फिफा विश्वचषक २०१४

Submitted by उदयन.. on 7 June, 2014 - 06:03

world-cup-2014-600x337.jpg

आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....

फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.

आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...

दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..

या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .

करुया सुरुवात ..!!!!!!

मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .

http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..

Tuesday 24 June

IMG_16726408502143_0.jpeg

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my

नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्था भाऊ ! आता महिनाभर पुनःप्रक्षेपण वगैरेची रेलचेल असेलच. नेट आहेच नाहीतर. मी स्वतः युरोपातले लीग्ज बर्‍यापैकी फॉलो करत असल्याने त्या संघांबद्दल/ खेळाडूंबद्दल जास्त आकर्षण आहे.
टीम मात्र अर्जेंटिना आवडते. १९८६ वर्ल्ड कपच्या स्पर्धेत माराडोनाच्या दैवी खेळामुळे अर्जेंटिनाचा फॅन झालो. आता मेस्सी.

मला एकच अशी टीम नाही आवडत. प्रत्येक टीम मधले प्लेअर आवडतात.
कका माझा आवडता होता. Happy

मेस्सी फॉर्म मध्ये आला म्हणणे जरा धारिष्ट्याचे होईल कारण फक्त एकच गोल केला आहे त्याने.

घानाची पहिली मॅच अमेरिकेसोबत आणि नंतर जर्मनीसोबत. घाना अमेरिकेला अपसेट करू शकते. मागच्या वेळी चांगली होती टीम.

सोनी सिक्स वर आहेत भारतात सामने.. ९:३० ल सुरु होणारे शक्य असतील तेव्हढे सामने बघण्याचा विचार आहे. अर्थात घरच्यांनी बघू दिले तर.. कारण वेगवेगळ्या चॅनेल्स वर असणार्‍या डेली सोप पुढे फुटबॉल मॅच बघायला मिळणे जरा अवघडच आहे..

+१ हिम्सकूल
यंदा स्पेन/जर्मनी/ब्राझील यांच्यतच चुरस.
बेल्जिअम डार्क हॉर्स आहे.

<< १९८६ वर्ल्ड कपच्या स्पर्धेत माराडोनाच्या दैवी खेळामुळे अर्जेंटिनाचा फॅन झालो. आता मेस्सी.>> यंदा मारॅडोना अर्जेंटीना संघाच्या तयारीसाठी खूप मेहनत घेतोय असंही वाचनात आलंय.

<< मधल्या काळात माराडोनाने फार गडबड गोंधळ घातला होता.. >> ' हँड ऑफ गॉड' ,असं म्हणून त्याने विश्वकपातल्या त्याच्या चूकीच्या गोलचं समर्थन केलं तरीही ती गोष्ट त्याला मनातून खात तर नव्हती ? नपेक्षां, 'फीटनेस'ची कांस धरलेला हा महान व जगभरच्या लोकांचा आत्यंतिक आवडीचा खेळाडू अचानक व्यसनाधीन कां व्हावा ? सॉरी, पण आतां हें विषयांतर नकोच; आतां तो पस्तावला आहे, सुधारला आहे, तंदुरूस्त आहे व देशासाठी , अर्जेंटीनाच्या संघासाठी जीव ओतून मेहनत करतोय, हें कौतुकास्पद ! बचावफळीला हुलकावण्या देत, चेंडू पायाला चिकटवल्यासारखा ज्या वेगाने तो गोलपर्यंत मुसंडी मारायचा तें दृश्य आठवलं कीं अजूनही त्याला मुजराच करावासा वाटतो, हें खरं !!

<< गेल्या वेळेस त्याचा सहकारी असलेला गॅब्रिएल बाटीस्टुटा अर्जेंटीनाचा कोच होता. >> ??

गेल्या वेळेस माराडोना कोच होता. खेळाडूंची त्यावरील श्रद्धा आणि मारडोनाचे ज्ञान यामुळे खूप अपेक्षा होत्या, पण पुर्‍या होऊ शकल्या नाहीत. उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीने ४-१ धुतले.
यावर्षीच्या विश्वचषकाशी, अर्जेंटिनाच्या तयारीशी माराडोनाचा काही संबंध नाही.

