मायबोली टीशर्ट आणि बॅग २०१४

Submitted by टीशर्ट_समिती on 23 June, 2014 - 00:56

तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.

मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.

  1. खिश्यासहित कॉलर टीशर्ट
  2. blue-collar-men-2014.jpg

    कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.

  3. राऊंडनेक टीशर्ट
  4. blue-round-men-2014.jpg
  5. लेडिज व्ही-नेक टीशर्ट
  6. T-shirt-Women-2014.jpg
  7. लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
  8. लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

  9. बॅग
  10. maayboli bag with logo 2014.jpg

    बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.

टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअ‍ॅड्रेस असेल.

** साईज :- **

size chart 1.jpg

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

Meassure.jpg

** टीशर्टांच्या किंमती :- **

price chart 2.jpg

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-


**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**

पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्‍यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

sthal 1.jpg

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.

tsh timing - 2.jpgसर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:

  1. कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
  2. पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.

टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.

ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.

अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्‍यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,

कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

** ऑर्डर कशी नोंदवाल?**

इथे टिचकी मारून

ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.

फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.

काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.

१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०

टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.

यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org

याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.

लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.

महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धानंद तू दादरला येणार आहेस? जिप्स्या मी येतेय पार्कात. तुझे हिमालयाचे बाकिचे फोटो आण दाखवायला.

मीळाले मीळाले ...टी शर्ट मिळाले.... सगळे खुपच खुश आहेत...... अजुन माझ्या पर्यन्त टी शर्ट पोहोचायला जरा वेळ आहे .

पण टी शर्ट समिती चे मन : पुर्वक अभिनन्दन....

संयोजक, जाई. हिच्याकडे सुपुर्द केलेले माझ्यासाठीचे पार्सल (१ टी-शर्ट, २ बॅग्स) मिळाले. त्यावर चिकटवलेली (यावर्षीच घ्यावेत) ही प्रेमळ दटावणी वाचुन कंठ दाटुन आला. Proud तुमचे व जाई. हिचे आभार. Happy

हो !
भ्रमर यांनी टी शर्ट्स माझ्याकड़े द्या असे सांगितले आहे असे म्हटल्यावर अनुक्रमे योकू आणि विनय यांनी एकमेकांचे अभिनंदन केले व मला भ्रमर यांना पैकेटवर लिहिलेला संदेश वाचायला जरुर सांग असा विनंती वजा आग्रह केला . विनंती भरल्या गळ्याने केलेली होती हे आणखी एक विशेष Lol Proud Rofl

जाई., मलाच काल आं नाही सांगितंलंस की जास्तीचा टी-शर्ट आहे म्हणुन. मीच घेतला असतां की, बिना दटवणीचा एक. Happy

मयुरेश पुण्याचा नाही तो . आणि ज्यादा वगैरे नाही
ज्या मेम्बरासाठी घेतला होता त्याला तो फार मोठा होतो आहे
म्हणून कोनाला विकत हवा असेल तर सांगा अस म्हटल आहे

भ्रमर तुम्हाला अजुनही हवा असेल तर सांगा तस

जाई., मी घेतो तो टी-शर्ट. रच्याकने गेल्या दोन वर्षांत घेतलेल्या सेम साईझच्या टी-शर्ट पेक्षा यंदाचा थोडासा मोठा वाटतोय.

मला काल पार्कात येता आले नाही, संयोजक राखी ने माझे टीझ आणि बॅग्स तीच्या कडेच ठवल्याबद्दल तीचे खूप खूप आभार....

मला काल शिवतिर्थावर यायला जमले नाहि .. आता मला माझा टि- शर्ट व बॅग कसे मिळतील.?. आनंदमैत्री आला होता का.. ?

सतीश.. तुम्हाला कॉल केला होता दोन तीन वेळेस काल. तुमचा नंबर लागला नाही. टीशर्ट मुग्धानंद कडे आहेत तुमचे. मला वा तिला फोन करून कोऑर्डिनेट करून घेऊन जाता येतील. मुग्धाला फोन जर नाही लागला तर तसं मला विपू करा. काहीतरी जमवूच कारण लोकेशन्स वेगवेगळे आहेत ... Happy

मी घेतलेल्या टीशर्ट्स आणि बॅग सहितच ओवी, मी_केदार, रीया यांचेही टीझ माझ्याकडे आहेत योग्य त्या मोबदल्यात ते त्यांना देण्यात येतील. बॅग खुप्प्प्च छान आणि अतिशय उपयुक्त आहे. मुख्यतः जेन्ट्स टीझ चा रंग खुप मस्त आहे. (पुढील वर्षी तोच रंग लेडिजबायकांच्या टीझ ना द्यावा Wink ) टीझ आणि बॅग्स च्या कर्त्याकरवित्यांचे खुप खुप आभार्स!!! Happy

संयोजक, रीया न आल्याबद्दल वाटलेले पेढे आणि चॉकलेट्स तुमच्यापर्यंत आलीच नाहीत की कै??? Proud

काल रिया दिसली का रे कोणाला?????...>>> रिया.टुकटुक.. श्यामलीने तुझ्यासाठी आणलेली कॅडबरी आम्ही खाल्ली.. Proud

काल रिया दिसली का रे कोणाला?????...>>> रिया.टुकटुक.. श्यामलीने तुझ्यासाठी आणलेली कॅडबरी आम्ही खाल्ली..
मला न देताच Angry

Pages