याचा स्क्रीन शॉट पण पाठवला आहे. पैसे पोहचल्याच्या ईमेलची वाट पाहते >> ++
मलाही वाटतंय की पेमेंटचे इमेल फार आयत्यावेळी आले आहे. एचडीएफसी मधे किंवा एसबी आय मधे पेयी अॅड व्हायला वेळ लागतो, कधी कधी २४ तास. समजा इतर कामात बिझी असल्याने आज चुकून कोणी इमेल चेक केले नाही तर त्यांना पेमेंट करता येणार नाही आणि ऑर्डर कॅन्सल होईल. मी ही आता नशिबाने इमेल पाहीले म्हणुन लगेच पेमेंट करता आले.
तर सगळ्यांसाठी एखाद दिवस वाढवुन द्यावा असे सुचवते.
पेमेंट करायला गेल्यावर नक्की किती रक्कम हे शोधणे आले.
तर त्यासाठी माबो लॉगिन करुन या धाग्यावर येऊन पहावे लागले. पुढच्या वर्षीसाठी - जेव्हा ऑर्डर कन्फर्मचे इमेल येते त्यातच टोटल किती अमाउंट होते हे लिहुन आले तर चांगले ( इन्व्हॉइस प्रमाणे )
मी आत्ताच मागणी नोंदवलीय..
मी आत्ताच मागणी नोंदवलीय.. ऑनलाईन पेमेन्टची माहिती कळवा..
आनंद मैत्री टी शर्ट समिती मध्ये आहे का ?
माझ्यावतीने मायबोलीकर वेल ही
माझ्यावतीने मायबोलीकर वेल ही पैसे भरणार आहे पण फॉर्मवर मी प्रत्यक्ष असे लिहिले आहे तर ते बदलावे लागेल कि त्याशिवायही चालेल?
सावली, बहुतेक चालणार आहे
सावली, बहुतेक चालणार आहे उद्या पैसे भरले तरी. निदान वर तसे confirmation तरी मिळाले आहे.
पेयी आज अॅड केला आहे.
माझ्यावतीने मायबोलीकर वेल ही
माझ्यावतीने मायबोलीकर वेल ही पैसे भरणार आहे पण फॉर्मवर मी प्रत्यक्ष असे लिहिले आहे तर ते बदलावे लागेल कि त्याशिवायही चालेल?...>>>... 'वेल' प्रत्यक्ष येणार आहे ना, मग झालं... कशाला काळजी करताय?...

धन्स विवेक..... हो 'वेल'
धन्स विवेक.....
हो 'वेल' प्रत्यक्ष येणार आहे....
Pages