<< यावर्षीच्या विश्वचषकाशी, अर्जेंटिनाच्या तयारीशी माराडोनाचा काही संबंध नाही. >> नक्की ? तो ह्या वेळीं अर्जेंटीनाचा अधिकृत प्रशिक्षक नसला तरीही संघाच्या तयारीत त्याचा सहभाग आहे असं वाचल्याचं आठवतं.कदाचित, ' In August 2013, Maradona joined Argentine Primera D club Deportivo Riestra's staff as "spiritual coach" ', असं कांहीं तरी वाचल्यामुळेही गैरसमज झाला असावा. क्षमस्व.

मित्रांनो. माझा हा जुना धागा बघा. थोडी वातवरण निर्मिती. त्यांचे क्लब गेम पहाण म्हणजे अवर्णनीय मेजवानी.
http://www.maayboli.com/node/7979

मी तिथे असतानाचा राईजींग स्टार टीन एजर न्येमार आता मोठा स्टार झालाय. सोलारी परत आलेत. आणि नेहमी प्रमाणे ब्राझिल हॉट फेवरीट. तिथे तर हेक्झा म्हणजे सहावा कप त्यांची सिलेक्सिऑन (बिग टीम) जिंकणारच अशी खात्री असणार.

मी मराकाना स्टेडियमला भेट दिली होती. आता बरेच बदल केले आहेत.

ड्रीम फायनल म्हणजे अर्जेंटिना विरूद्ध ब्राझिल . ३-३ बरोबरीनंतर १२० व्या मिनिटाला न्येमारचा विजयी गोल. Happy

पहिला सामना चालू झाला तरी एकही प्रतिसाद नाही? उठा लोकहो.. पहिलाच गोल ब्राझिलचा सेल्फ-गोल. नेमारनं ब्राझिलकडून गोल करून नुकतीच बरोबरी केली.

न्येमार आणि ऑस्करचे गोल मस्त होते. ऑस्कर छानच खेळला.
पेनल्टी द्यायची जरूर नव्हती.
ब्राझिलचा बचाव कुमकुवत वाटला. दुसर्‍या भागात पण सेल्फ गोल होता होता वाचला. ३-४ वेळेस धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या टीम विरूद्ध असे होउन चालणार नाही.. फायनलच्या आधीच स्पेन, जर्मनी , नेदरलँडशी ब्राझिलचा सामना होणार आहे. बचाव असाच राहिला तर गेल्या वेळेसारखी आफत यायची.

मॅचेस बघायला फार कष्ट करावे लागणार. जॉन अब्राहमच्या (तो प्री मॅच आनालिसिस मधे होता) म्हणण्याप्रमाणे जर आपण २०२६ चा वर्ल्ड कप आयोजीत केला तर याजन्मी आपली टीम बघता येण्याची शक्यता आहे.

<< ब्राझिलचा बचाव कमकुवत वाटला >> इतकी व्यावसायिकता खेळात आली असूनही बचाव हें अजूनही ब्राझीलचं पारंपारिक व सर्वज्ञात मर्मस्थळ रहावं हें आश्चर्यकारकच म्हणायला हवं !
<< आपण २०२६ चा वर्ल्ड कप आयोजीत केला तर याजन्मी आपली टीम बघता येण्याची शक्यता आहे.>> माझ्यासारख्या ज्येष्ठाना या आशेमुळे तब्येत संभाळून रहाण्यासाठीं 'मोटीव्हेशन' मिळेल हें तरी नक्की ! Wink

बॉल-कॅमेरा टी.व्ही.टेलिकास्टमधे वापरला जाणार नाहीये का? आत्ता केवळ बॉल-कॅमेराच्या उत्सुकतेपोटी हायलाईटस पाहिल्या, पण तसा एकही शॉट दिसला नाही. Sad

गोल्डन बूटच्या मोजदादीत सेल्फ-गोल नाही धरत ना? Wink

मी स्वतः युरोपातले लीग्ज बर्‍यापैकी फॉलो करत असल्याने त्या संघांबद्दल/ खेळाडूंबद्दल जास्त आकर्षण आहे.
टीम मात्र अर्जेंटिना आवडते. १९८६ वर्ल्ड कपच्या स्पर्धेत माराडोनाच्या दैवी खेळामुळे अर्जेंटिनाचा फॅन झालो. आता मेस्सी. >>>> अमेय, सेम हिअर. मी बिग टाइम मेस्सी फॅन असल्यामुळे आवडती टीम ठरवताना फार गोंधळले आहे. नेहमी बार्सिलोनाच्या प्लेअर्सना सपोर्ट करताना टीम अशी split झाल्यावर मेस्सीसाठी अर्जेंटिना कि माझ्या बाकी प्लेअर्ससाठी स्पेन हे ठरवता येत नाही. बघु जर्मनी, स्पेन आणि अर्जेंटीना या टीम्सना जेव्हा जशी मॅच तेव्हा कोणत्या मॅचला सपोर्ट करायचं ठरवणार.

सुआरेझ साठी मीच दु:खी आहे. केवढी मोठी संधी हुकते आहे. सगळ्यांच्या आशावादाप्रमाणे खरंच इग्लंडविरुद्ध खेळायला असेल का? i have crossed my fingers.

कालची मॅच एका गोलनंतर पहाताच आली नाही. आज मात्र एक क्षणही चुकवणार नाही. मागच्या वर्ल्ड कप फायनल्सची टीम इतक्या लगेच पहायला मिळणार ही मोठीच ट्रीट आहे. शुक्रवारअसल्यामुळे उद्या झोपा काढता येतील हे केवढं मोठें भाग्य. Happy

Messi.jpg

काय मॅच चालू आहे. स्पेनने आघाडी घेतल्यावर आता वॅन पर्सी आणि रॉबेनच्या गोलमुळे हॉलंड जोरदार खेळतोय. स्पेनलस अ‍ॅटॅक वाढवायला हवा

कालची स्पेन - हॉलंड मॅच जबरीच झाली...
पहिला गोल पेनल्टी वर स्पेन ने मारल्यावर हॉलंडने जो काही धडाका लावला त्यात स्पेन पार धुतले गेले.. पेनल्टी चुकीची वाटली... त्याचा रेफरीवरचा राग स्पेन वर काढला गेला.. त्यात कॅसिलासच्या दोन महान चुका कारणीभूत ठरल्या.. व्हॅनपर्सीचा पहिला गोल अत्यंत बिनचूक पास आणि अचूक हेडरचा नमुना होता. नंतर रॉबेननी फारच सहज गोल मारला.. त्यांचे दुसरे गोल कॅसिलसच्या चुकांमुळे मिळाले... दोन्ही वेळा त्याला नीट क्लिअर करता आले नाही...
हॉलंड कडे पझेशन कमी असूनही त्यांनी जास्त वेळा गोअल पोस्टवर धडका मारल्या आणि स्पेनचा बचाव ढिला करुन टाकला.... हे असेच खेळत राहिले तर सेमी मध्ये नक्की..

<< त्याचा रेफरीवरचा राग स्पेन वर काढला गेला.. >> काल मेक्सिकोचाही सुरवातीचा गोल चूकीचा 'ऑफ्-साईड' म्हणून नाकारला गेला व मग सुरेख खेळ करून त्यानी कॅमेरूनला १-० ने हरवलं . अर्थात, एकमेकांतील ताळमेळ, चेंडूचा ताबा राखणे यांत मेक्सिकोचा खेळ सरसच होता .

अवेळीं हा वर्ल्डकप बघायचा म्हणजे मात्र जरा पंचाईतच आहे ! Wink
aa231.JPG

रात्री साडेतीनची इंग्लंड - इटली, अजून एक जबरदस्त मॅच ! दोन्ही संघांना खूप काही सिद्ध करण्यासारखे चाहत्यांसाठी. नक्की बघा.

उरुग्वे- कोस्टारिका मस्त चालू आहे. पहिल्या हाफमध्ये एक गोलने मागे पडूनही कोस्टारिका दुसर्‍या हाफमध्ये २-१ आघाडीवर. उरुग्वे बरोबरीचा प्रयत्न करतंय पण लुईस सुआरेजची अनुपस्थिती जाणवतेय. कोस्टारिकन २१ वर्षीय कँपबेल हा स्ट्रायकर चांगलाच लक्षवेधी ठरलाय. लांब पल्ल्याची किक मारुन पहिला गोल केलाच शिवाय आता जोरदार खेळ करतोय. यावर्षी इंग्लिश क्लब आर्सेनलसाठी त्याला जास्त संधी मिळाली नव्हती. आता सगळ्यांचे लक्ष नक्की जाईल त्याच्याकडे.

कोस्टारिका ३ - उरुग्वे १ फायनल स्कोअर

<< कोलंबिया आणि ग्रीस अगदीच झाली >> 'लाँग पासिंगच्या' जमान्यात कोलंबियाच्या आघाडीच्या फळीचं शैलीदार 'शॉर्ट पासिंग'. 'बॅक पसिंग' ' क्रॉस पासिंग' पाहून बरं वाटलं. अगदीं गोलच्या ताँडावरही त्यांचा याबाबतींतील ताळमेळ दिसून येत होता. अर्थात , २-० पिछाडीवर बराच काळ असूनही ग्रीस जिद्दीने खेळत होते पण काल त्याना नशीबाची साथ अजिबातच नव्हती, हेंही खरं .

इटली २ - इग्लंड १ फायनल स्कोअर.

इंग्लंड - इटली अपेक्षेनुसार वेगवान खेळ झाला. दोन्ही संघात तरुण, अनुनभवी पण गुणी खेळाडूंचा भरणा आहे. इटलीने मिळालेल्या संधींचा जास्त फायदा उठवला. तापट बॅलोटेली कधी नव्हे ते थंड डोक्याने खेळला. त्यानेच विजयी गोल केला. काही वर्षापूर्वी पक्क्या बचावावर भर देणारा इटली आता जास्त मोकळा, आक्रमक खेळ करताना दिसला. मध्यफळीतील अनुभवी खेळाडू व कॅप्टन , आन्द्रे पिएर्लो , हा इटालियन खेळाचा सूत्रधार. छोटे पासेस देत प्रतिपक्षाच्या बचावफळीला भेदत जातो. मधूनच एखादा लॉंग पास सरकवून देतो. कालही संपूर्ण आक्रमण त्यानेच नियंत्रित केले.
इंग्लंडच्या रुनी आणि जेरार्डकडूनही अश्याच अनुभवी खेळाची अपेक्षा होती पण दोघेही फिके पडले. रुनीला तर खुल्या गोलसमोर मस्त चान्स मिळाला होता बरोबरी करण्याचा.
२-१ पिछाडीनंतर इंग्लंडची एनर्जी कमीच झाली. शेवटची २० मिनिटे अगदीच विझल्यागत खेळले.

उरुग्वे आणि इग्लंडच्या पराभवामुळे इटली आणि कोस्टारिका या अवघड ग्रूपमधून पुढेजाण्यासाठी फेवरीट आहेत.
इंग्लंड - इटली अपेक्षेनुसार वेगवान खेळ झाला. दोन्ही संघात तरुण, अनुनभवी पण गुणी खेळाडूंचा भरणा आहे. इटलीने मिळालेल्या संधींचा जास्त फायदा उठवला. तापट बॅलोटेली कधी नव्हे ते थंड डोक्याने खेळला. त्यानेच विजयी गोल केला. काही वर्षापूर्वी पक्क्या बचावावर भर देणारा इटली आता जास्त मोकळा, आक्रमक खेळ करताना दिसला. मध्यफळीतील अनुभवी खेळाडू व कॅप्टन , आन्द्रे पिएर्लो , हा इटालियन खेळाचा सूत्रधार. छोटे पासेस देत प्रतिपक्षाच्या बचावफळीला भेदत जातो. मधूनच एखादा लॉंग पास सरकवून देतो. कालही संपूर्ण आक्रमण त्यानेच नियंत्रित केले.
इंग्लंडच्या रुनी आणि जेरार्डकडूनही अश्याच अनुभवी खेळाची अपेक्षा होती पण दोघेही फिके पडले. रुनीला तर खुल्या गोलसमोर मस्त चस्न्स मिळाला होता बरोबरी करण्याचा.
२-१ पिछाडीनंतर इंग्लंडची एनर्जी कमीच झाली. शेवटची २० मिनिटे अगदीच विझल्यागत खेळले.

उरुग्वे आणि इग्लंडच्या पराभवामुळे इटली आणि कोस्टारिका या अवघड ग्रूपमधून पुढेजाण्यासाठी फेवरीट आहेत.

Pages